मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता ऑक्टोबर महिन्यातच दिला जाईल. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच महिलांच्या खात्यावर जमा होतील, अशी माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. राज्यभरात महिला आघाडीच्या वतीने शिवसेना लाडकी बहीण संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. पुणे जिल्ह्याची जबाबदारी गोऱ्हे यांच्यावर आहे. डॉ. गोऱ्हे यांनी गेल्या चार दिवसांत जिल्ह्यांत सुमारे १७ बैठका, घोंगडी बैठका घेतल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन – तीन हप्ते महिलांच्या खात्यावर जमा झाले आहेत. (Ladki Bahin Next Payment Details November, October Combine) त्याचा चांगला परिणाम राज्यात दिसून येत आहे.

नोव्हेंबर महिन्याचा हप्ता ऑक्टोबर महिन्यातच महिलांच्या खात्यावर जमा होईल. काही तांत्रिक अडचणी आहेत, त्या अडचणी दूर करून आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पात्र महिलांच्या खात्यावर पैसे जमा होतील, असे डॉ. गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जिल्ह्यांतील चार मतदारसंघांवर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. आम्ही येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणून मतदारांसमोर जाणार आहोत. त्यामुळे योग्य ठिकाणी योग्य उमेदवार दिला जाईल. इच्छुकांची संख्या जरी जास्त असली तरीही महायुती म्हणून पुन्हा एकदा आमचे सरकार निवडून येईल, असेही त्या म्हणाल्या.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















