Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MahaTET साठी Eligibility काय आहे

Eligibility For MahaTET 2021 Examinations

Eligibility For MahaTET 2021 Examinations – “बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ च्या तरतूदी लक्षात घेता, राज्यामध्ये यापुढे सर्व प्राथमिक शिक्षकांसाठी (इयत्ता १ ली ते ८ वी करिता) खालीलप्रमाणे किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा डिसेम्बर मध्ये
१.१) इयत्ता पहिली ते पाचवीकरिता:-

अ) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता-

(i) मान्यता प्राप्त मंडळाची किमान ५० टक्के गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची प्राथमिक शिक्षणशास्त्र दोन वर्षाची पदविका (D.T.ED) उत्तीर्ण (त्यास कोणतेही नाव दिलेले असो)

किंवा

(ii) राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या (National Council for Teacher Education) (Regulations, Norms and Procedure), Regulations, 2002 नुसार मान्यता प्राप्त मंडळाची किमान ४५ टक्के गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची प्राथमिक शिक्षणशास्त्र दोन वर्षाची पदविका उत्तीर्ण (त्यास कोणतेही नाव दिलेले असो).

किंवा

(iii) मान्यता प्राप्त मंडळाची किमान ५० टक्के गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची, चार वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदवी (Bachelor of Elementary Education) उत्तीर्ण

किंवा

(iv) मान्यता प्राप्त परीक्षा मंडळाची किमान ५० टक्के गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची शिक्षणशास्त्र विषयात दोन वर्षाची पदविका (विशेष शिक्षण)

किंवा

(v) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि मान्यताप्राप्त संस्थेची शिक्षणशास्त्र दोन वर्षाची पदविका उत्तीर्ण (त्यास कोणतेही नाव दिलेले असो),

(vi) शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक टसीएम-२००९/३६/०९/माश-४, दि. १० जून, २०१० अन्वये उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (MCVC) शाखेअंतर्गत कृषी गटातील Horticulture and Crop Science आणि आरोग्य वैदयकिय सेवागटातील Crench and Pre School Management परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यता प्राप्त संस्थेची शिक्षण शास्त्रात दोन वर्षाची पदविका

ब) शिक्षक पात्रता परीक्षा ( MAHATET)

राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद, (NCTE) यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासनाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test) उत्तीर्ण.

१.२) इयत्ता ६ वी ते ८ वी करिता-

अ) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता-

(i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि मान्यताप्राप्त संस्थेची प्राथमिक शिक्षणशास्त्र दोन वर्षाची पदविका उत्तीर्ण (त्यास कोणतेही नाव दिलेले असो)

किंवा

(ii) राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या (National Council for Teacher Education) (Regulations, Norms and Procedure), Regulations, 2002 नुसार मान्यताप्राप्त विद्यापिठाची किमान ४५ टक्के गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची शिक्षणशास्त्र विषयातील एक वर्षाची पदवी (Bachelor in Education) उत्तीर्ण (त्यास कोणतेही नाव दिलेले असो)

किंवा

(iii) मान्यता प्राप्त परीक्षा मंडळाची किंमान ५० टक्के गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि चार वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदवी (Bachelor of Elementary Education) उत्तीर्ण

किंवा

(iv) मान्यताप्राप्त परीक्षा मंडळाची किंमान ५० टक्के गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि चार वर्षाची B.A./B.Sc.Ed. or B.A.Ed./B.Sc.Ed. उत्तीर्ण

किंवा

(v) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची एक वर्षाची B.Ed. (Special Education) पदवी उत्तीर्ण.

किंवा

(vi) कृषी गटातील Horticulture and Crop Science आणि आरोग्य वैद्यकीय सेवा गटातील Crench and Pre School Management मधील पदवी परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षणशास्त्रातील एक वर्षाची पदवी.

आणि

ब) शिक्षक पात्रता परीक्षा (T.E.T)

राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासनाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test) उत्तीर्ण.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
  1. Jamdade says

    Sir,d.el.ed.appear nahi ka chalat??

  2. Ayesha says

    December madhe honari CTET exam aheka TET exam honar aahe

  3. Nisha nagpure says

    MahaTET के फॉर्म कब निकलेगें

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड