Government Jobs for Retired Persons – मंत्रालयासह अनेक शासकीय ठिकाणी कंत्राटी भरतीला प्राधान्य देणाऱ्या राज्य सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनाही कंत्राटी पद्धतीने पुन्हा सेवेत घेता येणार आहे. वयाच्या ६५ महाराष्ट्र व्या वर्षांपर्यंत या अधिकाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने काम करता येणार आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाला कर्मचारी आणि अधिकारी संघटनांनी मात्र विरोध केला आहे. अशा अधिकाऱ्यांची निवड करताना मर्जीतल्या अधिकाऱ्यांनाच संधी दिली जाईल, भेदभाव होण्याची शक्यता असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. राज्यातील बहुतांश खात्यातील जागा कायमस्वरूपी न भरता त्या कंत्राटी पद्धतीने भरण्याला राज्य सरकारने प्राधान्य दिले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नव्याने भरतीच झाली शासन नसल्याचे दिसून येते. सध्या राज्यात शासकीय निवृत्तीचे वय ५८ वर्षे आहे. त्यामुळे करार पद्धतीने अशा अधिकाऱ्यांना आणखी सात बर्षे सेवेत राहता येणार आहे. मात्र, जर राज्य सरकार ६५ वर्षापर्यंत करार पद्धतीने कामावरती घेत असेल तर निवृत्तीचे वय ६० वर्षे का करत नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राज्यात सध्या शासकीय कर्मचाऱ्याच्या निवृत्तीचे वय ५८ वर्षे इतके आहे. ते वाढवून ६० वर्षे करण्यात यावे, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. या आधी निवृत्तीचे वय हे ६० वर्षेच होते. पण नंतर ते कमी करून ५८ इतके करण्यात आले. आता निवृत्तीचे वय पुन्हा ६० वर्षे करावे, अशी मागणी कर्मचारी आणि अधिकारी संघटनांनी केली आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















