Jilhadhikari Karyalay Pune Bharti 2026
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालत परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी आता थेट परीक्षार्थींचे मत जाणून घेतले जाणार आहे. राज्यातील शासकीय भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समिती शनिवारी (दि. १२ सप्टेंबर) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला भेट देणार असून, विद्यार्थी व परीक्षार्थींशी संवाद साधून त्यांच्या सूचना आणि अभिप्राय जाणून घेणार आहे.
पुणे जिल्ह्यातील नागरिकांना आता आपल्या सूचना आणि हरकती थेट प्रशासनापर्यंत पोहोचविण्याची विशेष संधी उपलब्ध झाली आहे. नागरिक व संबंधित घटकांना सूचना, शिफारशी, हरकती आणि निवेदने सादर करता यावीत, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष सोमवार (दि. ७ सप्टेंबर) ते गुरुवार (दि. १० सप्टेंबर २०२६) या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कार्यरत राहणार आहे. प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसलेल्या नागरिकांनी आपला लेखी अभिप्राय संबंधित ई-मेलवर पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्यासाठी आता तंत्रज्ञानाच्या मदतीने नव्या उपाययोजनांचा शोध घेतला जाणार आहे. विद्यमान परीक्षा प्रणाली तसेच राज्य शासनाचे विविध विभाग, प्राधिकरणे आणि परीक्षा घेणाऱ्या संस्थांच्या कार्यपद्धतीबाबत नागरिक व संबंधित घटकांकडून अभिप्राय मागविण्यात येत आहेत. परीक्षा अधिक उमेदवाराभिमुख करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांसोबतच डिजिटल प्रणाली, बायोमेट्रिक प्रमाणीकरण, प्रवेश नियंत्रण, ऑडिट ट्रेल्स आणि सीसीटीव्ही देखरेख यांसारख्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून परीक्षा प्रक्रिया अधिक निष्पक्ष करण्याबाबतही सूचना घेतल्या जाणार आहेत.

अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















