महानिर्मिती कनिष्ठ अधिकारी (सुरक्षा) भरती कागदपत्रे पडताळणी कधी होणार? जाणून घ्या – MahaNirmiti Exam Date

Mahagecno Jr Officer Security Document Verification Date

MahaNirmiti Exam Date: महानिर्मिती कंपनीमार्फत जाहिरात क्र. ०३/२०२५ अन्वये कनिष्ठ अधिकारी (सुरक्षा) (Jr. Officer (Security)) या पदाची सरळसेवा जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदरील पदाकरीता ऑनलाईन परीक्षेअंती पात्र ठरलेल्या उमेदवारांना १:२० या प्रमाणात शारीरिकक्षमता चाचणीसाठी (PET) आणि मनोविश्लेषण (Psychometric Test) करीता सातारा व बुलढाणा या परीक्षा केंद्रावर बोलविण्यात आले होते. वरील नमूद प्रक्रियेअंती १:२ या प्रमाणात गुणांनुक्रमे पात्र ठरलेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया प्रस्तावित आहे. तथापि, दरम्यानच्या कालावधीत महाराष्ट्र राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमुळे आदर्श आचारसंहिता लागू असल्याने कनिष्ठ अधिकारी (सुरक्षा) (Jr. Officer (Security)) पदाकरीता कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया प्रलंबित आहे. तसेच महाराष्ट्र राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आदर्श आचारसंहिता पूर्णत्वास आल्यानंतर कनिष्ठ अधिकारी (सुरक्षा) (Jr.Officer (Security)) पदाची कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया राबविण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.


MahaGenco Exam Date – उपरोक्त विषयास अनुसरून महानिर्मिती कंपनीमार्फत सरळ सेवा भरती अंतर्गत जाहिरात क्रमांक ०३/२०२५ अन्वये सुरक्षा संवर्गातील कनिष्ठ अधिकारी (सुरक्षा) यांची रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ऑनलाइन परीक्षेअंती शारीरिक क्षमता चाचणीसाठी (Physical Efficiency Test) तात्पुरते पात्र ठरत असलेल्या उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी (Physical Efficiency Test) बाह्यस्त्रोत भरती संस्थेमार्फत दिनांक ०२ ते ०४ सप्टेंबर २०२५ दरम्यान सातारा आणि बुलढाणा केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती. सदरील परीक्षेसाठी तात्पुरते पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या यादीसह सविस्तर सूचना संदर्भीय क्रमांक ०२ अन्वये प्रसिद्ध करण्यात आली होती. तथापि, दिनांक ०१.०९.२०२५ रोजीच्या रात्रीपासून बुलढाणा येथे अचानकपणे सुरू झालेल्या अतिवृष्टीमुळे शारीरिक क्षमता चाचणीसाठीचे मैदान पूर्णतः ओले झाले असल्याने आणि अति पाऊसाची शक्यता पाहता, दिनांक ०२ ते ०४ सप्टेंबर २०२५ रोजी बुलढाणा येथे आयोजित शारीरिक क्षमता चाचणी (Physical Efficiency Test) परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. येणाऱ्या काळात पाऊसाची आणि इतर संलग्नित बाबींची शक्यता पाहून सदरील परीक्षेच्या नवीन तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील. 

 

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

MahaNirmiti Exam Date

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड