HCLTech मध्ये फ्रेशर भरती- करियर घडवण्याची मस्त संधी!! | IT Career Boost – HCLTech Hiring!

IT Career Boost – HCLTech Hiring!

मित्रांनो, जर तुम्ही 2024 किंवा 2025 मध्ये पदवीधर झाला असाल, आणि SAP मध्ये आपलं करिअर घडवण्याची तुमची इच्छा असेल, तर ही सुवर्णसंधी तुमच्यासाठी आहे! भारतातील नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय IT कंपनी HCLTech कडून Fresher पदवीधरांना SAP च्या Functional आणि Technical विभागात भरती केली जात आहे. नवीन तंत्रज्ञान, ग्लोबल क्लायंट्ससोबत काम करण्याची संधी, आणि व्यावसायिक वाढ यासाठी हि एक छान संधी आहे. या द्वारे आपल्या करियरला एक मस्त बूस्टर मिळू शकतो. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून आम्ही लिंक खाली दिलेली आहे. तसेच अर्ज कसा करायचा आणि पॅकेज किती आहे इत्यादी पूर्ण माहिती आपण या लेखात बघू शकता. 

IT Career Boost – HCLTech Hiring!

 

पदवीधरांसाठी उपलब्ध पदे आणि पात्रता निकष
SAP च्या Functional विभागात MM, FICO आणि SD या रोलसाठी भरती केली जात आहे, तर Technical विभागात ABAP साठी संधी आहे. कोणत्याही शाखेतील UG/PG पदवीधर अर्ज करू शकतात. मात्र, १०वी, १२वी, आणि पदवी परीक्षांमध्ये किमान ६०% गुण आवश्यक आहेत. Functional विभागासाठी SAP चे Global Certification असणे बंधनकारक आहे, तर ABAP साठी प्रोग्रॅमिंगची गोडी व मजबूत बेस आवश्यक आहे.

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

तुमचं कामाचं ठिकाण आणि पगाराची रेंज
HCL कंपनी भारतात अनेक शहरात कार्यरत आहे. या भारतभरातील विविध शहरांमधून काम करण्याची संधी देत आहे. सुरुवातीचा पगार ₹3.25 लाख ते ₹6 लाख प्रति वर्ष असू शकतो, जो तुमच्या कौशल्यांवर आणि मुलाखतीतील कामगिरीवर अवलंबून असेल.

SAP मध्ये करिअर का करावं HCLTech सोबत?
HCLTech ही एक अशी कंपनी आहे जी नव्या टॅलेंटला घडवण्यासाठी प्रचंड प्रयत्नशील आहे. Structured ट्रेनिंग, अनुभवी मार्गदर्शक, देश-विदेशातील प्रोजेक्ट्सवर काम करण्याची संधी आणि कंपनीतच करिअर ग्रोथची गॅरंटी – हे सगळं एकत्र फक्त HCLTech मध्ये मिळू शकतं.

कंपनीची ओळख – HCLTech चा जागतिक ठसा
50 पेक्षा अधिक देशांमध्ये कार्यरत, HCLTech ही डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, इंजिनिअरिंग, क्लाउड सेवा, आणि आयटी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आघाडीची कंपनी आहे. ग्राहककेंद्रित दृष्टीकोन आणि नावीन्यपूर्णतेवर आधारित कामाची शैली यामुळे कंपनी सतत उत्कृष्ट निकाल साधत आहे.

अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे
तुमच्याकडे जर आवश्यक पात्रता असेल आणि Functional रोलसाठी SAP Certification पूर्ण असेल, तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करा. अर्ज करताना तुमची शैक्षणिक कागदपत्रे आणि SAP सर्टिफिकेट अपलोड करायला विसरू नका.

लक्षात ठेवाव्यात अशा महत्त्वाच्या सूचना

  • फक्त SAP MM, FICO किंवा SD मध्ये सर्टिफिकेट असणारेच Functional रोलसाठी पात्र असतील.
  • Shortlisted उमेदवारांची पुढे टेस्ट व मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
  • ही भरती फक्त 2024 व 2025 पासआउट विद्यार्थ्यांसाठी आहे.

 

आता तुमच्या SAP करिअरची वाट सुरू करा!
तुमचं SAP सर्टिफिकेशन तयार आहे का? तर ही संधी गमावू नका! आजच अर्ज करा आणि तुमचं नाव एक ग्लोबल टेक कंपनीसोबत जोडून घ्या. एचसीएलटेक तुम्हाला केवळ नोकरी नाही, तर दीर्घकालीन, समृद्ध आणि प्रगतिशील करिअर देण्यास सज्ज आहे!


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड