केंद्र सरकारला नव्या १४६९ IAS अधिकाऱ्यांची गरज!
IAS, IPS Bharti 2023
IAS-IPS Bharti 2023
IPS Bharti 2023: There are large number of IPS posts vacant in the Country. The IAS-IPS Recruitment 2023 will be soon. He said that the central government is trying to fill the vacancies in all cadres as soon as possible. Further details are as follows:-
केंद्राला अखिल भारतीय सेवा अधिकाऱ्यांची मोठी कमतरता भासत आहे. बरेच जण केंद्रात प्रतिनियुक्तीवर येण्यास अनिच्छुक असल्यामुळे व अधिकाऱ्यांची कमतरता असून राज्ये त्यांना पाठवण्यास तयार नसल्याने ही स्थिती आली आहे. डीओपीटीने संसदीय पॅनलला कळवले आहे की, केंद्राला १४६९ अधिकाऱ्यांची गरज असताना केवळ ४४२ आयएएस अधिकारी काम करीत आहेत. गेल्या आठवड्यात राज्यसभेत मांडलेल्या डीओपीटी अनुदानाच्या मागणीच्या अहवालात या तपशिलांचा उल्लेख आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
भाजपचे सुशील कुमार मोदी यांच्या नेतृत्वाखालील संसदीय पॅनलने म्हटले आहे की, देशभरात १४७२ अधिकाऱ्यांची कमतरता आहे आणि केंद्र दरवर्षी १८० आयएएस अधिकाऱ्यांची नागरी सेवा परीक्षेद्वारे भरती करीत आहे. १ जानेवारी २०२२ पर्यंत एकूण आयएएस अधिकाऱ्यांची संख्या ५३१७ होती.
- सीबीआयमध्ये २३ टक्के पदे रिक्त
- अनिवार्य प्रक्रिया असतानाही तब्बल ११५ आयएएस अधिकाऱ्यांनी अचल संपत्तीची माहिती दिलेली नाही.
- सीबीआयमध्ये २३ टक्के पदे रिक्त आहेत आणि १ जानेवारी २०२२ पासून केवळ १७५ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली, असेही अहवालात म्हटले आहे.
- केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सीएपीएफ) आणि राज्य पोलिसांकडून सीबीआयला पुरेशा प्रमाणात नामनिर्देशन प्राप्त होत नाही.
- विशेष म्हणजे या दोन्हींकडूनच मोठ्या प्रमाणावर अधिकाऱ्यांची नियुक्तीसाठी शिफारस केली जाते. असे असतानाही पुरेशा प्रमाणात नामनिर्देशन प्राप्त होत नाही.
Previous Updates about IAS Bharti
देशातील आयएएस आणि आयपीएसची रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याचा प्रयत्न सुरु आहे. १ जानेवारी २०२२ पर्यंत विविध राज्यांमध्ये आयएएसच्या १,४७२ आणि आयपीएसच्या ८६४ जागा रिक्त आहेत. रिक्त पदे भरणे ही एक निरंतर प्रक्रिया आहे. सर्व संवर्गातील रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
- सरकारी नोकरीची (Government Job) तयारी करणाऱ्या उमेदवारांची संख्या सातत्याने वाढत आहे.
- विशेषतः करोनाच्या काळात नागरी सेवा परीक्षेकडे (Civil Service Exam) तरुणांचा कल वाढला आहे.
- असे असूनही, देशातील नोकरशाहीतील सर्वोच्च सेवा आयएएस-आयपीएसची २३०० हून अधिक पदे (IAS-IPS Vacancies) रिक्त आहेत.
- केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली आहे.
Civil Service Examination
नागरी सेवा परीक्षेद्वारे १८० पदांवर भरती
- केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०२२ पर्यंत विविध राज्यांमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) १,४७२ आणि भारतीय पोलिस सेवेत (IPS) ८६४ जागा रिक्त आहेत.
- थेट भरती झालेल्या IAS अधिकार्यांच्या सेवांचा पूर्ण वापर सुनिश्चित करण्यासाठी, सरकारने नागरी सेवा परीक्षा (CSE) द्वारे त्यांची वार्षिक भरती नागरी सेवा परीक्षा २०२२ पासून १८० पर्यंत वाढवल्याचे राज्यसभेत एका लेखी उत्तरात त्यांनी सांगितले.
जास्त संख्या म्हणजे प्रशिक्षणाच्या गुणवत्तेशी तडजोड
- लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी (LBSNAA), मसुरी ही नागरी सेवा भरतीसाठी देशातील प्रमुख प्रशिक्षण संस्था आहे असे सिंह म्हणले.
- बासवान समितीने यासंदर्भात शिफारस केली होती की, १८० पेक्षा जास्त संख्या LBSNAA च्या बॅच क्षमतेपेक्षा जास्त असेल आणि अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाच्या गुणवत्तेशी तडजोड करेल.
- दरम्यान, नागरी सेवा परीक्षा २०२० पासून, IPS अधिकार्यांच्या प्रशिक्षण बॅचमधील उमेदवारांची संख्या २०० झाली आहे.
IAS-IPS Vacancy 2022
रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याचा प्रयत्न
- १ जानेवारी २०२२ पर्यंत विविध राज्यांमध्ये आयएएसच्या १,४७२ आणि आयपीएसच्या ८६४ जागा रिक्त आहेत.
- रिक्त पदे भरणे ही एक निरंतर प्रक्रिया आहे.
- सर्व संवर्गातील रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) दरवर्षी थेट भरतीच्या आधारावर आयएएस आणि आयपीएस श्रेणीतील रिक्त जागा भरण्यासाठी नागरी सेवा परीक्षा आयोजित करते. याव्यतिरिक्त पदोन्नती कोट्यातील रिक्त जागा भरण्यासाठी यूपीएससीद्वारे राज्य सरकारांसह निवड समितीच्या बैठका आयोजित केल्या जातात.
IPS Bharti 2022 | IPS Recruitment 2022
IPS Bharti 2022: The number of IPS posts has been increased from the 2020 Civil Service Examination. So far 150 posts were being filled under this recruitment. But now 200 IPS will be recruited. This information has been given by the Central Government to the Lok Sabha. Further details are as follows:-
सन २०२० च्या नागरी सेवा परीक्षेतून आयपीएस पदांची संख्या वाढविण्यात आली आहे. या पदभरतीअंतर्गत आतापर्यंत १५० पदे भरण्यात येत होती. पण आता २०० आयपीएस भरती होणार आहे. केंद्र सरकारतर्फे लोकसभेच ही माहिती देण्यात आली आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणातील राज्य पोलीस सेवेमध्ये आयपीएस अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया जलद करण्यासाठी एक सराव सुरू करण्यात आला आहे. तेलंगणा राज्य पोलीस सेवेत २० पोलीस अधिकाऱ्यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आल्याची माहिती गृह मंत्रालयाकडून लोकसभेत देण्यात आली. केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा २०२० साठी ऑनलाइन अर्ज मागवले होते.
तेलंगणात ८० हजार नोकऱ्या जाहीर
Telangana Chief Minister K Chandrasekhar Rao on Wednesday announced immediate recruitment to fill 80,039 vacancies in the state government. The Chief Minister told the state assembly that the notification of recruitment in the government department would be implemented from today. Rao said filling 80,039 vacancies would impose an additional financial burden of Rs 7,000 crore on the exchequer.
राज्य सरकारने पोलिसांप्रमाणे गणवेशधारी सेवांसाठीच्या भरतीव्यतिरिक्त इतर सर्व थेट भरतीसाठी उच्च वयोमर्यादा १० वर्षांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत म्हणजे यूपीएससी नागरी सेवा, भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि भारतीय विदेश सेवा (IFS), रेल्वे गट A (भारतीय रेल्वे अकाऊंट्स सर्व्हिस) आणि इतर सेवांची निवड केली जाते. यूपीएससी नागरी सेवा परीक्षा प्राथमिक, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तीन टप्प्यात घेतली जाते. मुख्य परीक्षा आणि मुलाखतीतील कामगिरीच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाते.
Table of Contents