Maharashtra Arogya Vibhag Bharti 2026 – राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून १ हजार ४४० वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्ती आदेश देण्यात येणार आहेत. बुधवारी विशेष समारंभात हे आदेश वितरित केले जातील. यामध्ये ६७४ विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी आणि ७६६ एमबीबीएस डॉक्टरांचा समावेश आहे. या नियुक्त्यांमुळे शासकीय रुग्णालयांमधील डॉक्टरांची कमतरता दूर होण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ संवर्गातील या भरतीसाठी २७ फेब्रुवारीला जाहिरात प्रसिद्ध केली होती. वैद्यकीय अधिकारी संवर्गातील २ हजार ५१४ पदांपैकी १ हजार ४४० पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली.
नियुक्त होणाऱ्या डॉक्टरांमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा आणि जिल्हा रुग्णालयांमधील आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार आहेत. विशेषतः ग्रामीण, दुर्गम, डोंगराळ आणि आदिवासी भागातील नागरिकांना स्थानिक पातळीवर तपासणी, निदान आणि उपचार उपलब्ध होतील. अपघात, प्रसूती, सर्पदंश तसेच अन्य आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर उपचार मिळण्यास मदत होईल.
गंभीर आजारांचेही निदान
विशेषज्ञ डॉक्टरांच्या उपलब्धतेमुळे गंभीर आजारांवरील उपचारांसाठी मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज कमी होईल. तसेच सध्या कार्यरत डॉक्टरांवरील कामाचा ताण कमी होऊन बाह्यरुग्ण, आंतररुग्ण आणि आपत्कालीन सेवांची कार्यक्षमता वाढेल. “गरीब, गरजू आणि ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा जवळच उपलब्ध व्हावी, हा शासनाचा प्राधान्यक्रम आहे. नवनियुक्त डॉक्टरांनी सेवाभाव आणि रुग्णकेंद्रित दृष्टिकोन ठेवून काम करावे,” असे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
Maharashtra Arogya Vibhag Bharti 2026 – Maharashtra Arogya Vibhag (Health Department Maharashtra State) announces new Mega Recruitment For the more than 5 thousand vacancies to Fulfill the Vacancies For the Grade A, B, C, and D Posts like- “Medical Officer, Arogya Sevak/Sevika, Stuff Nurse, ANM, GNM, Lab Technician, Physician, Anesthetist, Pediatrician, Surgeon, Radiologist, Nephrologist, Dialysis Technician, Dental Hygienist, Medical Officer, Instructor for Hearing Impaired Children, JE, Medical Officer, Pediatrician, Physiotherapist, Audiologist, Cum Speech Therapist, Psychologist, Optometrist, etc”. Eligible candidates are directed to submit their application online through http://arogya.maharashtra.gov.in/ this Website. Date to start online application form will be live soon. Total 5000+ Vacant Posts have been announced by Maharashtra Arogya Vibhag (Health Department Maharashtra State) Recruitment Board, Maharashtra, in the advertisement 2026. Eligible candidates are directed to submit their application online through www.arogya.maharashtra.gov.in. Candidates are requested to read the detailed advertisement (जाहिरात PDF) carefully before applying this Arogya Vibhag Bharti 2026 – 2027 Application Process. Applicants can easily know all the latest updates of Maharashtra Health Department—Arogya Vibhag Bharti in this page. So, bookmark this page for more information about Maharashtra Health Department Bharti 2026. The PDF Advertisement will be out soon on MahaBharti.in
सेवाज्येष्ठतेच्या पारंपरिक चौकटीपलीकडे जात आता प्रत्यक्ष कामगिरी आणि गुणवत्तेला प्राधान्य देण्याच्या दिशेने सार्वजनिक आरोग्य विभागाची वाटचाल सुरू झाली आहे. ‘कामगिरीला मान्यता आणि गुणवत्तेला संधी’ या सूत्रावर आधारित नव्या व्यवस्थेत अधिकाऱ्यांची नेतृत्वक्षमता, रुग्णसेवेतील योगदान, आर्थिक शिस्त, मनुष्यबळ व्यवस्थापन तसेच विविध आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी यांना विशेष महत्त्व दिले जाणार आहे.
कामगिरीच्या जोरावर आता अधिकाऱ्यांच्या भविष्यातील संधींचे दरवाजे खुले होणार असून, उत्कृष्ट काम करणाऱ्यांना गुणवत्तेनुसार पुढील जबाबदाऱ्या मिळणार आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचे दरवर्षी वस्तुनिष्ठ पद्धतीने गुणांकन करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतला आहे. या प्रक्रियेत तीन वर्षांच्या कामगिरीचे ‘रिपोर्ट कार्ड’ तयार करून अधिकाऱ्यांचे अ, ब, क आणि ड अशा चार श्रेणींत वर्गीकरण केले जाणार आहे. दरवर्षी ही मूल्यांकन प्रक्रिया राबवून त्याआधारे अधिकाऱ्यांच्या पुढील संधी आणि जबाबदाऱ्या निश्चित केल्या जाणार आहेत.
रुग्णसेवेपासून प्रशासकीय कामकाजापर्यंतच्या प्रत्येक कामगिरीची आता डिजिटल पद्धतीने काटेकोर पडताळणी होणार आहे. अधिकाऱ्यांच्या गुणांकनासाठी तब्बल ११ वस्तुनिष्ठ कसोट्या निश्चित करण्यात येणार असून, रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमधील मनुष्यबळ व्यवस्थापनासह नैसर्गिक आपत्ती, साथीचे आजार आणि अपघातांच्या काळात अधिकाऱ्यांनी बजावलेल्या भूमिकेलाही गुणांकनात विशेष महत्त्व दिले जाणार आहे.

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2026 – आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवून सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी नवीन प्रशिक्षण धोरण राबविण्यात येत आहे. या धोरणानुसार ‘अ’ ते ‘ड’ वर्गातील सर्व नियमित आणि कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मूलभूत प्रशिक्षण घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. निर्धारित प्रशिक्षण पूर्ण न करणाऱ्यांवर पदोन्नती व आर्थिक लाभ रोखण्याची कारवाई केली जाऊ शकते. तसेच प्रशिक्षणासाठी झालेला खर्च संबंधित कर्मचाऱ्याच्या वेतनातून वसूल करण्यासह प्रशासकीय शिस्तभंगाची कारवाईही करण्यात येणार आहे
**गटातील सर्वांसाठी अनिवार्य प्रशिक्षण**
आरोग्य विभागांतर्गत ‘गट क’ (Group C) आणि ‘गट ड’ (Group D) मधील कर्मचाऱ्यांसाठी हे प्रशिक्षण अनिवार्य आहे; यामध्ये परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य कर्मचारी, लिपिक आणि शिपाई यांचा समावेश आहे. सेवेत रुजू होण्यापूर्वी आणि सेवेदरम्यान, अशा टप्प्याटप्प्याने हे प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक असेल.


राज्य शासनाच्या ज्या आरोग्य संस्थांमध्ये जागा रिक्त आहेत, त्यात जिल्हा रुग्णालय ठाणे, जिल्हा रुग्णालय, बीड, जिल्हा रुग्णालय अकोला, सामान्य रुग्णालय- मंचर, आंबेगाव, इचलकरंजी, सामान्य रुग्णालय, इचलकरंजी, संदर्भ सेवा रुग्णालय ठाणे, नाशिक. तसेच ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपजिलहा रुग्णालय- अंजनगाव सुर्जी, चिखली जि. बुलढाणा, वरुड जि. अमरावती, सोयगाव, धानोरा जि. गडचिरोली, माजलगाव जि. बीड, आटपाटी जि. सांगली, जत जि. सांगली, देवगड जि. सिंधुदुर्ग, दोडामार्ग जि. सिंधुदुर्ग, अमळनेर जि. जळगाव, मानत जि. परभणी, अजिंठा जि. छ. संभाजी नगर या सर्व रुग्णालयांची क्षमता ३० खाटांवरुन ५० खाटांवर वाढविण्यात येत आहे. त्यामुळे येतील रिक्त जागांची भरती होईल.
यासोबतच ३० खाटांवरुन १०० खाटांच्या रुग्णालयांमध्ये उपजिल्हा रुग्णालय- अकोट जि. अकोला, मोर्शी जि. अमरावती, जामखेड जि. अहिल्यानगर, सुपा जि. पुणे, बार्शी जि. सोलापूर, घनसावंगी जि. जालना या रुग्णालयांचा समावेश आहे. स्त्री रुग्णालय हिंगोली, नाशिक येथे १०० खाटा नव्याने निर्माण करण्यात येत असल्याने त्यासाठीही वेगळी पदनिर्मिती करण्यात येत आहे. ट्रॉमा केअर युनिट चाळीसगाव, मेहकर, वडगाव मावळ, उमरेड, कुर्डूवाडी या रुग्णालयांचाही समावेश आहे.
एवढंच नाही तर आयुष रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, आदिवासी प्राथमिक आरोग्य केंद्र, राज्यस्तरिय प्रशिक्षण केंद्र, राज्यस्तरिय औषधी भांडार या संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर पद निर्माण करण्यात आलेले आहेत. २५९ रुग्णसंस्थांसाठी एकूण ५२२३ पदे निर्मितीच्या अनुषंगाने मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















