खुशखबर! अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता; लवकरच खात्यात जमा होणार पैसे!! – Incentive Allowance for Anganwadi Workers; To Be Credited Soon!!
Incentive for Anganwadi Sevika, Payment Soon!
राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांसाठी मोठा निर्णय घेतला असून, सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना सुरू केली होती. या योजनेसाठी अर्ज भरण्याचे काम अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांमार्फत करण्यात आले होते. सात महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता या सेविकांना प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महिला दीना निमित्त हि गॉड बातमी सर्व अंगणवाडी सेविकांसाठी आहे.
लवकरच रक्कम जमा होणार
राज्य सरकारने पुणे जिल्ह्यातील ४००० अंगणवाडी सेविकांसाठी १ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी महिला व बाल विकास अधिकाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. आता हा निधी कोषागाराकडे पाठवून, सेविकांच्या खात्यात लवकरच प्रोत्साहन भत्ता जमा केला जाणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अर्ज प्रक्रियेसाठी मोठे प्रयत्न
‘लाडकी बहीण’ योजनेसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी दिवस-रात्र मेहनत घेऊन अर्ज भरले होते. ऑफलाइन भरलेले अर्ज ऑनलाइन प्रक्रियेत बदलण्याचे कामही त्यांनी केले. प्रत्येक अर्जासाठी ५० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे सरकारने जाहीर केले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सेविकांना भत्त्यासाठी प्रतीक्षा करावी लागली.
राज्यात २.५ लाख सेविकांना लाभ
राज्यातील सुमारे अडीच लाख अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, बचत गटाच्या सदस्य आणि आशा वर्कर यांनी योजनेसाठी अर्ज भरले होते. पुणे जिल्ह्यात एकूण ३,८४,५१२ अर्ज दाखल करण्यात आले. त्यासाठी १ कोटी ९२ लाख २५ हजार ६०० रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
संघटनांचा दबाव आणि सरकारचा निर्णय
प्रोत्साहन भत्त्याच्या विलंबाबाबत अंगणवाडी सेविका संघटनांनी सरकारला वेळोवेळी आठवण करून दिली होती. काही सेविकांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर अखेर सरकारने हा निधी मंजूर करून पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता लवकरच अंगणवाडी सेविकांच्या खात्यात भत्ता जमा होणार आहे.