इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना ‘जलसंपदा’मध्ये इंटर्नशीप करण्याची संधी! – Jalsampada Vibhag Pune Bharti 2025
Jalsampada Pune Vibhag Internship Program
PUNE Jalsampada Vibhag Internship Program – राज्यातील मान्यताप्राप्त विद्यापीठ आणि कॉलेजमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता तिसऱ्या, चौथ्या वर्षी राज्याच्या जलसपंदा विभागात इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे जलसंपदा विभागातील बांधकाम प्रकल्प, उपसा सिंचन योजना, जलनियोजन, जल, हवामान, पर्जन्य, सिंचन व्यवस्थापन, प्रकल्प आरेखन आदींची माहितीसह त्याचा कार्यानुभव घेता येणार आहे. जलसंपदा विभागाशी निगडित असलेल्या नाशिकच्या महाराष्ट्र अभियांत्रिकी संस्था (मेरी), मध्यवर्ती संकल्पचित्र सघंटना (सीडीओ), जलविज्ञान व धरण सुरक्षितता संघटना (डीएसओ) या तीन संस्थांसह इतर अन्य संस्थांमध्ये अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप करण्याची संधी जलसंपदा विभागाने उपलब्ध केली आहे. त्याबाबत विभागाने स्वतंत्र आदेश जारी केला आहे. यामुळे राज्यातील इंजिनिअरिंगच्या हजारो विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.
Jalsampada Vibhag Pune Bharti 2025 – Jalsampada Vibhag Internship Program is really golden opportunity for Engineering students studying in recognized universities and colleges across the state as they will now have the opportunity to undertake internships in the Water Resources Department during their third and fourth years. This Jalsampada Vibhag Bharti 2025 initiative will allow students to gain practical experience and in-depth knowledge about various aspects of the department, including construction projects, lift irrigation schemes, water planning, hydrology, climate, rainfall patterns, irrigation management, and project design.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
🔥थोडेच दिवस बाकी, बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये 129 लिपिक पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
जलसंपदा विभागात इंटर्नशिप उपलब्ध करण्याची कार्यवाही ही नाशिकच्या ‘मेरी’ संस्थेकडून करण्यात येणार आहे. राज्यातील मान्यताप्राप्त अभियांत्रिकी कॉलेजातील पदवी अभ्यासक्रमाच्या बीटेक किंवा बीईच्या तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध होणार आहे. अर्धवेळ किंवा पूर्णवेळ अशा दोन्ही स्वरूपाची इंटर्नशिप असेल. त्याची रचना ही नाशिकच्या ‘मेरी’ संस्थेकडून तयार करण्यात येईल. यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (AICTE) पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करता येईल. या प्रशिक्षणासाठी नाशिकच्या मेरी, सीडीओ, डीएसओ या संस्थेतील एकूण विद्यार्थ्यांच्या ५० टक्के महिलांची संख्या असणार आहे.
इंटर्नशिप करण्यासाठी जलसंपदा विभागासह अन्य निगडित विभागांच्या कार्यालयाजवळ असलेल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल; तसेच अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची कामगिरी, इंटर्नशिप असलेले कौशल्याचा विचार करून मुलाखतीद्वारे इंटर्नशिप विद्यार्थ्यांच्या निवडीसंदर्भात कार्यकारी अभियंताच्या पातळीवर निर्णय घेतला जाईल. इंटर्नशिपच्या कार्यक्रमाची रुपरेषा हे कार्यकारी अभियंता निश्चित करतील. इंटर्नशिपचा कालावधी समाप्तीच्या अंतिम आठवड्यात प्रशिक्षणार्थीनी प्रशिक्षणाचा अहवाल कार्यकारी अभियंता यांच्याकडे सादर करणे बंधनकारक आहे.