समाज कल्याण कागदपत्र पडताळणी यादी, वेळापत्रक जाहीर! – Samaj Kalyan Vibhga Bharti Result

Samaj Kalyan Vibhga Result

समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग–३ संवर्गातील विविध पदांसाठी अंतिम निवड व प्रतीक्षा यादी १८ सप्टेंबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित न राहिलेल्या उमेदवारांना पुन्हा संधी देण्यात आली; मात्र ४० पैकी केवळ ५ उमेदवार उपस्थित राहिले. उर्वरित ३५ उमेदवारांना आता अंतिम संधी देण्यात येत असून, त्यांनी दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता समाज कल्याण आयुक्तालय, ३ चर्च पथ, पुणे येथे कागदपत्र पडताळणीसाठी अनिवार्यपणे उपस्थित राहावे. या वेळी अनुपस्थित राहिल्यास संबंधित उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

Commissionerate of Social Welfare Maharashtra State, Pune Recruitment 2024 Final Result – Ad. No 3743 Dated 07.10.2024

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Samaj Kalyan Vibhga Result – Samaj Kalyan Vibhga Result is declared. Next update is about the DV. Samaj Kalyan Vibhag Document Verification Schdule is published today. You can check your DV time slot from following given PDF file… Best Luck From MahaBharti.

समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग -३ संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल / अधीक्षक (महिला), गृहपाल / अधीक्षक (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक या संवर्गाची अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी दिनांक १८.०९.२०२५ रोजी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार दिनांक ०६.१०.२०२५ ते दिनांक ०८.१०.२०२५ या कालावधीत सर्व निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले होते. तथापि, सदर कागदपत्र पडताळणीसाठी बोलविण्यात आलेल्या उमेदवारांपैकी सोबतच्या यादीत नमुद केलेले ४० उमेदवार गैरहजर राहिले आहेत. सबब, सदर यादीत नमुद प्रमाणे उमेदवारांनी दिनांक ०७.११.२०२५ रोजी कागदपत्र पडताळणीसाठी समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, ३ चर्च पथ, पुणे ४११ ००१ येथे सकाळी १०.३० वाजता उपस्थित राहणे बंधनकारक आहे. सदर उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहण्याची ही शेवटची संधी देण्यात येत आहे.

 

१. उमेदवाराने सादर केलेल्या आवेदन पत्राची प्रत व त्या सोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांची मुळ कागदपत्रे तपासणीसाठी सादर करावीत.
२. उमेदवाराने नमुद केलेल्या बाबींच्या अनुषंगाने मुळ कागदपत्रे व त्याच्या साक्षांकीत प्रती (३ प्रतीत) सादर कराव्यात. तसेच यापुर्वी देण्यात आलेल्या सुचना लागू राहतील.

 

समाज कल्याण कागदपत्र पडताळणी वेळापत्रक आणि यादी लिंक 

 


 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) सहायक आयुक्त, समाज कल्याण व तत्सम, गट अ या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार या परीक्षेत राज्यातून केदार गरड पहिला, तर वैभव भुतेकर याने दुसरा क्रमांक मिळवला आहे. एमपीएससीमार्फत मे २०२३ मध्ये समाज कल्याण विभागातील विविध पदांसाठी जाहिरात दिली होती. राज्यातील हजारो विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज केले. त्यानुसार समाज कल्याण अधिकारी गट अ या पदासाठी परीक्षा झाली. त्यानंतर या पदासाठी मुलाखती १५ ते १८ जुलै २०२५ या कालावधीत झाल्या. त्यानंतर या संवर्गनिहाय तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी न्यायिक प्रकरणाच्या अधीन राहून आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. ही सर्वसाधारण यादी निव्वळ तात्पुरती स्वरूपाची आहे. त्यात उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्र तथा कागदपत्र पडताळतीनंतर काही उमदेवारांच्या शिफारशीमध्ये बदल होऊ शकतो, याकडे आयोगाने लक्ष वेधले आहे.

 


कागदपत्र पडताळणी वेळापत्रक व सूचना

१. सर्व निवड झालेल्या उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर दर्शविण्यात आलेल्या दिनांकास समाज कल्याण आयुक्तालय, ३ चर्च रोड, येथे कागदपत्र पडताळणी साठी उपस्थित राहणे बंधन कारक आहे.
२. उमेदवाराने सादर केलेल्या आवेदन पत्राची प्रत व त्या सोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांची मूळ कागदपत्रे तपासणी साठी सादर करावी.
३. तसेच उमेदवाराने नमूद केलेल्या बाबींच्या अनुषंगाने मूळ कागदपत्रे व त्याच्या साक्षांकित प्रती सादर कराव्यात.
४. उमेदवाराने सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रती (३ प्रतीत) सादर कराव्यात.

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

 

👉 समाजकल्याण विभाग कागदपत्र पडताळणी वेळापत्रक लिंक 👈

 

 

 


Previous Result Links 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड