२०२३ – २०२४ मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती जाहीर; वाचा पूर्ण महत्वाची माहिती! | MPSC Timetable 2025
MPSC Timetable 2025-mpsc.gov.in
MPSC November Timetable 2024
MPSC Timetable 2024: The Tentative Exam Schedule of the competitive examinations to be conducted in the year 2024 by the Maharashtra Public Service Commission (MPSC) has been released on the Commission’s website. State Services Examination, Civil Judge Junior Level and Judicial Magistrate First Class Examination, Maharashtra Secondary Service Non-Gazetted, Group-B Combined Preliminary Examination, Maharashtra Group-C Service Main Examination, Maharashtra Gazetted Technical Service Combined Preliminary Examination, Maharashtra Forest Service Main Examination Dates are uploaded. Download New MPSC Updated Time Tabel from below :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नुकतेच २०२३ – २०२४ मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती (दिनांक ३० नोव्हेंबर, २०२४ अखेर) आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेले आहे. यात महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा – 2023, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा – 2024 परीक्षांचा समावेश आहे. वेळापत्रक व सद्यस्थित डाउनलोड करण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक २०२३ व २०२४ – सद्यस्थिती नोव्हेंबर २०२४
MPSC Timetable 2025-mpsc.gov.in
MPSC Timetable 2025: The tentative schedule for MPSC exams in 2025 has been officially published on the MPSC website. The tentative schedules for various competitive exams conducted by MPSC are typically released annually. This includes dates for exams like the State Services (Preliminary and Mains), Subordinate Services, and other specialized exams for posts like Police Sub-Inspector, Engineering Services, etc. Candidates can download MPSC Exam Tentative Schedule 2025 from below link
MPSC च्या 2025 च्या परीक्षा संदर्भातील तात्कालिक वेळापत्रक अधिकृतपणे MPSC च्या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आले आहे. MPSC द्वारे आयोजित विविध स्पर्धात्मक परीक्षाांसाठी तात्कालिक वेळापत्रक सामान्यतः दरवर्षी जारी केले जाते. यामध्ये राज्य सेवा (प्रिलिम्स आणि मेन्स), अधीनस्थ सेवा, पोलिस उपनिरीक्षक, अभियांत्रिकी सेवा इत्यादी पदांसाठी होणाऱ्या परीक्षा यांची तारीख समाविष्ट असते. उमेदवार MPSC परीक्षा तात्कालिक वेळापत्रक 2025 खालील लिंकवरून डाउनलोड करू शकतात.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
MPSC महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ करीता प्रवेशपत्र जाहीर । MPSC Combined Preliminary Exam Admit Card Link
MPSC Exam Tentative Schedule 2025
टीप:- (१) शासनाकडून संबंधित संवर्ग पदांसाठी विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल; या गृहितकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे. शासनाकडून विहितवेळेत मागणीपत्र प्राप्त झाल्यासच नियोजित महिन्यामध्ये पदेविज्ञापित करणे व वेळापत्रकाप्रमाणो परीक्षा घेणे शक्य होईल.
(२) वेळापत्रक अंदाजित असून जाहिरातीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना/दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होवू शकतो, असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
(३ ) दाजित वेळापत्रकावावतची सद्यस्थिती दर्शविणारी अद्ययावत माहिती (Updates) वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
(४) संबंधित परीक्षेची परीक्षायोजना, अभ्यासक्रम, निवड पध्दत इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे/ येईल व आयोगाच्या धोरणानुसार वेळोवेळी अद्ययावत करण्यात येईल.
(५) संबंधित परीक्षेमधून भरावयाच्या पदसंख्येबाबतचा, सविस्तर तपशील जाहिरात/अधिसूचनेद्वारे उपलब्ध करुन देण्यात येईल,
६) वेळापत्रकातील सन २०२५ मधील दिनांक निश्चित नसलेल्या परीक्षांचे दिनांक संबंधित परीक्षेच्या जाहिरात / अधिसूचनेद्वारे स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येतील.
( ७) आयोगाकडून आयोजित परीक्षेच्या दिनांकास अन्य संस्थेची परीक्षा असल्यास उमेदवारास कोणती परीक्षा द्यावयाची आहे, याबाबतचा निर्णय उमेदवाराने स्वतः घेणे आवश्यक आहे.
Download MPSC Tentative Exam 2025 Schedule
MPSC Screening Test Date
MPSC Timetable 2024-mpsc.gov.in: विशिष्ट शैक्षणिक अर्हता आणि/अथवा अनुभवावर आधारित सरळसेवा भरतीकरीता खाली नमुद संवर्गाच्या प्रसिद्ध जाहिरातीस अनुसरुन संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षा संवर्गाच्या नावासमोर नमूद केलेल्या ठिकाणी, दिनांक व वेळेस आयोजित करण्यात येईल..या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
- परीक्षा योजना, अभ्यासक्रम, निवडप्रक्रिया इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध केल्याप्रमाणे राहील.
- संगणक प्रणालीवर आधारित परीक्षेचे निश्चित ठिकाण व इतर तपशील स्वतंत्रपणे अवगत करण्यात येईल.
- उपरोक्त तक्त्यातील अनुक्रमांक १ व २ वरील संवर्गांकरीता सामायिक चाळणी परीक्षा घेण्यात येईल तसेच अनुक्रमांक ३ वरील संवर्गाकरीता स्वतंत्र चाळणी परीक्षा घेण्यात येईल.
- सामायिक तसेच स्वतंत्र चाळणी परीक्षेमधील गुणांच्या आधारे अनुक्रमांक १ ते ३ वरील प्रत्येक संवर्गाकरीता संवर्गनिहाय स्वतंत्र गुणवत्तायादी तयार करण्यात येईल व त्याआधारे पुढील निवड प्रक्रिया राबविण्यात येईल.
MPSC Group C Timetable 2024-mpsc.gov.in
MPSC Timetable 2024-mpsc.gov.in: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा- २०२३ मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गाकरीता TCS या सेवा पुरवठादार संस्थेमार्फत दिनांक ०१ जुलै, २०२४ ते १३ जुलै, २०२४ रोजी टंकलेखन कौशल्य चाचणी आयोजित करण्यात आली आहे. तथापि दिनांक ०१ जुलै, २०२४ रोजी प्रथम सत्राकरिता उपस्थित उमेदवारांना टंकलेखन कौशल्य चाचणीदरम्यान काही तांत्रिक अडचणी उद्धवल्यामुळे टंकलेखन कौशल्य चाचणी पुर्ण होऊ न शकल्याने दिनांक ०१ जुलै, २०२४ ते ०३ जुलै, २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेली टंकलेखन कौशल्य चाचणी पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतला होता. दिनांक ०१ जुलै, २०२४ ते ०३ जुलै, २०२४ रोजी टंकलेखन कौशल्य चाचणी असलेल्या सर्व उमेदवारांची टंकलेखन कौशल्य चाचणी खालीलप्रमाणे नमूद केलेल्या ठिकाणी, दिनांक व वेळेस आयोजित करण्यात येईल..या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
MPSC Group C Lipik Tanklekhan Skill Test Time Table
1. टंकलेखन कौशल्य चाचणीच्या ठिकाणाचा तपशील व उमेदवारांना विहित करण्यात आलेली वेळ इत्यादी तपशील प्रवेशप्रमाणपत्राद्वारे अवगत करण्यात येईल. दिनांक १० जुलै, २०२४ ते १३ जुलै, २०२४ या कालावधित सुधारित मराठी टंकलेखन कौशल्य चाचणी असलेल्या उमेदवारांना नव्याने प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येतील. आयोगाद्वारे नव्याने उपलब्ध करुन देण्यात आलेल्या प्रवेश प्रमाणपत्रांच्या आधारे परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात येईल.
2. कर सहायक पदासाठी ज्या उमेदवारांना मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेतील टंकलेखन कौशल्य चाचणी देणे आवश्यक आहे अशा उमेदवारांची मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी एकाच सत्रात येणार नाही, याची दक्षता घेण्यात आलेली आहे.
3. यापूर्वी दिनांक १४ जून, २०२४ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकात नमुद केल्याप्रमाणे दिनाक १० ते १३ जुलै, २०२४ या कालावधित आयोजित लिपिक टंकलेखक (इंग्रजी) आणि कर सहायक (इंग्रजी) टंकलेखन कौशल्य चाचणीच्या वेळापत्रकात कोणताही बदल नाही तसेच दिनांक १४ जून, २०२४ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकातील इतर अटी व शर्तीमध्ये बदल नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
Download MPSC Group C Lipik Tanklekhan Schedule
MPSC May 2024 Tentative Schedule
MPSC Timetable 2024-mpsc.gov.in: The Maharashtra Public Service Commission has released the tentative timetable for May 2024 exams. It will be held for the posts of groups B and C, civil judge junior division posts and other posts in police, revenue, transport, forest departments etc.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन 2023 व 2024 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती जाहीर,
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2024 मधील नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा, महाराष्ट्र 3 अराजपत्रित गट- ब व गट- क सेवा संयुक्त परीक्षा आणि महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा या तीनही परीक्षांच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
MPSC Announces Tentative Schedule of May 2024
Download Full MPSC Tentative Schedule 2024
MPSC Nagari Seva Purv Pariksha Time Table 2024
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालं असून 6 जुलै 2024 रोजी ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. शासनाकडून प्राप्त सुधारित मागणीपत्रानुसार या परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण 524 पदांचा सुधारित सविस्तर तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आले असल्याचे आयोगाने कळविले आहे. या परिक्षेसाठी दिनांक 29 डिसेंबर, 2023 रोजी एकूण 274 रिक्त पदांकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरातीनुसार ही परीक्षा दिनांक 28 एप्रिल, 2024 रोजी घेण्याचे नियोजित होते. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षण अधिनियम 2024, 26 फेब्रुवारी, 2024 नुसार राज्याच्या नियंत्रणाखालील पदांवरील नियुक्तीकरिता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठी आरक्षणाची तरतूद विहित करण्यात आली आहे. या अधिनियमातील तरतुदी शासन निर्णय,27 फेब्रुवारी, 2024 नुसार विषयांकित संवर्गाच्या विज्ञापित जाहिरातीसाठी लागू आहेत. प्रस्तुत प्रकरणी सामाजिक व शैक्षणिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठी आरक्षण निश्चिती करून सुधारित मागणीपत्र पाठविण्याबाबत शासनास कळविण्यात आले. यास्तव, आयोगाच्या दिनांक 21 मार्च, 2024 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रस्तुत परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याचे जाहीर करण्यात आले होते.
Maharashtra Gazetted Civil Services Combined Preliminary Examination Date 2024
शासनाकडून प्राप्त सुधारित मागणीपत्रानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 या परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण 524 पदांचा सुधारित तपशील खालीलप्रमाणे आहे.
- अर्ज सादर करण्याचा कालावधीदिनांक 09 मे, 2024 रोजी 14.00 ते दिनांक 24 मे, 2024 रोजी 23:59 पर्यंत आहे.
- ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 24 मे, 2024 रोजी 23:59 पर्यंत*
- भारतीय स्टेट बॅंकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक 26 मे, 2024 रोजी 23:59 पर्यंत आहे.
- चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 27 मे, 2024 रोजी आहे.
पदे व संख्या
(एक) राज्य सेवा परीक्षा :- एकुण पदे 431
(1) उप जिल्हाधिकारी, गट-अ (एकूण 07 पदे)
(2) सहाय्यक राज्य कर आयुक्त, गट-अ (एकूण 116 पदे)
(3) गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी),गट-अ (एकूण 52 पदे)
(4) सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ (एकूण 43 पदे)
(5) सहायक आयुक्त/ प्रकल्प अधिकारी (एकात्मिक अदिवासी विकास प्रकल्प)(श्रेणी दोन), गट-अ (एकूण 03 पदे)
(6) उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट-अ (एकूण 07 पदे)
(6) उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट-अ (एकूण 07 पदे)
(7) सहायक कामगार आयुक्त, गट – अ (एकूण 02 पदे),
(8) सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, गट – अ (एकूण 01 पद),
(9) मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी, गट-ब (एकूण 19 पदे),
(10) सहायक गट विकास अधिकारी, गट-ब (एकूण 25 पदे),
(11) सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब (एकूण 1 पदे),
(12) उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब (एकूण 5 पदे),
(13) कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता-मार्गदर्शन अधिकारी, गट-ब (एकूण 07 पदे),
(14) सरकारी कामगार अधिकारी, गट – ब (एकूण 04 पदे),
(15)सहायक प्रकल्प अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी/ प्रशासकीय अधिकारी/ संशोधन अधिकारी / गृहप्रमुख /प्रबंधक, गट-ब (एकूण 04 पदे),
(16) उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब (एकूण 7 पदे),
(17) सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण), आदिवासी विकास आयुक्तालय, गट-ब (एकूण 52 पदे),
(18) निरीक्षण अधिकारी (पुरवठा), गट-ब (एकूण 76 पदे),(दोन )
(दोन) महाराष्ट्र वनसेवा परीक्षा – महसूल व वन विभाग (एकूण48 पदे)
(1) सहायक वनसंरक्षक, गट-अ, (एकूण 32 पदे) ,(2) वनक्षेत्रपाल, गट-ब, (एकूण 16 पदे)
(तीन ) महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा – मृद व जल संधारण विभाग (एकूण 45 पदे)
(1) उपविभागीय जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-अ, (एकूण 23 पदे)
(2) जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब, (एकूण 22 पदे).
MPSC Timetable 2024
MPSC Timetable 2024-mpsc.gov.in: The Maharashtra Public Service Commission has released the tentative timetable for 2024 exams. It will be held for the posts of groups B and C, civil judge junior division posts and other posts in police, revenue, transport, forest departments etc.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2024 मधील नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा, महाराष्ट्र 3 अराजपत्रित गट- ब व गट- क सेवा संयुक्त परीक्षा आणि महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा या तीनही परीक्षांच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
MPSC Announces Tentative Schedule of 2022 Exams
Download MPSC Time Table 2023
MPSC Announces Tentative Schedule of 2024 Exams
Table of Contents
new time table 2025 out
Thanks sir
BMC chi bharti kadji honar aahe…?
Sir tell me about please….12th base job police officer for Maharashtra..I pursuing 3rd year
Job achieve