Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम – १९५८ – Gram Panchayat Act 1958 in Marathi PDF Download

Gram Panchayat Act 1958 in Marathi PDF Download

Gram Panchayat Act 1958 in Marathi PDF Download – The PDF copy of Gram Panchayat Act 1958 in Marathi is given below for downloading. The candidates looking for this Act PDF Copy can download this copy of document for your reference. This PDF is published by government, so can download the document for free. This Document cover all information about Panchayat Samiti, Zilla Parishad, Gramin Shasan, Gram Panchayat & other details. Gram Panchayat Act 1958 in Marathi PDF Download Link is given for your refrence.

Maharashtra Gram Panchayat Adhiniyam 1958, 1959 Sudharit

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम – १९५८ आणि त्यातील सुधारणा ,  Maharashtra Gram Panchayat Act, 1958 in Marathi pdf  – मित्रांनो आपल्याला माहीतच असेल कि आपल्या भारतात, समाजाचे नियमन करण्यात स्थानिक स्वराज्य संस्था महत्त्वाची भूमिका बजावतात. या संस्थांसोबत, फेडरल सरकार आणि राज्य सरकार देखील सामाजिक नियमनाच्या कामात सहभागी आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांचे ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था असे वर्गीकरण केले जाते. तर मित्रानो, या लेखात ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांबद्दल जाणून घेऊया. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना एकत्रितपणे ‘पंचायती राज्य व्यवस्था’ असे म्हणतात. या संदर्भातील पूर्ण नवीन माहिती आणि यात झालेले विविध बदल आम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहोत.

 

Gram panchayat information in Marathi

ग्रामपंचायत हि संस्था गावाचा कारभार आणि विविध विकास योजना राबवित असेल, याचा उद्देश म्हणजे गावाचा सर्वागीण विकास होय. या स्थानिक संस्थेला ग्रामपंचायत असे म्हणतात. याच समितीला ग्रामसभेची कार्यकारी समिती असे सुद्धा म्हणतात. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने या समितीचा पूर्ण कारभार पाहिला जातो. ग्रामपंचायतीचा कारभार मुबंई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ५ अन्वये चालतो. तसेच मित्रानो, नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तांना असतो. ग्रामपंचायत निर्मितीसाठी कमीत कमी ६०० लोकसंख्या असणे आवश्यक असून डोंगरी भागात हे प्रमाण ३०० आहे. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमीत कमी ७ व जास्तीत जास्त १७ असून ते लोकसंख्येवर निश्चित होते.

Gram Panchayat

Gram Panchayat Sabhasad List

Number of Gram panchayat Sabhasad is depend on the populations of village. The Details about this are given below.

गावाच्या लोकसंख्येच्या आधारावर  ग्रामपंचायतीच्या सभासदची संख्या खालील प्रमाणे ठरवली जाते.

१) 600 ते 1500 – 7 सभासद

२) 1501 ते 3000 – 9 सभासद

३) 3001 ते 4500 – 11 सभासद

४) 4501 ते 6000 – 13 सभासद

५) 6001 ते 7500 – 15 सभासद

६) 7501 त्यापेक्षा जास्त – 17 सभासद

Gram Panchayat Karya

ग्रामपंचायतींची कार्ये: ग्राम पंचायत गावाच्या विकासासाठी विविध कार्य आणि योजना राबविते. या बद्दल संक्षिप्त माहिती खालील प्रमाणे आहे.

 

  • १. कृषी – जमीन सुधारणा, धान्य कोठारांची निर्मिती, कंपोष्ट खात निर्मिती, सुधारित बियाणांचा वापर, सुधारित शेती प्रोत्साहन.
  • २. पशु संवर्धन – पशुधनाची काळजी, संकरीत गुराच्या पैदाशीसाठी प्रयत्न करणे, दुग्धोत्पादन वाढविणे, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करणे.
  • ३. समाजकल्याण – दारूबंदीस प्रोत्साहन, जुगार आणि अस्पृश्यता नष्ट करणे, महिला/बालकल्याणाच्या योजना लाभार्थींपर्यंत पोहोचविणे.
  • ४. शिक्षण – प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षणाची सोय करणे, गावाचा शैक्षणिक विकास.
  • ५. आरोग्य – सार्वजनिक विहीर, गटारे आणि परिसर स्वच्छ राखणे, शासकीय योजना राबविणे, शुद्ध जल पुरवठा.
  • ६. रस्ते बांधणी – रस्ते, पूल, साकव यांची बांधकामे करणे, सार्वजनिक बाग, क्रीडांगणे, सचिवालय बंधने.
  • ७. ग्रामोद्योग आणि सहकार – स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, कार्यकारी संस्था/पतपेढ्या स्थापणे.
  • ८. प्रशासन – महसुलाची कागदपत्रे अद्ययावत करणे, सार्वजनिक मालमत्तेची नोंद ठेवणे, घरांची नोंद ठेवणे, जन्म, मृत्यू आणि विवाहाची नोंद ठेवणे, बक्षिसांची नोंद, अतिक्रमणे हटविणे.

 

PDF डाउनलोड करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. MahaBharti says

    Gram Panchayat Act 1958 in Marathi PDF Download – धन्यवाद !

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड