लागा तयारीला, ग्रामविकास विभागात राज्यात 19 हजार पदांची भरती! | Gram Vikas Vibhag Bharti 2024

Gram Vikas Vibhag Bharti 2024

Gram Vikas Vibhag Bharti 2024

राज्याच्या ग्रामविकास खात्यामार्फत गेल्या वर्षभरात १९ हजार कर्मचाऱ्यांची पद भरती राज्य शासनाने हाती घेतली असून, या भरतीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात परीक्षा घेणे ही सोपी बाब नाही. मात्र, असे असतानाही अत्यंत पारदर्शकपणे परीक्षा घेऊन उमेदवारांना गुरुवारी (ता. २५) नियुक्तीपत्र दिले जात आहेत, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले. आपल्याला मिळालेली शासकीय नोकरी ही सेवा म्हणून केल्यास नक्कीच गोरगरीब वंचित घटकाला आपण न्याय देऊ शकतो. शासकीय नोकरीत गोरगरिबांची सेवा करून विश्वात संपादन करा, जनतेची मने जिंका, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. संभाजीराजे नाट्यगृहात गुरुवारी महाभरती २०२३-२४ अंतर्गत अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटप व जळगाव पर्यटन चित्रफितीच्या लोकार्पण झाले. त्यावेळी मंत्रीद्वयी बोलत होते. तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम, परीक्षा स्वरूप, गुण पद्धती व अन्य माहिती येथे तपासा.  या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार सुरेश भोळे, लता सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. डी. लोखंडे, प्रशिक्षणातील सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती वेवोतोलू केजो, जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

नवनियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यात तलाठी १९५, कनिष्ठ अभियंता स्थापत्य ३५, स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक ३२, औषध निर्माण अधिकारी १०, कनिष्ठ सहाय्यक ३५ व शिक्षणसेवक ११४ यांचा समावेश आहे. कार्यक्रमाच्या सुरवातीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रास्ताविकातून नवनियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना समुपदेशनाच्या माध्यमातून नियुक्त दिल्या असून, न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रशासनात आता मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची संख्या वाढणार असल्यामुळे प्रशासनाला गतिमानता येणार असल्याचे नमूद केले.

श्री. प्रसाद यांनी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार व महसूल प्रशासनाच्या तहसीलदार ज्योती गुंजाळ यांचे अभिनंदन केले. जळगाव जिल्ह्यातील २१ पर्यटनस्थळांची माहिती देणाऱ्या चित्रफितींचे लोकार्पण करण्यात येत आहे, ही बाब अत्यंत भूषणावह असून, पर्यटनावर आधारित चित्रफित तयार करणारा जळगाव जिल्हा पहिलाच असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी आभार मानले. निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार ३१ जुलैला निवृत्त होत असल्याने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

 


Guardian Minister Gulabrao Patil, Minister Anil Patil, MLA Suresh Bhole, Collector Ayush Prasad, G.P. CEO Ankit, Superintendent of Police Dr. Maheshwar Reddy.

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Gram Vikas Vibhag Bharti 2024: जिल्हा परिषदेच्या आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक पदाच्या भरतीसाठी अर्ज भरून चार महिने झाले आहे. मात्र अजूनही परीक्षेची तारीख घोषित नाही. त्यात परीक्षा जून महिन्यात होणार असल्याची अफवा पसरली असून, विद्यार्थी संभ्रमात आहेत. त्यामुळे ग्रामविकास विभागाने परीक्षांच्या तारखांबाबत निवेदन प्रसिद्ध करावे, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेची भरती वादग्रस्त ठरत असून, नव्याने घोषित झालेली भरतीही अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे.

परीक्षा या लवकरात-लवकर घेण्यात याव्यात पण उमेदवारांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळेल, यादृष्टीने किमान ३० दिवस आधी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणीही उमेदवारांच्या वतीने करण्यात आली आहे.

ग्रामसेवक, आरोग्य सेवकांच्या परीक्षांना जून नंतरचाच

ग्रामसेवक, आरोग्य सेवकांच्या परीक्षांना जून नंतरचाच मुहूर्त मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल ४ जून रोजी हाती येतील त्यानंतर या प्रक्रियेला वेग येईल. मागील काही महिन्यांपासून भरती प्रक्रिया सुरू आहे. अर्ज भरून चार महिने लोटले आहेत. पण, परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आली नाही. त्यामुळे परीक्षा केव्हा घेतली जाणार? या विचाराने ग्रामसेवक आणि आरोग्य सेवक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे. ग्रामसेवक, आरोग्यसेवक पदांच्या हजारो रिक्त जागांसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. चार महिन्यांपासून परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे लाखो विद्यार्थी परीक्षेची वाट पाहत आहेत. ही परीक्षा लवकर घ्यावी. मात्र, उमेदवारांना कमीत कमी एक महिना अभ्यासासाठी वेळ मिळेल अशा पद्धतीचा परीक्षेचा कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने शासनाकडे केली आहे.

???? ग्रामसेवकचे जिल्हा नुसार आलेले अर्ज ????????
Nandurbar.        →113
Dhule.                →384
Latur.                 →945
Washim                →1613
Gadchiroli.         →1698
Nagpur.              →2023
छत्रपती संभाजीनगर  →2233
Palghar              →2587
Akola                  →2933
Ahmadnagar.    →3414
Amaravati.         →3701
Parbhani            →3890
Buldhana           → 3929
Sindhudurg        →4276
Pune                   →4575
Sangali                →4587
Wardha              →4697

Bhandara           →5443
Raigad           →6600
Kolhapur             →6632
Chandrapur        →7113
Nanded               →7289
Beed                    →8868
Jalana                 →9420
Solapur               →10204
Nashik                  →11728
Jalgaon               →11837
Satara                 →13550
Yavatmal             →32306
Ratnagiri             →41145


Rashtriya Gram Swaraj Abhiyan Bharti 2023

Gram Vikas Vibhag Bharti 2023: Rural Development and Panchayat Raj Minister Girish Mahajan said that under the restructured National Gram Swaraj Abhiyan, 3 per cent increase in remuneration of appointed manpower at state, district and taluka levels has been approved through contractual and external mechanisms. Read More about Gram Vikas Vibhag Bharti 2023 at below:

राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत कंत्राटी व बाह्य यंत्रणेद्वारे राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील नियुक्त मनुष्यबळाच्या मानधनात प्रतिवर्षी ३ टक्के वाढ मंजूर करण्यात आली असल्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम, परीक्षा स्वरूप, गुण पद्धती व अन्य माहिती येथे तपासा

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

महाजन म्हणाले, पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान ही केंद्र पुरस्कृत योजना सन २०२२ ते सन २०२६ या कालावधीकरिता राज्यात कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेसाठी करार पद्धतीने घेतलेल्या समन्वय करणे, पंचायती राज संस्थांच्या संबंधित विविध स्वरूपाची माहिती, अहवाल ‘, संकलन करणे, इतर विविध उपक्रमांची अंमलबजावणी व सनियंत्रण करणे, जिल्ह्याचा मासिक प्रगती अहवाल तयार करून वरिष्ठ कार्यालयास सादर करणे, योजनेंतर्गत उपलब्ध निधीचे स्वतंत्र हिशोब, लेखे ठेवणे, लेखापरीक्षण करून घेणे तसेच योजनेसंदर्भात सोपवलेली सर्व कामे पार पाडणे इत्यादी कामे करण्यात येतात. त्यांच्या कामाचे व्यापक स्वरूप विचारात घेता त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने त्यांच्या मानधनात प्रतिवर्षी ३ टक्के वाढ करण्याबाबत मान्यता दिली असल्याचे महाजन यांनी सांगितले.


Gram Vikas Vibhag Bharti 2023 New Update

Gram Vikas Vibhag Bharti 2023 :  Rural Development and Panchayat Raj Minister Girish Mahajan said that a total of 19,460 vacancies in 30 cadres of Group -C in 34 Zilla Parishads of the state under the Rural Development and Panchayat Raj Department will be filled through direct service and the first phase of this recruitment will be implemented transparently and strictly from October 7 to 11, 2023.

 

ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत राज्यातील ३४ जिल्हा परिषदेतील गट-‘क’ मधील ३० संवर्गातील एकूण १९,४६० इतकी रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यात येणार असून या पदभरतीचा पहिला टप्पा ७ ते ११ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत पारदर्शक व काटेकोरपणे राबविण्यात येणार असल्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम, परीक्षा स्वरूप, गुण पद्धती व अन्य माहिती येथे तपासा

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत पदभरतीची जाहिरात ५ ऑगस्ट, २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीसाठी २५ ऑगस्ट २०२२ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. या परीक्षेसाठी एकूण ११लाख ४ हजार ९८६ अर्ज प्राप्त झाले आहेत. या परीक्षेचा पहिला टप्पा ७ ते ११ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या प्रथम टप्प्यामध्ये आठ संवर्गातील ५४७ रिक्त पदांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेची संपूर्ण भरती प्रक्रिया शासनाने मान्यता दिलेल्या आय.बी.पी.एस. या कंपनीमार्फत राबविण्यात येत असल्याचे मंत्री श्री.महाजन यांनी सांगितले.

यामुळे या परीक्षेची संपूर्ण भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व काटेकोर पद्धतीने होणार आहे. काही समाज विघातक प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून प्रलोभन दाखवून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा फसवणुकीपासून उमेदवारांनी दक्षता घ्यावी. तसेच अशा प्रकारच्या कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये, अन्यथा अशी फसवणूक झाल्यास शासन अथवा जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही. अशा प्रकारे कोणतीही व्यक्ती परीक्षेसंदर्भात आर्थिक मागणी करीत असल्याबाबत निदर्शनास आल्यास त्याच्याविरुद्ध जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात यावी, असे सर्व उमेदवारांना ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी आवाहन केले आहे.


Under the Department of Village Development and Panchayat Raj, under the 34 Zilla Parishads of the state, in the 30 cadres of Group-C, a total of 19 thousand 460 vacant posts are to be filled by direct service. Released on August 05, 2023. According to the advertisement Applications are invited from the candidates through online mode from 05th to 25th August, 2023. The entire recruitment process of Rural Development Department is IBPS approved by Govt. It is being implemented through this company. Therefore, the examination will be conducted in a very transparent and strict manner. However, the possibility of financial fraud by some individuals with anti-social tendencies cannot be ruled out. Rural Development and Panchayat Raj Minister Girish Mahajan has appealed to the candidates to be vigilant against such fraud and not fall victim to any such temptation. Know More about Gram Vikas Vibhag Bharti 2023 at below :

ग्रामविकास विभागाची संपूर्ण भरतीप्रक्रिया शासनाने मान्यता दिलेल्या आय.बी.पी.एस. या कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. त्यामुळे सदर परीक्षा अत्यंत पारदर्शक व काटेकोर पद्धतीने होणार आहे. तथापि, काही समाजविघातक प्रवृत्तींच्या व्यक्तींकडून प्रलोभने दाखवून आर्थिक फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा फसवणुकीपासून उमेदवारांनी दक्षता घ्यावी, तसेच अशाप्रकारच्या कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये, असे आवाहन ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीष महाजन यांनी केले आहे.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत राज्यातील 34 जिल्हा परिषदांतर्गत गट – क मधील 30 संवर्गातील एकूण 19 हजार 460 इतकी रिक्त पदे सरळसेवेने भरण्याबाबतची जाहिरात दि. 05 ऑगस्ट, 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जाहिरातीनुसार दि. 05 ते 25 ऑगस्ट, 2023 पर्यत ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले आहे की, कोणतीही व्यक्ती परिक्षेसंदर्भात आर्थिक मागणी करीत असल्याबाबत निदर्शनास आल्यास त्यांच्याविरुद्ध जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात यावी, फसवणूक झाल्यास शासन अथवा जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही.

जि. प. भरती! परीक्षा केंद्र कधीही बदलू शकते

ग्राम विकास विभागातर्फे राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये क वर्गातील तीस संवर्गात १९ हजार ४६० पदे सरळ सेवेने भरल्या जात आहे. इच्छुकांना २५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. ही संपूर्ण प्रक्रिया आयबीपीएस कंपनीतर्फे करण्यात येत आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. जिल्हा परिषदांना परीक्षेचे केंद्र बदलण्याचा अधिकार देण्यात आला आहे. कोणतीही जिल्हा परिषद एखादे केंद्र रद्द करू शकते. तसेच गरजेनुसार केंद्रात वाढही करू शकते. उमेदवारांनी पर्याय म्हणून दिलेल्या केंद्राव्यतिरिक्त जिल्हा परिषदेकडून इतरही केंद्र दिले जावू शकतात, असे कंपनीतर्फे खबरदार करण्यात आले आहे. तसेच ऑनलाईन परीक्षेच्या तारखेबाबत उमेदवारांनी सातत्याने जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ पाहण्याची सूचना आहे. ऑनलाईन अर्ज व शुल्क भरल्याच्या पावतीची प्रिंट जपून ठेवणे आवश्यक आहे. कोणतीही अडचण आल्यास त्याची गरज पडू शकते.


Gram Vikas Vibhag Bharti 2023

Gram Vikas Vibhag Bharti 2023 – The entire recruitment process of the Rural Development Department Exam is through IBPS approved by Govt. It is being implemented through this company. Therefore, the examination will be conducted in a very transparent and strict manner under Gram Vikas Vibhag Bharti 2023. However, the possibility of financial fraud by some anti-social persons cannot be ruled out For Gram Vikas Vibhag Bharti 2023. Rural Development and Panchayat Raj Minister Girish Mahajan has appealed to the candidates to be vigilant against such fraud and not fall prey to any such temptation.

 

ग्रामविकास विभागाच्या परिक्षेची संपूर्ण भरतीप्रक्रिया शासनाने मान्यता दिलेल्या IBPS या कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. त्यामुळे सदर परीक्षा अत्यंत पारदर्शक व काटेकोर पद्धतीने होणार आहे. तथापि, काही समाजविघातक प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून प्रलोभने दाखवून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा फसवणूकीपासून उमेदवारांनी दक्षता घ्यावी, तसेच अशा प्रकारच्या कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये, असे आवाहन ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीष महाजन यांनी केले आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती बगण्यासाठी येथे क्लिक करावे

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

मंत्री महाजन म्हणाले की, ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत राज्यातील ३४ जिल्हा परिषदांतर्गत गट-क मधील ३० संवर्गातील एकूण १९ हजार ४६० इतकी रिक्त पदे सरळसेवेने भरण्याबाबतची जाहिरात दि. ०५ ऑगस्ट, २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जाहिरातीनुसार दि. ०५ ते २५ ऑगस्ट, २०२३ पर्यत ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

 

ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले आहे की, फसवणूक झाल्यास शासन अथवा जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही. कोणतीही व्यक्ती परिक्षेसंदर्भात आर्थिक मागणी करीत असल्याबाबत निदर्शनास आल्यास त्यांच्याविरुद्ध जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात यावी, असे सर्व उमेदवारांना आवाहन करण्यात येत आहे.

 


Gram Vikas Vibhag Bharti 2023 – No Advertisement has been Published Yet after releasing Zilla Parishad Gram Vikas Bharti Time Tabel. So there is huge demand from student associations to fill these vacancies as soon as possible.  The age of the candidates who have filled the application form for recruitment is increasing day by day and due to non-recruitment there has been a lot of depression among the youth. Finally, Deputy Secretary Village Development Vijay Chandekar has ordered all Zilla Parishads to start the recruitment process immediately in this regard. Lets See When Gram Vikas ZP Bharti 2023 Notification is Released, You ca check this page for daily Update on ZP Gram Viikas Recruitment 2023 :

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषदांतील रखडलेली पदभरती तत्काळ करावी, अशी सूचना ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिली आहे. या संबंधी उपसचिव विजय चांदेरे यांनी नुकतेच पत्रक प्रसिद्ध केले आहे. जिल्हा परिषद मधील विविध पदांच्या २०१९ पासून रखडलेल्या १३ हजार ५२१ जागांची तत्काळ पदभरती घेण्यात यावी अशी मागणी होती. अखेरीस यासंदर्भात पदभरतीची प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याचे आदेश विजय चांदेकर उपसचिव ग्राम विकास यांनी सर्व जिल्हा परिषदेला दिले आहेत…

Gram Vikas Vibhag Bharti 2023 Starting Date

जिल्हा परिषद भरतीबाबत आलेल्या बातमीवर ग्रामविकास विभागाचा खुलासा

Gram Vikas Vibhag Bharti 2023 Update

ग्रामविकास विभागाचे जिल्हा परिषदांना आदेश तत्काळ पदभरती करा

जिल्हा परिषदेतील भरती प्रक्रिया मागील चार वर्षांपासून विविध कारणाने रखडल्या आहेत. त्यात राज्य शासनाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ हजार पदांच्या भरतीची घोषणा केली. मात्र प्रत्यक्षात कोणतीच हालचाल होत नसल्याने विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत.  मागील साडेतीन वर्षांत विविध कारणाने जिल्हा परिषदेतील पदभरती वादग्रस्त ठरली आहे. यंदा पदभरतीची घोषणा करतानाच सर्वसाधारण वेळापत्रक घोषित करण्यात आले होते.

मात्र, या वेळापत्रकानुसार कोणतीच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नाही. भरतीसाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांचे वय दिवसेंदिवस वाढत असून, भरती होत नसल्याने तरुणांमध्ये प्रचंड नैराश्य आले आहे. रखडलेली ही भरती तत्काळ करण्यात यावी, अशा मागण्या विद्यार्थी संघटना करत आहे. पदभरतीच्या वाढत्या असंतोषाची दखल ग्रामविकास विभागाच्या आदेशात घेण्यात आली आहे.


Gram Vikas Vibhag Bharti 2023 Details

Gram Vikas Vibhag Bharti 2023: Gram Vikas Vibhag Bharti 2023 as per the latest new this bharti process is on the hold. More details about this bharti are given below.

 

नवीन अपडेट – ग्रामविकास विभागाची काल बैठक झाली आहे. एक पद एक जिल्हा परिषद असाच फॉर्म भरता येणार आहे.. तसेच परीक्षा एकाच दिवशी घ्यायची आहे.. त्यामुळं परीक्षा ऑफलाईन होण्याची शक्यता जास्त असून TCS offline किंवा जिल्हा परिषद स्वतः घेतील.. उद्या किंवा सोमवारी GR येईल.. परीक्षा नियोजित दिनांक ला व्हाव्यात म्हणून ग्रामविकास विभाग पूर्ण प्रयत्न करणार आहे..

नव्याने अर्ज मागवण्याची चर्चा?

पदभरतीसाठी वित्त विभागाची परवानगी असतानाही ग्रामविकास विभागाने त्यासाठी घातलेल्या गोंधळामुळे संपूर्ण प्रक्रिया रखडली आहे. न्यास कंपनीकडून अर्जदारांची संपूर्ण माहिती देण्यास टाळाटाळ सुरू असल्याने ही पदभरती रद्द करून नव्याने अर्ज मागवण्यात येणार असल्याचीही चर्चा स्पर्धा परीक्षार्थीमध्ये आहे. त्यामुळे असे झाल्याने जुन्या अर्जदारांचे काय? वयोमर्यादेच्या नियमांचे काय? असे अनेक प्रश्न उभे राहणार आहेत.

 

विद्यार्थ्यांची फडणवीसांकडून अपेक्षा

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेगाभरतीची घोषणा केली होती. त्यांच्या काळातच जिल्हा परिषदेसाठी महापरीक्षा संकेतस्थळावर अर्ज घेण्यात आले होते, मात्र मधल्या काळातील महाविकास आघाडी सरकारकडून पदभरती घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. सध्या फडणवीस उपमुख्यमंत्री असल्याने त्यांच्या काळात सुरू झालेल्या या पदभरतीला पूर्णत्वास नेतील का? असा प्रश्नही विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

 

संपूर्ण संवर्गाची भरती केव्हा?

करोनामुळे केवळ आरोग्य विभागातील पदांची भरतीचा निर्णय घेण्यात आला होता. सध्या करोनानंतर संपूर्ण जनजीवन सुरळीत सुरू असतानाही १८ संवर्गातील संपूर्ण १३ हजार पदांच्या भरतीला मान्यता नाही. त्यामुळे संपूर्ण पदाची भरती कधी होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या भरतीच्या आशेवर असताना वारंवार वेळापत्रकाला स्थगिती देणे उचित नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी यामध्ये प्रत्यक्ष लक्ष घालून जिल्हा परिषद भरतीचा तिढा सोडवावा.

– राहुल कवठेकर, अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती.

 

Rural Development Department Bharti 2023

ग्रामविकास विभाग, बांधकाम भवन, मुंबई अंतर्गत “अवर सचिव पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – अवर सचिव
  • पद संख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Law Degree (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • वयोमर्यादा – 65 वर्षे
  • अर्ज करण्याचा पत्ता – अपर मुख्य सचिव, ग्रामविकास विभाग, सातवा माळा, बांधकाम भवन, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई-४००००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जुलै 2022
  • अधिकृत वेबसाईट– maharashtra.gov.in

Important Instruction For Maharashtra Rural Development Department Bharti 2022

  1. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  2. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2022 आहे.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Gram Vikas Vibhag Mumbai Bharti 2022

? PDF जाहिरात
https://cutt.ly/GLwitqB
✅ अधिकृत वेबसाईट
maharashtra.gov.in

 


Maharashtra Gram Vikas Vibhag Recruitment 2023

Gramvikas Vibhag Bharti 2023 : The recruitment process has been resumed as per the advertisement issued in March 2019 to fill the posts in the Group C category of Zilla Parishad Health Department under the Rural Development Department. Candidates who have applied for the respective posts as per the advertisement in March 2019 are required to go to the website www.maharddzp.com and create their login ID and password. These include health workers, health workers, laboratory technicians, drug manufacturers, and health supervisors. Further details are as follows:-

  • New Registrations will start from 1st till 10th October 2021. The New Vacancy List is being updated.

नवीन अपडेट : या भरतीच्या पदसंख्येत बदल होणे अपेक्षित आहे, यानुसार नवीन रजिस्ट्रेशन लिंक १ ते १० ऑक्टोबर २०२१ या कालावधीत उपलब्ध होईल. 

Last Date of Registration has been Extended till 29th September 2021 / नोंदणीची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.”

Gramvikas Vibhag Bharti 2021

ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषद आरोग्य विभागातील गट ‘क’ संवर्गातील पदे भरण्यासाठी मार्च 2019 मध्ये काढण्यात आलेल्या जाहिरातीनुसार सदरची भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. यात आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या पदांचा समावेश आहे. या अंतर्गत उमेदवार नवीन अर्ज सादर करू शकतात. 

मार्च 2019 मधील जाहिरातीनुसार संबंधित पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी www.maharddzp.com या संकेतस्थळावर जाऊन आपला लॉगीन आयडी व पासवर्ड क्रिएट करणे आवश्यक आहे. यापूर्वी आवेदनपत्रे सादर केलेल्या उमेदवारांपैकी समाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास प्रवर्गातील उमेदवारांव्यतिरिक्त इतर प्रवर्गातून अर्ज सादर केलेले उमेदवार संबंधित प्रवर्गातून परीक्षेसाठी पात्र असणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ‘एसईबीसी’ आरक्षण रद्द ठरविले आहे. त्यामुळे शासन निर्णयानुसार एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गात अथवा आर्थिकदृष्टय़ा दुर्बल प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ घेणे ऐच्छिक असेल.

 

Rural Development Department Bharti 2021

याअनुषंगाने सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवाराने संकेतस्थळावर 1 ते 14 सप्टेंबर या कालावधीत विकल्प द्यावयाचे आहेत. उमेदवाराने आर्थिकदृष्टय़ा मागास प्रवर्गाचा विकल्प निवडला असेल तर परिक्षेपूर्वी त्याबाबतचे प्रमाणपत्र निवड समितीकडे सादर करणे बंधनकारक आहे. जे एसईबीसी प्रवर्गातील उमेदवार खुल्या प्रवर्गासाठीचा विकल्प देतील किंवा आर्थिकदृष्टय़ा मागासप्रवर्गाचा विकल्प सादर करणार नाहीत. पण, खुल्या प्रवर्गातील वयोमर्यादेसाठी पात्र आहेत, त्यांना खुल्या प्रवर्गातील उमेदवार म्हणून गणण्यात येणार आहे. त्यांनी 1 ते 14 सप्टेंबर या कालावधीत परीक्षा शुल्क अदा केल्याबाबतची माहिती संकेतस्थळावर देण्sा बंधनकारक आहे.

GramVikas Vibhag Bharti 2021 Registration:

“सदर परीक्षा राज्यातील सर्व जिल्हा परिषदमध्ये एकाचवेळी होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना एकाच जिल्हा परिषदेमध्ये रिक्तपदासाठी अर्ज करता येईल. त्यामुळे उमेदवारांनी एकाच जि. प. चा विकल्पही संकेतस्थळावर 1 ते 14 सप्टेंबर 2021 या कालावधीत नोंदविणे आवश्यक आहे. “

दरम्यान, यात दिव्यागांच्या नव्याने समाविष्ट प्रवर्गाकरिता तसेच एसईबीसी मागास प्रवर्ग रद्द झाल्याने खुल्या प्रवर्गात नव्याने वाढलेल्या समांतर आरक्षणाच्या प्रवर्गासाठी जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागविण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त इतर प्रवर्गासाठी जाहिरात देता येणार नाही. नव्याने समाविष्ठ झालेल्या दिव्यांगांच्या प्रवर्गातील उमेदवाराने जर यापूर्वीच्या मार्च 2019 मध्ये प्रसिद्ध जाहिरातीनुसार खुल्या अथवा इतर प्रवर्गातून अर्ज केला असल्यास त्यांना दिव्यांग आरक्षणाचा विकल्प देणे आवश्यक असेल. तसेच यापूर्वी अर्ज सादर केलेल्या दिव्यांग उमेदवारांनी पदनिहाय आरक्षणात बदल होत असल्याने दिव्यांगासाठी नव्याने प्रसिद्ध होणाऱया जाहिरातीनुसार विकल्प देणे आवश्यक आहे.

याबाबतचे जाहीर प्रकटन 25 व 26 ऑगस्ट रोजी होणार आहे. विकल्पासाठीची मुदत 1 ते 14 सप्टेंबर आहे. नव्याने समाविष्ट दिव्यांग तसेच नव्याने वाढलेल्या खुल्या प्रवर्गातील रिक्त जागांसाठी ऑनलाईन अर्ज 1 ते 21 सप्टेंबर या कालावधीत मागविण्यात येणार आहेत. जिल्हा निवड समितीने आयोजनाबाबतची कार्यवाही करावयाची आहे. यात परीक्षा केंद्र निश्चिती 22 ते 29 सप्टेंबर, पर्यवेक्षक, अधिकारी, कर्मचारी नियुक्त्या 30 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीत करावयाच्या आहेत.

Gramvikas Vibhag Recruitment – Admit Card

The deadline for downloading admit card =s is October 6 to 15. The exams for laboratory technicians and drug manufacturers will be held on October 16 and for health workers, nurses and health supervisors on October 17. The period from October 18 to November 1 for publishing the answer key after the written examination, filing of objections to the candidates, final results, final list, list of eligible candidates has been given.


Gramvikas Vibhag Bharti 2021 :राज्यात लवकरच मेगा भरती सुरू करण्यात येणार आहे. या मेगा भरती अंतर्गत ग्रामविकास विभागात 8 हजार पदापेक्षा जास्त भरती करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. करोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागाला प्राधान्य देण्यात आले असून आरोग्य क्षेत्रातील आवश्‍यक भरती तातडीने करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

खुशखबर – ग्रामसडक योजनेसाठी दीड हजार पदांची भरती

आता आगामी नव्या वर्षात आरोग्य, कायदा आणि सुव्यवस्थेची सुविधा कशा प्रकारे असेल, याबाबत विचारले असता राजेश टोपे म्हणाले, आरोग्य आणि ग्रामविकास विभागातील आरोग्य निगडीत पदं लवकरच भरली जाणार आहेत. राज्य शासनाने भरतीला मान्यता दिली आहे. पुढील दोन महिन्यांत भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.

प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात आरोग्य योजनांच्या माहितीचा फलक लावावा

आरोग्य विभागाच्या योजनांची माहिती सामान्यांना व्हावी यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आणि गावातील मुख्य चौकात माहितीचे मोठे फलक लावण्यात यावेत, असे टोपे यांनी यावेळी सांगितले. तसेच महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा प्रभावीपणे प्रचार आणि प्रसिद्धी करावी. त्याचबरोबर या योजनेंतर्गत प्रत्येक तालुक्यात एक रुग्णालय सहभागी होईल यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी प्रयत्न करावे, असे ते म्हणाले.


महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, सेवानिवृत्त उप अभियंता पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, सेवानिवृत्त उप अभियंता
  • पद संख्या – 13 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Graduate
  • वयोमर्यादा – 65 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – मुंबई, औरंगाबाद, पुणे, अमरावती, अकोला, ठाणे, नाशिक, नागपूर, गडचिरोली व चंद्रपूर
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – वित्तीय नियंत्रक तथा उपसचिव (मु. मं. ग्रा. स. यो./ प्र. मं. ग्रा. स. यो.), ग्रामविकास विभाग, 5 व मजला, बांधकाम भवन, मुंबई
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जानेवारी 2021 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Gramvikas Vibhag Bharti 2021
PDF जाहिरात : 
अधिकृत वेबसाईट : www.rdd.maharashtra.gov.in

Gramvikas Vibhag Bharti 2020 : Gramvikas Vibhag Bharti Details are given below. There are 13 vacancies under this Bharti process. The last date to apply for this Bharti 28th January 2021. Gram Vikas Vibhag is inviting you to fill the offline application form. This recruitment conducting for Retired Executive Engineer, Retired Deputy Engineer posts. Here we will update you on everything about Gram Vikas Vibhag Recruitment 2021. Further details are as follows:-

Gram Vikas Vibhag Bharti 2020 Details & Updates 

Department Name
Gram Vikas Vibhag
Recruitment Name
Gram Vikas Vibhag Bharti Recruitment 2020
Name of Vacancies  Retired Executive Engineer, Retired Deputy EngineerJunior Mechanic
Application Mode Offline Application Forms
Official Website www.rdd.maharashtra.gov.in

Vacancy Details For Gram Vikas Vibhag Bharti Details

Retired Executive Engineer 02
Retired Deputy EngineerJunior Mechanic 11

\


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

18 Comments
  1. S.g.patil says

    Can be job for government in maharashtra medical pharmacist

  2. Balaji Narayanrao Kasbe says

    Gramsevak bharti kadhi nighel?

  3. K.k says

    अजून किती दिवस चालणार आहे हे,लवकरच लवकरच

  4. स्वाती जाधव says

    प्राध्यापक भरती साठी (NET /SET झालेल्यांनी) कोणत्या स्थळाला भेट द्यावी?

  5. Anita tekam says

    ANM chya vacancy ahet kayy

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड