JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

पोलिस भरतीत उंची मोजण्यावरून गोंधळ उमेदवारांना ठरवले अपात्र; पुण्यात मैदानी चाचणीत अनेकांना फटका!- Maharashtra Police Bharti Physical Test Admit Card Download

Maharashtra Police Bharti Physical Test Hall Ticket Out

आज पोलीस भरती शारीरिक चाचणीमध्ये पुणे शहर पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीमध्ये प्रशासनाच्या कारभाराचा फटका अनेक उमेदवारांना बसत आहे. ससूनसारख्या शासकीय रुग्णालयाने दिलेले उंचीचे प्रमाणपत्र नाकारत, पोलिस प्रशासनाने अनेक विद्यार्थिनींना उंचीच्या कारणावरून अपात्र ठरवले. इतर जिल्ह्यांत पात्र ठरलेल्या मुली पुण्यात अपात्र ठरत असल्याने उमेदवारांनी मोजमाप यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ‘शासकीय रुग्णालय की पोलिस प्रशासन, कुणाचे मोजमाप खरे ?’ असा संतप्त प्रश्न उमेदवारांनी विचारला आहे. राज्याच्या गृह विभागामार्फत १६ हजार ८०० पदांसाठी पोलिस भरती राबविली जात असून, विविध जिल्ह्यांमध्ये ११ फेब्रुवारीपासून मैदानी चाचणीला सुरुवात झाली आहे. १६ हजार ८०० जागांसाठी राज्यभरातून सुमारे १६ लाख अर्ज आले आहेत. पुणे शहर पोलिस भरतीसाठी यंदा तब्बल एक लाख ८५ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. पुण्यात १६ फेब्रुवारीपासून भरतीला सुरुवात झाली असून, शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात मुलींची, तर राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) गट क्रमांक दोन येथे मुलांची मैदानी चाचणी सुरू आहे. मात्र, या प्रक्रियेत उंची मोजण्याच्या पद्धतीत मोठा गोंधळ असल्याची शंका विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

अनेक मुलींनी पुणे आणि मुंबई, अशा दोन्ही ठिकाणी भरतीसाठी अर्ज केले आहेत. ज्या मुली मुंबईमध्ये उंचीच्या निकषात पात्र ठरल्या, त्यांना पुण्यात अपात्र करण्यात आले. एकाच मुलीचे दोन शहरांत वेगवेगळे मोजमाप कसे येऊ शकते ? असा प्रश्न मुलींना उपस्थित केला. न्याय मिळविण्यासाठी मुलींनी ससून रुग्णालयातून आपली उंची रीतसर मोजून त्याचे प्रमाणपत्र आणले. पण, ससूनसारख्या मोठ्या शासकीय रुग्णालयाचे प्रमाणपत्रही पोलिसांनी नाकारत मुलींना अपात्रच ठरविले.

 


पोलीस भरती प्रवेशपत्र डाउनलोड साठी खालील लिंक वरून आपण डाउनलोड करू शकता. जिल्हा निहाय प्रवेशपत्र उपब्ध होणे सुरु झाले आहे. तसेच पुढील सर्व अपडेट्स साठी या लिंक वरून आम्हाला जॉईन करा. मित्रांनो, या वर्षी पोलीस भरतीसाठी \मोठ्या प्रमाणात स्पर्धा सुरू असलेली दिसत आहे. उपलब्ध असलेल्या जागांसाठी हजारोंच्या संख्येने अर्ज आले आहेत. अमरावती ग्रामीण पोलीस दलात पोलीस शिपाई पदाच्या २१४ जागांसाठी तब्बल २१ हजार २०० उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात अर्ज केले असून सरासरी काढल्यास एका पदासाठी तब्बल १०० उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. बारावी उत्तीर्ण शैक्षणिक अर्हतेच्या या भरतीप्रक्रियेसाठी अर्ज केलेल्यांत पदवी, पदविका धारण करणारे आहेतच; सोबत अभियांत्रिकी व इतर शाखांचे उच्च शिक्षण घेतलेल्यांचेही प्रमाण अधिक आहे आणि त्यातही ग्रामीण भागातून सर्वाधिक भरणा आहे. तसेच प्राप्त माहिती नुसार राज्यातील सर्वच जिल्ह्यांत पोलिस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी जातांना हि आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा. तसेच मुंबई स्पेशल पेपर !! सर्व अभ्यास कव्हर होईल असा पेपर येथे सोडवाया लिंक द्वारे पोलीस भरती टेस्ट सिरीज जॉईन करा 

Maharashtra Police Bharti Hall ticket Download Link
शारीरिक चाचणीफेब्रुवारी 2026 पासून
🆕शारीरिक चाचणी प्रवेशपत्र🆕Click Here
अधिक माहिती Click Here

Admit Card Hall Ticket For Police Bharti 2026.jpg

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

How To Download Maha Police Physical Admit card

  • सुरुवातीला पोलीस भरतीच्या अधिकृत पोर्टलवर प्रवेशपत्र उपलब्ध होतील, अजून या संदर्भात अधिकृत घोषणा झाली नसली तरी फेब्रुवारीत होणे अपेक्षित आहे
  • “महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल शारीरिक चाचणी / ग्राउंड टेस्ट अॅडमिट कार्ड 2025” शोधा.
  • प्रश्न तपशील भरून वेबसाइटवर लॉग इन करा.
  • लॉग इन केल्यानंतर तुमचे हॉल तिकीट तुमच्या डिस्प्लेवर उघडेल.
  • ते सेव्ह करा आणि पीडीएफमध्ये डाउनलोड करा.
  • प्रवेशपत्रावर नमूद केलेले तपशील योग्यरित्या तपासा आणि काही विसंगती आढळल्यास ताबडतोब संबंधित प्राधिकरणाला कळवा.
  • तुमच्या रेकॉर्डसाठी प्रवेशपत्राची वैध प्रिंटआउट घ्या
  • आपला अर्ज क्रमांक(११०१०१०००१२३४५६) आणि जन्मदिनांक(१७-०५-१९९२)(DDMMYYYY) सलग लिहा (eg. ११०१०१०००१२३४५६१७०५१९९२)

उमेदवारांसाठी सूचना

  1. पोलीस भरतीचे ओळखपत्र ( Admit Card ) सोबत असल्याशिवाय मैदानात प्रवेश मिळणार नाही. तसेच स्वतःची ओळख पटविण्यासाठी आधार कार्ड,पॅन कार्ड ची रंगीत फोटो ( Colour Xerox ) असलेले साक्षांकित प्रत उमेदवारांकडे असणे बंधनकारक असून सदरहू प्रती सादर करणे आवश्यक आहे.
  2. उमेदवाराने स्वतःच्या पोलीस भरतीचे ओळखपत्र ( Admit Card ) ची print ०२ प्रतीत व आवेदन अर्जाची print ०२ प्रत, स्वतःचे पासपोर्ट साईझ ( ५ सें.मी. x ४. ५ सें.मी. ) आकारायचे ऑनलाईन आवेदन अर्जावर सादर केलेले ६ फोटोसह उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
  3. उमेदवाराने शारिरीक मोजमाप, मैदानी चाचणी, लेखी परीक्षा व कागदपत्र पडताळणी करिता दिलेल्या दिनांक व वेळेत उपस्थित राहावे. भरती प्रक्रियेदरम्यान शारिरीक मोजमाप / मैदानी चाचणी / लेखी चाचणी / कागदपत्र पडताळणी दिनांक व वेळी उमेदवार गैरहजर राहिल्यास, त्यांना भरती प्रक्रियेतून बाद ठरविण्यात येईल. सदर चाचणीसाठी कोणत्याही कारणांसाठी किंवा परिस्थितीत दिनांक बदलून दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
  4. शारिरीक मोजमाप अथवा मैदानी चाचणी यामध्ये काही तक्रार असल्यास संबंधित मैदानावर त्याच दिनांकाच्यावेळी प्रथम अपिल व व्दितीय अपिल करण्याची संधी आहे.
  5. सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत म्हणजेच दि.१५/१२/२०२२ किंवा त्यापूर्वीच्या दिनांकाची कागदपत्रे उमेदवाराने पडताळणीच्या दिनांकाच्यावेळी सादर करणे आवश्यक आहे.
  6. सर्व आवश्यक भरतीसाठी अर्हता, प्रमाणपत्र, सामाजिक तसेच समांतर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी केलेल्या दाव्यांचा पुष्ठीसाठी विधीग्राह्य व जाहिरातीत नमूद केलेल्या अंतिम दिनांक १५/१२/२०२२ ( cut off date ) पर्यंत किंवा त्यापूर्वीची प्राप्त केलेली असणे अनिवार्य आहे. त्या नुसार आवश्य ती मूळ प्रमाणपत्रे, क्रिडा प्रमाणपत्र, पडताळणी अहवाल व अर्हता प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे शारीरिक चाचणी, लेखी चाचणी व कागदपत्रे पडताळणीच्या दिनांकाच्या वेळी सादर करू न शकल्यास उमेदवाराची उमेदवारी तात्काळ रद्द करण्यात येईल.
  7. ऑनलाईन अर्जामध्ये आपण दावा केलेली माहिती ग्राहय धरून तात्पुरती निवड यादी करण्यात येईल, सदर निवड यादी कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहील. भरती निकषाची पूर्तता करत नसल्याचे आढळ्यास आपली उमेदवारी तात्काळ रद्द करण्यात येईल.
  8. भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यात उमेदवाराने गैरवर्तन / गैरकृत, भरतीसाठी गैरमार्गाचा अवलंब केल्याचे निदर्शनास आल्यास उमेदवारी तात्काळ रद्द करण्यात येईल.
  9. पोलीस भरती प्रक्रियेच्या वेळी उमेदवारास कोणतीही शारिरीक इजा / अपघात / नुकसान झाल्यास त्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील. त्याकरिता उमेदवाराने स्वतःची शारिरीक क्षमता / वैद्यकीय पात्रता विचारात घेऊन मैदानी चाचणीच्या प्रकारात सहभागी व्हावे व स्वतःची सर्वातोपरी काळजी घ्यावी.
  10. उमेदवारांनी ऑन लाईन अर्ज भरताना दिलेला भ्रमणध्वनी (मोबाईल क्र.) व ई-मेल कृपया बदलू नये. भरतीबाबतच्या सूचना आपण नमूद केलेल्या भ्रमणध्वनी (मोबाईल क्र.) अथवा ई-मेल वर देण्यात येतील.प्रवेशपत्रावरील फोटो, उमेदवाराचे नाव व इतर तपशील सुस्पष्ट व वाचनीय राहण्याची काळजी घ्यावी व प्रवेशपत्र भरतीच्या अंतिम टप्प्यापर्यंत आवश्यक असल्यामुळे त्याचे जतन करावे.
  11. प्रवेशपत्रा तील अर्जदाराची माहिती अर्जदाराने Online अर्जात भरलेल्या माहितीनुसार दिलेली असल्यामुळे सदरहू माहिती त्यांच्या मूळ प्रमाणपत्र / कागदपत्रांची अंतिम पडताळणीस अधीन राहील. प्रवेशपत्र प्राप्त झाले म्हणून उमेदवारास निवडीचा कोणताही हक्क प्राप्त होणार नाही याची नोंद घ्यावी. उमेदवारांना भरती प्रक्रियेबाबतच्या सूचना / निकाल वेळोवेळी संकेतस्थळावर दिल्या जातील, त्याप्रमाणे उमेदवारांनी अद्यावत माहितीसाठी व सूचनांसाठी वेळोवेळी जाहिरातीत दर्शविलेल्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
  12. महिला उमेदवार :- ज्या महिला उमेदवार महिला आरक्षणाचा लाभ घेणार आहेत, अशा महिला उमेदवारांनी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र व खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांनी ‘फ’ विवरणपत्र शारीरिक चाचणीपुर्वी उपलब्धकरून देणे आवश्यक आहे. जर त्या नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र अथवा ‘ फ ‘ विवरणपत्र उपलब्ध करून देत नसल्यास त्यांना महिला आरक्षणाचालाभ अनुज्ञेय ठरणार नाही.

Police Bharti Ground Test Document List – पोलिस भरती ऍडमिट कार्ड सोबत “ही” कागदपत्रे न्यायला विसरू नका, बघा लिस्ट

उमेदवारांनी शारिरीक चाचणी करीता हजर राहतेवेळी मुळ सर्व शैक्षणीक प्रमाणपत्र सोबत आणणेबाबत.

  • उमेदवार यांनी शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणीसाठी हजर राहतेवेळी आवश्यक ती मुळ शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • सामाजिक व संमातर आरक्षण
  • क्रिडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल
  • आधार कार्ड
  • पॅनकार्ड
  • एलएमव्ही लायसन्स
  • आवेदन अर्जाची छायांकित प्रत इत्यादी सर्व मूळ कागदपत्र सोबत घेऊन दिलेल्या तारखेस वेळेवर उपस्थित रहावे. 

 

 

येत्या ११ फेब्रुवारीपासून पोलीस भरतीच्या प्रक्रियेला सुरवात होणार आहे. ग्रामीण पोलीस दलाची भरतीप्रक्रिया जोग स्टेडियममध्ये होणार असून, यापूर्वी घोषित भरतीप्रक्रिया राज्यामध्ये २० जानेवारीपासून सुरू होणार होती. त्यासाठी ग्रामीण पोलिसांनी देखील तयार सुरू केली होती. परंतु ग्रामीण भागात निवडणुका आल्याने २० जानेवारीपासून सुरू होणारी भरतीप्रक्रिया रद्द करण्यात आली होती. १ हजार ६०० मीटर धावचाचणी, १०० मीटर धावचाचणी, गोळाफेक, लांबउडी, उंचउडी, पुलअप या प्रमुख चाचण्या उमेदवारांना शारीरिक चाचणीच्या अंतर्गत द्याव्या लागतील. त्यापूर्वी त्यांची दस्तऐवज तपासले जातील.

२१४ पदे आणि २१ हजार २०० च्यावर अर्ज आल्यामुळे टप्प्याटप्याने युवक व युवतींना चाचण्यांसाठी पाचारण करण्यात आले आहे. शहर पोलीस दलात जागाच रिक्त नसल्याने येथे भरतीप्रक्रिया चालू वर्षात घेतल्या गेली नाही. ११ फेब्रुवारीपासून सुरू होणारी भरती ही जवळपास पंधरा दिवसांपर्यंत चालणार आहे. युवक-युवतीसाठी बारावी उत्तीर्ण ही अट ठेवण्यात आली असून, एकूण जागापैकी ३० टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. ११ फेब्रुवारीपासून नियोजन असले तरी त्या तारखांमध्ये बदल होऊ शकतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

उमेदवारांनी एकापेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये भरतीसाठी अर्ज सादर केले असले तरी त्यांना एकाच जिल्ह्यात भरतीसाठी उभे राहता येईल. भरतीप्रक्रिया पारदर्शक व्हावी, याकरिता आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Instruction For Wardha Police Bharti Ground Exam 2026

Instruction For Wardha Police Bharti Ground Exam 2026


राज्यात १५ हजार ६३१ पदांची पोलिस भरती होत असून, त्यात सोलापूर शहर पोलिस दलातील ७९ आणि ग्रामीण पोलिसांकडील ९५ पदे आहेत. पोलिस भरतीसाठी राज्यभरातून एका पदासाठी तब्बल १०६ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. सोलापूर शहर-ग्रामीणमध्ये हे प्रमाण एका पदासाठी ५० उमेदवार असे आहे. सोलापूर शहरात एका पोलिस शिपाई पदासाठी ४३ तर बँड्‌समनच्या एका पदासाठी १६९ उमेदवार आहेत. सोलापूरसह राज्यातील पोलिस भरतीची प्रक्रिया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यावर सुरू होईल. महापालिकेनंतर ३१ जानेवारीपूर्वी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. फेब्रुवारीत मैदानी चाचणी सुरू होईल आणि पावसाळ्यापूर्वी मैदानी संपविण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. उमेदवारांच्या अर्जांची संख्या राज्यात १६ लाख ७० हजारांपर्यंत असल्याने मैदानी चाचणीसाठी अंदाजे चार महिने लागतील. 

मैदानी पार पडल्यावर पुढील टप्प्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा होईल. दरम्यान, सोलापूर शहरातील पोलिस शिपायांच्या ७३ पदांसाठी पुरुष उमेदवारांचे दोन हजार ४८८, महिला उमेदवारांचे ६२० आणि माजी सैनिक उमेदवारांचे २६ अर्ज आहेत. दुसरीकडे, बँड्‌समनच्या सहा पदांसाठी पुरुष उमेदवारांचे ७८५, महिला उमेदवारांचे २२७ आणि तृतीयपंथी उमेदवाराचा एक अर्ज असल्याची माहिती पोलिस उपायुक्त गौहर हसन यांनी दिली.

 

 

पोलिस दलामध्ये भरती होण्यासाठीची स्पर्धा वाढली असल्याचे या वर्षीच्या आकडेवारीतून दिसून येते. मुंबईसह राज्यात पोलिस दलातील वेगवेगळ्या १५ हजार ४०५ पदांसाठी तब्बल १६ लाख ५२ हजार ८५० उमेदवारांनी अर्ज केला आहे. सरासरी काढल्यास एका पदासाठी १०८ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. राज्यात सरकारी नोकरीची ओढ पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. ठाणे शहर आणि ग्रामीण पोलिस दलातील रिक्त जागांसाठी हजारो तरुणांनी अर्ज केल्याने यंदा भरतीचे मैदान चांगलेच गाजणार आहे. शहर पोलिस दलातील एका जागेसाठी ३२, तर ग्रामीणमध्ये २८ उमेदवार रिंगणात नशीब अजमावणार आहेत. ठाणे शहर पोलिस दलातील ६५४ जागांसाठी तब्बल २१ हजार दोन अर्ज ऑनलाइन दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे ठाणे ग्रामीण पोलिस दलात १६७ जागांसाठी चार हजार ७०० अर्ज प्राप्त झाले आहे. यावरून सरकारी नोकरीची क्रेझ पुन्हा एकदा दिसून आली आहे. मुंबईसह राज्यातील रिक्त पदे भरण्यासाठी सरकारने भरतीची घोषणा केल्यानंतर पोलिस प्रशासनाच्या वतीने प्रत्यक्षात प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शिपाई, चालक, बँड्समन, कारागृह शिपाई, एसआरपीएफ अशा वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, १५,४०५ जागा भरण्यात येणार आहेत. या प्रक्रियेचा पहिला टप्पा ३० नोव्हेंबर रोजी संपला. मात्र, राज्याच्या कानाकोपऱ्यातून होणाऱ्या मागणीनुसार ही मुदत आठ दिवसांनी वाढविण्यात आली. ही मुदत संपल्यानंतर १५,४०५ पदांसाठी उमेदवारांनी अर्ज केल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. अर्ज करणाऱ्यांमध्ये ग्रामीण भागातील तब्बल १६ लाख ५२ हजार ८५० उच्चशिक्षितांची संख्या अधिक असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. भरती प्रक्रियेचा पुढील टप्पा मैदानी चाचणी असून २० जानेवारीपासून ही प्रक्रिया सुरू होईल, असे हा अधिकारी म्हणाला. सर्वांत कमी म्हणजेच केवळ १९ पदे ही बँड्समनची भरण्यात येणार आहेत. मात्र, बँड्समनच्या एका पदासाठी सरासरी ८९५ उमेदवार स्पर्धेत आहेत.

 

दरवर्षीप्रमाणे रिक्त होणाऱ्या जागांसाठी पोलिस दलात भरती प्रक्रिया राबविण्यात येते. यावर्षीही या भरती प्रक्रियेचा श्रीगणेशा झाला असून इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यानुसार, शहर पोलिस दलातील एका जागेसाठी ३२ उमेदवार रिंगणात आहेत. तर ग्रामीणमध्ये एका जागेसाठी २८ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. यामुळे स्पर्धेचा स्तर कमालीचा वाढला आहे. सध्या सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. या निवडणुकीचा धुरळा शांत झाल्यानंतर, म्हणजेच २० जानेवारी २०२६ पासून प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. भरती प्रक्रिया पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने राबवण्यासाठी पोलिस प्रशासनाने तयारी अंतिम टप्प्यात आणली आहे.

उच्चशिक्षितांचाही ओढा
गेल्या काही वर्षांप्रमाणे यंदाही पोलिस शिपाईपदासाठी उच्चशिक्षित उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज केल्याची शक्यता आहे. स्थिर सरकारी नोकरीची हमी आणि पोलिस दलात काम करून समाजसेवेची संधी, यामुळे पदवीधर आणि पदव्युत्तर उमेदवारांचा ओढा वाढला आहे.

उमेदवारांसाठी कठीण कस
वाढत्या स्पर्धेमुळे केवळ लेखी परीक्षाच नाही, तर मैदानी चाचणीतही गुणांची मोठी चुरस पाहायला मिळेल. दमछाक करणाऱ्या शारीरिक चाचण्या आणि त्यानंतर होणारी लेखी परीक्षा पार करण्यासाठी उमेदवारांना तगडा फिटनेस आणि मानसिक तयारी ठेवावी लागणार आहे.

 

अर्जांचा पाऊस
पोलिस दल रिक्त जागा एकूण अर्ज एका जागेसाठी सरासरी

  • ठाणे शहर ६५४ २१,००२ ३२ उमेदवार
  • ठाणे ग्रामीण १६७ ४,७०० २८ उमेदवार

 

पोलिस दलामध्ये भरती होण्यासाठीची स्पर्धा वाढली असल्याचे या वर्षीच्या आकडेवारीतून दिसून येते. मुंबईसह राज्यात पोलिस दलातील वेगवेगळ्या १५ हजार ४०५ पदांसाठी तब्बल १६ लाख ५२ हजार ८५० उमेदवारांनी अर्ज केला आहे. सरासरी काढल्यास एका पदासाठी १०८ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत.मुंबईसह राज्यातील रिक्त पदे भरण्यासाठी सरकारने भरतीची घोषणा केल्यानंतर पोलिस प्रशासनाच्या वतीने प्रत्यक्षात प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शिपाई, चालक, बँड्समन, कारागृह शिपाई, एसआरपीएफ अशा वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, १५,४०५ जागा भरण्यात येणार आहेत. या प्रक्रियेचा पहिला टप्पा ३० नोव्हेंबर रोजी संपला. मात्र, राज्याच्या कानाकोपऱ्यातून होणाऱ्या मागणीनुसार ही मुदत आठ दिवसांनी वाढविण्यात आली. ही मुदत संपल्यानंतर १५,४०५ पर्दासाठी तब्बल १६ लाख ५२ हजार ८५० उमेदवारांनी अर्ज केल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. अर्ज करणाऱ्यांमध्ये ग्रामीण भागातील उच्चशिक्षितांची संख्या अधिक असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. भरती प्रक्रियेचा पुढील टप्पा मैदानी चाचणी असून २० जानेवारीपासून ही प्रक्रिया सुरू होईल, असे हा अधिकारी म्हणाला. सर्वात कमी म्हणजेच केवळ १९ पदे ही बँड्समनची भरण्यात येणार आहेत. मात्र, बँड्समनच्या एका पदासाठी सरासरी ८९५ उमेदवार स्पर्धेत आहेत.

 

  • शिपाई: जागा- १२,७०२ अर्ज- ७,८६,५००
  • चालक: जागा- ४७८ अर्ज- १,८०,०००
  • बँड : जागा- १९ अर्ज- १७,०००
  • कारागृह शिपाई: जागा- ५५४ अर्ज- ३,३४,३५०
  • एसआरपीएफ : जागा- १,६५२ अर्ज- ३,३५,०००

 

शिपाई, चालकांसह इतर पदावर घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेत इअर बर्ड आणि इलेक्ट्रिक डिव्हाइसच्या माध्यमातून हायटेक कॉपी आणि बनावट हॉल तिकिटाच्या माध्यमातून प्रवेश मिळविण्याचे प्रकार याआधी घडलेले आहेत. मैदानी चाचणीत पायातील चिपची अदलाबदल करून उत्तीर्ण होण्याचे प्रकार घडले होते. वर्गामध्ये; तसेच मैदानावर घडणाऱ्या या गैरप्रकारांना रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे.

 

मित्रांनो,  आताच प्राप्त माहिती नुसार,पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात फेब्रुवारी २०२६ मध्ये अपेक्षित आहे . महाराष्ट्र राज्य पोलिस दलासह कारागृह विभागातील शिपाई संवर्गात सुमारे पंधरा हजार रिक्त पदांसाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेत अर्ज नोंदणीची मुदत संपल्याने आता मैदानी चाचणीच्या वेळापत्रकाकडे उमेदवारांच्या नजरा आहेत. मैदानी चाचणीचे ‘लक्ष्य’ डोळ्यांसमोर ठेवत पोलिस होण्याचे स्वप्न लाखो उमेदवार बघत असून, नाशिक जिल्ह्यात तीन संवर्गातील ३८० रिक्त पदांसाठी सुमारे सत्तर हजारांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. लवकरच चाचण्यांचे वेळापत्रक घोषित होणार असून, अर्ज पडताळणीनुसार ‘स्लॉट’ करण्यात येणार आहेत त्याकरिता प्रवेशपत्र वेळेवर प्रकाशित केले जातील.  भरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ दिली जाणार नाही, असे गृह विभागाने स्पष्ट केले आहे. ८ डिसेंबरनंतर अर्जाची छाननी होईल पात्र उमेदवारांची फेब्रुवारीपासून मैदानी चाचणी सुरू होईल, असे सूत्रांनी सांगितले.

नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यातील रिक्त जागांच्या तपशिलांसह अधिसूचना जारी केली. त्यानुसार नाशिक ग्रामीण पोलिस दलात २१० शिपाई, ५२ चालक, तर कारागृह दलात ११८ शिपाई अशा एकूण ३८० जागांवर भरती होत आहे. यंदा सन २०२२ ते २०२५ या कालावधीत वयोमर्यादा ओलांडलेल्यांनाही अखेरची संधी असल्याने राज्यभरात सर्वत्र अर्जाची संख्या वाढली आहे. दरम्यान, नाशिक शहरात पदे रिक्त नसल्याने तेथील भरती घोषित झालेली नाही. मात्र, ग्रामीण पोलिस दलात होणऱ्या भरतीमुळे सिंहस्थापूर्वी नवप्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांचे बळ प्राप्त होणार आहे. सन २०२३ मध्ये नाशिक ग्रामीण पोलिसांत दीडशे, तर सन २०२४ मध्ये ३२ जागांवर भरती झाली होती. त्या भरतीतून नियुक्त झालेले कर्मचारी सध्या पोलिस ठाण्यांमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे आता होणाऱ्या भरतीतील पोलिसांचे बळ सिंहस्थात वापरता येणार आहे.

 

Table of Contents

4 thoughts on “पोलिस भरतीत उंची मोजण्यावरून गोंधळ उमेदवारांना ठरवले अपात्र; पुण्यात मैदानी चाचणीत अनेकांना फटका!- Maharashtra Police Bharti Physical Test Admit Card Download”

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड