GMC Nagpur Bharti 2026
वैद्यकीय शिक्षण व्यवस्थेला मोठा धक्का देणाऱ्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तूर्तास ब्रेक लावला आहे. गरजू नागरिकांसाठी आधारस्तंभ असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) शरीररचनाशास्त्र विभागातील प्राध्यापकांची तब्बल ६ पदे कमी करण्याचा निर्णय न्यायालयाने शुक्रवारी स्थगित केला.या पदकपातीसंदर्भातील सुधारित आकृतीबंधाला न्यायालयाने स्थगिती देत राज्य सरकारला २१ सप्टेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे प्राध्यापकांची पदे कमी करण्याच्या सरकारच्या निर्णयावर आता न्यायालयीन हस्तक्षेपामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागपूर मेडिकलमधील शरीररचनाशास्त्र विभागातील प्राध्यापकांची सहा पदे कमी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला अखेर न्यायालयीन ब्रेक लागला आहे. पदकपातीच्या या निर्णयामुळे वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्याला अंतरिम स्थगिती दिली.या प्रकरणावर न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती रजनीश व्यास यांच्यापुढे सुनावणी झाली. यावेळी न्यायालय मित्र अॅड. ईशा ठाकरे यांनी राज्य सरकारच्या वादग्रस्त निर्णयाकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.
वैद्यकीय शिक्षण विभागाने १८ ऑगस्ट २०२६ रोजी सुधारित आकृतीबंधासंदर्भात शासन निर्णय जारी केला होता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि त्यांच्याशी संलग्न रुग्णालयांमधील विद्यार्थ्यांची प्रवेशक्षमता विचारात घेऊन शरीररचनाशास्त्र विभागातील प्राध्यापक पदांचा सुधारित आकृतीबंध तयार करण्यात आला. त्यानुसार नागपूर मेडिकलच्या शरीररचनाशास्त्र विभागातील प्राध्यापकाचे एक, सहयोगी प्राध्यापकांची दोन आणि सहाय्यक प्राध्यापकांची तीन, अशी एकूण सहा पदे कमी करण्यात आली.या निर्णयाला महाराष्ट्र राज्य वैद्यकीय अध्यापक संघटनेने २१ ऑगस्ट २०२६ रोजी निवेदनाद्वारे तीव्र विरोध केला होता. मात्र, संघटनेच्या विरोधानंतरही राज्य सरकारने आपला निर्णय कायम ठेवला. त्यामुळे प्रकरण न्यायालयात पोहोचले. पदकपातीच्या निर्णयाचे प्राथमिक परिणाम आणि त्यातून निर्माण होणारी परिस्थिती लक्षात घेता न्यायालयाने सरकारच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती देत राज्य सरकारला आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.
नागपूर मेडिकलच्या अॅनाटॉमी विभागातील पदकपातीमुळे वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. जुन्या आकृतीबंधानुसार विभागात २ प्राध्यापक, ५ सहयोगी प्राध्यापक आणि ८ सहाय्यक प्राध्यापक, अशी एकूण १५ पदे मंजूर होती. मात्र, नव्या आकृतीबंधात यातील तब्बल ६ पदे कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
याशिवाय, विभागात वरिष्ठ निवासी डॉक्टरांची पदेही उपलब्ध नसल्याने ‘एनएमसी’च्या तपासणीत मेडिकलची मान्यता धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे पदकपातीचा निर्णय केवळ कर्मचाऱ्यांच्या पदांपुरता मर्यादित न राहता वैद्यकीय महाविद्यालयाच्या मान्यतेवरही परिणाम करणारा ठरू शकत होता.या गंभीर परिस्थितीकडे ‘लोकमत’ने २४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या ‘राज्यातील अॅनाटॉमीची २१ पदे रद्द; वैद्यकीय शिक्षणाचा ‘कणा’च मोडण्याचा घाट’ या वृत्तातून लक्ष वेधले होते. त्यानंतर न्यायालयानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत पदकपातीच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिल्याने वैद्यकीय शिक्षणाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरला आहे.

GMC Nagpur Bharti 2026: GMC Nagpur (Government Medical College and Hospital) has invited application for the posts of “Assistant Professor”. There are 16 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Nagpur. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned address before the last date. The Last Date of Applications is 11th of August 2026. Also candidates may attend the walk in interview on 19th of August 2026. For more details about GMC Nagpur Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपुर अंतर्गत “सहाय्यक प्राध्यापक” पदाची 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑगस्ट २०२६ आहे. तसेच पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपुर भरती 2026 करीता मुलाखतीची तारीख १९ ऑगस्ट २०२६ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपुर भरती 2026
- पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक
- पदसंख्या – 16 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 40 वर्ष
- नोकरी ठिकाण – नागपुर
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अर्ज पाठविण्याचा /मुलाखतीचा पत्ता – अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपुर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ ऑगस्ट २०२६
- मुलाखतीची तारीख- १९ ऑगस्ट २०२६
- अधिकृत वेबसाईट – https://gmcnagpur.org/
GMC Nagpur Super Specialist Vacancy 2026

Salary Details For GMC SSH Nagpur Job 2026
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| वैद्यकीय अधिकारी | 1,00,000/- |
How To Apply For GMC Nagpur Application 2026
- सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑगस्ट २०२६ आहे.
- नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यातयेणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Selection Process For GMC Nagpur Notification 2026
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- सदर पदांकरिता मुलाखती १९ ऑगस्ट २०२६ रोजी घेण्यात येणार आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For gmcnagpur.org Arj 2026 | |
| 📑 शुद्धीपत्र | https://shorturl.at/xdsnh |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/pT4q5 |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://gmcnagpur.org/ |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App


















1 thought on “प्राध्यापकांची पदे कमी करण्याचा निर्णय अडला; मेडिकलच्या आकृतीबंधाला न्यायालयाची स्थगिती!! | GMC Nagpur Bharti 2026”
Laboratory Technician, Data Manager vacncies out!!