कोतवाल भरती- आज नवीन जाहिराती प्रकाशित! – Kotwal Bharti 2023
Kotwal Bharti Apply Now
Kotwal Bharti 2023– The Good News For All candidates, Revised rules and guidelines have been issued by the Revenue and Forest Department dated September 05, 2013 to ensure uniformity in the posts of Kotwal cadre in the state. However, now the government has decided not to conduct oral test / interview for the posts under nomination quota under Ex-Secondary Services Selection Board.
-
????4थी उत्तीर्ण उमेदवारांना उत्तम संधी!! मालेगाव (वाशिम) तालुक्या अंतर्गत “कोतवाल” पदाकरीता नवीन भरती जाहिरात प्रकाशित
-
????4थी पास उमेदवारांना रिसोड (वाशिम) तालुक्या अंतर्गत नोकरीची उत्तम संधी!! कोतवाल पदांची नवीन भरती सुरु
-
????4थी पास उमेदवारांसाठी वरोरा (चंद्रपूर) मध्ये “कोतवाल” पदांची भरती – अर्ज करा!!
-
????4थी पास उमेदवारांसाठी नागपूर मध्ये “कोतवाल” पदांची भरती – त्वरित अर्ज करा!! – Nagpur Kotwal Bharti 2023
आताच प्राप्त नवीन अपडेट नुसार आता कोतवाल पदासाठीही १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय महसूल आणि वन विभागाने घेतला आहे. सजा तेथे कोतवाल नेमण्याचा तसेच त्यांच्या मानधन वाढीचा निर्णय शासनाने घेतल्याने तलाठ्यांचे सहाय्यक असलेले कोतवाल गावोगावी मानाचे पद झाली आहे. कोतवाल अ वर्गीकृत मानधन तत्त्वावरील पद असून शासकीय कर्मचारी नाही तथापि शासनाने आता कोतवालांच्या भरतीसाठी १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्याचे निश्चित केले असून आरक्षण कायद्याच्या तरतुदीचे पालन करण्याचाही नवा निकष लावला आहे. राज्यातील महसूल विभागाच्या अखत्यारीत कार्यरत असलेला कोतवाल संवर्ग हे अवर्गीकृत मानधन तत्त्वावरील पद असून, शासकीय कर्मचारी नाही. त्यामुळे ७ मे १९५९ च्या शासन निर्णयानुसार त्यासाठी स्वतंत्र सेवा प्रवेश नियम निश्चित करण्यात आले आहेत. परंतु, आता शासनाने भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे भरताना मौखिक परीक्षा किंवा मुलाखत न घेण्याचे धोरण ठरवले आहे. त्यामुळेच यापुढे कोतवालांची पदे भरताना वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ५० प्रश्नांची आणि १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षेमध्ये प्राप्त गुणांच्या आधारे निवड सूची तयार करून गुणवत्तेनुसार निवड आता करण्यात येणार आहे. तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
जाणून घ्या या परीक्षेची संपूर्ण माहिती, परीक्षा पॅटर्न, व अभ्यासक्रम !!
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
शासनाने २०१९ मध्ये कोतवालांचे एकत्रित कामाचे स्वरूप तसेच पूर्णवेळ शासकीय कामाशी बांधिलकी विचारात घेऊन मानधनात वाढ केली आहे तसेच त्यांना राज्य शासकीय कर्मचारी सामूहिक अपघात योजना, अटल निवृत्ती वेतन योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना याचाही लाभ दिला आहे. महसूल विभागातील गट ड च्या प्रथम नियुक्तीच्या पदांपैकी ४० टक्के पदे कोतवालांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विशेष म्हणजे यापूर्वी कोतवालांना एकत्रित फक्त पाच हजार रुपये मानधन होते मात्र नव्याने यात वाढ करून वयोमानानुसार ७५०० ते १५ हजार रुपये इतके मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. पन्नास वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या कोतवालांना पंधरा हजार रुपये मानधन दिले जाते. या बदलामुळे कोतवालांचे गाव पातळीवर महत्त्व वाढले असून कामातील योगदानातही वाढ झाली आहे किंबहुना सजा येथे कोतवाल नेमला जात असल्याने ही संख्या ही वाढीस लागली आहे.
आता शासनाने भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे भरताना मौखिक परीक्षा म्हणजेच मुलाखत न घेण्याचे ठरविले आहे. तसेच सरळ सेवा भरतीसाठी वेळोवेळी सुधारित केलेल्या बिंदू नामावलीच्या अंमलबजावणी देखील करण्याचा निर्णय घेतला आहे.या नव्या नियमानुसार आता कोतवालांची पदे भरताना शंभर गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे ५० प्रश्न असतील, त्यानुसार लेखी परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवड सूची तयार करून गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची निवड होणार आहे तसेच पद भरती करताना बिंदू नामावलीनुसार अंमलबजावणी व कायद्यात आरक्षण कायद्यातील तरतुदीचे पालन देखील करण्याच्या निर्णय शासनाने नव्याने घेतला आहे. यामुळे आता भविष्यात कोतवालांच्या पदभरतीला महत्त्व वाढणार आहेच पण उमेदवारांची उमेदवारांना देखील अधिकची तयारी करावी लागणार हे नक्की!
राज्यातील महसूल विभागाच्या अखत्यारीत कार्यरत असलेला कोतवाल संवर्ग हा अवर्गीकृत मानधन तत्वावरील पद असून शासकीय कर्मचारी नाही. कोतवाल संवर्गाकरीता दिनांक ०७ मे, १९५९ च्या शासन निर्णयान्वये स्वतंत्र सेवाप्रवेश नियम विहित करण्यात आलेले आहेत. तसेच कोतवाल संवर्गाची पदे भरतांना राज्यात सर्व ठिकाणी समानता येण्यासाठी महसूल व वन विभागाच्या दिनांक ०५ सप्टेंबर, २०१३ च्या शासन निर्णयान्वये सुधारीत नियम व मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. तथापि, आता शासनाने भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे भरतांना मौखिक परीक्षा / मुलाखत न घेण्याबाबतचे धोरण ठरविले आहे. तसेच शासनाने सरळसेवा भरतीसाठी नामनिर्देशनाव्दारे पदभरती करताना वेळोवेळी सुधारित केलेल्या बिंदुनामावलीची अंमलबजावणी व आरक्षण कायद्यातील तरतुदींचे पालन करणे आवश्यक आहे. सबब, सदरच्या बाबी विचारात घेता, कोतवाल संवर्गाच्या पदभरतीसंदर्भात महसूल व वन विभागाच्या दिनांक ०५ सप्टेंबर, २०१३ च्या शासन निर्णयातील सुधारित नियम व मार्गदर्शक तत्वांमधील अनुक्रमांक (४) व (५) मध्ये योग्य त्या सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यास अनुसरुन शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे. जाणून घ्या या परीक्षेची संपूर्ण माहिती, परीक्षा पॅटर्न, व अभ्यासक्रम !!
Bhandara तालुक्यातील कोतवाल भरतीसाठी मोहाडीत अर्जाचा अक्षरश: पाऊस पडला. २० कोतवाल पदाचा रिक्त जागांसाठी २५२ अर्ज पात्र झाले आहे. ४ मे रोजी उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. बहुप्रतिक्षीत कोतवाल भरतीची प्रतीक्षा संपली आहे. भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. पालोरा, आंधळगाव, रोहा, सातोना, जांब, कुशारी, मोहगाव देवी, वडेगांव सी., बेटाळा, नवेगांव धुसाळा, धोप, देव्हाडा बुज, डोंगरगांव, मुंढरी बुज, सालई खुर्द खुटसावरी, नेरी, कान्हळगांव, शिवणी,
करडी या ठिकाणी असलेल्या कोतवाल पदासाठी ऑनलाइन ३१९ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ५१ अर्ज स्थानिक रहिवासी नसल्यामुळे ४० अर्ज तसेच आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र अर्जासोबत जोडला नसल्याने १० अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत. तसेच ४ डमी अर्ज तर १२ दुय्यम अर्ज यादीत दिसून येत आहेत. तुमसर उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी बी. वैष्णवी यांनी लेखी परीक्षेकरिता पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी प्रकाशित केली. ४ मे रोजी कोतवाल भरतीसाठी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी कार्यालय वर्धा अंतर्गत “कोतवाल” पदांच्या एकूण ३७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तरी उमेदवारांनी विहीत नमुन्यात दोन पासपोर्ट साईज फोटोसहीत अर्ज आवश्यक कागदपत्र व पुराव्यासहीत दिनांक 09 मे 2023 रोजी सायंकाळी 04.00 वाजेपर्यन्त कार्यालयात तलाठी आस्थापना शाखेत सादर करावेत व त्याबाबत पोच घ्यावी. अर्जाचा नमुना तहसील कार्यालयातील आस्थापना शाखेत कार्यालयीन वेळेत व दिवशी उपलब्ध आहे. विहीत तारखे नंतर येणाऱ्या व अपुर्ण भरलेल्या अर्जाचा तसेच जाहीरनाम्याच्या पूर्वी सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी.
तहसील नुसार पूर्ण माहिती आणि लिंक खाली दिलेली आहे. तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – कोतवाल
- पदसंख्या – ३७ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – आष्टी, हिंगणघाट, समुद्रपूर, सेलु
- वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे
- अर्ज शुल्क – Rs. 20/-
- परीक्षा शुल्क –
- खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु 500/-
- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 300/-
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मे 2023
- निवड प्रक्रिया – मुलाखती/ लेखी परीक्षा
- अधिकृत वेबसाईट – wardha.gov.in
तहसील नुसार जाहिराती आणि लिंक्स खाली दिलेल्या आहे
-
आष्टी (वर्धा) मध्ये “कोतवाल” पदाची भरती जाहिरात – लगेच अर्ज करा
-
हिंगणघाट– वर्धा अंतर्गत “कोतवाल” पदाच्या विविध रिक्त जागा; नवीन भरती सुरु
-
सेलु (वर्धा) मध्ये “कोतवाल” पदाची भरती जाहिरात प्रकाशित; जाणून घ्या!!
-
समुद्रपुर- वर्धा येथे कोतवाल पदाची भरती सुरु – त्वरित अर्ज करा
Table of Contents
कोतवाल भरती
[…] Source link […]