आपल्याला माहीतच असेल, मुंबई शहर जिल्ह्यासाठी जिल्हा दक्षता व नियंत्रण (Jilha Dakshata Samiti) समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीसाठी इच्छुक उमेदवारांनी दि. १५ ऑक्टोबर २०२४ पूर्वी अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले आहे. मुंबई शहर जिल्हाकरिता पाच अशासकीय सदस्याची नियुक्ती करावयाची आहे. तरी इच्छुक असलेल्या व्यक्तींनी अर्ज व अर्जासोबत परिचय कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत दि. १५ ऑक्टोबर २०२४ पूर्वी सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर, प्रशासकीय इमारत, ४ था मजला, आर.सी. मार्ग, चेंबूर (पू), मुंबई-७१. ई-मेल [email protected] यावर किंवा कार्यालयात सादर करावा.

अशासकीय सदस्य पात्रतेचे नियम पुढील प्रमाणे आहेत, सदस्य अनुसूचित जाती, जमातीचा असावा, सदस्यास सामाजिक क्षेत्रात कार्य केल्याचा अनुभव असावा, सदस्यास अनुसूचित जाती, जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ कायद्याचे ज्ञान असावे, विधी शाखेची पदवी (LLB, LLM) असलेले सदस्यांना प्राधान्य राहील, सदस्य मुंबई शहर जिल्ह्यात राहणारा असावा,असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















