Ladki Bahin Payment 2100 Maharashtra Sarkar – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महिन्याला २१०० रुपये, शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच शेतपिकाच्या किमान आधारभूत किंमतीवर २० टक्के अनुदान, किसान सन्मान योजनेतून वर्षाला १५ हजार रुपये आणि वृद्ध निवृत्ती वेतनधारकांना महिन्याला २१०० रुपये अशी विविध आश्वासने राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) वतीने जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत. राष्ट्रवादीने ३६ पानांच्या आपल्या जाहिरनाम्यास ‘महाराष्ट्रवादी घोषणापत्र’ म्हटले असून यामध्ये एकूण ११ आश्वासने देण्यात आली आहेत.

राष्ट्रवादी लढवत असलेल्या सर्व ५२ मतदारसंघात आज एकाचवेळी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. अजित पवार, प्रफुल पटेल, छगन भुजबळ तसेच ५२ मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार दूरदृश्यप्रणालीद्वारे जाहिरनामा प्रकाशनात सहभागी झाले होते. मुंबईत निवडणुकीचा जाहीरनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते बुधवारी गरवारे क्लब येथे प्रकाशित करण्यात आला. महायुतीच्या माध्यमातून गेल्या चार महिन्यांत बदल घडवणाऱ्या योजना जाहीर केल्या आहेत. त्या योजनांची अंमलबजावणी कसोशीने करण्याचा प्रयत्न प्रशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून महायुती सरकारने उत्तम पध्दतीने केला असून पुढेही केला जाईल, अशी ग्वाही प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी दिली. जाहिरनामा प्रकाशनास पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव, तारांकीत प्रचारक सयाजी शिंदे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, कोषाध्यक्ष व आमदार शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे उपस्थित होते.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















