Maharashtra PWD Recruitment 2024 | सार्वजनिक बांधकाम मध्ये १३७८ पदांची महाभरती सुरु होणार!
Maharashtra PWD Recruitment 2024
Maharashtra PWD Bharti 2024
????PWD २०२३ भरती मेरिट लिस्ट जाहीर, डाउनलोड करा निकाल – PWD 2023 Result, Merit List
सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे प्रसिद्ध परिपत्रका नुसार लवकरच १३७८ पदांची मोठी भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. या नवीन पत्रामध्ये नमूद केल्यानुसार, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संवर्गातील एकूण १३७८ पदांसाठी भरती प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार आहे. अधिक माहिती आपण खालील पत्रात बघू शकता. तसेच, तसेच या भरतीचे नवीन सिल्याबस बघण्यासाठी येथे क्लिक करा आणि आवश्यक कागदपत्रांची यादी या लिंक वर उपलब्ध आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सार्वजनिक बांधकाम विभाग सरळसेवा पदभरती-२०२३ मुळ कागदपत्रांच्या तपासणी वेळापत्रक जाहीर । Maha PWD Document Verification Schedule
Maharashtra PWD Recruitment 2024: In the recent advertisement issued by the Public Works Department of the Government, only Diploma and Diploma holders can apply for 532 posts of Junior Engineer (Civil) Group B Non-Gazetted. As students with higher education such as diploma, degree, ME / MTech can apply for 1378 posts of Civil Engineering Assistant Group C, the engineering degree holders of the state have expressed their displeasure over this strange decision of the government, and the degree holders demanded to give a chance to all. In the same way, the students are expressing their satisfaction that the degree students have been successful in it and now the degree students can submit the application form for class B as they have done the back proof. Know More details about PWD Recruitment 2024, Maharashtra PWD Recruitment 2024 at below.
शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने नुकत्याच काढलेल्या जाहिरातीत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य ) गट ब अराजपत्रितच्या ५३२ जागांसाठी फक्त डिप्लोमा आणि डिप्लोमा करून डिग्री केलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार होता. तर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क च्या १३७८ जागांसाठी डिप्लोमा, डिग्री, एमइ / एमटेक अशा उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार असल्याने राज्यातील अभियांत्रिकी पदवीधारकांनी शासनाच्या या अजब निर्णयावर नाराजी व्यक्त केली असून, सरसकट सर्वांना संधी देण्याची मागणी पदवीधारक विद्यार्थ्यांनी केली होती. तसा विद्यार्थ्यांकडून पाठ पुरावाही करण्यात आल्याने डिग्रीच्या विद्यार्थ्यांना त्यात यश येऊन आता डिग्रीच्या विद्यार्थ्याना वर्ग ब साठी अर्ज सादर करता येणार असल्याचे त्यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने काढलेल्या जाहिरातीत वर्ग ब साठी डिप्लोमा, डिप्लोमा करून डिग्री केलेल्या विद्यार्थ्याना भरतीसाठी अर्ज करता येणार होता. तर डिग्री केलेल्या विद्यार्थ्यांना वर्ग ब करिता अर्ज करता येणार नव्हता. त्यांना वर्ग क साथी पात्र केले. त्यामुळे जास्त शिकलेल्या मुलांना कमी शिकलेल्यांच्या हाताखाली काम करावे लागणार होते. त्यामुळे शासनाच्या विशेषतः सार्वजानिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांत नाराजी पसरली होती. डिप्लोमाबरोबर डिग्री केलेले विद्यार्थी ही वर्ग ब च्या भरतीसाठी पात्र असुन, त्यांना अर्ज करता येणार आहे. तसा आदेश आर. आर. हांडे, मुख्य अभियंता सार्वजानिक बांधकाम प्रादेशिक विभाग मुंबई तथा अध्यक्ष राज्यस्तरीय समन्वय समिती यानी काढला आहे.
Maharashtra PWD Bharti 2024: : Good News For all job Seekers !! PWD (Public Works Department) Mumbai has published the recruitment notification for the “Junior Engineer, Stenographer, Laboratory Assistant, Driver, Constable, Senior Clerk and others” posts. There are total 2109 vacancies to be filled under PWD Mumbai Bharti 2023. Eligible candidates can apply before the last date. Online Link will be activated from 16th October 2023. The last date of submission of application should be 6th November 2023. Candidates may check all details on http://mahapad.gov.in website. Further details are as follows:-
As relaxation of upper age limit by two years has been given for the recruitment advertisement published before 3rd December 2023, the upper age limit for the following categories mentioned in page no.8 of the detailed advertisement shall remain as follows.
सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत “कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, प्रयोगशाळा सहायक, वाहन चालक, शिपाई, वरिष्ठ लिपिक आणि इतर” पदांच्या एकूण 2019 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज आज (१६ ऑक्टोबर २०२३) पासून सुरु झाले आहेत. रजिस्ट्रेशनचे शेवटची तारीख ६ नोव्हेंबर २०२३ आहे. तसेच अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 7 नोव्हेंबर 2023 आहे.
- पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, प्रयोगशाळा सहायक, वाहन चालक, शिपाई, वरिष्ठ लिपिक आणि इतर
- वरिष्ठ लिपिक
- प्रयोगशाळा सहाय्यक
- वाहनचालक
- स्वच्छक
- शिपाई
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
- कनिष्ठ अभियंता (विद्युत)
- कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ
- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
- लघुलेखक उच्चश्रेणी
- लघुलेखक निम्नश्रेणी
- उद्यान पर्यवेक्षक
- सहाय्यक कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ
- स्वच्छता निरीक्षक
- पद संख्या – २०१९ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- परीक्षा शुल्क –
- खुला – १०००/- रु
- राखीव – ९००/- रु
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 16 ऑक्टोबर 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 नोव्हेंबर 2023
- अधिकृत वेबसाईट – pwd.maharashtra.gov.in
Maharashtra PWD Vacancy 2024
सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2024 रिक्त जागांचा तपशील | |
पदाचे नाव | एकूण जागा |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 532 |
कनिष्ठ अभियंता (विद्युत) | 55 |
कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ | 5 |
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक | 1378 |
लघुलेखक उच्चश्रेणी | 8 |
लघुलेखक निम्नश्रेणी | 2 |
उद्यान पर्यवेक्षक | 12 |
सहाय्यक कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ | 9 |
स्वच्छता निरीक्षक | 1 |
वरिष्ठ लिपिक | 27 |
प्रयोगशाळा सहाय्यक | 5 |
वाहनचालक | 2 |
स्वच्छक | 32 |
शिपाई | 41 |
एकूण | 2109 Vacancies |
PWD Recruitment 2024
Maha PWD Bharti 2023 शैक्षणिक पात्रता आणि महत्वाचे निकष
|
|
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) |
|
कनिष्ठ अभियंता (विद्युत) |
|
कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ |
|
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक |
|
लघुलेखक उच्चश्रेणी |
|
लघुलेखक निम्नश्रेणी |
|
उद्यान पर्यवेक्षक |
|
सहाय्यक कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ |
|
स्वच्छता निरीक्षक |
|
वरिष्ठ लिपिक |
|
प्रयोगशाळा सहाय्यक |
|
वाहनचालक |
|
स्वच्छक |
|
शिपाई |
|
Maha PWD Bharti Age Criteria Revised
शासन सामान्य प्रशासन विभाग निर्णय क्र. सनिव-२०२३/प्र.क्र.१४/कार्या. १२ दिनांक ३ मार्च २०२३ अन्वये दिनांक ३ डिसेंबर २०२३ पूर्वी प्रसिध्द होणाऱ्या भरती जाहिराती करिता कमाल वयोमर्यादेच्या दोन वर्षे शिथिलता दिलेली असल्यामुळे सविस्तर जाहिरातीतील पान क्र.८ मध्ये नमूद केलेल्या खालील प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा खालीलप्रमाणे राहील.
How To Apply For Maharashtra PWD Notification 2024
- उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या लिंक द्वारे अर्ज करा .
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2023आहे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
- मुलाखतीची तारीख आणि ठिकाण नंतर कळवले जाईल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PWD Recruitment 2024 Pay Scale – वेतनश्रेणी + अधिक महागाई भत्ता व शासन नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
- Junior Engineer (Civil) – S-१५ (४१८००-१३२३००).
- Junior Engineer (Electrical)- S-१५ (४१८००-१३२३००).
- Junior Architect- S-१५ (४१८००-१३२३००).
- Civil Engineering Assistant (Group-C)- S-८ (२५५००-८११००).
- Stenographer (Higher Grade)- S-१६ (४४९००-१४२४००).
- Stenographer (Lower Grade)- S-१५ (४१८००-१३२३००).
- Park Supervisor (Group-C)- S-१३ (३५४००-११२४००).
- Assistant Junior Architect (Group-C)- S-१२ (३२०००-१०१६००).
- Sanitary Inspector (Group-C)- S-८ (२५५००-८११००).
- Senior Clerk (Group-C)- S-८ (२५५००-८११००).
- Laboratory Assistant (Group-C)- S-७ (२१७००-६९१००).
- Vehicle Driver (Group-C)- S-६ (१९९००-६३२०० ).
- Cleaner (Group-C)- S-१ (१५०००-४७६००).
- Peon (Group-C)- S–१ (१५०००-४७६००).
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For pwd.maharashtra.gov.in Bharti 2024 |
|
???? अधिकृत पूर्ण PDF जाहिरात |
https://shorturl.at/hchBC |
???? PWD २०२३ नवीन सिल्याबस आणि एक्साम |
https://t.co/rBgN5mo93k |
???? PWD २०२३ आवश्यक कागदपत्रांची यादी |
https://t.co/O0UL8ihKhr |
???? ऑनलाईन अर्ज करा (MahaPWD online registration Link) | https://cdn3.digialm.com/EForms/ |
✅ अधिकृत वेबसाईट | pwd.maharashtra.gov.in |
Maharashtra PWD Bharti 2023: The proposal for a revised design of the architectural branch (posts under 34 cadre) under the public works department was under consideration at the government level. After reviewing the posts in 34 cadres of the architecture branch located in the establishment of the Regional Office under the Public Works Department, the revised framework of “11228 posts of regular and 2326 human resources services to be taken by external agencies” (as per annexed Statement -A) is being approved by this government decision. The vacancies in the cadre shown in The Return – A will be filled as per the directions given by the Finance Department from time to time.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखालील स्थापत्य शाखेचा (३४ संवर्गाच्या आतील पदांचा) सुधारित आकृतीबंधाचा प्रस्ताव शासन स्तरावर विचाराधीन होता. सदर आकृतीबंधाचा प्रस्ताव वित्त विभागामार्फत अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीच्या दि. १८ ऑक्टोबर, २०२२ रोजीच्या बैठकीत सादर करण्यात आला होता. सुधारित आकृतीबंधासंदर्भात उप समितीने केलेली शिफारस विचारात घेऊन प्रस्ताव मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सचिव समितीच्या दि.१७ एप्रिल, २०२३ रोजीच्या बैठकीत सादर करण्यात आला होता. उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेनंतर स्थापत्य शाखेचा (३४ संवर्गाच्या आतील पदांचा) आकृतीबंध निश्चितीबाबत शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रिय कार्यालयाच्या आस्थापनेवर असलेल्या स्थापत्य शाखेतील ३४ संवर्गांतील पदांचा आढावा घेऊन “ नियमित ११२२८ पदे व बाह्ययंत्रणेव्दारे घ्यावयाच्या २३२६ मनुष्यबळसेवा ” अशा सुधारित आकृतीबंधास (सोबत जोडलेल्या विवरणपत्र – अ प्रमाणे) या शासन निर्णयाद्वारे मंजुरी देण्यात येत आहे. विवरणपत्र – अ मध्ये दर्शविलेल्या संवर्गातील रिक्त पदांवर वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार पदभरती करण्यात येईल. या संदर्भातील पूर्ण GR खालील लिंक वर दिलेला आहे. तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
PWD (Public Works Department) Mumbai has published the recruitment notification for the “Managing Director” posts. Eligible candidates can apply before the last date. The last date of submission of application should be 04th of September 2023. More details are as follows:-
सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई अंतर्गत “व्यवस्थापकीय संचालक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2023 आहे.
- पदाचे नाव – व्यवस्थापकीय संचालक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव (रस्ते), सार्वजनिक बांधकाम विभाग, चौथा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई-३२
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 सप्टेंबर 2023
- अधिकृत वेबसाईट – pwd.maharashtra.gov.in
Educational Qualification For Maharashtra PWD Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
व्यवस्थापकीय संचालक | पायाभूत सुविधा क्षेत्रातील कामाचा अनुभव असलेल्या केंद्र शासनाच्या सेवेतील किमान स्तर ( Level) – १४ वेतनश्रेणीतील किंवा राज्य अभियांत्रिकी सेवेतील किमान स्तर (Level) एस-३० वेतनश्रेणीतील कार्यरत / सेवानिवृत्त अधिकारी. |
How To Apply For Maharashtra PWD Jobs 2023
- सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For pwd.maharashtra.gov.in Bharti 2023
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/kEKLT |
✅ अधिकृत वेबसाईट |
pwd.maharashtra.gov.in |
Maha PWD Bharti 2024 Update
Maharashtra PWD Recruitment 2023: Public Works Department of Govt. of Maharashtra very soon going to conduct a recruitment process for Junior Engineer Civil and Civil Engineer Assistant Posts. The Number of candidates to be recruited in Maha PWD Bharti 2023 is 532 for JE posts and 1371 for Civil Engineer Assistant Post. Candidates can check below PWD GR and Start Preparing for Maharashtra PWD Bharti 2023:
राज्याच्या विविध विभागातील रिक्त जागांच्या भरतीबाबत राज्य शासन झपाट्याने निर्णय घेत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाची भरती जाहीर होऊन सहा महिने झाले तरी अद्याप जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. कनिष्ठ अभियंता व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांच्या एकूण एक हजार ९०३ जागा भरण्यासाठी या विभागाने ‘टीसीएस’ कंपनीसोबत करारही केला. पण भरतीला मुहूर्त कधी लागणार, असा प्रश्न परीक्षार्थींनी उपस्थित केला आहे. रिक्त पदे भरण्याबाबत राज्य सरकार वेळोवेळी जाहिरात प्रसिद्ध करत आहे. तलाठी, शिक्षक, आरोग्य विभागात मेगा भरती होत आहे. प्रक्रिया जलद गतीने होत असताना दुसरीकडे सहा महिने होऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाची साधी जाहिरातही प्रसिद्ध झालेली नाही. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
कनिष्ठ अभियंत्यांची ५३२ व स्थापत्य अभियांत्रिकी सहायकांची एक हजार ३७१ पदे भरण्यासाठी बांधकाम विभागाने १३ एप्रिल २०२३ ला ‘टीसीएस’सोबत करार केला. पात्र परीक्षार्थींची २०० गुणांची ऑनलाइन परीक्षा घेऊन त्यांची निवड केली जाते. परीक्षेत बुद्धिमत्ता चाचणी, भाषा, गणित आदी विषयांचे प्रश्न विचारले जातात. या विभागात २०१९ पासून भरती झालेली नाही. त्यात आता कुठे भरती जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. पण सहा महिने होऊनही जाहिरात प्रसिद्ध न झाल्यामुळे त्यांची निराशा झाली आहे.
कसा होणार खड्डेमुक्त महाराष्ट्र
रस्त्यांची देखभाल- दुरुस्ती करण्याचे काम ठेकेदार करत असले तरी त्यांच्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे नियंत्रण असते. उपअभियंता, कनिष्ठ अभियंता आदी हे कामाची तपासणी करतात.
महाराष्ट्रात सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, खड्डेमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांची भरती होत नसेल तर या विभागाकडून समाधानकारक कामाची अपेक्षा कशी करणार, असाही प्रश्न निर्माण होतो.
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत ५३१ कनिष्ठ अभियंता आणि १३७१ स्थापत्य अभियंता, अशी एकूण 1903 पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याबाबत राज्य शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागात पदभरती झालेली नाही. तसेच वरिष्ठ पदांना पदोन्नती दिल्याने मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत. एखाद्या कामाचे अंदाजपत्रक तयार करणे, सर्वेक्षण करणे, कामाच्या ठिकाणी जाऊन काम करून घेणे, ही कामे कनिष्ठ अभियंते करतात. ते नसतील, तर उपविभागातील अन्य अधिकाऱ्यांवर कामाचा बोजा येतो. सार्वजनिक बांधकाम विभागाचा आकृतिबंध तयार झाला असून लवकरच पदभरतीची कार्यवाही करण्यात येणार आहे.
पुणे विभागाबरोबरच राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता श्रेणी दोन, कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ही पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे स्थानिक ठिकाणी सुरू असलेल्या कामावर परिणाम होत आहे.
????PWD विभागातर्फे होणारी भरती TCS घेणार हे जवळपास निश्चित ????
???? कनिष्ठ अभियंता (स्थापत्य):- 532 पदे
(Diploma / Diploma+Degree धारकांना खूप मोठी सुवर्णसंधी????????????
???? स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक:- 1371 पदे
(Diploma/ Diploma+Degree / 12+Degree)
Maharashtra PWD Bharti 2023 GR
Maharashtra PWD Recruitment 2023
Maharashtra PWD Recruitment 2023 – Very Soon Maha PWD Mega Recruitment 2023 will be carried Out for 532 vacancies soon !! Recruitment for Junior Engineer (Civil) in Group-B (Non-Gazetted) Cadre and Civil Engineering Assistant in Group-C Cadre for State Level Posts advertisement will be published soon. For more information in this regard please refer to the given PDF advertisement.
२. सदर अर्जाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, वित्त विभाग, शासन निर्णय, दि. ३१.१०.२०२२ मधील तरतुदीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या संवर्गातील ५३२ रिक्त पदे भरण्याची कार्यवाही शासनस्तरावर सुरु आहे. तथापि, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या संवर्गातील रिक्त पदांची माहिती संबंधित मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग यांचेकडून ठेवण्यात येत असल्याने सदर माहिती शासनस्तरावर उपलब्ध नाही.
तसेच, सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक केंमाअ-२००८/प्र.क्र.९३/६ (मा.अ.) दि.६.९.२००८ मधील तरतुदीनुसार सार्वजनिक प्राधिकरणांकडे कलम २ (च) मध्ये व्याख्या केलेली व उपलब्ध असलेली माहितीच पुरविणे अभिप्रेत असून जेथे वेगळयाने माहितीचे संकलन, संशोधन, पृथ्थक्करण करणे आवश्यक आहे, अशा स्वरुपातील माहिती पुरविणे अभिप्रेत नाही. यास्तव, आपण मागितलेली कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या संवर्गाची प्रवर्गनिहाय रिक्त पदांची माहिती शासन स्तरावरुन देता येणे शक्य नाही.
३. उपरोक्त उत्तराने आपले समाधान न झाल्यास हे पत्र प्राप्त झाल्यापासून ३० दिवसांच्या आत प्रथम अपिलीय अधिकारी तथा अवर सचिव (आस्थापना), सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडे अपील करता येईल.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 अंतर्गत Jr. Engineer (कनिष्ठ अभियंता), Stenographer (लघुलेखक), Sr. Clerk (वरिष्ठ लिपिक), Stenographer cum Typist (लघुटंकलेखक), आणि Tracer (अनुरेखक) या संवर्गातील रिक्त पदांची भरती होणार असून रिक्त पदाचा तपशील (Maharashtra PWD Vacancy) लवकरच जाहीर करण्यात येणार आहे…
संदर्भ क्र.१ च्या शासन निर्णयान्वये मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय निवड समिती स्थापन करण्यात आलेली आहे.
यासंदर्भात मा. सचिव (बांधकामे) यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार आपल्या प्रादेशिक विभागांतर्गत सरळसेवेने भरावयाची कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) व स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या संवर्गाची सरळ सेवेच्या पदासह समावेशनाच्या रिक्त पदांची माहिती सोबतच्या नमुना-क मध्ये भरुन (प्रमाणित बिंदूनामावलीसह) दि. १५.१.२०२३ पर्वत किंवा त्यापूर्वी या प्रादेशिक कार्यालयास उपलब्ध करुन द्यावी, जेणेकरुन आपणांकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे एकत्रित माहिती कालमर्यादेत सामान्य १८ भी बां. विभागास सादर करणे या प्रादेशिक कार्यालयास शक्य होईल.
सदर पदभरतीबाबतचा विषय मंत्रीमंडळाच्या विषय सूचीत स्थायी पध्दतीने समाविष्ट करण्यात आलेला असून पदभरतीबाबतच्या प्रगतीचा अहवाल मंत्रीमंडळाच्या प्रत्येक बैठकीत सादर करावयाचा आहे ही बाब विचारात घेऊन उपरोक्त माहिती प्राधान्याने या प्रादेशिक कार्यालयास उपलब्ध करुन देण्यात आपणा सर्वांचे सहकार्य मिळावे अशी अपेक्षा करत आहे.
Maharashtra PWD Recruitment 2023
Maharashtra PWD Recruitment 2023 As per the latest update, A state level and regional selection committee is being constituted to fill the remaining posts through direct service excluding the posts to be filled through the Maharashtra Public Service Commission in the nomination quota of Group-B (Non-Gazetted) and Group-C cadre in the Construction Office under the Public Works Department. Further details are as follows:-
Maha PWD Bharti 2023
शासन निर्णय :-
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत स्थापत्य कार्यालयातील गट-ब (अराजपत्रित) व गट-क संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोटयातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणारी पदे वगळून उर्वरित पदे सरळसेवेने भरण्याकरीता राज्यस्तरीय व प्रादेशिक निवड समितीची रचना करण्यात येत आहे. यासंदर्भातील अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
MAHA PWD Recruitment 2023 – New GR
Maharashtra PWD Recruitment 2023
भरती प्रक्रिया राबविण्यासंदर्भातील एकत्रित मार्गदर्शक सूचना सामान्य प्रशासन विभागाने दिनांक ०४.५.२०२२ व दिनांक २१.११.२०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये दिलेल्या आहेत. त्यानुसार तसेच सामान्य प्रशासन विभाग, वित्त विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळोवेळी दिलेल्या / देण्यात येणाऱ्या सूचनांनूसारच भरती प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. पदभरती करताना शासनाने विहित केलेली कार्यपध्दती, सेवाप्रवेश नियम, सर्व प्रकारचे आरक्षण, बिंदूनामावली यासंदर्भातील नियम व आदेश विचारात घेऊनच पदे भरण्याची कार्यवाही करण्याची दक्षता घेण्यात यावी. मार्गदर्शक सूचनांमध्ये दिल्याप्रमाणे वेळोवेळी शासनाची पूर्वमान्यता घेणे बंधनकारक राहील.
GR डाउनलोड करा – https://bit.ly/3HBkNX9
Maharashtra PWD Recruitment 2022
Maharashtra PWD Recruitment 2022: PWD (Public Works Department) Mumbai has published the recruitment notification for the vacant posts. Eligible candidates can apply before the last date. The last date of submission of application should be 3rd of November 2022. Further details are as follows:-
सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई येथे कार्यकारी अभियंता, उप अभियंता पदांच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2022 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – कार्यकारी अभियंता, उप अभियंता
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- पदसंख्या – 02 जागा
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा – 65 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता (इमारती) संकल्पचित्र मंडळ, चौथा मजला, कोकणभवन, नवी मुंबई – 400614
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 नोव्हेंबर 2022
- अधिकुत वेबसाईट – pwd.maharashtra.gov.in
Educational Qualification For Maharashtra PWD Bharti 2022
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कार्यकारी अभियंता | Retired Officer in relevant field (Read Complete details) |
उप अभियंता | Retired Officer in relevant field (Read Complete details) |
How to Apply For PWD Mumbai Bharti 2022
- सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
- अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2022 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Selection Process For Maharashtra PWD Jobs 2022
- वरील भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
- मुलाखतीकरीता पात्र उमेदवारांना पत्र ई-मेलद्वारे कळविण्यात येईल.
- अर्जदारांनी आपल्या वैयक्तिक माहितीत त्यांचा ई-मेल पत्ता व भ्रमणध्वनी क्रमांक देणे बंधनकारक आहे.
- तसेच मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी अधीक्षक अभियंता (इमारती), संकल्पचित्र मंडळ, कोंकणभवन, नवी मुंबई यांच्या सुचना फलकावर दि. २७/१०/२०२२ रोजी प्रसिध्द करण्यात येईल.
- अंतिम निवड झालेल्या अर्जदारांची यादी वरील कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल, तसेच वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येईल. तसेच अंतिम निवड झालेल्या अर्जदारांना वैयक्तिक ई-मेलद्वारे व पत्राव्दारे कळविण्यात येईल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Terms & Conditions – PWD Mumbai Recruitment 2022
अति व शर्ती:
- अर्ज करणाऱ्या सेवानिवृत्त अधिकारी ज्या पदासाठी अर्ज केले आहेत. त्या पदाचा विवक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्हता तसेच वर नमूद केलेला अनुभव असणे आवश्यक आहे.
- सदर नेमणूक एक वर्षासाठी राहील. त्यापेक्षा जास्त वाढविण्याची आवश्यकता भासल्यास संबंधीताचे काम व आवश्यकता पाहून नियुक्ती अधिकारी तसा निर्णय घेऊ शकतात.
- नियुक्त अर्जदाराला त्यांनी विहित कार्यपालन केल्यामुळे महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.संकीर्ण-२७१५/प्र.क्र.१००/१३, दि.१७.१२.२०१६ मधील अटी व शर्तीप्रमाणे शासन निर्णयासोबत असलेल्या परिशिष्ट ‘अ’ नुसार मासिक परिश्रमीक अनुज्ञेय राहील.
- करारपध्दतीने नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधीतांस शासनाच्या कोणत्याही विभागात/संवर्गात सेवा समावेशनाबाबत किंवा सामावून घेण्याबाबत वा नियमित सेवेचा इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार नसेल. याबाबत अर्जदाराने रु.१००/- च्या स्टॅम्प पेपरवर नोटराईज केलेले प्रतिज्ञापत्र अर्जासोबत सादर करावे.
- अर्ज करणाऱ्या सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांनी त्यांची शारिरीक, मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असल्याबाबतचा शल्यचिकित्सक अधिकाऱ्याचे मूळ प्रमाणपत्र द्यावे लागेल.
अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Maha PWD Mumbai Bharti 2022 | pwd.maharashtra.gov.in Recruitment 2022
|
|
✅ PDF जाहिरात |
https://cutt.ly/KNl3RLG |
✅ अधिकुत वेबसाईट |
pwd.maharashtra.gov.in |
Maharashtra PWD Recruitment 2023 For 2776 Posts – As per the Latest New the Maharashtra Government will start the recruitment process for the 2776 Vacancies under the Maharashtra PWD Recruitment 2022. This recruitment will be carried for the posts of Assistant Engineer Category 2, Junior Engineer, Branch Engineer & Civil Engineering. The More Updates and details will be available soon on MahaBharti. The all given details are published by DGIPR Official Twitter.
राज्यातील पायाभूत विकासाला चालना देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता, सहायक अभियंता श्रेणी-2 व कनिष्ठ अभियंत्यांची १ हजार २४०, स्थापत्य अभियांत्रिकी सहायकची १ हजार ५३६ रिक्त पदे भरणे आवश्यक आहे. या विभागाचा आकृतीबंध तयार झाला असून लवकरच पदभरतीची कार्यवाही करणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बैठकीत दिली.
राज्यमंत्री श्री. भरणे म्हणाले, राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागात सहायक अभियंता श्रेणी 2, कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक ही पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे स्थानिक ठिकाणी सुरु असलेल्या कामावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे.
कमी मनुष्यबळात काम करणे कठीण आहे. ही परिस्थिती लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने आकृतीबंध तयार केला असून वित्त विभागाला मान्यतेसाठी पाठवलेला आहे. याला मान्यता मिळताच तत्काळ पदभरती होणार आहे, अशी माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बैठकीत दिली.
राज्यमंत्री श्री. भरणे म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विभागनिहाय रिक्त पदांची अद्ययावत माहिती घ्यावी. बढतीची देखील कार्यवाही करण्यात आली आहे. मात्र बदलीचे आदेश निघूनही काही अभियंता नियुक्त ठिकाणी हजर झालेले नाहीत. बदलीचे कार्यादेश मिळूनही विहित कालावधीत बदलीच्या ठिकाणी रुजू न झालेल्या अभियंत्यांवर कारवाई करण्याचे आदेश यावेळी राज्यमंत्री श्री. भरणे यांनी या बैठकीत दिले.
Table of Contents
Maharashtra PWD Recruitment 2024 For 1378 Posts stating soon