बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा लांबणीवर | HSC Exam 2023
HSC Exam 2023
HSC Exam 2023
HSC Exam 2023: The non-teaching staff have boycotted all examination proceedings from February 2. Employees of junior colleges have also supported this strike. The preparation for practical exams and experiments of XII board is done by non-teaching staff. As they are on strike, it is impossible for the teachers to manage the classes and prepare for these exams. Due to this Hsc Exam 12th Practical Exam is Postponed..!!
राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि कॉलेजांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांना बसला आहे. कर्मचाऱ्यांनी परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार घातल्याने या परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ अनेक कॉलेजांवर आली आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी २ फेब्रुवारीपासून सर्व परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार घातला आहे. या संपाला कनिष्ठ कॉलेजांतील कर्मचाऱ्यांनीही पाठिंबा दिला आहे. बारावी बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षा आणि प्रयोगांची तयारी शिक्षकेतर कर्मचारी करतात. ते संपावर असल्याने शिक्षकांना वर्ग सांभाळून या परीक्षांची तयारी करणे अशक्य झाले आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी बातमी; परीक्षेसाठी प्रवेशपत्र उपलब्ध! – HSC Exam Admit Card Download 2023
पूर्व उपनगरातील एका कॉलेजने ६ फेब्रुवारीला प्रात्यक्षिक परीक्षांचे आयोजन केले होते. मात्र शिक्षकेतर कर्मचारी संपावर असल्याने त्या पुढे ढकलाव्या लागल्या. सध्या कॉलेजात केवळ तोंडी परीक्षा घेतल्या जात असून, पुढील आठवड्यात प्रात्यक्षिक परीक्षांचे नियोजन केले जाणार असल्याची माहिती प्राचार्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
‘शिक्षकेतर कर्मचारीच रसायनशास्त्रातील प्रयोगांसाठी विविध रसायने तयार करतात. त्यांच्याविना रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्राच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेणे शक्य नाही. परिणामी १ फेब्रुवारीपासून नियोजित असलेल्या या तीन विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षा अद्याप सुरू होऊ शकलेल्या नाहीत. या परीक्षा कशाप्रकारे घेता येतील, याबाबत सरकारकडे विचारणा करण्यात आली आहे. मात्र त्यावर पुढे काही झाले नाही. आम्हाला १७ फेब्रुवारीपर्यंत या परीक्षा पूर्ण करायच्या आहेत. सोमवारी यावर तोडगा निघाला नाही, तर गोंधळ उडेल’, अशी प्रतिक्रिया घाटकोपर येथील एका कॉलेजच्या उपप्राचार्यांनी दिली. तर, अन्य एका कॉलेजने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने प्रात्यक्षिक परीक्षा पूर्ण केल्याचे सांगितले.
..तर बोर्डाच्या परीक्षांनाही फटका
मागण्या मान्य न झाल्यास शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी २० फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. तसेच सर्व कामकाज थांबवण्याचे जाहीर केले आहे. त्यातच २१ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. त्यातून २० फेब्रुवारीपासून कर्मचारी संपावर गेल्यास बारावी बोर्डाच्या परीक्षाही बाधित होणार आहेत.
HSC Exam 2022 Application
HSC Exam 2022: the extension for HSC Exam application. Students can apply till 5th of November 2022. Further details are as follows:-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी नियमित विद्यार्थ्यांना सरल डेटाबेसवरून ऑनलाइन पद्धतीने नियमित शुल्काने अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता या नियमित विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज ५ नोव्हेंबरपर्यंत भरता येणार आहेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर अर्ज भरण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे.
- तसेच व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआयचे विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेचा अर्ज (आवेदनपत्रे) ऑनलाइन भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
- नियमित विद्यार्थ्यांचा ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत २१ ऑक्टोबर रोजी संपत आहे.
- आता या विद्यार्थ्यांचे अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.
शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल डेटाबेसवरून ऑनलाइन अर्ज उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरण्यात येतील. तसेच नियमित व एमसीव्हीसीचे विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी, तुरळक विषय, आयटीआय विषय घेणारे, श्रेणीसुधार व खासगी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर बँकेत शुल्क भरण्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रीलिस्ट जमा करावयाचा कालावधीही राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केला आहे.
Previous Update –
बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी शनिवारपासून विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार | HSC Exam 2022
HSC Exam 2022: Students can apply from the 1st of October 2022 for the 12th examination conducted in February-March by the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education. Students will be able to fill out the application along with the regular fee. Visit www.mahahsscboard.in for more details about HSC Application. Further details are as follows:-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी शनिवारपासून (ता.१) विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत ऑनलाइन पद्धतीने सरल डेटाबेसवरून भरायची असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.
- उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज १ ते २१ ऑक्टोबर दरम्यान नियमित शुल्कासह भरता येणार आहेत.
- तर व्यवसाय अभ्यासक्रम शाखांचे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विष, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे (आयटीआय) ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी यांना २२ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
- मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर अर्ज भरायची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे.
बारावीच्या परीक्षेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी अर्ज त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरावी. व्यवसाय अभ्यासक्रम शाखेच्या नियमित विद्यार्थ्यांची माहिती सरल डेटामध्ये नसल्याने या विद्यार्थ्यांचे अर्ज प्रचलित पद्धतीने ऑनलाइनच भरावेत. नियमित शुल्काने अर्ज भरायच्या कालावधीत कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे ओक यांनी स्पष्ट केले आहे.
तपशील : नियमित शुल्कासह अर्ज करण्याचा कालावधी
- – शास्त्र, कला व वाणिज्य शाखांचे नियमित विद्यार्थी : १ ते २१ ऑक्टोबर
- – व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय घेणारे विद्यार्थी : २२ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर
HSC Supplementary Exam 2022
HSC Exam 2022 : The HSC supplementary exam will be conducted in July-August 2022. Students should apply from 10th June to 17th of June 2022 for HSC supplementary exam with regular charges. Further details are as follows:-
जुलै-ऑगस्ट २०२२ मध्ये बारावीची पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजनेअंतर्गत, तुरळक विषय घेऊन परीक्षा देणारे, तसेच आयटीआयद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणाऱ्या विद्यार्थ्यांना येत्या शुक्रवारपासून (ता. १०) ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
HSC Result 2022: बारावीचा निकाल जाहीर लगेच चेक करा !
या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेसाठी नियमित शुल्कासह १० ते १७ जूनपर्यंत अर्ज (आवेदनपत्र) भरता येईल. ऑनलाइन अर्ज भरताना मार्च-एप्रिल २०२२ च्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती अर्जात ऑनलाइनद्वारे घेता येईल. श्रेणीसुधार करून इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट २०२२ आणि फेब्रुवारी-मार्च २०२३ अशा लगतच्या दोनच संधी उपलब्ध राहणार आहेत. असे राज्य मंडळाचे प्रभारी सचिव माणिक बांगर यांनी प्रकटनाद्वारे जाहीर केले आहे.
Changes in 12th exam timetable 2022
HSC Exam 2022 : Exams for 12th, March-April 2022 General, Bifocal, and M.C.V.C. schedules on March 5, 2022, and March 7, 2022, have been postponed for one month due to unavoidable technical reasons. Further details are as follows:-
बारावीच्या मार्च-एप्रिल २०२२ च्या सर्वसाधारण (General), द्विलक्षी (Biofocal)आणि व्यावसायिक (M.C.V.C.) वेळापत्रकातील दिनांक ५ मार्च २०२२ आणि ७ मार्च २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विषयांच्या परीक्षा काही अपरिहार्य तांत्रिक कारणास्तव एक महिना लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात मंडळाने अंशत: बदल (Changes in 12th exam timetable 2022) केला आहे. असे असले तरी परीक्षा नियोजित वेळेतच सुरू होणार आहे, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
HSC Exam Revised Timetable
तारीख — सत्र — विषय — बदललेली तारीख
- शनिवार ५ मार्च २०२२ — सकाळी १०.३० ते दुपारी २ — हिंदी (कोड ०४)– मंगळवार ५ एप्रिल २०२२
- शनिवार ५ मार्च २०२२ — दुपारी ३ ते सायंकाळी ६.३० — जर्मन, जपानी, चिनी, पर्शियन– मंगळवार ५ एप्रिल २०२२
- सोमवार, ७ मार्च २०२२ — सकाळी १०.३० ते दुपारी २ — मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी, मल्याळम तमिळ, तेलुगु, पंजाबी, बंगाली– गुरुवार, ७ एप्रिल २०२२
- सोमवार, ७ मार्च २०२२ –दुपारी ३ ते सायंकाळी ६.३० –उर्दू, फ्रेंच. स्पॅनिश, पाली — गुरुवार. ७ एप्रिल २०२२
The Board has informed that no other changes have been made in the schedule of written examination for Class XII and other examinations. Also, no change has been made in the schedule of Class X examination. The above partial change in the schedule should be noted by all the concerned junior colleges as well as parents-students.
HSC Exam 2022 Schedule
HSC Exam 2022: The State Board has conducted the Class XII examination from March 4th to March 30th. The 12th standard examination will start from March 4 on the scheduled date. Further details are as follows:-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या प्रश्नपत्रिका बुधवारी आगीत जळून खाक झाल्याची घटना घडली. मात्र, प्रश्नपत्रिका जळल्या तरी बारावीची परीक्षा नियोजित तारखेला येत्या 4 मार्चपासूनच सुरु होईल. विद्यार्थ्यांनी परीक्षेबाबत निश्चिंत राहून केवळ अभ्यासाकडे लक्ष द्यावे. प्रश्नपत्रिका पुन्हा छापून घेण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल, असे राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्य मंडळातर्फे इयत्ता बारावीची परीक्षा येत्या 4 मार्च ते 30 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. परीक्षेच्या नियोजनाच्या दृष्टीने राज्य मंडळाने परराज्यातून प्रश्नपत्रिकांची छपाई करून घेतली.
HSC Exam 2022 Timetable Update Minor Change
HSC Exam 2022 : The twelfth examination schedule has been partially changed. A circular in this regard has been issued by the Board. The 12th standard examination will be held offline from March 4, 2022 to March 30, 2022. Further details are as follows:-
बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल करण्यात आला आहे. याबाबतचे परिपत्रक मंडळाने जारी केले आहे. या अंशत: बदलाची सर्व संबंधित उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी तसेच विद्यार्थी, पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाने केले आहे.
बारावीची परीक्षा ४ मार्च २०२२ ते ३० मार्च २०२२ या कालावधीत ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. बारावीच्या परीक्षेतीली अर्धमागधी (१६) या विषयाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. अर्धमागधी (१६) विषयाची परीक्षा ७ मार्च २०२२ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६.३० या वेळेत होणार होती. हा पेपर आता सुधारित वेळेनुसार, ८ मार्च २०२२ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६.३० या वेळेत होणार आहे.
No change has been made in the schedule of written and other examinations of class XII. The State Board of Education has appealed to all concerned higher secondary schools and junior colleges as well as students and parents to take note of this partial change in schedule.
HSC Exam 2022 Extension Of Application Process
HSC Exam 2022 : Students who have applied for the 12th examination have been given an extension. Accordingly, students can apply till December 11. They can apply till December 20 with late fee. Detailed information in this regard is given on the official website. Further details are as follows:-
बारावी परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थी ११ डिसेंबरपर्यंत अर्ज करु शकतात. तर २० डिसेंबरपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज करु शकतात. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
बारावी परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना १२ नोव्हेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर जाऊन http://mahahsscboard.in अर्ज करायचा आहे. उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांतील नियमित विद्यार्थ्यांना सरल डेटाबेसच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया १२ नोव्हेंबरपासून सुरु होणार असून २ डिसेंबरपर्यंत सुरु राहणार होती. त्यानंतर १३ डिसेंबर २०२१ पर्यंत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे. पण आता नव्या अपडेटनुसार ३ डिसेंबर ते ११ डिसेंबर या कालावधी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु राहणार आहे. तर विलंब शुल्कासह १३ डिसेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत अर्ज भरता येणार आहे.
The application process will be open from December to December 11 for regular students of vocational courses, re-examinees, students who have obtained enrollment certificate, private and sparse subjects through higher secondary schools / junior colleges. These students will be able to apply till 5 pm on 20th December 2021 with late fee.
तसेच उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी चलन डाऊनलोड करु शुल्क भरण्यासाठी १२ नोव्हेंबर ते २५ डिसेंबरपर्यंत वेळ देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज भरुन सबमीट केल्यानंतर त्यांना कॉलेज लॉगिनमधून प्रीलिस्ट उपलब्ध करुन दिली जाईल. त्यानंतर विद्यार्थ्यांनी दिलेली माहिती रजिस्टारसोबत पडताळण्यात यावी. माहिती अचूक असल्याची खात्री करावी आणि विद्यार्थ्यांची सही घ्यावी असे निर्देश शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आले आहेत.
The government and the health department should follow the instructions given from time to time on the background of corona. Students who apply with regular fee as well as late fee should pay the fee through two separate challans. The Department of Education has instructed the students to deposit the copy of the challan in the bank account fixed by the Board of Fees and submit the list of students to the concerned department within the given time.
HSC Exam 2022 Details
HSC Exam 2022 : The application process for the 12th exam will start from November 12. This information has been given by the school education department. Students will have to go to the official website and apply for it. After the given deadline, the application along with the delay fee will have to be filled. Further details are as follows:-
HSC Exam Application Forms
बारावी परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया १२ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. शालेय शिक्षण विभागातर्फे ही माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन यासाठी अर्ज करावा लागणार आहे. दिलेल्या मुदतीनंतर विलंब शुल्कासह अर्ज भरावा लागणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- यासाठी अधिकृत वेबसाइटवर जाऊन http://mahahsscboard.in अर्ज करायचा आहे.
- उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांतील नियमित विद्यार्थ्यांना सरल डेटाबेसच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया १२ नोव्हेंबरपासून सुरु होणार असून २ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे.
- त्यानंतर १३ डिसेंबर २०२१ पर्यंत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे.
उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत व्यवसायिक अभ्यासक्रम (vocational Course) शाखेचे नियमित विद्यार्थी, पुनरपरीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले विद्यार्थी खासगी आणि तुरळक विषय घेऊन बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज प्रक्रिया ३ डिसेंबर ते ११ डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. या विद्यार्थ्यांना २० डिसेंबर २०२१ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज करता येणार आहे.
Also, higher secondary schools / junior colleges have been given time from November 12 to December 23 to pay the challan download fee.
Table of Contents
Thanks sir
Mla job hvi
Hole sir mananiy
Mla job sathi aaplya kra plzzzz
Ani mazi job karnyachi khup ichay ahe