महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ चे परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करा | Maha TET Admit Card Download

Maha TET Hall Ticket 2024

mahatet.in Admit Card

Maha TET Admit Card Download:महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून दि. १० नोव्हेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यात येणार आहे. त्यासाठी परिषदेच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र हॉलतिकिटे डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ते १० नोव्हेंबर रोजी परीक्षेच्या तारखेपर्यंत प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे. राज्यातील शाळा, महाविद्यालयांत १०२९ परीक्षा केंद्र असणार आहेत. यामध्ये पेपर-१साठी १ लाख ५२ हजार ५९७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, ४३१ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. पेपर-२ साठी २ लाख १ हजार ३४० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 10 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांना प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. उमेदवारांना परीक्षेच्या दिनाकांपर्यंत प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे. MSCE मंडळातर्फे 2024 संपूर्ण राज्यात विविध शिक्षक पदांसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा 10 नोव्हेंबर 2024 रोजी भरती मंडळाद्वारे आयोजित केली जाणार आहे. राज्यातील एकूण १०२९ परीक्षा केंद्रांवर टीईटी परीक्षा होणार आहे. यात ‘पेपर एक’ साठी एक लाख ५२ हजार ५९७ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. पेपर एकची परीक्षा ४३१ परीक्षा केंद्रावर सकाळी साडेदहा ते दुपारी एक या वेळेत होणार आहे. दुपारी अडीच ते सायंकाळी पाच या वेळेत दोन लाख एक हजार ३४० उमेदवार ‘पेपर दोन’ची परीक्षा देणार आहेत.

 

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद नि महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ चे परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. २८/१०/२०२४ ते १०/११/२०२४ या कालावधीत उमेदवारांनी आपले प्रवेशपत्र डाउनलोड करावे, प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

दोन वर्षांपासून रखडलेल्या ‘टीईटी’ परीक्षेला (शिक्षक पात्रता परीक्षा) अखेर मुहूर्त लागला असून, राज्यभरात १० नोव्हेंबरला ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी जिल्हयातील सुमारे २१ हजार ८७ भावी शिक्षकांनी ऑनलाइन अर्ज केला आहे. त्यासाठी जिल्ह्यात ५५ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. येते जाणून घ्या महा टेट परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महत्त्वाच्या तारखा –

  • परीक्षेची तारीख – दि. १०/११/२०२४

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात वाचावी.

प्रवेशपत्र डाउनलोड

 

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा

५५ परीक्षा केंद्रांवर १० ला परीक्षा; १२० पोलिसांचा बंदोबस्त

२०१३ पासून टीईटी परीक्षा सुरू करण्यात आल्या. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे आणि ‘टीईटी’ च्या बोगस प्रमाणपत्रांमुळे दोन ते तीन वर्षांपासून ही परीक्षा रखडली होती. यामुळे परीक्षेबाबत भावी शिक्षकांमध्ये अस्वस्थता पसरली होती. मात्र ही रखडलेली परीक्षा आता नोव्हेंबरमध्ये होत आहे. राज्यात एकाच वेळी नोव्हेंबरमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे. पेपर क्रमांक १ (पहिली ते पाचवी), पेपर क्रमांक २ (सहावी ते आठवी) होणार आहे. पेपर क्रमांक १ हा १० नोव्हेंबरला सकाळी साडेदहा ते दुपारी एक आणि पेपर क्रमांक २ हा दुपारी दोन ते साडेचार यावेळेत होणार आहे. परीक्षेसाठी झावश्यक असलेली सर्व तयारी ही शिक्षण विभागाने केली असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छीक यांनी सांगितले.

Maha TET Exam Date

Maha TET Exam Date

परीक्षेचे नियोजन असे

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा १० नोव्हेंबरला होणार आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण ५५ केंद्रांवर एकाच वेळी ही परीक्षा घेतली जाणार आहे. यात पेपर क्रमांक १ साठी २१ तर, पेपर क्रमांक २ साठी ३४ केंद्रे व आठ झोन आहेत. पेपर क्रमाक एक ८ हजार ६६४, तर पेपर क्रमांक २ साठी १२ हजार ४२३ परीक्षार्थी प्रविष्ट आहेत. परीक्षेसाठी आठ व एक राखीव असे नऊ झोनल अधिकारी, ५९ सहाय्यक परिरक्षक, ५९ केंद्र संचालक यांची नेमणूक केली आहे. परीक्षा सुरळीतत पार पाडावी, यासाठी आत झोनल अधिकारी तसेच १२० पोलिस कार्यरत असणार आहेत.

 


TET परीक्षेच्या हॉल तिकिटावर परीक्षा केंद्राचा पत्ताच चुकीचा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा- २०२४ जिल्ह्यातील १४ केंद्रांवर दि. १० नोव्हेंबर रोजी दोन सत्रांत होणार आहे. मात्र, भावी शिक्षकांना पाठविलेल्या अनेक हॉल तिकिटांवर परीक्षा केंद्राचा पत्ताच चुकल्याने बाहेरगावावरून येणाऱ्या परीक्षार्थीचा गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जळगाव शहरातील १४ परीक्षा केंद्रावर दि. १० नोव्हेंबर रोजी परीक्षा होणार आहे.

 

टीईटी परीक्षेच्या हॉल तिकिटात परीक्षा केंद्राचा पत्ता चुकला असल्यास काही परीक्षा नियंत्रकांसों संपर्क साधावा, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी केले आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Rahul mali says

    Mla nokri milel ka

  2. Rahul mali says

    Job

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड