अल्पसंख्याक विकास विभागात ४०३ पदे रिक्त, पुढील भरती प्रक्रिया लवकरच होणार सुरु!! | Maha MDD Mumbai Bharti 2025
Maha MDD Mumbai Bharti 2025
Maha MDD Mumbai Bharti 2025
अल्पसंख्याक उमेदवारांच्या विकासाकडे लक्ष देणारे महत्वाचा विभाग म्हणजे अल्पसंख्यांक विभाग. परंतु या विभागात अनेक पदे रिक्त असल्याचे चित्र समोर आले आहे. राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभागात मंजूर ६०९ पदापैकी ४१० म्हणजे तब्बल ६७टक्के पदे रिक्त असून सदर पदे तातडीने भरण्यात यावीत. अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली आहे. रिक्त पदे भरण्यासंदर्भात शासन निर्णय होऊनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याबाबत आमदार शेख यांनी पवार यांना लिहिलेल्या पत्रामध्ये खंत व्यक्त केली आहे. अल्पसंख्याक विभाग व विभागाचे अल्पसंख्याक आयुक्तालय, अल्पसंख्याक प्रशिक्षण व संशोधन संस्था, अल्पसंख्याक आयोग, वक्फ मंडळ, पंजाबी साहित्य अकादमी, वक्फ न्यायाधिकरण, मौलाना आझाद मंडळ, जैन महामंडळ व विभागाची विविध क्षेत्रीय कार्यालये आदींसाठी एकूण ६०९ पदे मंजूर असून त्यापैकी केवळ १९९ पदे भरली आहे आणि अन्य ४१० पदे रिक्त आहे. या रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया लवकरच सुरु होणे अपेक्षित आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Maha MDD Mumbai Bharti: Maha MDD Mumbai (Maharashtra Department of Minority Development, Mumbai) The recruitment notification has been declared for the interested candidates for the vacant post of “Managing Director”. Eligible candidates can apply before the 20th of February 2023. The official website of Maha MDD Mumbai is mdd.maharashtra.gov.in. Further details are as follows:-
महाराष्ट्र अल्पसंख्याक विकास विभाग, मुंबई अंतर्गत “व्यवस्थापकीय संचालक” पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2023 आहे.
- पदाचे नाव – व्यवस्थापकीय संचालक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा – 25 वर्षे पूर्ण
- अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव (का. ४) अल्पसंख्याक विकास विभाग, रूम नंबर क्र. ७०८, ७ वा माळा मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय (विस्तार) मुंबई – 400032
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – mdd.maharashtra.gov.in
Educational Qualification
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
व्यवस्थापकीय संचालक | संबंधित अधिकारी शासनाच्या उप सचिव दर्जापेक्षा कमी नसलेला किंवा समकक्ष दर्जाचा अधिकारी ( तो कार्यरत असलेल्या पदाचे वेतनस्तर सातव्या वेतन आयोगानुसार एस-२५ पेक्षा कमी नसावे.) |
Terms & Conditions – MDD Mumbai Bharti
अटी व शर्ती:
- मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळावर व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्त होणारा अधिकारी हा अल्पसंख्याक विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असेल.
- व्यवस्थापकीय संचालक (गट-अ) या पदाच्या प्रथम प्रतिनियुक्तीचा/नियुक्तीचा कार्यकाळ हा त्याने आपल्या पदावर प्रत्यक्ष रुजू झाल्याच्या दिनांकापासून २ वर्ष असा असेल. शासनास सदर कालावधी पुढे दोन वर्षापर्यंत वाढविता येईल.
- पदावर नियुक्ती झाल्यानंतर अधिकाऱ्यास मूळ संवर्गातील नियमित वेतनश्रेणीतील वेतन व भत्ते अनुज्ञेय असतील.
How To Apply For Maha MDD Mumbai Recruitment
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2023 आहे.
- शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज योग्यरित्या नाकारले जातील.
- तसेच अर्ज ई-मेल क्र[email protected]/ टपालाने/ कुरिअरने सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे.
- विहित मुदतीनंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Maharashtra Department of Minority Development Mumbai Bharti | mdd.maharashtra.gov.in Recruitment 2024
|
|
???? PDF जाहिरात |
shorturl.at/gqux2 |
✅ अधिकृत वेबसाईट |
mdd.maharashtra.gov.in |
Table of Contents