Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कमवा व शिकासाठी आता ५५ रुपये प्रतितास मानधन – kamwa ani shika yojana 2024

kamwa ani shika yojana 2024

Kamwa Ani Shika Yojana –  Through the Zilla Parishad Social Welfare Department, ‘Kamwa Va Shika’ scheme is being implemented to provide employment opportunities to the backward class students. Pune has become the first Zilla Parishad to experiment with such a method of simultaneous education and employment. Youths will also be able to experience administrative work for three consecutive years like government employees in various departments of Zilla Parishad. Due to this scheme, administrative work has been speeded up. Therefore, in the current financial year, new students will be given the opportunity to work, the information was given by the social welfare department of ZP.

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमध्ये व संलग्न महाविद्यालयांमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका योजनेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना १ जानेवारी २०२४ पासून वाढीव मानधन लागू केले आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळातर्फे याबाबतचे परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे ४५ रुपये प्रतितास ऐवजी विद्यार्थ्यांना आता ५५ रुपये प्रतितास एवढे मानधन मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यांनी तसेच विविध विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कमवा व शिका योजनेच्या मानधनात वाढ करावी, याबाबत विद्यापीठाकडे पत्रव्यवहार केला होता. तसेच, विद्यापीठाच्या अधिसभेमध्ये सुद्धा काही सदस्यांनी या संदर्भातील ठराव व प्रस्ताव सादर केले होते. त्यावर सुमारे तीन महिन्यांपूर्वी व्यवस्थापन परिषदेमध्ये निर्णय घेण्यात आला. मात्र, अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी झाली नव्हती. त्यामुळे मानधन वाढीचा निर्णय केव्हा लागू होणार, याबाबत विद्यार्थ्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात होते. अखेर १ जानेवारीपासून मानधन वाढीचा निर्णय लागू करण्यात येत असल्याचे परिपत्रक विद्यापीठातर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी ‘कमवा व शिका’ ही योजना राबविण्यात येत आहे. अशा पद्धतीचा एकाचवेळी शिक्षण व रोजगाराचा प्रयोग करणारी पुणे ही पहिलीच जिल्हा परिषद ठरली आहे. युवकांना जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सलग तीन वर्षे प्रशासकीय कामांचा अनुभवही घेता येणार आहे.या योजनेमुळे प्रशासकीय कामकाज गतिमान झाले आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षांत नव्याने विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी दिली जाणार आहे, अशी माहिती झेडपीच्या समाजकल्याण विभागाकडून देण्यात आली.

 

कमवा शिका योजनेतून अनुसूचित जाती, जमाती, भटक्‍या विमुक्त जाती-जमातींच्या 18 ते 22 वयोगटातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यालयात तीन वर्षे प्रशासनासोबत काम करता येईल. पहिल्या वर्षी 8 हजार रुपये, दुसऱ्या वर्षी 9 हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षी 10 हजार रुपये मासिक मानधन दिले जाते. या विद्यार्थ्यांनी तीन वर्षे काम केल्यानंतर त्यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची पदवी मिळते.

 

अशी होईल निवड : कमवा शिका योजनेतून काम करण्याची संधी मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा द्यावी लागेल. त्यानंतर मुलाखतीमधून विद्यार्थ्याची निवड केली जाते. परीक्षा कधी होणार यासंदर्भात सविस्तर माहिती लवकरच जाहीर केले जाईल. ही परीक्षा एमकेसीएलमार्फत घेण्यात येणार आहे, अशी माहिती झेडपीकडून देण्यात आली.

 

अनुभव प्रमाणपत्र देणार : कमवा व शिका योजनेसाठी निवड झालेल्या उमेदवारांना सलग तीन वर्षे प्रशासकीय कामाचा अनुभव घेता येणार आहे. या सर्वांना त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर जिल्हा परिषदेच्यावतीने अनुभव प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. या उपक्रमामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, प्रशासकीय कामाचा अनुभव, मानधन आणि अनुभव प्रमाणपत्र असा एकाचवेळी चार प्रकारचा लाभ मिळणार आहे. या अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. अजय जाधव says

    मी या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो?

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड