JOIN Telegram

Document Required for Maha PWD Exam 2023 – PWD मूळ कागदपत्रे यादी डाउनलोड करा

List Of Documents Required for Maha PWD Exam 2023

Document Required for Maha PWD Exam 2023: The attested copies of various certificates submitted by the eligible candidates in the final selection list will be checked on the basis of the original certificates at the time of document verification. It will be mandatory for the candidates to provide the attested copies of the said certificate based on the original certificate at the time of document verification. If the certificates are found to be false or incorrect, the concerned candidate will be disqualified. We have given you a list of documents required for Maha PWD Exam 2023, download Document Required for Maha PWD Exam 2023 from below link:

अंतिम निवड यादीतील पात्र उमेदवारांनी सादर केलेल्या विविध प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती कागदपत्र पडताळणीच्या वेळी मूळ प्रमाणपत्रांच्या आधारे तपासल्या जातील. उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीच्या वेळी मूळ प्रमाणपत्राच्या आधारे उक्त प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती देणे बंधनकारक असेल. प्रमाणपत्रे खोटी किंवा चुकीची असल्याचे आढळून आल्यास संबंधित उमेदवारास अपात्र ठरवले जाईल. आम्ही तुम्हाला महा PWD परीक्षा 2023 साठी आवश्यक कागदपत्रांची यादी दिली आहे, महा PWD परीक्षा 2023 साठी आवश्यक कागदपत्र खालील लिंकवरून डाउनलोड करा…..अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

 सार्वजनिक बांधकाम विभाग २०००+ जागांसाठी परीक्षेची संपूर्ण माहिती !

विहित कागदपत्रे / प्रमाणपत्रे संलग्न (Upload) करणे :-
१ प्रोफाईलद्वारे केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने परीक्षेकरीता अर्ज सादर करताना खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ तसेच प्रकल्पग्रस्त, भुंकपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे PDF फाईल फॉरमॅट मध्ये संलग्न (Upload) करावीत.
२ विविध सामाजिक व समांतर आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांची पात्रता आजमावल्यानंतर (After Checking the Eligibility) उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील (लागू असलेली) कागदपत्रे / प्रमाणपत्रे संलग्न/अपलोड (Upload) करणे अनिवार्य आहे.

उपरोक्त प्रमाणपत्र / कागदपत्रे https://mahapwd.gov.in या संकेतस्थळावरील उपलब्ध लिंकवर उमेदवारांना सर्वसाधारण सूचना मध्ये प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाण असणे अनिवार्य आहे. खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ तसेच प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाच्या दाव्यांच्या अनुषंगाने प्रमाणपत्रे/कागदपत्रे संलग्न (Upload) केल्याशिवाय अर्ज स्विकृत केला जाणार नाही.

Public Works Department Document List

Important Document List For Public Works Department Exam 2023

पदाच्या निवडीसाठी कार्यपध्दती, आवश्यक कागदपत्रे तसेच महत्वाच्या अटी व शती (सर्व उमेदवारांसाठी) :

१ संवर्ग क्र.१ ते १४ या सर्व पदांसाठी अर्ज केलेला उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व त्यांचेकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
५.२ संवर्ग क्र. १ ते १४ या सर्व पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी शासन महसूल व वन विभाग निर्णय क्र. रिपभ/प्र.क्र.६६/२०११/ई-१० दिनांक २७ जुन २०११ नुसार ज्या उमेदवाराकडे अधिवास प्रमाणत्र ( Domicile Certificate) उपलब्ध नसल्यास त्यांनी त्यांचा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला असल्याचा जन्म दाखला (Birth Certificate) सादर करणे आवश्यक आहे. अशा प्रकरणात अधिवास प्रमाणपत्राची अट लागू राहणार नाही. सदर उमेदवाराकडे अधिवास प्रमाणपत्र तसेच जन्म तारखेचा दाखला उपलब्ध नसल्यास, त्या उमेदवाराने आपला शाळा सोडल्याचा दाखला सादर करणे आवश्यक राहील. परंतू सदर शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये त्या उमेदवाराचा जन्म हा महाराष्ट्र राज्यात झाल्याची नोंद असणे आवश्यक आहे. अशा प्रकरणात अधिवास प्रमाणपत्राची अट लागू राहणार नाही. ज्या उमेदवाराचा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला नसेल परंतु महाराष्ट्र राज्यातील रहिवास सलग १५ वर्ष व त्यापेक्षा अधिक कालावधीचा आहे अशा उमेदवारांसाठी अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) आवश्यक राहील.
५.३ उमेदवाराने अर्ज केला अथवा विहित अर्हता धारण केली म्हणजे परीक्षेला बोलविण्याचा अथवा नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे नाही.
५.४ आरक्षित मागास प्रवर्गांचा दावा करणाऱ्या उमेदवारांना ज्या संदर्भातील सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र (Cast Certificate) व उपलब्ध असल्यास जात वैधता प्रमाणपत्र (Validity Certificate) निवडी अंती सादर करणे आवश्यक आहे.
५.५. जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास शासन सामान्य प्रशासन विभाग निर्णय क्रमांक बीसीसी- २०११/प्र.क्र.१०६४/२०११/१६ व दिनांक १२ डिसेंबर २०११ मधील तरतूदीनुसार, याचिका क्र. २१३६/२०११ व अन्य याचिकांवर मा.मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि. २५.८.२०११ रोजी दिलेल्या आदेशाच्या विरोधात मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे दाखल केलेल्या एसएलपी मधील आदेशाच्या अधीन राहून तात्पूरते नियुक्ती आदेश निर्गमित केल्याच्या दिनांकापासून ०६ महिन्याचे आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे, अन्यथा त्यांची नियुक्ती पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करण्यात येईल.
५.६ उमेदवारांनी परीक्षेसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल. परिक्षेसाठी नेमून दिलेल्या परिक्षा केंद्रावर दिलेल्या वेळेपूर्वी १ तास ३० मिनिटे (९० मिनिटे अगोदर उपस्थित रहावे.

अंतिम निवड यादीतील पात्र उमेदवारांनी सादर केलेल्या विविध प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती मूळ प्रमाणपत्राचे आधारे कागदपत्रे तपासणीवेळी तपासण्यात येतील. सदर प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती मूळ प्रमाणपत्राच्या आधारे कागदपत्र तपासण्याच्या वेळी उपलब्ध करुन देणे उमेदवारांना बंधनकारक राहील. त्यामधील प्रमाणपत्रे खोटी किंवा चुकीची आढळल्यास संबंधीत उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.


test99
Available for Amazon Prime
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
कॉन्टेस्ट
अँप डाउनलोड