JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

पोलिस पाटील पदांसाठी भरती प्रक्रिया लवकरच; अर्ज प्रक्रिया ऑनलाइन !! – Jalgaon Police Patil Bharti 2026

Jalgaon Police Patil Bharti 2026

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पोलिस पाटील पदांच्या भरतीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये एकूण २०९ पोलिस पाटील पदे रिक्त असल्याने अनेक गावांतील प्रशासनिक कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे. या रिक्त पदांमुळे गावपातळीवरील माहिती संकलन, कायदा-सुव्यवस्था राखणे तसेच शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये अडचणी निर्माण होत आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, जिल्ह्यात सर्वाधिक रिक्त पदे अमळनेर तालुक्यात ३९ असून त्याखालोखाल चाळीसगावमध्ये २२, पाचोरा येथे २१, धरणगावमध्ये १८, तर चोपडा तालुक्यात १६ पदे रिक्त आहेत. याशिवाय जामनेरमध्ये १५, भडगावमध्ये १४, पारोळा येथे १३, रावेरमध्ये १२, जळगाव व मुस्कळव येथे प्रत्येकी ९, मुक्ताईनगरमध्ये ७, बोदवड व यावल येथे प्रत्येकी ६ पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे एरंडोल तालुक्यात एकही पद रिक्त नसल्याची नोंद आहे.

पोलिस पाटील हे गाव प्रशासनातील महत्त्वाचे दुवा मानले जातात. गावातील घडामोडींची माहिती पोलिस आणि महसूल प्रशासनापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. ग्रामस्थांमधील किरकोळ वाद, सामाजिक प्रश्न, संशयास्पद हालचाली तसेच आपत्तीजन्य परिस्थितीत प्रशासनाला मदत करण्याची भूमिका ते पार पाडतात. त्यामुळे ही पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असणे ही चिंतेची बाब मानली जात आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांकडूनही या रिक्त पदांच्या भरतीची मागणी सातत्याने केली जात आहे. अनेक गावांमध्ये अतिरिक्त कार्यभार इतर कर्मचाऱ्यांवर पडत असल्याने कामकाजाची गती मंदावल्याची तक्रार व्यक्त होत आहे. जिल्हा प्रशासनाने भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून रिक्त पदे भरण्याची आवश्यकता असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

दरम्यान, राज्य शासनाने पोलिस पाटील भरती प्रक्रियेला गती देऊन पात्र उमेदवारांची नियुक्ती केल्यास ग्रामीण प्रशासन अधिक सक्षम होईल. तसेच गावपातळीवरील कायदा-सुव्यवस्था राखण्यास आणि शासनाच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास मदत मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यातील २०९ रिक्त पदे भरण्याकडे आता प्रशासन किती वेगाने पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच प्रशासन आणि ग्रामस्थांमधील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करणाऱ्या पोलिस पाटलांच्या रिक्त जागा आता भरल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील तब्बल २०९ रिक्त पदांच्या भरतीसाठी जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असून, लवकरच भरती प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात पोलिस पाटलांची एकूण १ हजार ४३९ पदे मंजूर आहेत. त्यापैकी १ हजार २३० पदांवर सध्या नियुक्त्या असून, २०९ पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविणारी एजन्सी नियुक्त केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने निविदा प्रसिद्ध केली असून, महिनाभरात एजन्सीची नियुक्ती झाल्यानंतर लगेचच भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

पोलिस पाटील भरतीचा मार्ग मोकळा होण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून महत्त्वाची पूर्वतयारी पूर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सातही उपविभागांमधील पोलिस पाटील पदांची बिंदुनामावली तपासणी पूर्ण झाल्याने रिक्त पदांच्या भरतीसाठी आवश्यक असलेली आरक्षणविषयक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता भरती प्रक्रियेतील पुढील प्रशासकीय कार्यवाहीला गती मिळण्याची अपेक्षा आहे. भरतीची अधिकृत घोषणा कधी होणार आणि प्रत्यक्ष प्रक्रिया कधी सुरू होणार, याकडे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

Jalgaon Police Patil Bharti 2026


Jalgaon Police Patil Bharti 2026: Jalgaon Police Patil is going to recruit interested and eligible candidates to fill up various posts of “Police Patil”. There are a total of 344 vacancies available to fill the posts. Eligible candidates can submit their application through online mode before the last date. The last date for submission of the application is 31st of July 2023.. More details are as follows:-

जळगाव जिल्ह्यातील सर्व उपविभागीय दंडाधिकारी, कार्यालयांतर्गत पोलिस पाटील पदांच्या  एकूण 344 पदे भरतीसाठी अर्हताधारक उमेदवाराकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पध्दतीनेच https://jalgaon.ppbharti.in या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023  आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

  • पदाचे नाव –  पोलिस पाटील
  • पद संख्या – 344 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 25 ते 45 वर्ष
  • परीक्षा शुल्क – 
    • खुला प्रवर्ग – ६००/-
    • राखीव प्रवर्ग  – ५००/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2023
  • अधिकृत वेबसाईट : www.jalgaon.gov.in

Jalgaon Police Patil Bharti 2026 – Important Date

Jalgaon Police Patil Vacancy 2026

पदाचे नावपद संख्या 
उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, जळगाव42 पदे
उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, एरंडोल66 पदे
उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, पाचोरा 36 पदे
 उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, चाळीसगाव41 पदे
उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, अमळनेर80 पदे
उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, फैजपूर43 पदे
उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, भुसावळ36 पदे

Educational Qualification For Jalgaon Police Patil Recruitment 2026

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पोलिस पाटीलइयत्ता 10वी उत्तीर्ण

How To Apply For Jalgaon Police Patil Jobs 2026

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  • ऑनलाईन अर्ज 18 जुलै 2023 पासून सुरु होतील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For Jalgaon Police Patil Application Form

  • पोलीस पाटील पदाची लेखी परिक्षा 80 गुणांची असेल प्रत्येक प्रश्न एक गुणाचा राहील.
  • लेखी परिक्षेची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाची असेल.
  • लेखी परिक्षा इयत्ता दहावी (एस. एस. सी.) पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल यात सामान्य ज्ञान, गणित, पोलीस पाटलांचे अधिकार व कर्तव्य. बुध्दीमत्ता चाचणी, स्थानिक परिसराची माहिती चालू घडामोडी इत्यादी विषयाचा समावेश असेल.
  • लेखी परिक्षेत एकूण 80 गुणांपैकी किमाण 36 गुण (45% ) प्राप्त केलेल्या अर्जदारामधील उच्चतम गुण मिळालेल्या पर्याप्त प्रमाणातील अर्जदाराची तोंडी परिक्षा घेण्यात येईल.
  • सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र. प्रनिम /2010/2009/प्र. क्र. 66/10/13-अ दिनांक 16/06/2010 मधील तरतुदीनुसार लेखी परिक्षा घेतेवेळी उत्तर पत्रिकेवर उत्तर लिहोण्यासाठी अथवा चिन्हांकित करण्यासाठी फक्त काळया शाईचा वॉलपेन वापर करावा लागेल.
  • लेखी परिक्षेत मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारास पोलीस पाटील भरती / निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या 20 गुणांच्या तोडी (मुलाखत) परिक्षेस उपस्थित राहणे अनिवार्य राहील तोड़ी परिक्षेत अनुपस्थित राहणारा उमेदवार अंतिम निवडीस अपात्र ठरेल. मात्र एखादया उमेदवाराला मुलाखतीत शुन्य गुण मिळाले असले तरी लेखी परिक्षेतील गुणांच्या आधारे तो जर गुणवत्ता यादीत येत असेल तर असा उमेदवार पोलीस पाटील पदावरील निवडीकरिता पात्र राहील.

 

Jalgaon Police Patil Vacancy details 2026

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

This advertisement is old new advertisements will be coming soon.

Important Links For www.police.ppbharti.in Bharti 2026

???? PDF जाहिरात (छोटी जाहिरात )
https://shorturl.at/xNQ25
???? PDF जाहिरात (पूर्ण जाहिरात )
https://shorturl.at/beCRV
???? ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/CELOP
✅ अधिकृत वेबसाईट
www.jalgaon.gov.in

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड