स्थानिक युवकांना रोजगार संधी- राज्य सरकार स्थापणार कामगार ब्युरो
Kamgar Bureau For State Candidates – सध्या महाराष्ट्रातील उद्योगांमध्ये कामगारांची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून उद्योग, कामगार व कौशल्य विकास विभागाच्या वतीने कामगार ब्युरोची स्थापना केली जाणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी दिली. याचा लाभ स्थानिक युवकांना होणार आहे. या मुले चांगला रोजगार निर्माण होईल.
सध्याच्या परिस्थिती करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कारखान्यातील परप्रांतीय श्रमिक त्यांच्या घरी निघून गेले आहेत. यामुळे स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीची संधी निर्माण झाली आहे. यासाठी कामगार ब्युरोची स्थापना केली जाणार असून, यात कामगारांच्या त्यांच्या कौशल्याप्रमाणे विभागणी केली जाईल. त्यानंतर, अवघ्या सात दिवसांत कामगारांना प्रशिक्षण देऊन उद्योगांची गरज पुरविली जाणार आहे. उद्योगांना कुशल, अकुशल मजूर, कामगार मोठ्या संख्येने उपलब्ध होतील. मराठी मुलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उद्योगमंत्री या नात्याने सुभाष देसाई यांनी केले आहे.
अन्य राज्यातील अनेक लोक सध्या परत गेले आहेत, त्यांच्या जाण्याने राज्यात आता रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. हि सुवर्णसंधी स्थानिक भूमिपुत्रांनी सोडू नये. कारण, त्यासाठी आम्ही अनेकदा आंदोलने केली. महाराष्ट्राला ही एक संधी मिळाली आहे. त्यामुळे आता उद्योजकांनी स्थानिक भूमिपुत्रांना प्रथम संधी द्यावी. यामुळे मराठी माणसांची महाराष्ट्रातील बेकारी कमी होईल’, असा विश्वास सुभाष देसाई यांनी व्यक्त केला आहे.
मी M.Com केला आहे मला जॉब मिळेल का?
सर, भरती कधी चालु होणार आहे. आणि कायमस्वरूपीची भरती होणार आहे का? सर, कृपया माहिती दया. आम्हाला ह्या संधिचा लाभ घ्यावयाचा आहे.
Mla hi sadhya job nahi maz MA.Bed zal ahe…korona mule fresher la job milel ka sgle junech lok job vr ghetil amchya sarkhya ch ky
भर्ती कधी निघणार apply कसे करायच
भरती कधी निघणार कुटे निघणार From कुठे भेटणार