ग्रामसेवक भरती – जिल्हा परिषद प्रशासनाकडून अखेर दखल; जिल्ह्यात ‘त्या’ ३८ जणांना नियुक्त्या!! – Gram Sevak Bharti 2024
Gram Sevak Bharti 2024
Gram Sevak Bharti 2024
Gram Sevak Bharti 2024: भरती प्रक्रिया पूर्ण होवूनही निवड झालेल्या ग्रामसेवकांना नियुक्त्या न दिल्याच्या ‘सकाळ’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी ३८ जणांना नियुक्त्या दिल्या. पात्र उमेदवारांतील तीन जणांची पडताळणी पूर्ण न झाल्याने त्या नियुक्त्या प्रलंबित ठेवल्या आहेत. चार आरक्षित जागांसाठी पात्र उमेदवार प्राप्त न झाल्याने या चार जागा रिक्त राहिल्या आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्याने डिसेंबर २०२३ अखेर रिक्त असलेल्या जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू केली होती. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या ३३४ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. एवढ्या पदांसाठी एकूण १६ हजार २८७ अर्ज आले होते. यामध्ये सर्वाधिक ग्रामसेवक पदांसाठी ४ हजार २७६ अर्ज दाखल झाले होते. या पाठोपाठ आरोग्य सेवक पुरुष पदांसाठी ३ हजार १ एवढे अर्ज आले होते.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षाच्या निमित्ताने राज्याने शासकीय विभागांसाठी राबविलेल्या मेगा भरतीचे धोरण निश्चित केले होते. या धोरणानुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये तब्बल ३३४ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली गेली. ज्या विभागांचा सुधारित आकृतीबंध जाहीर झाला आहे, त्या विभागांची रिक्त पदे १०० टक्के भरती प्रक्रियेत घेतली होती. ज्या विभागांचा सुधारित आकृतीबंध जाहीर झालेला नाही, त्या विभागातील रिक्त पदांतील ८० टक्के पदांची भरती प्रक्रिया राबविली होती. एकूण १७ संवर्गासाठी ही प्रक्रिया राबविली गेली.
यातील सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सहायक चार, आरोग्य विभागातील आरोग्य पर्यवेक्षक एक, वित्त विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी दोन, वरिष्ठ लेखा सहायक सात, कनिष्ठ लेखा सहायक चार, कृषी विभागातील तीन कृषी विस्तार अधिकारी, बांधकाम विभागातील तारतंत्री एक, विद्युत कनिष्ठ अभियंता दोन, महिला व बाल कल्याण विभागातील एक पर्यवेक्षिका, पशुसंवर्धन विभागातील पशुसंवर्धन पर्यवेक्षक १७ अशा एकूण ४२ पदांवर नियुक्त्या दिल्या होत्या.
ग्रामसेवकांच्या ४५ जागांसाठी भरती निघाली होती. यातील ४१ उमेदवारांची यादी जिल्हा परिषदेला प्राप्त झाली होती. उर्वरित चार आरक्षित जागांसाठी उमेदवार प्राप्त झाले नव्हते. प्राप्त झालेल्या पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी पूर्ण झाली होती. परंतु, नियुक्त्या रखडल्या होत्या.
याबाबत ‘सकाळ’ने ‘ग्रामसेवक भरती ‘वेटिंग वरच’ या मथळ्याखाली १० ऑक्टोबरला वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल जिल्हा परिषद प्रशासनाने तत्काळ घेत ११ ऑक्टोबरला नियुक्त्या दिल्या आहेत.
चार जागांसाठी उमेदवार न मिळाल्याने ४५ पैकी ४१ जागांसाठी ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. परंतु, ४१ पैकी तीन जणांची पडताळणी पूर्ण झाली नसल्याने या नियुक्त्या प्रलंबित ठेवत ३८ जर्णांना ११ ला नियुक्तिपत्रे दिली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर आलेला अतिरिक्त ताण काही प्रमाणात कमी झाला आहे..
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागण्याची चिन्हे आहेत. आचारसंहिता लागल्यास कंत्राटी ग्रामसेवक उमेदवारांचे नियुक्ती आदेश लांबणीवर पडू शकतात. यामुळे ३० सप्टेंबर व एक ऑक्टोबर रोजी दोन दिवस जिल्हा परिषदेत पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर लवकरच नियुक्ती आदेश देण्याच्या प्रशासनाच्या हालचालींना वेग आला आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत २०२३-२४ या वर्षात झालेल्या सरळसेवा पदभरतीमध्ये कंत्राटी ग्रामसेवक अनुसूचित क्षेत्राबाहेरील (नॉन पेसा) या पदाचा निकाल जाहीर करण्यात आला. निकालानुसार तात्पुरती ५२ पदांची निवड यादी व प्रतीक्षा यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
महाराष्ट्र ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न साठी येथे क्लिक करा आणि ग्राम सेवक भरतीचे मागील वर्षीचे पेपर्स डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
यादीत ज्यांचे नाव समाविष्ट आहे. त्यांनी सरळसेवा परीक्षेचा अर्ज भरताना ज्या कागदपत्रांच्या आधारे सादर केला आहे. त्या सर्व मूळ कागदपत्र व त्या कागदपत्रांच्या दोन छायांकित प्रतीसह ३० सप्टेंबर व एक ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद सभागृहात उपस्थित राहावे लागणार आहे. ५२ जागांसाठी निवड व प्रतीक्षा यादीतील १९८ उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हा परिषोअंतर्गत विविध संवर्गासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात आली लोकसभा निवडणुकीमुळे नियुक्ती आदेश देण्यासाठी आचारसंहिता शिथिल होण्याची प्रतीक्षा जिल्हा परिषद प्रशासनाला करावी लागली होती. आता विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पुन्हा अशी वेळ येऊ नये, यासाठी सामान्य प्रशासन विभाग कामाला लागले आहे. कागदपत्रांच्या तपासणीनंतर पात्र उमेदवारांना लवकरच नियुक्ती आदेश मिळेल.
गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक पुरूष आणि महिला, कंत्राटी ग्रामसेवक पदांच्या परिक्षेला अखेर मुहूर्त मिळाला. नॉन पेसा क्षेत्रातील पदांच्या परिक्षेला गुरूवारी दि. १८ जुलै रोजीपासून सुरूवात होणार आहे. तर पेसा क्षेत्रातील पदांच्या भरतीबाबत शासनाचे कुठलेही निर्देश प्राप्त झाले नाही.
जिल्हा परिषदेतील वेगवेगळ्या संवर्गातील ८७५ जागांच्या पद भरतीला ऑक्टोंबर २०२३ पासून सुरूवात झाली होती. आयबीपीएस कंपनीच्या माध्यमातून ऑनलाईन परिक्षा घेण्यात आली. मात्र, नॉन पेसा क्षेत्रातील जागेचा मुद्दा न्यायालयात पोहचल्याने आरोग्य सेवक पुरूष आणि महिला, तसेच कंत्राटी ग्रामसेवकांच्या पद भरतीला ब्रेक लागला होता. मध्यंतरी न्यायालयाने ज्या पदाची परिक्षा झाली, त्यातील पात्र उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पशूसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षकांच्या ३६ जागेसाठी पात्र उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध केली. त्यातून नॉन पेसा क्षेत्रातील १९ उमेदवारांची कागदपत्रे तपासण्यात आली, परंतू पेसा क्षेत्रातील उमेदवारांच्या नियुक्त्याबाबत अंतीम निर्णय घेण्यात आला नाही. त्याच पद्धतीचा निर्णय आरोग्य सेवक पुरूष आणि महिला, तसेच कंत्राटी ग्रामसेवकांच्या परिक्षेबाबत शासनाने घेतला. नॉन पेसा क्षेत्रातील उमेदवारांची परिक्षेचे वेळापत्रक जाहिर करावे, अशा सुचना दिल्या आहेत. त्यानुसार ह्या परिक्षेला मुहूर्त मिळाला आहे. पहिला पेपर पर्यवेक्षिकांचा १८ जुलै रोजी होणार आहे. तर आरोग्य परिचारीका (आरोग्य सेवक महिला) १९ जुलै, आरोग्य सेवक (पुरूष ४० टक्के) २२ आणि २३ जुलै, तर आरोग्य सेवक पुरूष ५० टक्के (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) यांची २३ आणि २४ जुलै रोजी परिक्षा होणार आहे. गेल्या नऊ महिन्यापासून उमेदवार प्रतिक्षेत होते. आता अर्ज भरलेल्या उमेदवारांची प्रतिक्षा संपली आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागातील आरोग्य सेवक पुरूष आणि महिला, परिचारीका, असे पेसा आणि नॉन पेसा मिळून ४७४ जागा, तसेच कंत्राटी ग्रामसेवकांची १६१ जागांची पदभरती होणार आहे. यात ग्रामसेवकांसाठी ३२ हजार ३०६ तसेच आरोग्य सेवक पुरूष, महिला, परिचारीका, असे मिळून २२ हजार ४१, असे सर्व मिळून ५४ हजार ३४७ उमेदवारांनी अर्ज दाखल केला. आता नॉन पेसा क्षेत्रातील जागांची भरती होणार असल्यामुळे उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
गेले अनेक महिने अडकलेल्या जिल्हा परिषद कर्मचारी भरतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्यसेवक यांची लेखी परीक्षा १० जूननंतर होणार असल्याचे प्रशासनाला सांगण्यात आले आहे. कंत्राटी ग्रामसेवकाच्या १८५ जागेसाठी तब्बल ४१ हजार १४५ अर्ज दाखल झाले आहेत.
जिल्हा परिषद वर्ग ३ व ४ची भरती प्रक्रिया सहा महिन्यांपूर्वी सुरू झाली. यामध्ये विविध संवर्गाच्या ७०० जागा रिक्त होत्या. त्यासाठी भरती प्रक्रिया होती. यापैकी अनेक जागांसाठी लेखी परीक्षाही घेण्यात आली होती; मात्र मध्यंतरी यातील काही संवर्गातील पदासाठी भरतीवर आक्षेप घेत काही उमेदवार न्यायालयात गेले होते. विशेषत: ग्रामसेवक या पदासाठी न्यायालयात गेले होते. हा विषय न्यायालयाने निकाली काढत भरती करण्याचे आदेश दिले; परंतु त्याच दरम्यान लोकसभा निवडणूक आल्याने ही प्रक्रिया अडकली. निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर आता ही प्रक्रिया होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या गट क संवर्गाच्या १८ पदांच्या ७१५ जागांसाठी ७० हजार ६०८ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यात ग्रामसेवक पदासाठी सर्वाधिक अर्ज म्हणजे तब्बल ४१ हजार अर्ज दाखल झाले होते. ३ ऑक्टोबरपासून परीक्षा सुरू झाली होती. फक्त ग्रामसेवक पदासाठी अजूनही परीक्षा निश्चित झालेली नाही. जिल्हा परिषदेच्या नोकर भरतीसाठी मुदतीअखेर ७० हजार ६०८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. आरोग्यसेवक दोन पदांसाठी ६४ अर्ज आले आहेत.
आरोग्य परिचारिकांच्या भरतीसाठी २२७ जागांसाठी ९३२ अर्ज आले आहेत तर आरोग्यसेवक २२ जागांसाठी ४ हजार ८१५ अर्ज प्राप्त झाले आहेत. आरोग्यसेवक पुरुष हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी यांच्या ५२ जागांसाठी १ हजार ५० अर्ज आले होते. औषधनिर्माण अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी ३७ जागांसाठी ४ हजार १९९ अर्ज प्राप्त झाले होते तर विस्तार अधिकारी सांख्यिकी ३ जागांसाठी ५६४ अर्ज, विस्तार अधिकारी कृषी ४ जागांसाठी ८११ अर्ज आले आहेत. वरिष्ठ सहाय्यक लिपिक १ जागेसाठी २९९ अर्ज आले होते. पशुधन पर्यवेक्षक ४२ जागांसाठी १ हजार २८६ अर्ज प्राप्त झाले आहेत. कनिष्ठ आरेखक २ जागांसाठी ६१ अर्ज आले आहेत. राज्यातील भरतीसंदर्भात आमदार रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या भरतीसाठी घेण्यात येणारे शुल्क कमी करण्याची मागणी त्यांनी केली होती. एकट्या रत्नागिरी जिल्हा परिषदेकडे भरती प्रक्रियेसाठी तब्बल ६ कोटी रुपये आले आहेत.
Gramsevak Recruitment 2024 Update
परीक्षेसंदर्भात जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार हंगामी आणि कायमस्वरूपी पुरुष आरोग्यसेवक पदासाठी घेण्यात येणारी परीक्षा १० जून ते १५ जूनदरम्यान होईल. ग्रामसेवक या पदासाठी १६ ते २१ जूनदरम्यान परीक्षा घेण्यात येणार आहे.
ग्रामसेवक, आरोग्य सेवकांच्या परीक्षांना जूननंतरचाच मुहूर्त – जिल्हा परिषदेतील ग्रामसेवक, आरोग्य सेवकांच्या परिक्षा पेसा क्षेत्रातील वादामुळे प्रलंबित राहिल्या. आता आचार संहिता लागू झाली असून, पुढील दोन महिन्यापर्यंत परीक्षेबाबत कुठलाही निर्णय होणार नाही. त्यामुळे परिक्षेला आता जून महिन्यानंतरच मुहुर्त मिळणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. ग्रामसेवकांच्या १६१, तर आरोग्याच्या ४७४ जागांची भरती होणार असून, दोन्ही मिळून ५६ हजार ७६४, उमेदवारांची जीव टांगणीला लागला आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
महाराष्ट्र ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न साठी येथे क्लिक करा आणि ग्राम सेवक भरतीचे मागील वर्षीचे पेपर्स डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
मागील लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर जिल्हा परिषद पद भरती होणार होती. मात्र, वेगवेगळ्या प्रकारचे कारण देवून पद भरती शेवटी रद्द करावी लागली. मध्यंतरी राज्य सरकारने जिल्हा परिषदेची पद भरतीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार यवतमाळ जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील ८७५ पदे भरण्यास मान्यता देण्यात आली होती. तर परिक्षेची जबाबदारी आयपीबीपीएस कंपनीला दिली होती. या जाहिरातीनंतर उमेदवारांकडून पाठपुरावा एकूण ८८ हजार ७५३ उमेदवारांनी प्रत्यक्षात अर्ज दाखल केले होते. त्यानुसार पेसा क्षेत्रातील जागा असलेल्या पदांची भरतीला स्थगिती आली. तर उर्वरीत पदांची परिक्षा जवळपास आटोपल्या होत्या. यात ९ संवर्गातील पदाचा निकाल लागला असून, त्यातील २२ वेगवेगळ्या संवर्गातील उमेदवारांची नियुक्ती सुद्धा झाली आहे.
पेसा क्षेत्रातील जागांबाबतचा तिढा सुटल्याची माहिती समोर आली आहे. असे असताना परिक्षेची तारीख जाहिर करावी, अशी मागणी उमेदवारांकडून केल्या जात होती. सातत्याने महाराष्ट्रातील उमेदवारांनी मंत्रालयासह मंत्र्यांशी सुद्धा संपर्क साधून परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्याबाबत विनंती केली, परंतू शासनस्तरावरून ह्यावर शिक्कामोर्तब होवूच शकला नाही.
जिल्हयात ग्रामसेवकांची ५१ पदे अनेक वर्षांपासून रिक्त – जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा ७६४ कारभार सांभाळण्यासाठी ४२५ ग्रामसेवकांची नेमणूक केली आहे. ४७६ ग्रामसेवकांची पदे मंजूर असताना अनेक वर्षापासून ५१ पदे रिक्त आहेत. ग्रामसेवकांच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी येथील पंचायत समिती कार्यालयात एक विस्तार अधिकाऱ्यांसह गटविकास अधिकारी कार्यरत आहेत. असे असतानाही मुख्यालयाचे वावडे, जिल्ह्याच्या ठिकाणावरून अप-डाऊन करीत कारभार पाहणारी ग्रामसेवक यंत्रणा कमालीची ढिसाळ झाली आहे. सरासरी दोन ते तीन गावांचा कारभार पाहण्यासाठी कार्यरत ग्रामसेवकाला गावभेटीचे दिवस निश्चित करून दिले असतानाही ग्रामसेवक संबंधित गावांमध्ये जात नसल्याची ओरड ग्रामस्थांमधून होत आहे. जिल्ह्यातून कारभार पाहणारी ग्रामसेवक मंडळी गावात येत नसल्याच्या असंख्य तक्रारी पंचायत समिती पातळीवर वाढल्या आहेत.
काही ग्रामसेवक केवळ पंचायत समितीच्या मासिक बैठकीलाच हजेरी लावतात व पुन्हा मासिक बैठकीच्या निमित्ताने वेळ मिळाला तर नेमून दिलेल्या गावात भेट देतात. सातत्याने गैरहजर राहणाऱ्या ग्रामसेवकांचे प्रमाण जिल्ह्यात वाढले आहे. ग्रामसेवक सर्रासपणे कोणतीही रजा न देता प्रदीर्घ काळ गैरहजर राहतात. या सर्वांचा त्रास सर्वसामान्य ग्रामस्थांना सोसावा लागत आहे. वारंवार दांडी मारणाऱ्या व कायम गैरहजर राहणाऱ्या ग्रामसेवकांना पाठबळ मिळत आहे. गैरहजर ग्रामसेवकांचे वेतनही पंचायत समिती स्तरावरून विना अडथळा काढले जाते. ग्रामपंचायत स्तरावरील सरपंच यंत्रणा ग्रामसेवकांच्या अनधिकृत गैरहजेरीला पाठबळ देऊन आपले हित जोपासण्यात धन्यता मानत आहे.
वर्षातून सहा सभा घेणे बंधनकारक वर्षातून किमान सहा ग्रामसभा घेणे ग्रामपंचायतीला बंधनकारक असून, त्यापेक्षा अधिक ग्रामसभाही घेतल्या जातात. मात्र, प्रत्यक्षात ग्रामस्थांना याची पुसटशी कल्पनाही दिली जात नाही. २६ जानेवारी, १ मे, १५ ऑगस्ट, २ ऑक्टोबर या दिवशी ग्रामसभा घेणे बंधनकारक असतानाही घेतल्या जात नाहीत.
राज्यातील ग्रामसेवक, आरोग्यसेवक पदांच्या हजारो जागांसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला. अद्यापही परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे लाखो विद्यार्थी परीक्षेची वाट पाहत आहेत. परीक्षा घ्यावी, अशी मागणी शासनाकडे करीत आहेत.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. त्याआधी ग्रामसेवक, आरोग्यसेवक भरती परीक्षा घेऊन करण्याची मागणी होत आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाने वर्षभरामध्ये ७५ हजार शासकीय नोकऱ्यांची घोषणा केली होती. त्यानुसार काही विभागांत पदभरती राबविण्यात आली. त्यानुसारच भरती प्रक्रिया सुरू आहे. अर्ज भरुन तीन महिने लोटले आहेत. पण, परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आली नाही. त्यामुळे लवकरात परीक्षा घेण्याची गरज आहे.
राज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागात कंत्राटी आरोग्यसेवक, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका आदी पदांची जाहिरात काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध करण्यात झाली होती. त्यासाठी राज्यभरातून लाखो उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत, ते विद्यार्थी परीक्षेची वाट पाहत आहेत. मात्र, शासन याकडे दुर्लक्ष करत आहे.
राज्यातील ग्रामसेवक, आरोग्य सेवक पदांच्या हजारो जागांसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला. अद्यापही परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे लाखो उमेदवार परीक्षेची वाट पाहत आहेत. तातडीने परीक्षा घ्यावी, अशी मागणी शासनाकडे करत आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. त्याआधी ग्रामसेवक, आरोग्य सेवक भरती परीक्षा घेऊन करण्याची मागणी होत आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाने वर्षभरामध्ये 75 हजार शासकीय नोकर्यांची घोषणा केली होती. त्यानुसार काही विभागांत पदभरती राबविण्यात आली. त्यानुसारच भरती प्रक्रिया सुरूच आहे. अर्ज भरून तीन महिने लोटले आहेत. पण, परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आली नाही.
Gram Sevak Bharti 2024 : 41 thousand 145 candidates have applied for 185 Maharashtra Gram Sevak posts. 64 applications have been received for two posts of health care workers. 932 applications have been received for the recruitment of 227 posts of health nurses and 4 thousand 815 applications for 22 posts of health workers. 1 thousand 50 applications have been received for 52 posts of Health Caregiver Male Seasonal Spraying Field Staff. 4 thousand 199 applications have been received for the recruitment of Drug Manufacturing Officers for 37 posts, while 564 applications have been received for 3 posts of Extension Officer Statistics, 811 applications for 4 posts of Extension Officer Agriculture. 299 applications have been received for Senior Assistant Clerk 1 post. 1 thousand 286 applications have been received for Livestock Supervisor 42 posts. Gram Sevak Bharti 2023 Exam Date is yet To Announced. Very Soon you will get Gram Sevak Bharti 2023 Time Table. Keep Following this Page
जिल्हा परिषदेतील गट क मधील ७१५ जागांसाठी ७० हजार ६०८ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यात ग्रामसेवक पदासाठी सर्वाधिक ४१ हजार अर्ज आले आहेत. ग्रामसेवक पदासाठी अजूनही परीक्षा निश्चित झालेली नाही; मात्र उर्वरित पदांसाठीच्या परीक्षा ३ ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत.
१८५ जागा असून यासाठी ४१ हजार १४५ उमेदवारांनी अर्ज
ग्रामसेवकपदाच्या १८५ जागा असून यासाठी ४१ हजार १४५ उमेदवारांनी अर्ज दाखल झाले आहेत. आरोग्यसेवक दोन पदांसाठी ६४ अर्ज आले आहेत. आरोग्य परिचारिक पदाच्या २२७ जागांच्या भरतीसाठी ९३२ अर्ज तर आरोग्यसेवकपदाच्या २२ जागांसाठी ४ हजार ८१५ अर्ज प्राप्त झाले आहेत. आरोग्यसेवक पुरुष हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी यांच्या ५२ जागांसाठी १ हजार ५० अर्ज आले आहेत. औषध निर्माण अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी ३७ जागांसाठी ४ हजार १९९ अर्ज प्राप्त झाले आहेत तर विस्तार अधिकारी सांख्यिकी ३ जागांसाठी ५६४ अर्ज, विस्तार अधिकारी कृषी ४ जागांसाठी ८११ अर्ज आले आहेत. वरिष्ठ सहाय्यक लिपिक १ जागेसाठी २९९ अर्ज आले आहेत. पशुधन पर्यवेक्षक ४२ जागांसाठी १ हजार २८६ अर्ज प्राप्त झाले आहेत.
कनिष्ठ आरेखक २ जागांसाठी ६१ अर्ज आले आहेत. वरिष्ठ सहाय्यक लिपिक ६८ जागांसाठी ११ हजरी ४१ अर्ज तर पर्यवेक्षिका ९ जागांसाठी १ हजार ५४८ अर्ज प्राप्त झाले आहेत. कनिष्ठ अभियंता स्थापत्य बांधकाम ग्रामीण पाणीपुरवठा ३१ जागांसाठी १ हजार ५५७ अर्ज आले आहेत. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक २२ जागांसाठी ७४४ अर्ज आले आहेत. लघुलेखक उच्चश्रेणी १ जागेसाठी ११७ अर्ज दाखल झाले आहेत. ग्रामसेवक पद सोडून इतर पदांसाठी ३ ते ११ ऑक्टोबर २०२३ या दरम्यान परीक्षा होणार आहे.
३ ऑक्टोबरपासून परीक्षा…
ग्रामसेवक पदासाठी अर्ज जास्त असल्यामुळे या परीक्षेची तारीख अजूनही निश्चित केलेली नाही. ३ ऑक्टोबरला कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता, ५ ऑक्टोबरला पशुधन पर्यवेक्षक, ७ ऑक्टोबरला वरिष्ठ सहाय्यक, ८ ला विस्तार अधिकारी (सांख्यिकी), १० ला विस्तार अधिकारी कृषी, आरोग्य पर्यवेक्षक, ११ ला लघु लेखक, कनिष्ठ सहाय्यक लेखा अशी परीक्षा असणार आहे.
Maharashtra Gram Sevak Recruitment 2024
Gram Sevak Bharti 2023: – Recruitment of 1658 posts of gram sevak posts has started under zilla parishad recruitment. Applications for a total of 1658 vacancies of this cadre have started from August 05, 2023. The last date to apply is August 25, 2023 for Gram Sevak Bharti 2023. Interested and eligible candidates should apply online at this link https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ till 23.59 pm on 25/08/2023 For Gram Sevak Bharti 2023 . Details of vacancies in connection with the above advertisement, educational qualification required for the posts, pay scale, age limit, examination fee, method of applying online, application deadline and other necessary conditions and conditions etc. are available below and in the pdf given.
जिल्हा परिषद भरतीअंतर्गत ग्रामसेवक पदाच्या १६५८ पदांची भरती सुरु झाली आहे. या संवर्गाच्या एकूण १६५८ रिक्त पदांकरिता अर्ज दिनांक ०५ ऑगस्ट २०२३ पासून सुरु झाले आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२३ आहे. तसेच इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या लिंकवर दिनांक २५/०८/२०२३ रोजीचे रात्री २३.५९ वाजेपर्यंत Online पद्धतीने अर्ज करावा. उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशिल, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी खाली आणि दिलेल्या PDF मध्ये उपलब्ध आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
महाराष्ट्र ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न साठी येथे क्लिक करा आणि ग्राम सेवक भरतीचे मागील वर्षीचे पेपर्स डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
- पद संख्या – १६५८ Posts
- शैक्षणिक पात्रता – पदानुसार आहे (कृपया मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – महाराष्ट्रात
- वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे (राखीव उमेदवारणी PDF पहावी)
- अर्ज पद्धती –ऑनलाईन अर्ज IBPS द्वारे
- अर्ज सुरु होण्याची तारीख – ५ ऑगस्ट २०२३
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –२५ ऑगस्ट २०२३.
- परीक्षा शुल्क – खुला वर्ग रु. ३७१/- – राखीव वर्ग : ९००/-
- वेतन मान / Gramsevak Salary in Maharashtra : प्रथम 3 वर्ष 16,000/- मानधन नंतर शासकीय नियमानुसार 35400-112400 /-
ग्रामसेवक पदासाठी पात्रता : Gramsevak Eligibility Criteria For Gram Sevak Bharti 2024
- किमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (HSC) किंवा तुल्य अर्हता परीक्षेत किमान 60 % गुणांसह उत्तीर्ण
- किंवा शासन मान्य संस्थेची अभियंत्रिकी पदविका (तीन वर्षाचा अभ्यासक्रम) (Engineering Diploma)
- किंवा प्रशासन मान्य संस्थेची समाजकल्याणची पदवी (BSW)
- किंवा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (SSC) किंवा तुल्य अर्हता आणि कृषि पदविका दोन वर्षाचा अभ्यासक्रम (Agri Diploma)
- किंवा कृषि विषयाची पदवी (Agri Degree)
- किंवा उच्च अर्हता धारण करणाऱ्या किंवा समाजसेवेचा अनुभव आणि ग्रामीण अनुभव असलेले उमेदवारांना अधिक पसंती.
- संगणक हाताळणी वापराबाबत माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेली परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील. (MSCIT Or Related)
ग्रामसेवक भरतीसाठी वयाची गट | Gramsevak Bharti 2023 Age Limit
ग्रामसेवक पदाला किती पगार असतो | Gramsevak Salary In Marathi
ग्रामसेवक रिक्त जागा व जाहिरात : Gramsevak Total Vacancies
जिल्हा / District | रिक्त जागा |
---|---|
अमरावती / Amravati | 67 |
सिंधुदुर्ग / Sindhudurg | 45 |
अहमदनगर / Ahmednagar | 52 |
उस्मानाबाद / (धाराशिव) / Osmanabad | 33 |
वाशीम / Washim | 16 |
नंदुरबार / Nandurbar | 1 |
रत्नागिरी / Ratnagiri | 185 |
जळगाव / Jalgaon | 74 |
सांगली / Sangli | 52 |
हिंगोली / Hingoli | 10 |
नांदेड / Nanded | 83 |
नाशिक / Nashik | 50 |
गोंदिया / Gondia | 9 |
बुलढाणा / Buldhana | 36 |
धुळे / Dhule | 05 |
पुणे / Pune | 37 |
अकोला / Akola | 26 |
ठाणे / Thane | 18 |
नागपूर / Nagpur | 26 |
रायगड / Raigad | 75 |
पालघर / Palghar | 5 |
परभणी / Parbhani | 33 |
कोल्हापूर / Kolhapur | 57 |
छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद / Aurangabad) | 15 |
वर्धा / Wardha | 43 |
लातूर / Latur | 04 |
सोलापूर / Solapur | 74 |
सातारा / Satara | 101 |
चंद्रपूर / Chandrapur | 64 |
बीड / Beed | 74 |
जालना / Jalna | 50 |
भंडारा / Bhandara | 33 |
गडचिरोली / Gadchiroli | 44 |
यवतमाळ / Yavatmal | 161 |
इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या लिंकवर दिनांक २५/०८/२०२३ रोजीचे रात्री २३.५९ वाजेपर्यंत Online पद्धतीने अर्ज करावा. उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशिल, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी खाली आणि दिलेल्या PDF मध्ये उपलब्ध आहे. तसेच या नवीन जिल्हा परिषद भरतीचे सविस्तर अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा तसेच ZP सराव पेपर साठी येथे क्लीक करा.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
Gram Sevak Bharti 2023 – Development of rural areas, implementation of government schemes in villages is done through Gram Panchayats. The administrative affairs of these Gram Panchayats are handled through Gram Vikas Adhikari and Gram Sevaks. Gram Sevak Bharti 2023 Since 200 posts of Village Development Officer and Village Sevak are vacant in Raigad district, it is adversely affecting the rural development and the development of the rural areas is stunted. Many village development officers and gram sevaks have to manage two gram panchayats. Due to this, they are under pressure.
ग्रामीण भागाचा विकास, गावागावात शासकीय योजनांची अंमलबजावणी ग्रामपंचायतींच्या माध्यमातून करण्यात येते. या ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांच्या माध्यमातून हाकण्यात येतो. रायगड जिल्ह्यात ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांची २०० पदे रिक्त असल्याने त्याचा विपरीत परिणाम ग्रामीण विकासावर होत असून ग्रामीण भागाचा विकास खुंटला आहे. अनेक ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांना दोन दोन ग्रामपंचायतींचा कारभार हाकावा लागत आहे. यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण पडत आहे.
रायगड जिल्ह्यात ८१० ग्रामपंचायती असून दोन हजारपेक्षा जास्त गावे,
वाड्यांचा समावेश आहे. २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यातील लोकसंख्या सुमारे १६ लाख ६४ हजार इतकी आहे. मात्र जिल्ह्यातील गावांमध्ये वेगवेगळे लहान मोठे उद्योगधंदे सुरू झाल्याने गावांचा विस्तारदेखील झपाट्याने वाढू लागला आहे. गावांमध्ये नागरीकरण प्रचंड वाढू लागले आहे. त्यामुळे गावांतील लोकसंख्यादेखील सध्या २० लाखांपेक्षा अधिक असल्याचे चित्र आहे.
रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू
जिल्ह्यात मंजूर पदांपैकी २०० पदे ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची आहेत. अलिबाग, खालापूर, पनवेल, पेण या तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये पदे भरली आहेत. परंतु महाड, श्रीवर्धन तालुक्यात पदे कमी असल्याने अतिरिक्त भार ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर आहे. रिक्त पदे भरण्याची शासनाची प्रक्रिया सुरू असून पुढील काळात भरती होण्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी व्यक्त केली आहे. साडेसहाशे ग्रामसेवकांवर जिल्ह्याचा भार जिल्ह्यात ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांची एकूण ६५९ पदे मंजूर आहेत. त्यापैकी २०० पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे कार्यरत ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांना दोन दोन ग्रामपंचायतींचा कारभार सोपवला जात आहे. यामुळे ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांना गावांच्या विकासासाठी पूर्ण वेळ देता येत नाही. पूर्ण वेळ ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक नसल्याने शासनाच्या योजनांची अंमलबजावणी मुदतीमध्ये पूर्ण होण्यास अडथळे निर्माण होत आहेत. प्रशासकीय कामकाजासह वेगवेगळ्या योजना राबवताना या ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रिक्त पदांमुळे गावांच्या विकासावर त्याचा परिणाम होत आहे.
Good news for candidates who are waiting for Gram Sevak Recruitment. Also the Gram Sevak Bharti Starting Date 2023 will be available soon. The Zilla Parishad will be recruiting for around 13 thousand posts under the Rural Development Department. A government decision has been announced in this regard. For more details about Gram Sevak Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-
Gram Sevak Bharti 2024 Form Date
Maharashtra gramsevak bharti 2023 registration process and online Application form starting date of Gram Sevak Bharti will be available soon, Within next week we will given you a new update about this recruitment process. The registration process & details will be updated soon. The respective update with vacancies updates will be available on MahaBharti.in so keep visiting us.
गेली अनेक महिने ग्रामसेवक भरतीची वाट पाहणाऱ्या (Gramsevak Bharti 2023 Details ) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्हा परिषदेतर्फे ग्रामविकास विभाग अंतर्गत तब्बल 13 हजार पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासंदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. प्रत्येक गावात ग्रामसेवक हा महत्वाची जबाबदारी संभाळत असतो. सरकारी नोकरीसोबतच गावाची सेवा करण्याची संधी या पदावरील व्यक्तीला मिळते. या भरतीच्या परीक्षा आणि सिल्याबसच्या माहितीसाठी येथे क्लिक करा
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
Gram Vikas Vibhag Bharti 2023
Gramsevak Marathwada Bharti 2024 | Required Computer Knowledge For Gramsevak
206+ Gram Sevak Recruitment in Marathwada. And Livestock Supervisor 204+ post advertisement will be coming all over Maharashtra. Computer skill required while applying.
Gram Sevak Bharti in April 2023 Starting Date
ग्रामविकास विभागातील कामकाजाला चालना मिळावी यासाठी १३,४०० पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. एप्रिलपर्यंत ही पदे भरली जातील, अशी माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी विधानसभेत दिली. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील हंगरगाव दापका या दोन गावांच्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकाकडून भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी ग्रामसेवकावर निलंबनाच्या कारवाईनंतर जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटनेने आंदोलन केले होते. त्यावर नांदेड जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आंदोलन करणाऱ्या ४० ग्रामसेवकांचे निलंबन केले होते. राजेश पवार यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.
मोठी बातमी!! राज्यात 13 हजार ग्रामसेवक पदांची मेगा भरती होणार; जाणून घ्या तारखा
मंत्री श्री.महाजन म्हणाले की, ग्रामविकास विभागातील पदे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून याबाबत वेळापत्रक ठरवून कार्यवाही सुरू आहे. एप्रिल महिन्यात सर्व उमेदवारांची निवड करून ही पदे भरली जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. नांदेड जिल्ह्यातील 40 ग्रामसेवकांच्या निलंबनाच्या निर्णयाबाबत चौकशी केली जात असून याबाबतचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शैक्षणिक पात्रता (Gramsevak Bharti 2023)
- तुम्हाला ग्रामसेवक व्हायचं असेल तर कमीत कमी बारावी पास असणे आवश्यक आहे आणि बारावी मध्ये तुम्हाला कमीत कमी 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे आणि जर बारावी मध्ये 60% गुण नसतील,
- तर कृषी क्षेत्रातील विषयामध्ये पदविका किंवा पदवी धारण केलीली असावी, पदवी कोणत्याही क्षेत्रातील असेल तर अर्ज करू शकता,
- जसे की बीए, बीकॉम, बीएससी किंवा इतर कोणतीहि 3 वर्षाची किंवा 4 वर्षाची पदवी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.
- वरील पात्रतेत तुम्ही बसत असाल तर तुम्ही ग्रामसेवक भरतीसाठी पात्र आहात.पदवी धारण केलेल्या उमेदवारास कोणत्याही टक्केवारीची अट नाही.
वयोमर्यादा (Age Criteria For Gram Sevak Bharti 2023)
- ग्रामसेवक भरतीसाठी सुद्धा शासनाने ठरवून दिल्यानुसार वयोमर्यादा आहे. त्यासाठी तुमचं वय कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 38 वर्ष असावे.
- जर इतर संवर्गातून अर्ज करत असाल तर वय 38 वर्षापेक्षा जास्त नसावे आणि जर तुम्ही आरक्षित संवर्गातून अर्ज करत असाल तर शासनाच्या नियमाप्रमाणे तुम्हाला वयोमर्यादेत शिथिलता देण्यात येते.
Gram Sevak Recruitment 2023 – Vacancy Details
- ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सर्व संवर्गाची (वाहनचालक व गट- ड संवर्गातील पदे वगळून) सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त (Gramsevak Bharti) पदांच्या ८०% मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यात येणार आहे.
- सदर मान्यता ही वित्त विभागाच्या निर्देशानुसार दि. १५ ऑगस्ट, २०२३ पर्यंत लागू राहील.
- त्यापुढील भरती प्रक्रिया वित्त विभागाचा शासन निर्णय दि. ३० सप्टेंबर, २०२२ नुसार सुधारित आकृतिबंध शासनाने मान्य केल्यावरच करता येणार आहे.
- जिल्हा परिषदांतील गट-क मधील सर्व संवर्गाची (वाहनचालक व गट-ड संवर्गातील पदे वगळून) रिक्त पदे संवर्गनिहाय आरक्षण नियमानुसार निश्चित करून जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्तरावर जिल्हा निवड मंडळामार्फत परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक देण्यात आले आहे.
परीक्षेची तयारी आणि स्वरूप (Gram Sevak Exam Details)
- ग्रामसेवक भरतीसाठी मागील माहितीनुसार 200 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाते.
- मराठी या विषयाचे (15 प्रश्न)-30 गुण
- इंग्रजी विषयाचे (15 प्रश्न)-30 गुण
- अंकगणित व बुद्धिमत्ता (15 प्रश्न)-30 गुण
- सामान्य ज्ञान (15 प्रश्न)-30 गुण
- कृषी आणि तांत्रिक (40 प्रश्न) – 80 गुण
- याप्रमाणे शंभर प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्नास दोन गुण असतील असे एकूण 200 गुणांची परीक्षा असेल.
- हे 200 गुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला दीडतास कालावधी दिला जातो या दीडतासामध्ये तुम्हाला 200 गुणांचे शंभर प्रश्न सोडवायचे आहेत.
- या परीक्षेमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाही म्हणजे कुठलाही प्रश्न जर चुकला तर त्याचे गुण कापले जाणार नाहीत म्हणजे तुम्ही सगळे प्रश्न सोडवू शकता.
- प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय दिलेले असतात त्यापैकी योग्य तो एक पर्याय तुम्हाला निवडायचा असतो.
Important Dates – Maharashtra Gramsevak Bharti 2023
काही महत्वाच्या तारखा – (Gramsevak Bharti)
- १ ते ७ फेब्रुवारी २०२३ दरम्यान पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.
- त्यानंतर पुढे २२ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येतील.
- २३ फेब्रुवारी ते १ मार्च २०२३ दरम्यान अर्जाची छाननी करण्यात येणार आहे.
- तर २ ते ५ मार्च २०२३ दरम्यान पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे.
- ६ ते १३ एप्रिल २०२३ दरम्यान पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तर १४ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत ऑनलाइन/ऑफलाइन माध्यमातून परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे.
Maharashtra Gramsevak Recruitment 2023
या वेळापत्रकाचे सर्व जिल्हा परिषदांना पालन करावे (Gramsevak Bharti) लागणार आहे. त्याकरिता रिक्त पदे (एकूण रिक्त पदांच्या ८०% मर्यादेपर्यंत), त्यांची आरक्षण निश्चिती, उमेदवारी अर्ज मागविणे, सदर परीक्षेच्या आयोजनासाठी कंपनी निवडणे (आवश्यक असल्यास), परीक्षा घेण्यासंबंधीची सर्व जबाबदारी हीजिल्हा निवड मंडळाची व जिल्हा परिषदेची असेल.
महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाइट www.maharashtra.gov.in वर याचा अधिक तपशील देण्यात आला आहे. त्याचा संकेताक २०२२१११५११२३०३६७२० असा आहे.
Table of Contents
आपलाय कैसे करे
Sir form kadhi sure honar
Sir mi aadhi mahapoartal la gram sevak cha form bharla ahe ti exam kadhi honar
Education criteria for gramsevak bharti
सर ग्रामसेवक भरती ची तारिख किती आहे
Sir mla 53 % aahet 12th mi apply kru shakte ka gram sevak sathi ..??