JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेत गैरप्रकार!! – Pune Mahanagarpalika Bharti Result

Pune Mahanagarpalika Bharti Result

सध्या सुरु असलेल्या पेपर फुटीच्या बातम्यांमध्ये अजून एक भर पडली आहे. प्राप्त माहिती नुसार, पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या भरती परीक्षेत गैरप्रकार घडल्याचे उघडकीस आले. महापालिकेने केलेल्या डिजिटल नोंदींच्या तपासणीत तीन उमेदवार संशयित आढळले असून, त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली. या उमेदवारांना मदत करणाऱ्या संभाजीनगर येथील परीक्षा केंद्रावरील दोन कर्मचारी आणि तीन उमेदवार अशा पाच जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुणे महापालिकेने कनिष्ठ अभियंता पदाच्या भरतीसाठी जानेवारी २०२४ मध्ये ११३ पदांची जाहिरात प्रसिद्ध केली. त्यानंतर पदसंख्या १६९ पर्यंत वाढविण्यात आली. या परीक्षेत गैर प्रकार झाल्याचा संशय असलताने या संदर्भात निवेदन महानगरपालिकेद्वारे जाहीर केले आहे. खालील PDF मध्ये आपण माहिती बघू शकता. 

PMC द्वारे जाहीर निवेदन PDF 

ऑक्टोबर २०२५ मध्ये या पदांसाठी सुधारित जाहिरात काढून ऑनलाइन परीक्षा घेण्याची जबाबदारी ‘इन्स्टिट्यूट ऑफ बैंकिंग पर्सोनल सिलेक्शन’ (आयबीपीएस) यांच्याकडे देण्यात आली. परीक्षेचा निकाल जाहीर केल्यानंतर महापालिकेने पात्र उमेदवारांची कागदपत्रे पडताळणीची यादी जाहीर केली. त्यानंतर या परीक्षेतील एका प्रश्नाचे छायाचित्र ‘एक्स’ या समाजमाध्यमावर प्रसारित झाले. या परीक्षेचा पेपर फुटल्याचा संशय व्यक्त करून फेरपरीक्षा घेण्याची मागणी केली जात होती. त्यानंतर तपासणीमध्ये तीन उमेदवारांनी परीक्षा सुरू झाल्यानंतर त्यामध्ये गैरप्रकार केल्याचे तांत्रिक पुरावे आहेत. यासाठी त्यांना केंद्रांवर नियुक्त दोन कर्मचाऱ्यांनी मदत केल्याचेदेखील आढळले. या तीन उमेदवारांसह दोन कर्मचाऱ्यांच्या विरोधात महापालिकेने पोलिसांत तक्रार दिली आहे,’ असे नायर यांनी सांगितले. या प्रकरणातील एका संशयित उमेदवाराने परीक्षेच्या सुरुवातीला अनेक प्रश्न पाहूनही त्याची उत्तरे नोंदविली नाहीत. शेवटच्या अर्ध्या तासात या उमेदवाराने तब्बल ९३ प्रश्न सोडविले. या पद्धतीमुळे गैरप्रकाराचा संशय अधिक बळावला.


Pune Mahanagarpalika Bharti Result: Pune Municipal Corporation (PMC) Health Department has officially released the Selection and Waiting Lists for the Counsellor and Lab Technician posts. These results are based on the objective assessment interviews conducted on 12/05/2026.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाने समुपदेशक आणि लॅब टेक्निशियन पदांची अधिकृत निवड व प्रतीक्षा यादी जाहीर केली आहे. ही यादी १२/०५/२०२६ रोजी घेतलेल्या मौखिक आणि वस्तुनिष्ठ मूल्यमापन मुलाखतींच्या आधारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आतिम निवड यादी, प्रतिक्षा यादी


Pune Mahanagarpalika Bharti Result

Pune Mahanagarpalika Bharti Result: दिनांक ०४/०९/२०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने मेट्रोपॉलिटन सव्र्व्हेलन्स युनिट अंतर्गत विविध संवर्गाच्या ०७ कंत्राटी पदांकरिता ऑफलाईन पद्धतीने प्राप्त अर्ज व कागदपत्रांच्या छाननी अंती व जाहिराती मधील शैक्षणिक अर्हता व अनुभवाच्या निकषानुसार पदनिहाय नमूद उमेदवारांची अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

१. सदर अंतिम निवड यादीतील निवड केलेल्या उमेदवारांनी दिनांक 2०/०४/२०२६ ते २७/०४/२०२६ रोजी पर्यंत नवीन इमारत, चौथा मजला, शिवाजीनगर, पुणे महानगपालिका, पुणे- ४११००५ येथे कार्यालयीन वेळेत मूळ कागदपत्रांसह स्वतः उपस्थित राहून आपले नियुक्ती आदेश प्राप्त करून घ्यावे व तात्काळ नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होऊन तसा अहवाल या कार्यालयास कळवावा.
२. या नियुक्ती पत्रकाच्या दिनांकापासून सात दिवसाचे मुदतीत आपण हजर न झाल्यास सदर नेमणुकीसाठी आपण इच्छुक नसल्याचे गृहीत धरण्यात येईल व पुढील कार्यवाही करण्यात येईल.

मेट्रोपॉलिटन सव्र्व्हेलन्स युनिट, उमेदवारांची अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी


Pune Mahanagarpalika Bharti Result

मेट्रोपॉलिटन सव्हिलन्स युनिट (एमएसयू), आरोग्य विभाग, पुणे महानगरपालिका अंतर्गत Senior Public Health Specialist, Microbiologist, Veterinary Officer, Technical Assistant, Training Manager, Technical Officer (IT), Data Analyst या कंत्राटी पदांची पात्र/अपात्र यादी. दिनांक ०४/०९/२०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने मेट्रोपॉलिटन सव्हिलन्स युनिट (एमएसयू), आरोग्य विभाग, पुणे महानगरपालिका पुणे अंतर्गत Senior Public Health Specialist, Microbiologist, Veterinary Officer, Technical Assistant, Training Manager, Technical Officer (IT), Data Analyst या संवर्गाच्या कंत्राटी पदांकरिता ऑफलाईन पद्धतीने प्राप्त अर्ज व कागद पत्रांच्या छाननी अंती व जाहिराती मधील शैक्षणिक अर्हता व अनुभवाच्या निकषानुसार पदनिहाय नमूद उमेदवारांची पात्र व अपात्र यादी सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे.

. त्या नुसार प्रसिद्ध केलेल्या पात्र/अपात्र यादीनुसार उमेदवारांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत

१) सदर पात्र/अपात्रतेबाबत उमेदवारांना काही हरकती असल्यास सोमवार दिनांक १३/१०/२०२५ रोजी सायंकाळी ६:१५ वाजे पर्यंत साथरोग नियंत्रण विभाग, पुणे महानगरपालिका, नविन इमारत, ४ था मजला, शिवाजीनगर, पुणे ४११००५ येथे कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टी वगळता) स्वतः उपस्थित राहून आपले आक्षेप / हरकती (कागदपत्रे) सादर करावे.
२) सोमवार दिनांक १३/१०/२०२५ रोजी सायंकाळी ६:१५ वाजेनंतर आपले आक्षेप / हरकती (कागदपत्रे) तसेच ईमेल आयडीवर पाठविल्यास हरकती / आक्षेप (कागदपत्रे) विचारात घेतल्या जाणार नाहीत. पाठविलेल्या हरकती/आक्षेप (कागदपत्रे) विचारात घेतल्या जाणार नाहीत.

 

MSU पात्र अपात्र उमेदवारांची यादी डाउनलोड लिंक 

 


 

 

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत रिक्त असलेली करारतत्वावरील पदाची आतिम निवड यादी, प्रतिक्षा यादी प्रसिद्ध.उमेदवार खालील लिंकवरून कोल्हापूर आरोग्य विभाग निकाल डाउनलोड करू शकतात. या  भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आतिम निवड यादी, प्रतिक्षा यादीमहांग पालिकेने जाहीर केलेले निवेदन द्वारे

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड