MahaTET साठी Eligibility काय आहे? MahaTET 2024 Eligibility
Eligibility For MahaTET 2024 Examinations
Eligibility For Maha TET 2024 Examinations
MahaTET 2024 Eligibilty : The MAHA TET Eligibility Criteria 2024 include specific requirements regarding age limit and educational qualifications for candidates who wish to appear for the Maharashtra Teachers Eligibility Test (MAHA TET). Here are the key details:
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 2024 आयोजित केली आहे. MAHA TET पात्रता निकष 2024 पूर्ण करण्यासाठी उमेदवारांनी वय, शैक्षणिक पात्रता, अधिवास आणि प्रयत्नांची संख्या यासारखी ठराविक अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. जे उमेदवार महाराष्ट्र TET वयोमर्यादेत बसत नाहीत, त्यांना परीक्षेसाठी पात्र मानले जाणार नाही. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
महत्वाचे, महाराष्ट्र TET नोटिफिकेशन प्रकाशित, अर्ज सुरु! | Maha TET Exam 2024 Direct Link
“बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ च्या तरतूदी लक्षात घेता, राज्यामध्ये यापुढे सर्व प्राथमिक शिक्षकांसाठी (इयत्ता १ ली ते ८ वी करिता) खालीलप्रमाणे किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात येत आहे.
MAHA TET EXAM PATTERN & SYLLABUS
Who is eligible for TET exam 2024?
१.१) इयत्ता पहिली ते पाचवीकरिता:-
अ) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता-
(i) मान्यता प्राप्त मंडळाची किमान ५० टक्के गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची प्राथमिक शिक्षणशास्त्र दोन वर्षाची पदविका (D.T.ED) उत्तीर्ण (त्यास कोणतेही नाव दिलेले असो)
किंवा
(ii) राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या (National Council for Teacher Education) (Regulations, Norms and Procedure), Regulations, 2002 नुसार मान्यता प्राप्त मंडळाची किमान ४५ टक्के गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची प्राथमिक शिक्षणशास्त्र दोन वर्षाची पदविका उत्तीर्ण (त्यास कोणतेही नाव दिलेले असो).
किंवा
(iii) मान्यता प्राप्त मंडळाची किमान ५० टक्के गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची, चार वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदवी (Bachelor of Elementary Education) उत्तीर्ण
किंवा
(iv) मान्यता प्राप्त परीक्षा मंडळाची किमान ५० टक्के गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची शिक्षणशास्त्र विषयात दोन वर्षाची पदविका (विशेष शिक्षण)
किंवा
(v) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि मान्यताप्राप्त संस्थेची शिक्षणशास्त्र दोन वर्षाची पदविका उत्तीर्ण (त्यास कोणतेही नाव दिलेले असो),
(vi) शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक टसीएम-२००९/३६/०९/माश-४, दि. १० जून, २०१० अन्वये उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (MCVC) शाखेअंतर्गत कृषी गटातील Horticulture and Crop Science आणि आरोग्य वैदयकिय सेवागटातील Crench and Pre School Management परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यता प्राप्त संस्थेची शिक्षण शास्त्रात दोन वर्षाची पदविका
ब) शिक्षक पात्रता परीक्षा ( MAHATET)
राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद, (NCTE) यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासनाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test) उत्तीर्ण.
१.२) इयत्ता ६ वी ते ८ वी करिता-
अ) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता-
(i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि मान्यताप्राप्त संस्थेची प्राथमिक शिक्षणशास्त्र दोन वर्षाची पदविका उत्तीर्ण (त्यास कोणतेही नाव दिलेले असो)
किंवा
(ii) राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या (National Council for Teacher Education) (Regulations, Norms and Procedure), Regulations, 2002 नुसार मान्यताप्राप्त विद्यापिठाची किमान ४५ टक्के गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची शिक्षणशास्त्र विषयातील एक वर्षाची पदवी (Bachelor in Education) उत्तीर्ण (त्यास कोणतेही नाव दिलेले असो)
किंवा
(iii) मान्यता प्राप्त परीक्षा मंडळाची किंमान ५० टक्के गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि चार वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदवी (Bachelor of Elementary Education) उत्तीर्ण
किंवा
(iv) मान्यताप्राप्त परीक्षा मंडळाची किंमान ५० टक्के गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि चार वर्षाची B.A./B.Sc.Ed. or B.A.Ed./B.Sc.Ed. उत्तीर्ण
किंवा
(v) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची एक वर्षाची B.Ed. (Special Education) पदवी उत्तीर्ण.
किंवा
(vi) कृषी गटातील Horticulture and Crop Science आणि आरोग्य वैद्यकीय सेवा गटातील Crench and Pre School Management मधील पदवी परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षणशास्त्रातील एक वर्षाची पदवी.
आणि
ब) शिक्षक पात्रता परीक्षा (T.E.T)
राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासनाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test) उत्तीर्ण.
MahaTET 2024 Eligibility Criteria
MAHA TET Eligibility 2024 Overview |
|
Exam Name | Maharashtra Teachers Eligibility Test ( MAHA TET) |
Conducting Body | Maharashtra State Council of Examinations |
Exam Name | MAHA TET Exam |
Post Category | MAHA TET Eligibility Criteria |
Exam Level | State-level |
Age Limit | There is no age limit for the candidates. |
Educational Qualification |
|
Nationality | Candidate must be an Indian citizen. |
Domicile | Candidate must be a resident of Maharashtra. |
Number of Attempts | There is no limit on the number of attempts. |
Work Experience | Work experience is not required. |
Official Website | https://mahatet.in/Home |
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा नोव्हेंबर मध्ये
Table of Contents
Sir,d.el.ed.appear nahi ka chalat??
December madhe honari CTET exam aheka TET exam honar aahe
MahaTET के फॉर्म कब निकलेगें