MahaTET पात्रता परीक्षेत ३.३८ टक्केच शिक्षक पात्र..! MAHATET Result mahatet.in

MAHATET Result mahatet.in

MAHATET Result 2025 @ mahatet.in

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा (एमएएचएटीईटी) अंतिम निकाल पेपर १ (१ ली ते ५ वी गट) आणि पेपर २ (६ वी ते ८ वी गट) प्रसिद्ध झाला असून, या परीक्षेत ३.३८ टक्के उमेदवार पात्र ठरले आहेत. उमेदवारांना त्यांचा निकाल शुक्रवार (दि. १४) पासून संकेतस्थळावर पाहता येणार आहे, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली आहे. या परीक्षेसाठी प्रविष्ट एकूण ३ लाख ५३ हजार ९५२ परीक्षार्थीपैकी ११ हजार १६८ परीक्षार्थी पात्र ठरले होते. या परीक्षेचा अंतरिम निकाल ३१ जानेवारी २०२५ रोजी प्रसिद्ध करून १० फेब्रुवारीपर्यंत आक्षेप मागविण्यात आले होते.

 

शुक्रवारी परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. पेपर १ (१ ली ते ५ वी गट) साठी १ लाख ५२ हजार ६०५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यातील ४ हजार ७०९ उमेदवार पात्र ठरले, पेपर २- गणित विज्ञान (६ वी ते ८ वी गट) ७५ हजार ५९९ उमेदवार प्रविष्ट झाले, त्यातील २१ हजार ४१४ उमेदवार पात्र ठरले तर पेपर २- सामाजिकशास्त्र (६ वी ते ८ वी गट) १ लाख २५ हजार ७४८ उमेदवार प्रविष्ट झाले असून, ४ हजार ०४५ उमेदवार पात्र उरले आहेत

 


 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा 2024 पेपर 1 (इ. 1 ली ते 5वी गट) पेपर 2 (इ. 6 वी ते 8वी गट) चा अंतिम निकाल परिषदेच्या https://mahatet.in संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर परीक्षेचा अंतरिम निकाल दि. 31 जानेवारी 2025 रोजी प्रसिध्द करण्यात आला होता. सदर निकालाबाबत दि. 01/02/2025 ते 06/02/2025 अखेर पर्यंत ऑनलाईन आक्षेप लॉगिनद्वारे नोंदवुन घेण्यात आले होते. तसेच ईमेलद्वारे दि. 08/02/2025 ते 10/02/2025 अखेरपर्यंत आक्षेप मागविण्यात आलेले होते. सदर आक्षेपावरील कार्यवाही पूर्ण करुन अंतिम निकाल तयार करण्यात येत आहे. पेपर 1 व 2 साठी प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना त्यांचा अंतिम निकाल दि. 14/02/2025 रोजी सायंकाळी 04.00 वाजल्यापासून संकेतस्थळावर पाहता येईल.
पात्र उमेदवारांना प्रमाणपत्राची प्रत संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प./ शिक्षण निरीक्षक मुंबई (उत्तर/दक्षिण/पश्चिम) यांचेमार्फत यथावकाश पाठविण्यात येईल. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

या लिंक वर निकाल चेक करा( ४ पासून) 

 

MahaTET Result 2025


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. Ravji Dursing Pawara says

    Mahatet risult 2021 Napas risult midnar ka

  2. Ayesha Shah says

    TET 2021 result download link

  3. Yogita Gavit says

    TET 2021 cha result download

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड