चारचाकीवाल्या लाडक्या बहिणींना होणार त्रास, लवकरच तपासणी होणार! आता, चार चाकी दिसताच..
Ladki Bahin with Car Verification
सध्या महाराष्ट्रत गाजत असलेल्या लाडक्या भिन्न योजनेचा एक मोठं अपडेट समोर आला आहे. आता लाडक्या बहिणींना एक जून टेन्शन ला समोर जावं लागणार आहे. जर, लाडक्या बहीण योजनेचा लाभघेणाऱ्या बहिणींना एकत्रित अथवा विभक्त कुटुंबात पती किंवा सासऱ्यांच्या नावावर चारचाकी असणे आता महागात पडणार आहे(Ladki Bahin with Car Verification) . घरात दोघांपैकी कोणाकडेही चारचाकी नावावर असल्याचे निष्पन्न होताच त्या बहिणींचा योजनेचा लाभ रद्द होणार आहे. येत्या दोन दिवसांत अंगणवाडी सेविकांकडून घरोघरी जाऊन बहिणींकडील चारचाकी वाहनांची शहानिशा केली जाऊन लाभ ठेवायचा की रद्द करायचा हे सर्व्हेनंतर निश्चित केले जाणार आहे. राज्यातील महायुती सरकारने लाडक्या बहिणींसाठी योजना सुरुच ठेवण्याच्या आश्वासनाची पूर्ती केली आहे. मात्र, आता योजनेचा लाभघेणाऱ्या महिलांना स्वतःहून लाभातून माघार घेण्याचे आवाहन करण्यात आले होते; परंतु या योजनेला राज्यभरातून अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. महिला व बाल कल्याण विभागाचे सचिव अनुपकुमार यांनी राज्यातील महिला व बाल कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेऊन त्यांना सोमवारी विविध सूचना दिल्या. त्यामुळे आता सर्व जिल्ह्यांतील अंगणवाडी सेविकांना लाभार्थ्यांच्या घरी जावे लागणार आहे.
गाडी दिसताच होणार लाभ रद्द!
लाडक्या बहिणींच्या घरी चारचाकी वाहन असू नये, अशी योजनेची अट आहे. अनेक बहिणींनी अटीकडे दुर्लक्ष करून अर्ज भरून आतापर्यंतचे लाभमिळविले आहेत. आता सरकारने योजनेतील खऱ्या लाभार्थ्यांनाच लाभमिळावा; तसेच पात्र नसलेल्या लाभार्थ्यांना लाभ मिळू नये, त्यांची नावे वगळली जावीत यासाठी महिला व बाल कल्याण विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. या विभागाने परिवहन विभागाकडून राज्यातील चारचाकी वाहनमालकांची यादीच मिळवली आहे. ही यादी विभागाच्या प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा प्रकल्प अधिकाऱ्यांकडे पाठविली जाणार आहे. त्या यादीच्या आधारेच आता अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन महिलांच्या घरी चारचाकी कोणाच्या नावावर आहे याची चौकशी करून यादीतील नाव आणि प्रत्यक्षातील व्यक्तींची खातरजमा करणार आहे. त्यामुळे एकत्रित कुटुंबातील पती, सासरे यांच्यापैकी कोणाकडेही चारचाकी वाहन असल्याचे निष्पन्न होताच लाभाच्या यादीतून त्या कुटुंबातील पत्नी अथवा सून किंवा सासू यांची नावे थेट वगळली जाणार आहेत. यामध्ये सासऱ्याकडे गाडी असल्यास सासूने लाभ घेतल्यास सासूचा, तर सासूऐवजी सुनेने लाभ घेतल्यास तिचा लाभ रद्द होईल; परंतु एका कुटुंबातील पती-पत्नी हे एका जिल्ह्यात राहत असतील आणि त्यांच्याकडे वाहन नाही; पण सासू-सासरे दुसऱ्या जिल्ह्यात राहत असून, त्यांच्याकडे वाहन असल्यास त्यांचा लाभ ‘सुरक्षित’ राहण्याची शक्यता आहे. सव्र्व्हेनंतर रद्द करण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांच्या नावाची यादी सरकारला पाठविण्याची सूचना करण्यात आली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
🔥थोडेच दिवस बाकी, बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये 129 लिपिक पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
लाभार्थ्यांचा फुगवटा होणार कमी
राज्यात आजमितीपर्यंत सुमारे अडीच कोटींहून अधिक लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहेत. त्यामध्ये निकषांमध्ये न बसलेल्या महिलांची संख्या अधिक असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्या महिलांची संख्या कमी करण्याचा महिला व बाल कल्याण विभागाचा प्रयत्न आहे. त्यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येचा फुगवटा कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे; तसेच या योजनेच्या खऱ्या लाभार्थ्यांनाच लाभ मिळावा आणि सरकारने निवडणुकीत १५०० ऐवजी २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, त्याची अंमलबजावणी करताना सरकारच्या तिजोरीवर बोजा येऊ नये यासाठी ही खबरदारी घेतल्याची चर्चा महिला व बालकल्याण विभागात आहे.
लाखभर अर्जाची आज छाननी
महिला बाल कल्याण विभागाकडे योजनेसाठी अर्ज केलेल्यांपैकी राज्यातील सुमारे लाखभर अर्जाची अद्याप छाननी बाकी आहे. त्या अजांची आज, मंगळवारी (४ फेब्रुवारी) दिवसभरात छाननी पूर्ण करावी. त्यातून कोणते अर्ज नाकारायचे किंवा कोणते अर्ज मंजूर करायचे याचा निर्णय घेण्याचे; तसेच त्याची यादी अंतिम करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.