शिक्षक भरती उमेदवारांना प्राधान्यक्रम नोंदवण्यास मिळाली मुदतवाढ, तीन दिवस मिळाली मुदतवाढ!! – Maharashtra Shikshak Bharti 2025

Maharashtra Shikshak Bharti 2025

Shikshak Bharti New Update 2025

शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यात शिक्षक होण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पात्र उमेदवारांना आणखी काही जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट आणि लॉक करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेत अद्याप सहभागी होऊ न शकलेल्या उमेदवारांना सोमवार (ता. ५) नंतर तीन दिवस प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा खुली होणार आहे. राज्यात दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०२२’ नुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीसाठीच्या रिक्त जागांसाठी उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट आणि लॉक करण्याची सुविधा दिली होती. शिक्षण विभागाने २५ एप्रिल ते २ मे या कालावधीत उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्याची आणि लॉक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील शिक्षक भरतीत नियुक्ती न मिळालेल्या काही उमेदवारांना दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रियेत प्राधान्यक्रम जनरेट करण्याचा पर्याय उपलब्ध नसल्याचे दिसून आले. अशा काही उमेदवारांनी शिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली.

दरम्यान, या उमेदवारांच्या लॉगिनमध्ये आढळणाऱ्या तांत्रिक त्रुटींबाबत शिक्षण विभागामार्फत कोणतीही दखल घेतली जात नव्हती. मात्र आता वृत्तपत्रातील बातमी मुळे याची दखल घेत राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केलेल्या काही उमेदवारांसाठी तत्काळ पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा खुली करून दिली. तसेच, दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत अधिकाधिक शाळा व्यवस्थापनांना सहभागी होत यावे, यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड करण्यासाठीही मुदत दिली आहे. व्यवस्थापनांच्या जाहिराती अपलोड झाल्यानंतर संबंधित जाहिरातींमधील पदांचे प्राधान्यक्रम पात्र उमेदवारांना उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे सिंह यांनी सांगितले.

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शिक्षक भरती- महाराष्ट्र TAIT २०२५ परीक्षेचे नोटिफिकेशन प्रकाशित,अर्ज सुरु! Maha TAIT Exam…

 


शिक्षण विभागाच्या पवित्र संकेतस्थळामार्फत शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यात उमेदवारांना त्यांचे प्राधान्यक्रम नोंदविण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार, २५ एप्रिल ते २ मे या कालावधीत उमेदवारांना प्राधान्यक्रम नोंदवता येणार आहे. मुलाखतीसह, मुलाखतीशिवाय आणि या दोन्ही प्रकारांत उमेदवारांना प्राधान्यक्रम नोंदवता येणार आहेत. शिक्षण विभागाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. भरती प्रक्रियेत विविध व्यवस्थापनांमध्ये रिक्त असलेली पदे, पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी, नववी ते दहावी, अकरावी ते बारावी हे इयत्ता गट, अध्यापनाचे विषय, समांतर आरक्षणासह आरक्षण, अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीत प्राप्त केलेले गुण, उमेदवारांचे प्राधान्यक्रम विचारात घेऊन ऑनलाइन पद्धतीने निवडीसाठी शिफारस होणार आहे.

 

स्व-प्रमाणपत्र पूर्ण केलेल्या, दुरुस्त केलेल्या आणि प्रमाणित केलेल्या उमेदवारांनाच या प्रक्रियेत सहभागी होता येईल. उमेदवारांना मुलाखतीसह, मुलाखतीशिवाय या दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम निवडता येतील. मुलाखतीशिवाय या प्रकारात शिफारस झालेल्या उमेदवारांचे मुलाखतीसह या प्रकारातील वरच्या पदासाठी पात्रतेनुसार प्राधान्यक्रम विचारात घेतले जातील. दोन्ही प्रकारांत सहभागी व्हायचे असल्यास दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम तयार करून ते अंतिम करणे बंधनकारक आहे. प्राधान्यक्रम अंतिम न केलेले उमेदवार निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतले जाणार नाहीत.

 

Teacher Recruitment Phase 2 Begins!

 

 


मित्रांनो, आपल्यासाठी आम्ही एक महत्वाचा अपडेट घेऊन आलो आहे. सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यात “शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2022” मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर, ग्रामपंचायत व खासगी शाळांमधील शिक्षक पदांसाठी दुसऱ्या टप्प्यात भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. चला तर बाबत पूर्ण माहिती बघूया!!

 

उमेदवारांना आपले प्राधान्यक्रम (पसंतीच्या जागा) तयार करून ते लॉक करता यावेत यासाठी पोर्टलवर शुक्रवारपासून सुविधा सुरू झाली आहे आणि ती २ मे २०२५ पर्यंत खुली राहणार आहे. या टप्प्यात शिक्षक पदे भरताना त्या-त्या शाळांतील रिक्त जागा, इयत्ता, विषय, माध्यम, आरक्षण, परीक्षेत मिळालेले गुण आणि उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम या सर्वांचा एकत्रित विचार करून संगणकीय पद्धतीने निवड केली जाणार आहे. ही TET परीक्षा फेब्रुवारी–मार्च २०२३ मध्ये झाली होती आणि त्यामध्ये २ लाखांहून अधिक उमेदवार सहभागी झाले होते. ज्यांनी वेळेत स्व-प्रमाणपत्र सादर करून मान्यता घेतली आहे, त्यांनाच लॉगिनची सुविधा मिळणार आहे.

 

लॉगिननंतर उमेदवार “प्राधान्यक्रम तयार करा” या पर्यायातून मुलाखतीसह किंवा मुलाखतीशिवाय अशा दोन्ही पद्धतीने आपली पसंतीक्रमाची यादी तयार करू शकतात. एकदा प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर नंतरच्या क्रमांकांचा विचार केला जाणार नाही, त्यामुळे काळजीपूर्वक आणि नीट विचार करून क्रम ठरवा.

अपात्र ठरण्याची शक्यता
कोणी उमेदवार पवित्र पोर्टलवर चुकीची, खोटी किंवा अपूर्ण माहिती भरत असेल, कागदपत्रात गडबड करत असेल, खोटं प्रमाणपत्र लावत असेल, तर त्याला भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवलं जाईल आणि शिक्षा होऊ शकते, असं शिक्षण विभागाने स्पष्ट केलं आहे.

 


 

शिक्षक भरती प्रक्रियेसाठी अत्यावश्यक असलेल्या TAIT मे 2025 च्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यानंतर TET ऑक्टोबर 2025 महिन्यात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (TAIT,TET 2025 Exam Date)  त्यामुळे शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची संधी ठरणार आहे. राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत उमेदवारांची गुणवत्ता आणि पात्रता तपासण्यासाठी टीएआयटी व टीईटी या दोन्ही परीक्षा अनिवार्य आहेत. २०१७ नंतर तब्बल सहा वर्षांनी २०२३ मध्ये टीएआयटी परीक्षा घेण्यात आली होती. त्या परीक्षेच्या आधारे ३० हजारांहून अधिक शिक्षकांची भरती करण्यात आली.

आता पुन्हा शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्याच्या अनुषंगाने नवे पात्रता निकष निश्‍चित करण्यासाठी आणि यादी तयार करण्यासाठी परीक्षा घेणे आवश्यक ठरत आहे. TAIT परीक्षेसाठी परीक्षा यंत्रणेकडून तयारीला वेग देण्यात आला असून, प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या कामालाही सुरवात झाली. मागील वेळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ही परीक्षा आयोजित केली होती. यंदाही त्या अनुभवाच्या आधारे परीक्षा आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आहे. साधारणपणे ८ ते १० लाख उमेदवार ही परीक्षा देण्यासाठी अर्ज करतील, अशी अपेक्षा आहे. दुसरीकडे, शिक्षक पात्रता परीक्षाही (TET) ऑक्टोबर महिन्यात घेतली जाणार असून, ही परीक्षा प्रामुख्याने प्राथमिक शिक्षक (इयत्ता १ ते ५) आणि उच्च प्राथमिक शिक्षक (इयत्ता ६ ते ८) यांच्या भरतीसाठी आवश्यक आहे.

 

TET परीक्षा पास असलेल्यांनाच शिक्षक म्हणून पात्र मानले जाते. त्यामुळे दोन्ही परीक्षा उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. शासनाकडून लवकरच या दोन्ही परीक्षांबाबत सविस्तर वेळापत्रक, अधिसूचना व अर्ज प्रक्रियेची माहिती प्रसिद्ध करण्यात येईल, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

 


राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या गेल्या काही वर्षांत झपाट्याने घटली आहे. परिणामी, मागील १५ वर्षांत तब्बल ७२ हजार शिक्षकांची पदे कमी झाली आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांचे रोजगाराच्या शोधात शहरांकडे स्थलांतर, इंग्रजी माध्यमांकडे वाढता कल, आणि जन्मदरातील घट या कारणांमुळे ही परिस्थिती ओढवली आहे.

सध्या राज्यात २२ हजार खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये कार्यरत आहेत. यामध्ये पूर्वी मंजूर केलेली एकूण शिक्षक पदसंख्या २.९२ लाख होती. मात्र, सध्या केवळ २.२० लाख शिक्षक कार्यरत आहेत.

दुसरीकडे, जिल्हा परिषदेच्या ६२ हजार शाळांमध्ये १८ हजार शिक्षकांची पदे कमी झाली आहेत. सध्या या शाळांमध्ये सुमारे १ कोटी ७० लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या १० पेक्षा कमी आहे, ज्यामुळे सुमारे २ हजार शाळा बंद होण्याच्या उंबरठ्यावर आहेत.

शिक्षकांच्या पदांमध्ये घट होण्यामागची कारणे:

  1. ग्रामीण भागातून शहरांकडे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर

  2. ‘हम दो, हमारा एक’ यामुळे कमी झालेला जन्मदर

  3. शिक्षण व नोकरीच्या शोधात वाढलेले विवाहाचे वय

  4. इंग्रजी माध्यमाच्या शाळांची वाढती संख्या

  5. इंग्रजी शिक्षणाबाबत पालकांचा वाढता कल

दरवर्षी सुमारे २०० नवीन खासगी इंग्रजी शाळा उघडल्या जात आहेत, तर मराठी शाळांमधील घटलेली विद्यार्थी संख्या अनेक ठिकाणी शिक्षकांच्या तुकड्यांनाही अप्रभावी ठरत आहे. यातून शिक्षकांची पदे कमी केली जात आहेत, ज्याचा थेट परिणाम शिक्षणाच्या दर्जावर व गुणवत्ता व्यवस्थेवर होत आहे.

पवित्र पोर्टलवर केवळ ११ हजार शिक्षक पदांसाठीच भरती

राज्य सरकारच्या पवित्र पोर्टलवर केवळ ११ हजार शिक्षकांच्या जागांची जाहिरात करण्यात आली आहे. त्यामुळे हजारो बेरोजगार उमेदवारांसमोर संधी कमी झाली आहे.

सध्या शाळांमध्ये केवळ शिक्षकेतर नव्हे, तर शिक्षकांच्या आवश्यक पदांमध्येही कपात करण्यात आली आहे. यामुळे नव्या शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करताना शाळांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मराठी शाळांची ही ढासळती अवस्था शिक्षण विभागासाठी गंभीर इशारा असून, या संकटावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

अनुदानित शाळांची स्थिती
एकूण शाळा : २२,०००
एकूण पदे मंजूर : २.९२ लाख
सध्या कार्यरत पदे : २.२० लाख
१५ वर्षांत कमी झालेली पदे: ७२,०००

 

 


Shikshak Bharti New Update 2025

 राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अंशतः, पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक या संवर्गातील पदे अनुकंपा नियुक्तीसह १०० टक्के नामनिर्देशनाने भरण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. राज्यात २१ वर्षांनी शिक्षकेतर पदांवर भरती होणार आहे. त्यासाठी अनेक वर्षे लढा द्यावा लागला. या भरतीमुळे शाळांतील प्रशासकीय काम चांगल्या पद्धतीने होईल, तसेच शिक्षकांवरील ताण कमी होईल. सुमारे ५ हजार पदांवर भरती होण्याची शक्यता आहे.

शिक्षक भरतीच्या धर्तीवर शिक्षकेतर पदांनाही एकूण रिक्त पदांच्या ८० टक्के पदभरतीची अट लागू करण्यात आली असून, या निर्णयामुळे शिक्षकेतर पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अंशतः, पूर्णतः अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतिबंध लागू करण्यात आला आहे.


दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती प्रक्रिया केव्हा सुरु होणार, याबाबत अनेक उमेदवार उत्सुकतेने वाट पाहत आहेत. परंतु, बऱ्याच व्यवस्थापनांना जाहिरात देण्यास अजून काही कालावधीची आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी १५ एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात भरतीची संधी मिळणार आहे. या निर्णयाचे स्वागत जिल्हा परिषद मागासवर्गीय माध्यमिक शिक्षक संघटनेचे राज्य नेते प्रवीण मेश्राम, राज्याध्यक्ष शालिनी बारसागडे, राज्य सहसचिव शेखर मेश्राम, जिल्हाध्यक्ष सदाशिव चव्हाण व जिल्हा सरचिटणीस गोवर्धन पाटील आर्दीनी केले आहे. जाहिरातीसाठी २० जानेवारीपासून पोर्टल व सर्व व्यवस्थापनांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. २८ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील एक हजार ७१२ व्यवस्थापन आणि विविध माध्यमांसाठी एकूण एक हजार ९०२ जाहिरातींची प्रक्रिया सुरू केली आहे. अनेक संस्थांनी बिंदू नामावली प्रमाणित करण्यासाठी मागासवर्गीय कक्षात प्रस्ताव दाखल केले आहेत. परंतु अद्यापही बऱ्याच व्यवस्थापनांची बिंदुनामावली मागासवर्गीय कक्षाकडून प्रमाणित न झाल्यामुळे पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याच्या तारखेस मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.

Shikshak Bharti mUDATWADH

पवित्र पोर्टल शिक्षक अंतर्गत पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी; अर्ज करा !!

 


राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत असलेल्या, ‘टीईटी’ परीक्षा न दिलेल्या शिक्षकांची तातडीने माहिती देण्याचा आदेश दिला आहे. भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र लिहून संबंधित शिक्षकांची यादी मागवली आहे. शासकीय शाळांमध्ये शिक्षक पात्रता परीक्षेतून (टीईटी) दरवर्षी भरती केली जाते. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षक म्हणून पात्र होण्यासाठी ही परीक्षा म्हणजे किमान पात्रता मानली जाते. राज्यात १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी ‘टीईटी’ परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

शासनाने २४ ऑगस्ट २०१८ रोजी काढलेल्या निर्णयानुसार, या कालावधीत नियुक्त झालेल्या शिक्षकांनी ३० मार्च २०१९ पर्यंत ‘टीईटी’ उत्तीर्ण करणे आवश्यक होते. मात्र, राज्यातील अनेक शिक्षक आजही पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेले नाहीत. या पार्श्वभूमीवर प्रशांत बंब यांनी राज्यातील सर्व शाळांमधील ‘टीईटी’ परीक्षा न दिलेल्या शिक्षकांची यादी शिक्षणाधिकाऱ्यांकडून मागवली आहे. राज्यातील शाळांमध्ये अशा अपात्र शिक्षकांकडून अध्यापनाचे काम सुरू राहिल्यास विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील नियमानुसार, पात्रता परीक्षा न उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

 



राज्यातील शिक्षक भरती प्रक्रिया पवित्र प्रणालीद्वारे राबवली जात आहे. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील भरतीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षण आयुक्तालयामार्फत अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी आयोजित करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला आहे. शासनाच्या मंजुरीनंतर परीक्षा परिषद ही परीक्षा घेणार असल्याने इच्छुक उमेदवारांना तयारीसाठी सज्ज राहावे लागणार आहे.

दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीसाठी किती पदे उपलब्ध होतील, याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शैक्षणिक व्यवस्थापनांकडून शिक्षक पदभरतीबाबतच्या जाहिराती अल्प प्रमाणात पोर्टलवर प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे स्पर्धा तीव्र होण्याची शक्यता आहे.

पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी जाहिराती नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शिक्षण विभागाच्या नियोजनानुसार, येत्या काही महिन्यांत दुसऱ्या टप्प्यातील भरती पूर्ण करून नवीन शैक्षणिक वर्षात शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती करण्याचा प्रयत्न आहे. या प्रक्रियेसाठी अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणीमध्ये पात्र ठरणे आवश्यक आहे.

शिक्षक भरतीसाठी रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी २० जानेवारीपासून पवित्र पोर्टलवर सर्व व्यवस्थापनांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर भेट देऊन जाहिरात नोंदविता येईल. तसेच, या जाहिरातींसाठी २० फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

81 Comments
  1. Avinash Ahire says

    मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण शिक्षक भरती gr हवाय

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड