सध्या पूर्ण महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचा गाजावाजा आहे. सर्व महिला वर या योजनेचे प्रभावित आहे. याच अनुषंगाने, महायुती सरकारने आज (१६ ऑक्टोबर) संयुक्त पत्रकार परिषद घेऊन गेल्या अडीच वर्षांचा लेखाजोखा मांडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले या पत्रकार परिषदेला सामोरे गेले. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमचा विरोधी पक्ष एकीकडे टीका करतो की लाडकी बहीण योजनेसाठी पैसे कुठून आणणार? मुलींना मोफत शिक्षण देण्यासाठी पैसे कुठून आणणार? सरकारकडे पैसे नाहीत, असंही म्हणतात. दुसरीकडे त्यांचे नेते म्हणतात की आमचं सरकार आल्यावर आम्ही लाडकी बहीण योजनेची रक्कम १५०० रुपयांवरून २००० रुपये करू. राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू. त्यामुळे आता विरोधकांनी आधी हे ठरवावं की योजनांसाठी राज्य सरकारकडे पैसे आहेत की नाही. त्यानंतर त्यांनी टीका करावी”.

या नंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणाले, “विरोधक एकीकडे म्हणतायत की राज्याच्या तिजोरीत पैसे नाहीत आणि वर घोषणा करतात की त्यांचं सरकार आल्यावर ते संपूर्ण कर्जमाफी करणार आणि इतरही अनेक घोषणा करत आहेत. त्यामुळे विरोधकांनी आधी ठरवावं की सरकारडे योजनांसाठी पैसे आहेत की नाहीत? पैसे असतील तर ते पुढची कर्जमाफी करू शकतील. मात्र, आम्ही ज्या योजना आतार्यंत सांगितल्या आहेत, त्या पूर्ण विचार करून जाहीर केल्या आहेत. त्या योजना यापुढेही चालू राहतील. प्रत्येक योजनेच्या पाठिशी पूर्ण आर्थिक पाठबळ उभं करूनच आम्ही योजना जाहीर करू. मात्र विरोधक गोंधळले आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद करावी असं त्यांना वाटतं. परंतु, मला एक गोष्ट सर्वांना सांगायची आहे की या निमित्ताने महाविकास आघाीचा पर्दाफाश झाला आहे”.
तसेच “आम्ही आलो की सर्व योजना बंद करणार. जेलमध्ये टाकणार. पोलखोल करणार, असं विरोधक म्हणत आहेत. पण कोणाला जेलमध्ये टाकणार? योजना बंद करणार? तुमची पोलखोल झाली आहे. कोविडमध्येच तुमची पोलखोल झाली. काहीजण तर जेलमध्येही गेले. या सर्व योजना बंद करणाऱ्यांना जनता साथ देणार नाही”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















