Maharashtra SCDRC Recruitment 2026
Maharashtra SCDRC Bharti 2026: महाराष्ट्र राज्यात नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येते आहे ! महाराष्ट्र शासनाने विविध सरकारी विभागांतील रिक्त पदे भरण्यासाठी आउटसोर्सिंग पद्धतीने भरती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील अनेक कार्यालयांमध्ये दीर्घकाळापासून रिक्त असलेल्या गट-क आणि इतर पदांमुळे नागरिकांच्या कामांवर परिणाम होत असल्याने ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ग्राहक संरक्षणाशी संबंधित कार्यालयांमध्ये एकूण ७४ रिक्त पदे आउटसोर्सिंगच्या माध्यमातून भरण्यात येणार आहेत. यामध्ये अधिकारी तसेच लिपिकीय संवर्गातील विविध पदांचा समावेश आहे. या निर्णयामुळे कार्यालयीन कामकाजाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राज्य आणि जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये कोणती पदे भरली जाणार?
उपलब्ध माहितीनुसार खालील पदांचा समावेश आहे:
- अधीक्षक / रजिस्ट्रार / जनसंपर्क अधिकारी (गट-क) – ४३ पदे
- लघुलेखक उच्च श्रेणी (गट-क) – १२ पदे
- लघुलेखक निम्न श्रेणी (गट-क) – २७ पदे
- सहाय्यक अधीक्षक (गट-क) – ११ पदे\
- ऑनलाईन लिपिक – ११ पदे

राज्य आणि जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये भरतीमागचे कारण
राज्य आणि जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असल्याने नागरिकांना प्रकरणांच्या सुनावणीसाठी आणि तक्रारींच्या निपटाऱ्यासाठी विलंबाचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने तात्पुरत्या स्वरूपात आउटसोर्सिंगद्वारे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
कामकाजाला मिळणार गती | Maharashtra Government Outsourcing Recruitment 2026
रिक्त पदांमुळे प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढत असल्याचे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध झाल्यानंतर तक्रारींचा निपटारा अधिक वेगाने होण्यास मदत होईल, असा शासनाचा विश्वास आहे.
राज्य आणि जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग जाहिरात 2026 लवकरच अपेक्षित
सध्या शासनस्तरावर भरती प्रक्रियेची तयारी सुरू असून, संबंधित आउटसोर्सिंग संस्थेमार्फत पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येण्याची शक्यता आहे. भरतीची सविस्तर पात्रता, वयोमर्यादा, वेतन, अर्ज प्रक्रिया आणि इतर अटींची माहिती अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर उपलब्ध होईल.
टीप: ही माहिती वर्तमानपत्रातील वृत्तावर आधारित आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत अधिसूचना (Maharashtra SCDRC Bharti Official Notification) प्रसिद्ध झाल्यानंतरच अंतिम माहितीची खात्री करावी.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















