महसूल विभाग भरती 2025 : राज्य महसूल विभागात नोकरीची संधी, अर्ज करण्यासाठी उरला अल्पकालावधी!! -Mahsul Vibhag Recruitment 2025
Mahsul Vibhag Bharti 2025: Job Opportunity in State Revenue Department, Limited Time Left to Apply!!
महाराष्ट्र राज्य महसूल विभागात नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या भरती प्रक्रियेची घोषणा करण्यात आली असून, इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 मार्च 2025 आहे. अर्ज करण्यासाठी केवळ नऊ दिवसांचा कालावधी शिल्लक असल्यामुळे इच्छुकांनी त्वरित अर्ज भरावा. Mahsul Vibhag Recruitment 2025
महसूल न्यायाधिकरणात भरती प्रक्रियेस सुरुवात
राज्य शासनाने महाराष्ट्र जमीन महसूल न्यायाधिकरणाच्या मुंबई मुख्य पीठासह पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील खंडपीठांसाठी रिक्त पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेद्वारे अध्यक्ष, न्यायिक सदस्य आणि प्रशासकीय सदस्य या पदांवर नियुक्त्या होणार आहेत. अर्ज भरण्यासाठी केवळ नऊ दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने इच्छुक उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये शिपाई पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
ऑनलाइन व ऑफलाइन अर्जाची सुविधा
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 5 फेब्रुवारी 2025 पासून सुरू झाली आहे, आणि इच्छुक उमेदवार 7 मार्च 2025 पर्यंत अर्ज दाखल करू शकतात. उमेदवार ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही प्रकारे अर्ज करू शकतात. [email protected] या ई-मेल आयडीवर अर्ज सादर करता येईल, तसेच अधिकृत जाहिरातीत नमूद केलेल्या पत्त्यावर ऑफलाइन अर्जही पाठवता येईल.
महसूल व वन विभाग भरती 2025 – संधी गमावू नका!
ही भरती प्रक्रिया महाराष्ट्र महसूल व वन विभागाच्या अंतर्गत राबविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांसाठी MRT_Advertisement_2025 या पीडीएफमध्ये सर्व आवश्यक माहिती उपलब्ध आहे. यामध्ये रिक्त पदांची संख्या, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि इतर महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.
भरती प्रक्रियेसाठी अर्ज शुल्क नाही
या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही. तसेच, उमेदवारांना उत्तम वेतन मिळणार असल्याने ही संधी गमावू नये. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करून आवश्यक अभ्यास साहित्य गोळा करावे आणि तयारी सुरू करावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 मार्च 2025
सरकारी नोकरीच्या संधी अत्यंत मर्यादित असतात आणि स्पर्धा प्रचंड असते. त्यामुळे जर तुम्ही या भरतीसाठी पात्र असाल, तर वेळ न घालवता त्वरित अर्ज करा!