कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागांतर्गत 1346 युवकांना रोजगार

Article on Skills Full Development 

Article on Skills Full Development  : Employment of 1316 youth in the district – कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागांतर्गत प्रशिक्षणाबाबत विविध योजना राबविण्यात येत आहेत. गत वर्षात १३१६ युवकांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे.

बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. यामध्ये प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना, किमान कौशल्य विकास कार्यक़्रम, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा समावेश आहे. या योजनेंतर्गत २०२०-२१ मध्ये एकूण २ हजार ४१६ युवकांना प्रशिक्षण द्यावयाचे आहे. सदरील प्रशिक्षण प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हिंगोली, वसमत, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव व ट्रेनिंग सेंटर आदीमार्फत देण्यात येणार आहे.

सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मेळावे, ऑनलाईन वेबिनार, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. २०२० मध्ये १ हजार ३१६ युवकांना या योजनेंतर्गत रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. १२ डिसेंबर ते २० डिसेंबर यादरम्यान राज्यस्तरीय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात हिंगोली जिल्ह्यासाठी ५३७ जागांसाठी सात उद्योजक कंपन्यांनी सहभाग नोंदविला.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

२२१ लाभार्थ्यांची रक्कम मंजूर

विभागांतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजना राबविण्यात येते. यामध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा, गट कर्ज व्याज परतावा, गट प्रकल्प कर्ज योजना राबविली जाते. महामंडळाकडून आजपर्यंत २२१ लाभार्थ्यांना १३ कोटी ८० लाख १५ हजार २१ रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. २२१ पैकी २०७ लाभार्थींना व्याज परतावा मिळाला आहे. व्याज परताव्याची एकत्रित रक्कम ९० लाख ३५ हजार २७१ एवढी आहे.

-प्र.सो. खंदारे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता कार्यालय

सोर्स : लोकमत


‘कौशल्य’पूर्ण विकास – Article on Skills Full Development 

Maharashtra New Rojgar Opportunity  : article on skills full development : सध्याच्या स्पर्धेच्या युगात नोकरी शोधताना एका जागेसाठी हजारो अर्ज येतात, अनेक स्पर्धा परीक्षांच्या कट—ऑफ गुणांनी तर नव्वदीचा आकडा केव्हाच ओलांडला आहे. बारावीमध्ये बोर्ड— सीईटी अशा परीक्षांचा मेहनतीने केलेला अभ्यास आणि पुढे स्पर्धेत टिकून राहायचे म्हणून जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी जीव तोडून केलेला अभ्यास या गोष्टींमुळे परीक्षांमध्ये उत्तम गुण मिळतातही, पण नोकरी मिळवताना अनेक विद्यार्थ्यांंना उत्तम गुणांसह सारखीच पदवी असल्याचं दिसतं. एकीकडे अनेक पदवीधर – उच्चशिक्षित विद्यार्थी योग्य नोकरीच्या शोधार्थ कष्ट घेताना दिसतात, तर दुसरीकडे अनेकदा उच्चशिक्षित नसलेले, परंतु आयटीआय किंवा अशा प्रकारचे कौशल्य विकास होणारे कोर्सेस केलेले तरुण—तरुणी आपल्या कौशल्याच्या आणि अनुभवाच्या जोरावर यशस्वी झालेले दिसतात. असे उमेदवार वेगळे ठरतात, ते त्यांच्या ‘स्किल्स’ किंवा कौशल्यामुळे. या कौशल्यामध्ये नोकरी किंवा व्यवसायाभिमुख म्हणता येतील अशी कौशल्ये दोन प्रकारची.. सॉफ्ट स्किल किंवा व्यवहार कौशल्य आणि टेक्निकल स्किल्स म्हणजे तांत्रिक कौशल्ये.

यापैकी सॉफ्ट स्किल्स ही प्रत्येक क्षेत्रात गरजेची असतात. यामध्ये फार साध्या आणि सोप्या गोष्टींचा समावेश होतो, उदाहरणार्थ प्रभावीपणे संवाद साधणे, प्रेझेन्टेशन, इंग्रजी भाषेवर असलेले प्रभुत्व, स्वयंशिस्त, नेतृत्वगुण, जबाबदारीची जाणीव, विश्वासार्हता, एखादी समस्या सोडवण्याची पद्धत, दबावाखाली किं वा वेळेच्या मर्यादांमध्ये काम करण्याची क्षमता अशा काही अत्यंत महत्वाच्या कौशल्यांचा समावेश होतो. ही कौशल्ये काही फार वेगळी किंवा आत्मसात करण्यासाठी अवघड नाहीत, परंतु शिक्षण झाल्यावर या कौशल्यांमुळे आपल्याला नोकरी मिळण्यासाठी किंवा नोकरी मिळाल्यावर आपल्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी आपण इतरांपेक्षा निश्चितच एक पाऊल पुढे असतो. अनेकदा आपण बघतो की एखाद्या संस्थेत सारख्या पदावर, सारखे शिक्षण असलेल्या व्यक्ती काम करतात. काही वर्षांंनी त्यातली एक व्यक्ती आपल्या क्षेत्रात खूप पुढे निघून गेलेली असते, तर दुसरी व्यक्ती तिथे नोकरी लागल्यानंतर फारशी प्रगती करत नाही. इथे महत्त्वाची कौशल्ये ‘करिअर ग्रोथ’मध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. कौशल्य विकासाच्या बाबतीत बोलताना कौशल्य विकास प्रशिक्षणाचा प्रदीर्घ अनुभव असलेले पुण्यातील ‘कम्युनिकेयर ट्रेनिंग सोल्युशन्स’ संस्थेचे प्रा. कुशल राऊत सांगतात,‘एखाद्या मुलाखतीला गेल्यावर तुमच्या पदवीपेक्षा तुमचे स्किल्स पाहिले जातात. मुलाखतीमध्ये अगदी महत्वाचे कौशल्य म्हणजे प्रभावी संवाद, सकारात्मक दृष्टिकोन, स्वयंशिस्त अशा गोष्टीही जोखल्या जातात. या गोष्टी एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत, ही कौशल्ये तुमच्याकडे असतील तर तुमच्या करिअरची ग्रोथ होते’.

आता ही कौशल्ये आत्मसात करायची असतील तर इंटरनेटवर बरीच माहिती उपलब्ध आहेत. तसेच याबद्दल सखोल मार्गदर्शन करणाऱ्या अनेक कार्यशाळा उपलब्ध आहेत, परंतु या कार्यशाळा आपल्याला फक्त ही कौशल्ये मिळवण्यासाठी मदत करू शकतात. हे करण्यासाठीचे प्रयत्न आणि त्यासाठी लागणारी प्रेरणा, स्वयंशिस्त ही आपल्याला जाणीवपूर्वक आत्मसात करावी लागते. ही कौशल्ये आत्मसात करणे ही एक आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. पदवी मिळाल्यानंतर नोकरी शोधताना ही कौशल्ये आवश्यक आहेत अशी जाणीव अनेक तरुणांना होते, परंतु आधीपासूनच अशी कौशल्ये आत्मसात करणे, शिकणे गरजेचे आहे, यासाठी लागणारी स्वयंप्रेरणा असलीच पाहिजे. त्यानंतरच ही कौशल्ये आत्मसात करण्यासाठीच्या कार्यशाळा ही प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी उपयुक्त ठरतील. ही व्यवहार कौशल्ये कोणती असावीत, हे व्यक्तिपरत्वे बदलते. याचे उदाहरण देताना महाराष्ट्रातील तरुणांमध्ये अनेकदा इंग्रजी बोलण्याविषयी न्यूनगंड दिसून येतो, त्यामुळे आत्मविश्वास कमी होतो आणि संवाद प्रभावीपणे साधता येत नाही. इथे भाषेवर प्रभुत्व, आत्मविश्वास आणि प्रभावी संवाद अशी तिन्ही कौशल्ये एकमेकांशी निगडित आहेत. अशावेळी तरुणांनी हे लक्षात घ्यायला हवे की इंग्रजी ही केवळ एक भाषा आहे, ज्याचा वापर संवाद साधताना होईल. त्यात अवघड असे काहीही नाही. असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास आत्मविश्वास आपोआप वाढेल आणि संवाद प्रभावीपणे होईल, अशा प्रकारे एक कौशल्य दुसऱ्याशी निगडित असते, असे राऊत सांगतात. ही कौशल्ये विकसित करणे आणि ‘अपडेट’ करत राहणे ही अगदी आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे.

व्यवहार कौशल्याच्या बरोबरच नोकरी किंवा व्यवसायाच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी गरजेची असतात ती तांत्रिक कौशल्ये. म्हणजे आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रात पदवीबरोबरच आवश्यक अशी जी कौशल्ये लागतात ती म्हणजे तांत्रिक कौशल्ये. प्रत्येक पदवी—पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये त्या पदवीनंतर आवश्यक असणाऱ्या गोष्टी अंतर्भूत असतातच. पण नोकरी मिळवताना ही पदवी तर सगळ्यांकडेच असते. मग नोकरी किंवा व्यवसायाला सुरुवात करण्यापूर्वीच आपल्याला ज्या क्षेत्रात पुढे जायचे आहे, त्या क्षेत्रातली कौशल्ये आत्मसात केल्यास आपण सहजपणे यशस्वी होऊ शकतो. अशा प्रकारची कौशल्ये आत्मसात करण्यासाठी शिक्षण घेत असताना पदवीच्या पहिल्या वर्षांपासूनच महाविद्यालयात होणाऱ्या विविध कार्यशाळांमध्ये सहभागी होता येईल. यामुळे आपल्या क्षेत्रामध्ये कोणत्या विषयात आपला कल आहे, याची कल्पना आपल्याला येऊ शकेल, पुढे पदव्युत्तर शिक्षण घेताना आपल्याला हव्या त्या क्षेत्रातील विविध लहान लहान कोर्स, वर्कशॉप, इंटर्नशिप या माध्यमातून आपण आपले स्किल्स डेव्हलप करू शकतो. याविषयी बोलताना मुलुंड येथील वझे महाविद्यालयाच्या, जैवतंत्रज्ञान विभागाच्या प्रमुख डॉ. दीपाली कारखानीस सांगतात,‘महाविद्यालयीन शिक्षणामध्ये पुढील करिअरसाठी आवश्यक असणारी कौशल्ये अभ्यासक्रमात यावीत यासाठी अभ्यासक्रम वेळोवेळी सुधारित होत असतोच, पण आपल्याला गरजेची असणारी कौशल्ये यावीत यासाठी विद्यार्थ्यांंनीही प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपल्या क्षेत्राशी संबंधित कौशल्ये आत्मसात करण्यासाठी पदवी मिळाल्यानंतर इंटर्नशिप, वर्कशॉप या माध्यमातून प्रत्यक्ष कामाशी ओळख करून घेता येईल’.

अशाच प्रकारचा अनुभव कुठलाही व्यवसाय करतानाही गरजेचा असतो. ग्रामीण भागामध्ये डेअरी, पोल्ट्री इत्यादी गोष्टींचे व्यवसायाभिमुख कौशल्य प्रशिक्षण देणारे डॉ. बापू भोगटे सांगतात, ‘आपल्याला एखादा व्यवसाय करायचा असेल, तर त्याच्या कागदोपत्री प्लॅनबरोबरच प्रत्यक्ष काम करताना त्यातले बारकावे समजून घेतल्याशिवाय एखादा व्यवसाय यशस्वी होत नाही. कुठलाही अनुभव नसताना फक्त एखाद्या कार्यशाळेच्या जोरावर सरळ व्यवसाय करणे चुकीचे आहे. ग्रामीण भागातील युवक उत्साहाने पोल्ट्री, डेअरी, फार्मिग या गोष्टींचे प्रशिक्षण घेतात, त्यांची कष्ट करण्याची तयारीही दिसते, पण यासोबत त्या व्यवसायासाठी आवश्यक अशी मूलभूत कौशल्ये आत्मसात करण्यासाठी किमान तीन ते सहा महिने एखाद्या फार्मवर प्रत्यक्ष काम करून अनुभव घेणे गरजेचे आहे’. यातून नवीन व्यावसायिकांना कार्यशाळेत शिकलेल्या ज्ञानाचा प्रत्यक्षात उपयोग करण्याविषयी अनुभव घेता येईल.

नोकरी शोधायला लागल्यावर कौशल्य विकास करणे म्हणजे तहान लागल्यावर विहीर खणल्यासारखे होईल. विद्यार्थीदशेत परीक्षेसाठी विद्यार्थी मेहनत घेऊन अभ्यास करतात, त्याचवेळी अशा छोटय़ा छोटय़ा परंतु महत्त्वपूर्ण कौशल्यांची जोड देण्याचा प्रयत्न आपण शिक्षण सुरू असतानाच केला तर नोकरी शोधताना आपण इतरांपेक्षा नक्कीच सरस ठरू.

सोर्स : लोकसत्ता


कौशल्य विकासाबरोबरच मिळवा रोजगार – 10 वी पासून ते पदवीधर उमेदवारांपर्यंत संधी 

Maharashtra New Rojgar Opportunity  : दहावी, बारावी आणि पदवीचे शिक्षण घेतले परंतु नोकरी मिळत नाही. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे कौशल्य प्रशिक्षणाचा अभाव. बहुतांश तरुण-तरुणींना येणारी ही अडचण दूर करण्यासाठी विविध कौशल्य विकास योजनांच्या माध्यमातून मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणानंतर तरुण-तरुणींना प्रमाणपत्रासोबत लगेचच रोजगारही उपलब्ध होणार आहे. याव्यतिरिक्त ऑनलाइन रोजगार मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले आहे.

हे असतील कोर्सेस – Maharashtra New Rojgar Opportunity 




टेलर, एम्ब्रॉयडरी, शिवणकला मशिन ऑपरेटर, हेअर स्टाईलिस्ट, मोबाईल फोन हार्डवेअर टेक्निशियन, टेक्निशियन कॉम्प्युटिंग, नेटवर्किंग ॲंड स्टोअरेज टेक्निशियन, सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन टेक्निशियन, स्नॅक मेकर, बेकर, डोमेस्टिक आयटी हेल्पडेस्क असिस्टंट, ज्युनिअर स%Aफ्टवेअर इंजिनिअर, डेटा एंट्री ऑपरेटर, डॉक्युमेंटेशन असिस्टंट, रिटेल ट्रेनी असोसिएट, असिस्टंट हेअर स्टाइल, एलईडी लाइट टेक्निशियन, सोलर पीव्ही इन्स्टॉल, सांडपाणी प्रक्रिया टेक्निशियन, मशिन ऑपरेटर, लॅब टेक्निशियन, ऑफिस असोसिएट, हाउसकीपिंग अटेंडंट, ट्रॅव्हल कन्सल्टंट, प्लंबर, वर्कशॉप मॅनेजर, टेक्निशियन फूड प्रोसेसिंग.

वेबपोर्टलवर रोजगार मेळावा

कोरोनाच्या संकटानंतर कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने रोजगार मेळावा होणार आहे. केवळ ऑनलाइन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांसाठीच हा मेळावा घेण्यात येणार आहे. तो www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर होणार आहे.

होमपेजवरील जॉब सीकर लॉगीनमधून युझर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगीन करावे. त्यानंतर डॅशबोर्डमधील पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या बटनावर क्लिक करून प्रथम पुणे विभाग व नंतर पुणे जिल्हा निवडून रोजगार मेळाव्याची निवड करावी. यानंतर उद्योजकनिहाय त्यांच्याकडील रिक्तपदाची निवड करावी. ऑनलाइन पसंतीक्रमानुसार उमेदवारांना त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण आणि वेळ दूरध्वनी, एसएमएस किंवा ई-मेलद्वारे कळविण्यात येईल.

  • रोजगारासाठी १०० दिवस कामाचे; अतिरिक्त दहा हजार मजुरांना मिळणार काम
  • १५ ते ४५ वयोगटातील सुशिक्षित बेरोजगारांना संधी

कौशल्य विकास अंतर्गत पहिल्या बॅचमध्ये ७४५ इच्छुकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारी मान्यताप्राप्त संस्थांची निवड करण्यात येत आहे. येत्या १५ दिवसांत प्रशिक्षण सुरू होइल. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर संस्थेला संबंधित उमेदवारास रोजगार उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे.

सोर्स : सकाळ


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

16 Comments
  1. आगर मगर says

    Saheb apl khul sarkar kadhi vacancies kadnar ahet… Aamhi devakade gelyavar ka?

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड