महाटीईटी परीक्षा २०२० परीक्षा झाली, उत्तरतालिका..
MAHA TET Answer Key 2020 PDF Download
उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षा दिली. यात पहिली ते पाचवीच्या शिक्षक पदासाठी ३४ केंद्रांवर पेपर एकची सकाळच्या सत्रात परीक्षा घेण्यात आली. तर सहावी ते आठवी च्या शिक्षकपदासाठी दुपारच्या सत्रात २७ परीक्षा केंद्रांवर पेपर दोनची परीक्षा घेण्यात आली. यातील किरकोळ अपवाद वगळता सर्व परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पडल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.
शिक्षकाच्या नोकरीसाठी टीईटी परीक्षा पास होणे सक्तीचे करण्यात आले आहे. जे सेवेत आहेत त्यांनाही ठराविक कालावधीत टीईटी परीक्षा पास होणे आवश्यक आहे. यासाठी ही परीक्षा प्रत्येक जिल्हा केंद्रावर घेण्यात येते. यावेळी ही परीक्षा रविवार, १९ रोजी होत आहे.
सर्व साहित्याची गोपनीयता राखण्यासाठी तसेच परीक्षेदरम्यान गैरप्रकार घडणार नाही यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार प्रत्येक परीक्षा केंद्रावर सहाय्यक परीरक्षकांनी बैठे पथकाची भूमिका बजावत करडी नजर ठेवली. तसेच प्रश्नपत्रिकांच्या गोपनीयतेसाठी परीक्षा परिषदेच्या सूचनांनुसार प्रक्रियेचे चित्रीकरणही करण्यात आले. दरम्यान, शहरातील सीडीओ मेरी येथे तीन परीक्षार्थींना तर नवरचना विद्यालयातील केंद्रावर एका परीक्षार्थीला उशीर झाल्यामुळे परीक्षेला मुकावे लागले. परंतु परीक्षा परिषद व शिक्षण विभागाने सर्व परीक्षार्थींनी नियोजित वेळेच्या २० मिनिटे पूर्वीच परीक्षा कें द्रावर उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या होत्या.त्यामुळे उशीर झाल्याच्या कारणावरून कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नसल्याचे शिक्षण विभागाने स्षष्ट केले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 83 रिक्त पदांची भरती; थेट ई-मेल द्वारे करा अर्ज!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
गैरप्रकार केल्यास खबरदार… परिक्षेत गैरप्रकार केल्यास धडक पथकातर्फे कारवाई करण्यात येणार आहे. गेल्यावेळी काही दलालांनी परिक्षार्र्थींकडून पैसे घेवून उत्तीर्ण करून देण्याचे अमिष दाखविले होते. त्यासाठी मॅजीक पेन व इतर मार्गाचा अवलंब करण्यात आला होता. याबाबत तक्रारीही झाल्या होत्या. त्यामुळे यावेळी अशा दलालांना दूर ठेवण्यासाठी प्रशासनाने थेट कारवाईचा ईशारा दिला आहे.
शिक्षक पदासाठी चुरस
डीएड अथवा बीएड उत्तीर्ण करूनही अनेक उमेदवारांना केवळ टीईटी उत्तीर्ण नसल्यामुळे ३१ डिसेंबरपासून नोकरी गमवावी लागली आहे. तसेच यापुढील शिक्षक भरतीसाठीही टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य असल्याने टीईटीला प्रविष्ठ परीक्षार्थींमध्ये शिक्षक पदासाठी चुरस दिसून आली.