मोठी बातमी! ‘SEBC’ सवलतीसाठी नव्याने करावा लागणार अर्ज ! कोणते डॉक्युमेंट्स लागणार बघा!- Maratha SEBC Caste Certificate

Maratha SEBC Caste Certificate

SEBC Certificate Arj 

Maratha SEBC Caste Certificate: मराठा समाजातील सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबांसाठी ‘एसईबीसी’तून १० टक्के आरक्षण मिळाले. त्यानंतर १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार हजारो तरुण-तरुणींनी नोकरी किंवा शैक्षणिक कामकाजासाठी ‘एसईबीसी’ प्रमाणपत्रे काढली. पण, २८ जूनला शासनाने शुद्धीपत्रक काढून पूर्वीचा १५ मार्चचा आदेश रद्द केल्याने पूर्वी काढलेले ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र आता चालतील का? आणि दुसरीकडे २८ जूनपूर्वी प्रांताधिकाऱ्यांकडे प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जांचे काय?, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासह अन्य विद्यापीठांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आता जेईई, सीईटीच्या निकालानंतर अभियांत्रिकी, फार्मसी अभ्यासक्रमांचे देखील प्रवेश सुरू होतील. तर आयटीआय, शासकीय व खासगी तंत्रनिकेतनची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जासोबत २८ जूनपूर्वी काढलेले एसईबीसी प्रमाणपत्र जोडले आहे तर काहींनी त्याची पोच पावती जोडली आहे. मात्र, सामान्य प्रशासन विभागाच्या शुद्धीपत्रकानुसार नॉन क्रिमीलेअर व एसईबीसी प्रमाणपत्र स्वतंत्र करण्यात आले आहे. पूर्वी उत्पन्नाचा दाखला एक की तीन वर्षाचा आहे, त्यावरून तेवढ्या वर्षाचे एसईबीसी व नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र एकत्रित (एका खाली एक जोडूनच) मिळत होते. शासनाच्या शुद्धीपत्रकानुसार पूर्वी काढलेले दाखले प्रवेश किंवा अन्य कामांसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत का, शुद्धीपत्रक निघण्यापूर्वी अर्ज केलेल्यांना पुन्हा नव्याने अर्ज करावा लागणार नाही ना, या प्रश्नांची उत्तरे सद्य:स्थितीत जिल्हा प्रशासनाकडे सुद्धा नाहीत.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अभियांत्रिकी प्रवेशाला बुधवारपासून प्रारंभ?

‘सीईटी’चा निकाल जाहीर होऊन २२ दिवस झाले तरीदेखील अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाचे प्रवेश सुरू झालेले नाहीत. प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी कागदपत्रे अपलोड, त्याची छाननी हे टप्पे पार पडतात. पण, यंदा निकाल जाहीर होऊनही प्रवेश प्रक्रियेला विलंब झाला आहे. १० जुलैपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

सोलापूरमधील ‘एसईबीसी’ची स्थिती

१५ मार्चनंतरचे अर्ज

८,३००

अंदाजे प्रमाणपत्रे वितरित

६,७००

प्रांताधिकाऱ्यांकडील प्रलंबित अर्ज

१,६००

शासनाकडून मार्गदर्शन मागविले जाईल

‘एसईबीसी’ प्रमाणपत्रासंदर्भात २८ जूनला शुद्धीपत्रक निघाले असून नवीन परिपत्रकानुसार कार्यवाही सुरू झाली आहे. पण, २८ जूनपूर्वी प्रमाणपत्रासाठी काहींनी अर्ज केले आहेत. तसेच यापूर्वी देखील अनेकांनी दाखले काढले आहेत. त्यासंदर्भात शासनाकडून मार्गदर्शन मागविले जाईल.

– कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी, सोलापूर

 


Download Maratha SEBC Certificate Link

Maratha SEBC Caste Certificate 2024 : नमस्कार मित्रांनो,  आता आपण मराठा SEBC प्रमाणपत्र कसे काढायचे याची प्रोसेस बघणार आहे. जर तुम्ही पोलीस भरती किंवा इतर कोणत्या भरती साठी तयारी करत असाल, तर तुमच्या साठी हे SEBC जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. या प्रमाणपत्र द्वारे, मराठा समाजाला या SEBC प्रवर्गाद्वारे 10 टक्के आरक्षण दिले गेले आहे, त्याचा मोठा फायदा हा येणाऱ्या पोलीस भरती मध्ये होणार आहे. त्यामुळे हे आर्टिकल काळजीपूर्वक वाचा, आणि मराठा SEBC प्रमाणपत्र कसे काढायचे? याची प्रोसेस समजून घ्या.

 

Documents required for Maratha SEBC Caste Certificate

 

✅ #SEBC मराठा जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे

  •  अर्जदाराचे आधार कार्ड / मतदान कार्ड.
  •  अर्जदाराचा रहीवासी पुरावा.
  •  अर्जदाराची टी.सी. किंवा प्रवेश निर्गम उतारा.
  •  अर्जदाराच्या रक्तातील कोणत्याही दोन नातेवाईक यांचे टी.सी किंवा प्रवेश निर्गम उतारा किंवा (निरक्षर असल्यास) निरक्षर असल्याचे शपथपत्र व त्यांचे आधार कार्ड / मतदान कार्ड.
  •  दहावी किंवा बारावी सनद (स्पेलींगसाठी)
  •  वंशावळ (अर्जदाराचे वय १८ पेक्षा कमी असेल तर पालकांचा एक फोटो)

 

SEBC Non Creamy Layer Certificate For Maratha Candidates

✅ #SEBC साठी नॉनक्रेमीलेयर प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे

???? अर्जदाराचे आधार कार्ड / मतदान कार्ड.

???? अर्जदाराचा रहीवासी पुरावा.

???? अर्जदाराची टी.सी. किंवा प्रवेश निर्गम उतारा.

???? जातीची प्रमाणपत्र

???? तहसीलचे ३ वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र (पालकांचे)

???? (अर्जदाराचे वय १८ पेक्षा कमी असेल तर पालकांचा एक फोटो)

 

  • आधार कार्ड: तुमच्या आधार कार्डची प्रमाणित प्रतिलिपी.
  • राज्य निवासी प्रमाणपत्र: तुमच्या निवासी प्रमाणपत्राची प्रमाणित प्रतिलिपी.
  • जन्म प्रमाणपत्र: तुमच्या जन्म प्रमाणपत्राची प्रमाणित प्रतिलिपी.
  • शिक्षणाचे प्रमाणपत्र: तुमच्या शिक्षणाचे प्रमाणपत्राची प्रमाणित प्रतिलिपी.
  • वार्षिक आयकर पत्रिका: तुमच्या आयकर पत्रिकेची प्रमाणित प्रतिलिपी.
  • वार्षिक आयकर पत्रिका: तुमच्या आयकर पत्रिकेची प्रमाणित प्रतिलिपी.
  • वार्षिक आयकर पत्रिका: तुमच्या आयकर पत्रिकेची प्रमाणित प्रतिलिपी.

या कागतपत्रांची पडताळणी करून, तुम्हाला १८ दिवसात मराठा सामाजिक आणि आर्थिक पिछडी वर्गाचे कास्ट सर्टिफिकेट मिळवले जाईल12. आपल्या आवश्यकतेनुसार तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन प्रक्रियेद्वारे हे सर्टिफिकेट प्राप्त करू शकता. आपल्या सर्टिफिकेट प्राप्त करण्यासाठी आवश्यक कागदपत्र आहे.

How to Apply for Maratha SEBC Caste Certificate Online

मराठा कास्ट सर्टिफिकेट साठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा आपले सरकार या पोर्टलवर जावे लागेल. तिथे गेल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.

नोंदणी करताना सर्वप्रथम तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे, त्यांनतर विचारलेली सर्व महत्वाची माहिती टाकून, आपली नोंदणी करून घ्यायची आहे.

नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला Aaple सरकार पोर्टल वर लॉगिन करायचे आहे. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला सर्व्हिसेस मध्ये Revenue Department शोधायचे आहे. आणि त्यावर क्लिक करायचे आहे.

मग Revenue Department मध्ये असलेल्या सर्व्हिसेस मध्ये Cast Certificate ही Service निवडायची आहे. मग त्यावर क्लिक करायचे आहे, तेथे तुम्हाला SEBC प्रवर्गासाठी Cast Certificate चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल, त्यात SEBC Cast Certificate साठी फॉर्म दिलेला असेल, तो अर्ज तुम्हाला भरून घ्यायचा आहे. त्यात आवश्यक ती सर्व माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे.

माहिती टाकून झाल्यावर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट साठी लागणारी कागदपत्रे फॉर्म भरताना अपलोड करायचे आहेत. कागदपत्रे अपलोड करताना दिलेल्या सूचनांचे पालन करायचे आहे, योग्य Size आणि Ratio मध्ये डॉक्युमेंट अपलोड करणे आवश्यक आहे, नाहीतर कागदपत्रे फॉर्म साठी स्वीकारले जाणार नाहीत.

कागदपत्रे अपलोड केल्यावर तुम्हाला पुढील आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे, आणि मग फॉर्म खाली दिलेल्या सबमिट या बटणावर क्लिक करून SEBC Certificate चा Online Form Submit करून टाका.

थोडक्यात अशा प्रकारे तुम्ही अगदी सहजपणे तुमचा मराठा जातीचा SEBC दाखला ऑनलाईन काढू शकता.

How to get a SEBC certificate in Maharashtra?
Step 1: Log in to the Aaple Sarkar website.
  1. Step 2: Click on the ‘Revenue Department’ option listed on the menu.
  2. Step 3: Select the sub-department as ‘Revenue Services’ and select the ‘Caste Certificate’ option.
  3. Step 4: Select the appropriate caste certificate option from the drop-down list.

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड