महास्वयंम कि महाजॉब्स- उमेदवार कन्फ्युज

Mahaswayam vs MahaJobs

महास्वयंम कि महाजॉब्स- उमेदवार कन्फ्युज (MahaJobs Vs MahaSwayam)

रोजगारासाठी महास्वयंम पोर्टलवर नोंदणी केलेल्या १८ लाखांहून अधिक युवकांना महाजॉब्स पोर्टलवर पुन्हा नव्याने नोंदणी करावी लागणार आहे. तस दोन्ही पोर्टलचा उद्देश एकच आहे.

राज्यात युवकांचे कौशल्य विकसित करण्यासाठी आणि खासगी कंपन्यांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध व्हावे म्हणून महास्वयंम पोर्टल सुरू आहे. या पोर्टलवर १८ लाख ३३ हजार ९८४ युवकांनी रोजगार मिळावा म्हणून आधीच नोंदणी केली आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

आता टाळेबंदी लागल्यानंतर राज्यातील परप्रांतीय कामगार गावी परतले. त्यामुळे राज्यातील उद्योजकांना मनुष्यबळ उपलब्ध व्हावे आणि भूमिपुत्रांना रोजगार मिळावा म्हणून उद्योग खात्याने महाजॉब्स पोर्टल तयार केले. त्यावरही सव्वा लाखाहून अधिक युवकांनी नोंदणी केली आहे. याआधी राज्यातील युवकांना रोजगार मिळावा म्हणून सेवा योजन (एम्लॉमेंट एक्सचेंज) नावाचे खाते सुरू करण्यात आले. दहावी उत्तीर्ण झाल्यापासून येथे नोंदणी केली जात असे. त्यानंतर शैक्षणिक पात्रतेनुसार नोंदणी अद्ययावत करण्याची सोय होती.

सेवा योजन येथून वर्ग तीन आणि वर्ग चारसाठी हजारो युवकांना कॉल जायचे. याद्वारे शासकीय आणि निमशासकीय तसेच खासगी कंपन्यांमध्ये नोकरी मिळू लागली. दरम्यानच्या काळात अशाप्रकारे थेट नियुक्तीला न्यायालयात आव्हान देण्यात आले. स्पर्धा परीक्षा घेऊन नोकरी देण्याचे नवीन धोरण स्वीकारण्यात आले. कालांतराने या विभागाचे नाव कौशल्य विकास आणि उद्योजगता असे करण्यात आले.

आता कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजगता असे करण्यात आले. या विभागाची तीन प्रमुख कामे आहेत. कौशल्य विकसित करणे, रोजगार मिळवून देण्यास प्रयत्न करणे, स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देणे. गेल्या पाच-सहा वर्षांपासून या खात्याच्या महास्वयंम पोर्टलवर लाखो युवकांनी नोंदणी केल्यानंतर खासगी कंपन्यांनी त्यांच्या आवश्यकतेनुसार या पोर्टलवरील युवकांना संधी देणे अपेक्षित आहे. परंतु येथून उमेदवार निवडण्याचे प्रमाण फारच अत्यल्प आहे. आता उद्योग खात्याने महाजॉब्स नवे पोर्टल तयार केले आहे. यावर इच्छुक उमेदवार आणि ज्यांना मनुष्यबळाची आवश्यकता आहे त्या कंपन्यांची नोंदणी सुरू आहे.

महास्वयंममध्ये कंपन्यांची नोंदणी नाही. मात्र, दोन्ही पोर्टलवर नोंदणी केली तरी युवकांना खासगी कंपन्यांनी नोकरी देणे बंधकारक नाही. नवीन पोर्टलवर राज्यातील विविध खासगी, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त पदे आणि भरतीच्या तारखांच्या जाहिराती दिसून येतात. जे आधीच्या (महास्वयंम) पोर्टलवर नाही. त्यामुळे रोजगार शोधत असलेल्या युवकांना दोन्ही पोर्टलवर नोंदणी करण्याशिवाय पर्याय नाही.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड