MHT सीईटीचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध !! येथे करा डाउनलोड
MHT-CET Exam Admit Card
MHT-CET Exam Admit Card 2023
MHT-CET Exam Admit Card: MHT CET PSM group exam which is important for admission to professional courses like engineering, medical, pharmacology, agriculture etc. is being held from next 9th in various sessions. The admit card of this examination has been made available by CET Cell. Candidates can download MHT CET Admit Card 2023 from below direct Link:
अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषधनिर्माणशास्त्र, कृषी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महत्त्वाच्या असलेल्या एमएचटी सीईटी पीएसएम ग्रुपची परीक्षा येत्या ९ पासून विविध सत्रात होत आहे. या परीक्षेची प्रवेश पत्र सीईटी सेलने रात्री पासून ८ संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहेत. खाली दिलेल्या लिंक वरून प्रवेशपत्र डाउनलोड करा.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
एमएचटी सीईटी परीक्षेसाठी यंदा विक्रमी नोंदणी झाली आहे. ६ लाख १९ हजार ०३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये पीसीबी ग्रुपसाठी २ लाख ९५ हजार ८४४ आणि पीसीएम ग्रुपसाठी ३ लाख २३ हजार १८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
MHT CET Exam Date 2023
- पीसीएम ग्रुपसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची सीईटी ९ मे पासून सुरु होणार असून १३ मे रोजी संपणार आहे.
- तर पीसीबी ग्रुपची परीक्षा १५ मे पासून सुरु होणार असून २० मे रोजी संपणार आहे.
- या परीक्षा कालावधीत विविध सत्रात परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना सत्र आणि वेळा निश्चित करुन तारीख आणि सत्र वेळांची माहिती प्रवेशपत्रावर देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र गुरुवारी रात्री ८ वाजता ऑनलाईन पद्धतीने देण्यात आल्याची माहिती आयुक्त महेन्द्र वारभुवन यांनी दिली. विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढावी, प्रवेशपत्रावरील परीक्षेचा दिनांक, वेळ, परीक्षा केंद्राचा पत्ता आदी बाबी वाचून घेण्याच्या सूचना सीईटी सेलकडून देण्यात आल्या आहेत. तसेच परीक्षेच्या दिवशी केंद्रावर वेळेपूर्वी पोहचण्याची दक्षता विद्यार्थ्यांनी
Documents To Be Carry With MHT CET Hall Ticket 2023
परीक्षेस जाताना प्रवेश पत्राबरोबरच स्वत:चे मूळ ओळख प्रमाणपत्रासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट यापैकी एक ओळखीचा पुरावा म्हणून आणणे बंधनकारक असल्याचे सीईटी सेलकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Download MHT CET Admit Card 2023
To Download Admit Card for CET- 2023 Click On Below Links :
SN | CET Name | Department | Link |
---|---|---|---|
1 | MAH-MBA/MMS-CET-2023 | Technical Education | Click Here to View Admit Card |
2 | MHTCET (PCM Group) | Technical Education | Click Here to View Admit Card |
MHT CET PCM 2022 Admit Card
MHT-CET Exam Admit Card: The admit card has been declared for MHT CET PCM Group Exam. The exam will be conducted on the 5th of August 2022. Click on the below link to download the hall tickets.
अभियांत्रिकी (बीई), औषधनिर्माणशास्त्र (बी.फार्मसी) यांसह बी.एस्सी (कृषी) या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी (MHT CET) परीक्षा घेतली जाणार आहे. यापैकी पीसीएम ग्रुपच्या परीक्षेला ५ ऑगस्टपासून सुरवात होणार आहे. या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना मंगळवारी (ता.२६) प्रवेशपत्र (ॲडमिटकार्ड) उपलब्ध करून दिलेले आहेत. खाली दिलेल्या लिंक वरून प्रवेशपत्र डाउनलोड करा.
- विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांच्या संदर्भात सीईटी सेलतर्फे सूचना जारी केलेल्या आहेत.
- परीक्षेला सामोरे जाण्यासाठी प्रवेशपत्राची आवश्यकता असणार आहे.
- टप्याटप्याने सीईटी सेलतर्फे अभ्यासक्रमांचे प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाते आहेत.
- एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी सर्वाधिक विद्यार्थी प्रविष्ट होत असतात. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित (पीसीएम) आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र (पीसीबी) अशा दोन ग्रुपमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे.
- यापैकी पीसीएम ग्रुपची परीक्षा ५ ते ११ ऑगस्ट या कालावधीत घेतली जाईल.
- १२ ते २० ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या पीसीबी ग्रुपच्या परीक्षेसाठी २ ऑगस्टपासून प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/3vlNXmi
MHT CET Admit Card 2022
MHT-CET Exam Admit Card: The admit card has been announced for the Entrance Examinations conducted for various courses in the Technical Education/ Higher Education Department. Click on the below link to download the hall tickets.
तंत्रशिक्षण/ उच्च शिक्षण विभागाच्या विविध अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षांची प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलेली आहेत. याबाबतचे नियोजन तसेच प्रवेश परीक्षांच्या तारखा राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (सीईटी सेल) वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
MHT CET Hall Tickets Download
SN | CET Name | विभागाचे नाव | प्रवेशपत्र डाउनलोड करा |
---|---|---|---|
1 | MAH-B.Ed.-M.Ed. (Three Year Integrated Course) | उच्च शिक्षण विभाग | View Admit Card |
2 | MAH-BPED | उच्च शिक्षण विभाग | View Admit Card |
3 | MAH-LLB-5 Yrs. (Integrated Course) | उच्च शिक्षण विभाग | View Admit Card |
4 | MAH-M.Ed. | उच्च शिक्षण विभाग | View Admit Card |
5 | MAH-MARCH | तंत्रशिक्षण | View Admit Card |
6 | MAH-MHMCT | तंत्रशिक्षण | View Admit Card |
MHT CET 2022 Hall Tickets
MHT-CET Exam Admit Card : MHT CET Admission examination hall tickets will be available on the 23rd of July 2022. visit CET Cell website to download the admit card. The exam will be held from 2nd August to 25th of August 2022. Further details are as follows:-
उच्च शिक्षण विभागाच्या विविध अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षांची हॉल तिकिटे २३ जुलैपासून ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. याबाबतचे नियोजन तसेच प्रवेश परीक्षांच्या तारखा राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (सीईटी सेल) वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
- सीईटी सेलमार्फत मे महिन्यापासूनच विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
- तसेच या परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले होते.
- उच्च शिक्षण विभागाच्या विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचा यामध्ये समावेश होता.
- या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी आवश्यक असणारी हॉल तिकिटे सिटी सेलमार्फत टप्प्या-टप्प्याने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
- या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी आवश्यक असणारी हॉल तिकिटे सिटी सेलमार्फत टप्प्या-टप्प्याने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
- याचसोबत या अभ्यासक्रमांच्या परीक्षाही ऑगस्ट महिन्यात होणार असून, त्यांच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत.
२ ते २५ ऑगस्टदरम्यान या परीक्षा होणार असून, हॉल तिकीट मिळण्याच्या तारखांसोबत या परीक्षांच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत. हे सर्व अभ्यासक्रम पदव्युत्तर असल्यामुळे त्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या पदवी तृतीय वर्षाचे निकाल जाहीर होणे आवश्यक आहे. विविध विद्यापीठांचे निकाल जाहीर होण्याचे वेळापत्रक वेगवेगळे असल्यामुळे, गेल्या वर्षी या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी डिसेंबर महिना उजाडला होता. त्या तुलनेत यंदा ही प्रक्रिया लवकर होण्याची शक्यता आहे.
MHT CET Important Dates
अभ्यासक्रम -हॉल तिकीट- परीक्षा तारीख
- लॉ (५ वर्षे) – २३ जुलै-२ ऑगस्ट
- बीपीएड- २३ जुलै- २ व ३ ऑगस्ट
- एमपीएड- २३ जुलै-२ ऑगस्ट
- बीएड-एमएड-२३ जुलै -२ ऑगस्ट
- लॉ (३ वर्षे)-२४ जुलै-३ ऑगस्ट
- बीएबीएड, बीएस्सीबीएड-२५ जुलै -४ ऑगस्ट
- बीएड इलेक्टिव्ह- ११ ऑगस्ट- २१, २२ ऑगस्ट
- एमपीएड- ११ ऑगस्ट- २२ ते २५ ऑगस्ट
MHT-CET Exam Admit Card : हॉटेल मॅनेजमेंट सीईटीसाठी हॉलतिकीट जारी करण्यात आले आहेत….
MAH HMCT CET 2020 Admit Card: महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (CET Cell) ने MH CET 2020 परीक्षेचे हॉलतिकीट जारी करण्यात आलं आहे. प्रवेश परीक्षा बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी (BHMCT) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आयोजित केली जाते. सीईटी सेलचे अधिकृत संकेतस्थळ cetcell.mahacet.org वरून हॉलतिकीट डाऊनलोड करता येईल. MH CET HMCT प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी उमेदवारांना आपला रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर आणि पासवर्ड किंवा जन्मतारखेच्या सहाय्याने अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येईल.
MAH BHMCT परीक्षा कधी होणार?
MAH BHMCT परीक्षा येत्या १० ऑक्टोबर रोजी होणार आहे. परीक्षेसाठी जे अॅडमिट कार्ड जारी करण्यात आलंय त्यावर उमेदवाराची सर्व माहिती उदा. – अर्ज क्रमांक, अनुक्रमांक, परीक्षेची रिपोर्टिंग वेळ आणि परीक्षा केंद्राची माहिती आदी देण्यात आली आहे.
MAH HMCT CET 2020 Admit Card: पुढील पद्धतीने अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा –
- – सर्वात आधी अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर जा.
- – यानंतर उमेदवारांनी आपला रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख आदी माहिती भरावी.
- – अॅडमिट कार्ड तुमच्या स्क्रीनवर दिसू लागेल.
- – तुमचं अॅडमिट कार्ड नीट तपासून डाउनलोड करा.
हॉलतिकीट डाऊनलोड – https://bit.ly/33C8rcI
MHT-CET 2020: PCM ग्रुपचे अॅडमिट कार्ड जारी
MHT CET 2020 परीक्षेसाठी पीसीएम ग्रुपसाठी हॉलतिकीट जारी झाले आहेत.
MHT-CET Admit Card 2020: महाराष्ट्र सीईटी कक्षाने सामायिक प्रवेश परीक्षेसाठी (MHT CET 2020) प्रवेश पत्र जाहीर केले आहेत. सीईटी सेलची अधिकृत वेबसाईट mhtcet2020.mahaonline.gov.in वर हे अॅडमिट कार्ड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. फिजिक्स-केमिस्ट्री-मॅथ्स अर्थात पीसीएम (PCM) ग्रुपसाठी हे अॅडमिट कार्ड जारी करण्यात आले आहेत. याआधी तीन दिवसांपूर्वी २६ सप्टेंबर रोजी PCB गटाचे अॅडमिट कार्ड जारी करण्यात आले होते.
उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या ‘CET’ पुन्हा पुढे ढकलल्या
या अॅडमिट कार्डवर परीक्षा केंद्रासंबंधीची माहिती, रिपोर्टिंगची वेळ, दिवस आणि अन्य माहिती उपलब्ध आहे. MHT-CET 2020 चे हॉलतिकीट डाऊनलोड करण्यासाठी उमेदवारांना आपला अॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्डची आवश्यकता भासेल.
MHT-CET Admit Card 2020 कसे डाऊनलोड करायचे वाचा…
- – सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळ mhtcet2020.mahaonline.gov.in वर जा.
- – यानंतर हॉल तिकिट या पर्यायावर क्लिक करा.
- – तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाका.
- – नंतर आपला विषय PCB / PCM यापैकी एक निवडा.
- – यानंतर सर्च बटणावर क्लिक करा.
- – MHT CET हॉलतिकीट तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
- – हे हॉलतिकीट तुम्ही डाऊनलोड करून त्याचं एक प्रिंट आऊट घेऊन ठेवा.
MHT-CET 2020 परीक्षेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर हॉलतिकीट सोबत बाळगणे अनिवार्य आहे. हॉलतिकीट शिवाय कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्राच्या आत प्रवेश दिला जाणार नाही.
Important Links For MHT-CET Exam Admit Card | |
प्रवेशपत्र डाउनलोड : https://bit.ly/2S5Bu22 |
MHT-CET 2020: PCB ग्रुपचे अॅडमिट कार्ड जारी
MHT-CET Exam Admit Card : MHT-CET 2020 परीक्षेचे PCB ग्रुपचे अॅडमिट कार्ड जारी झाले आहे. कसे डाऊनलोड करायचे ते जाणून घ्या….
MHT-CET Exam Admit Card : MHT-CET Admit Card 2020: महाराष्ट्र राज्याच्या सीईटी कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या कॉमन अॅडमिशन टेस्ट अर्थात MHT-CET 2020 परीक्षेचे अॅडमिट कार्ड सीईटी सेलने आज, शनिवार २६ सप्टेंबर पासून उपलब्ध केले आहेत. विद्यार्थ्यांना mhtcet2020.mahaonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन हे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येतील. ते कसे डाऊनलोड करायचे याबाबतचा सविस्तर तपशील आम्ही या वृत्तात पुढे देत आहोत.
हे अॅडमिट कार्ड केवळ PCB ग्रुपचे आहेत. एमएचटी-सीईटी परीक्षा १,२,४,५,६,७,८ आणि ९ ऑक्टोबर २०२० रोजी होणार आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या MHT-CET अॅप्लिकेशन फॉर्म नंबर आणि पासवर्डच्या सहाय्याने हे हॉलतिकीट डाऊनलोड करायचे आहे. इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांसाठी म्हणजेच PCM ग्रुप परीक्षेचे अॅडमिट कार्ड अद्याप उपलब्ध झालेले नाहीत.
यापूर्वी बी.फार्मसाठी सीईटी सेलने अॅडमिट कार्ड जारी केले आहेत. हॉलतिकिटावर परीक्षेची तारीख, वेळ, परीक्षा केंद्राचा पत्ता, विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती देण्यात आली आहे. तसेच कोविड-१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रावर घ्यावयाच्या खबरदारीविषयीदेखील अॅडमिट कार्डमध्ये विस्तृत माहिती देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी अॅडमिट कार्डवरील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे, त्यात कोणत्याही प्रकारची चूक वा त्रुटी आढळल्यास संबंधित यंत्रणेशी तत्काळ संपर्क साधायचा आहे.
MHT CET Admit Card 2020 कसे डाऊनलोड कराल?
- – mhtcet2020.mahaonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जा.
- – MHT CET Admit Card 2020 डाऊनलोड लिंकवर क्लिक करा.
- – अॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगइन करा.
- – आता स्क्रीनवर तुमचे MHT CET Admit Card 2020 अॅडमिट कार्ड दिसेल.
- – अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंट आऊट काढून सुरक्षित ठेवा.
अॅडमिट कार्ड डाऊनलोड कसे करायचे याची विस्तृत प्रोसेस सीईटी कक्षाने दिली आहे.
एकूण ४ लाख ४५ हजार ७८० विद्यार्थ्यांनी PCM आणि PCB कोर्सेसच्या सीईटी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. जे विद्यार्थी महाराष्ट्राबाहेरचे आहेत आणि त्या विद्यार्थ्यांकडे सक्षम प्राधिकरणाचे डोमिसाईल प्रमाणपत्र आणि जन्मदाखला किंवा रेसिडेन्शिअल सर्टिफिकेट आहे ते विद्यार्थी एमएचटी सीईटी बी फार्म परीक्षा देऊ शकतात.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For MHT-CET Exam Admit Card | |
PDF जाहिरात : https://bit.ly/2S4cfgg | |
प्रवेशपत्र डाउनलोड : https://mhtcet2020.mahaonline.gov.in/ |
सोर्स : म. टा.
Table of Contents