Jobs in USA for Indian: अमेरिकेत अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरी मिळवण्याचे स्वप्न अनेक भारतीय विद्यार्थी आणि नोकरदार पाहतात. मात्र, अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सत्तारूढ झाल्यानंतर भारतीयांना अमेरिकेत नोकरीच्या संधी मिळतील का, याबाबत चर्चा सुरु झाली आहे. तरीही, भारत-अमेरिका संबंध अधिक मजबूत होतील आणि अमेरिकेतील रोजगाराची संधी शोधणाऱ्यांसाठी अनुकूल वातावरण तयार होईल, तसेच भारतातील अमेरिकन गुंतवणुकीत वाढ होण्याची शक्यता आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
बी.ई आणि बी.टेक. पदवी घेतलेले पदवीधर तसेच विविध माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमधील नोकरदार हे अमेरिकेत नोकरीच्या संधीच्या प्रतीक्षेत असतात. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून ट्रम्प पुन्हा एकदा निवडून आल्यानंतर अमेरिकेत नोकरीच्या संधी पाहणाऱ्या भारतीयांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकतर, ट्रम्प यांच्या ‘अमेरिका प्रथम’ या धोरणामुळे भारतीयांना अमेरिकेत रोजगार आणि अमेरिकेकडून सॉफ्टवेअर निर्मितीसाठी भारतातील कंपन्यांना मिळणाऱ्या संधी यापुढेही मिळतील का, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. परंतु, भारत-अमेरिकेतील राजकीय संबंध चांगले असल्यामुळे भविष्यात या संधी वाढण्यास चालना मिळेल, असे अभ्यासकांनी सांगितले.
भारतीयांचा वाटा सर्वाधिक
अमेरिकेत नोकरी करणाऱ्यांना ‘एच-वनबी’ व्हिसा दिला जातो. ‘यूएस सिटीझनशिप अॅण्ड इमिग्रेशन सर्व्हिसेस ‘ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेने २०२३ या आर्थिक वर्षात ‘एच- वनबी व्हिसा’ दिलेल्या नागरिकांमध्ये भारतीय नागरिकांची संख्या ७२.३ टक्के इतकी आहे. अमेरिकेत भारतीयांना नोकरीची सर्वाधिक संधी दिली जात असून या संधीत आणखी वाढ होईल, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे…
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















