हॉटेल मॅनेजमेंट सीईटीसाठी हॉलतिकीट जारी

MHT-CET Exam Admit Card

MHT-CET Exam Admit Card : हॉटेल मॅनेजमेंट सीईटीसाठी हॉलतिकीट जारी करण्यात आले आहेत….

MAH HMCT CET 2020 Admit Card: महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (CET Cell) ने MH CET 2020 परीक्षेचे हॉलतिकीट जारी करण्यात आलं आहे. प्रवेश परीक्षा बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी (BHMCT) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आयोजित केली जाते. सीईटी सेलचे अधिकृत संकेतस्थळ cetcell.mahacet.org वरून हॉलतिकीट डाऊनलोड करता येईल. MH CET HMCT प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी उमेदवारांना आपला रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर आणि पासवर्ड किंवा जन्मतारखेच्या सहाय्याने अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येईल.

MAH BHMCT परीक्षा कधी होणार?

MAH BHMCT परीक्षा येत्या १० ऑक्टोबर रोजी होणार आहे. परीक्षेसाठी जे अॅडमिट कार्ड जारी करण्यात आलंय त्यावर उमेदवाराची सर्व माहिती उदा. – अर्ज क्रमांक, अनुक्रमांक, परीक्षेची रिपोर्टिंग वेळ आणि परीक्षा केंद्राची माहिती आदी देण्यात आली आहे.

MAH HMCT CET 2020 Admit Card: पुढील पद्धतीने अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा –

 • – सर्वात आधी अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर जा.
 • – यानंतर उमेदवारांनी आपला रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख आदी माहिती भरावी.
 • – अॅडमिट कार्ड तुमच्या स्क्रीनवर दिसू लागेल.
 • – तुमचं अॅडमिट कार्ड नीट तपासून डाउनलोड करा.

हॉलतिकीट डाऊनलोड  – https://bit.ly/33C8rcI


MHT-CET 2020: PCM ग्रुपचे अॅडमिट कार्ड जारी

MHT CET 2020 परीक्षेसाठी पीसीएम ग्रुपसाठी हॉलतिकीट जारी झाले आहेत.

MHT-CET Admit Card 2020: महाराष्ट्र सीईटी कक्षाने सामायिक प्रवेश परीक्षेसाठी (MHT CET 2020) प्रवेश पत्र जाहीर केले आहेत. सीईटी सेलची अधिकृत वेबसाईट mhtcet2020.mahaonline.gov.in वर हे अॅडमिट कार्ड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. फिजिक्स-केमिस्ट्री-मॅथ्स अर्थात पीसीएम (PCM) ग्रुपसाठी हे अॅडमिट कार्ड जारी करण्यात आले आहेत. याआधी तीन दिवसांपूर्वी २६ सप्टेंबर रोजी PCB गटाचे अॅडमिट कार्ड जारी करण्यात आले होते.

उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या ‘CET’ पुन्हा पुढे ढकलल्या

या अॅडमिट कार्डवर परीक्षा केंद्रासंबंधीची माहिती, रिपोर्टिंगची वेळ, दिवस आणि अन्य माहिती उपलब्ध आहे. MHT-CET 2020 चे हॉलतिकीट डाऊनलोड करण्यासाठी उमेदवारांना आपला अॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्डची आवश्यकता भासेल.

MHT-CET Admit Card 2020 कसे डाऊनलोड करायचे वाचा…
 • – सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळ mhtcet2020.mahaonline.gov.in वर जा.
 • – यानंतर हॉल तिकिट या पर्यायावर क्लिक करा.
 • – तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाका.
 • – नंतर आपला विषय PCB / PCM यापैकी एक निवडा.
 • – यानंतर सर्च बटणावर क्लिक करा.
 • – MHT CET हॉलतिकीट तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
 • – हे हॉलतिकीट तुम्ही डाऊनलोड करून त्याचं एक प्रिंट आऊट घेऊन ठेवा.

MHT-CET 2020 परीक्षेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर हॉलतिकीट सोबत बाळगणे अनिवार्य आहे. हॉलतिकीट शिवाय कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्राच्या आत प्रवेश दिला जाणार नाही.

Important Links For MHT-CET Exam Admit Card
प्रवेशपत्र डाउनलोड : https://bit.ly/2S5Bu22

MHT-CET 2020: PCB ग्रुपचे अॅडमिट कार्ड जारी

MHT-CET Exam Admit Card : MHT-CET 2020 परीक्षेचे PCB ग्रुपचे अॅडमिट कार्ड जारी झाले आहे. कसे डाऊनलोड करायचे ते जाणून घ्या….

MHT-CET Exam Admit Card : MHT-CET Admit Card 2020: महाराष्ट्र राज्याच्या सीईटी कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या कॉमन अॅडमिशन टेस्ट अर्थात MHT-CET 2020 परीक्षेचे अॅडमिट कार्ड सीईटी सेलने आज, शनिवार २६ सप्टेंबर पासून उपलब्ध केले आहेत. विद्यार्थ्यांना mhtcet2020.mahaonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन हे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येतील. ते कसे डाऊनलोड करायचे याबाबतचा सविस्तर तपशील आम्ही या वृत्तात पुढे देत आहोत.

हे अॅडमिट कार्ड केवळ PCB ग्रुपचे आहेत. एमएचटी-सीईटी परीक्षा १,२,४,५,६,७,८ आणि ९ ऑक्टोबर २०२० रोजी होणार आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या MHT-CET अॅप्लिकेशन फॉर्म नंबर आणि पासवर्डच्या सहाय्याने हे हॉलतिकीट डाऊनलोड करायचे आहे. इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांसाठी म्हणजेच PCM ग्रुप परीक्षेचे अॅडमिट कार्ड अद्याप उपलब्ध झालेले नाहीत.

यापूर्वी बी.फार्मसाठी सीईटी सेलने अॅडमिट कार्ड जारी केले आहेत. हॉलतिकिटावर परीक्षेची तारीख, वेळ, परीक्षा केंद्राचा पत्ता, विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती देण्यात आली आहे. तसेच कोविड-१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रावर घ्यावयाच्या खबरदारीविषयीदेखील अॅडमिट कार्डमध्ये विस्तृत माहिती देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनी अॅडमिट कार्डवरील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे, त्यात कोणत्याही प्रकारची चूक वा त्रुटी आढळल्यास संबंधित यंत्रणेशी तत्काळ संपर्क साधायचा आहे.

MHT CET Admit Card 2020 कसे डाऊनलोड कराल?

 • – mhtcet2020.mahaonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जा.
 • – MHT CET Admit Card 2020 डाऊनलोड लिंकवर क्लिक करा.
 • – अॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगइन करा.
 • – आता स्क्रीनवर तुमचे MHT CET Admit Card 2020 अॅडमिट कार्ड दिसेल.
 • – अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंट आऊट काढून सुरक्षित ठेवा.

अॅडमिट कार्ड डाऊनलोड कसे करायचे याची विस्तृत प्रोसेस सीईटी कक्षाने दिली आहे.

एकूण ४ लाख ४५ हजार ७८० विद्यार्थ्यांनी PCM आणि PCB कोर्सेसच्या सीईटी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. जे विद्यार्थी महाराष्ट्राबाहेरचे आहेत आणि त्या विद्यार्थ्यांकडे सक्षम प्राधिकरणाचे डोमिसाईल प्रमाणपत्र आणि जन्मदाखला किंवा रेसिडेन्शिअल सर्टिफिकेट आहे ते विद्यार्थी एमएचटी सीईटी बी फार्म परीक्षा देऊ शकतात.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For MHT-CET Exam Admit Card
PDF जाहिरात : https://bit.ly/2S4cfgg
प्रवेशपत्र डाउनलोड : https://mhtcet2020.mahaonline.gov.in/

सोर्स : म. टा.Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड