JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

महत्वाचे – टीईटी’च्या अर्जासाठी मुदतवाढ; २४ एप्रिलपर्यंत भरता येणार अर्ज | MAHA TET- mahatet.in Application 2026

Mahatet.in Application 2026

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार उमेदवारांना २४ एप्रिलपर्यंत अर्ज भरता येणार आहे. परीक्षा परिषदेने २५ मार्चला टीईटीचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार २१ जून रोजी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी २७ मार्च ते १६ एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, उमेदवारांनी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याची विनंती परीक्षा परिषदेकडे केली होती.


Mahatet.in Application 2026

केंद्र शासनाच्या टीईटी वर्षातून दोनदा होतात. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी जास्तीत जास्त संधी मिळाव्यात म्हणून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फेही वर्षातून दोन परीक्षा घेतल्या जातील. तसा प्रस्ताव शासनाला पाठविला असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली. 

परिषदेच्या वतीने आता २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील पहिली टीईटी जूनअखेर अथवा जुलै महिन्यात होईल. त्यानंतर याच वर्षातील नोव्हेंबरमध्ये दुसरी टीईटी घेतली जाणार आहे. २०२७-२८ या शैक्षणिक वर्षातील पहिली परीक्षा जूनमध्ये होईल. दि. ३१ ऑगस्टपूर्वी निकाल जाहीर करावा लागणार आहे. दुसरीकडे, ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या तीन सीटीईटी होणार आहेत. १ सप्टेंबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने टीईटी सक्तीचा निर्णय घेतला आणि त्यासाठी दोन वर्षांची मुदतही दिली. ही मुदत ३१ ऑगस्ट २०२७ रोजी संपणार आहे. इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवर नियुक्त सर्वच शिक्षकांना, ज्यांचे वय ५३ वर्षांपर्यंत आहे, त्यांना दोन वर्षांत टीईटी उत्तीर्ण व्हायचे आहे. मुदतीत पात्रता पूर्ण न करणाऱ्यांवर सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामध्ये त्या वर्गांवरील तथा शाळांमधील मुख्याध्यापकांचा देखील समावेश आहे. दुसरीकडे, यापुढे शिक्षकांना पदोन्नतीचा लाभघेण्यासाठीदेखील टीईटी उत्तीर्ण असावे लागणार आहे. दि. २३ नोव्हेंबरला झालेल्या टीईटीत १२ टक्केसुद्धा उमेदवार उत्तीर्ण झाले नाहीत, तर केंद्र सरकारच्या सीटीईटी परीक्षेचा निकालदेखील कमीच असतो. या पार्श्वभूमीवर शिक्षकांना पुढच्या सहा मुदतीत टीईटी उत्तीर्ण व्हावीच लागेल. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या अध्यापनाबरोबर शिक्षकांना स्वतःलादेखील अभ्यास करावा लागणार.

राज्य सरकारच्या मान्यतेकडे शिक्षकांचे लक्ष:
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने दरवर्षी एकदाच टीईटी घेतली जात होती, तसा शासन निर्णय आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांना दोन वर्षांत पात्रता पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. ती मुदत ३१ ऑगस्ट २०२७पर्यंत असणार आहे. या पार्श्वभूमीवर आता शासन निर्णय बदलावा आणि परीक्षा परिषदेलादेखील वर्षातून दोनदा परीक्षा घेण्यास परवानगी द्यावी लागणार आहे. तसा प्रस्ताव परीक्षा परिषदेने शासनाला पाठविला आहे. त्यावर आता राज्य सरकारकडून तत्काळ मान्यता मिळणार का, याकडे राज्यातील पावणेदोन लाख शिक्षकांचे लक्ष लागले आहे.


Mahatet.in Application 2025

सर्वोच्च न्यायालयाने सर्वच शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य परीक्षा परिषदेने येत्या दोन वर्षात चार वेळा म्हणजेच वर्षातून दोन वेळा टीईटी परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यानंतर एप्रिल-मे महिन्यात दुसरी टीईटी परीक्षा होणार आहे. त्यामुळे अपात्र उमेदवारांना टीईटीची आणखी संधी उपलब्ध होणार आहे. राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी आयुक्त डॉ. अनुराधा ओक उपस्थित होत्या. डॉ. बेडसे म्हणाले, येत्या रविवारी (दि. २३) होणाऱ्या टीईटी परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. सर्वो च्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नियमित उमेदवारासह कार्यरत शिक्षकांनाही टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. त्यासाठी शिक्षकांना दोन परीक्षेची संधी देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची संख्या लक्षात घेता येत्या एप्रिल-मे महिन्यात आणखी एक परीक्षा घेण्यात येत आहे. येत्या दोन वर्षात चार परीक्षा घेण्याचे प्रस्तावित आहे. अर्थात वर्षातून दोन वेळा परीक्षा घेण्यात येणार असून, यातून अधिकाधिक उमेदवार तथा शिक्षकांना ही परीक्षा देता येईल. 

रविवारी होणाऱ्या टीईटी परीक्षेसाठी परीक्षा परिषदेने यंत्रणा सज्ज ठेवली आहे. टीईटी परीक्षा उमेदवारांची एकूण संख्या ४ लाख ७५ हजार ६६९ इतकी आहे. यात एकूण आठ माध्यमांपैकी मराठी माध्यमातील उमेदवार सर्वाधिक असून, त्याची संख्या ३ लाख २७ हजार १३५ इतकी आहे. राज्यातून ५ हजार २८३ दिव्यांग उमेदवारांनी परीक्षेला नोंदणी केली आहे. तसेच ४११ दिव्यांग उमेदवारांना लेखनिक पुरविला आहे. माजी सैनिक असलेले ४५ उमेदवार टीईटी परीक्षा देणार आहेत. परीक्षेसाठी उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर दीड तास आधी हजर राहणे आवश्यक आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड