संभाजी नगर महापालिकामध्ये मधील २२४ पदांची भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार! – Sambhaji Nagar Mahanagarpalika bharti 2026
Sambhaji Nagar Mahanagarpalika Application 2026
Sambhaji Nagar Mahanagarpalika Bharti 2026
निवडणुकीच्यानंतर महापालिकेत नोकरभरतीची तयारी सुरु होणार आहे. पुढील तीन ते चार महिन्यात अत्यावश्यक अशा २२४ पदांवर भरती केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. महापालिकेतील अधिकारी -कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्यामुळे रिक्त पदांची संख्या वाढत आहे. रिक्त पदांवर कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून महापालिकेचा कारभार हाकला जात आहे. रिक्त पदांपैकी अत्यावश्यक पदांवर भरती करण्याची परवानगी महापालिकेने राज्य शासनाकडे मागीतली होती. त्याला हिरवा कंदील मिळाल्यावर पहिल्या टप्प्यात सुमारे १४७ पदांवर भरती करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील २२४ जागांसाठी शासनाने परवानगी दिली. या जागांवर भरती करण्यासाठी सुमारे दीड वर्षांपासून पालिकेचे प्रयत्न सुरु आहेत. पदांचे रोस्टर (बिंदू नामावली) ठरवण्यात बराच कालावधी निघून गेला. रोस्टर निश्चित झाल्यावर पालिकेने नोकरभरतीसाठी आयबीपीएस या शासनमान्य संस्थेची नियुक्ती केली. या संस्थेच्या माध्यमातून परीक्षा घेऊन पात्र उमेदवारांना नोकरी करण्याची संधी देण्याचा निर्णय पालिकेने घेतला. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

त्यानुसार संस्थेशी संपर्क करून पुढील प्रक्रिया ठरवण्यात आली. दरम्यानच्या काळात निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे भरती प्रक्रियेला पुन्हा ब्रेक लागला. आचारसंहिता संपल्यानंतर नोकरभरतीची प्रक्रिया लगेचच सुरू केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार पालिकेच्या आस्थापना विभागाने नोकरभरतीच्या अनुशंगाने जाहिरात तयार करुन ती आयबीपीएस या संस्थेला प्रसिद्ध करण्यासाठी पाठवली आहे. जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात ही जाहिरात संस्थेकडून प्रसिद्ध केली जाईल. जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर इच्छुकांना त्या त्या पदासाठी अर्ज करण्यासाठी एक महिन्याचा अवधी दिला जाणार आहे. या कालावधीत प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करुन लेखी परीक्षेची तयारी करण्यात येणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕महाराष्ट्र पोलीस भरती अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना संधी - BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 594 रिक्त जगांकरिता भरती !!
✅मेगा भरती - बँक ऑफ इंडिया अंतर्गत 914 पदाकरिता भरती; अर्ज ऑनलाईन पद्धतीने करा !!
✅ अर्ज सुरु - लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत 375 पदांकरिता करा ऑनलाईन अर्ज !!
✅रेल्वे मंत्रालय अंतर्गत तब्बल २२००० रिक्त पदांची मोठी भरती; जाणून घ्या संपूर्ण माहिती !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे महापालिकेतील नोकरभरती लटकली आहे. आता निवडणुकीची पार प्रक्रिया पडल्यानंतर नोकरभरतीला मुहूर्त लागेल असे मानले जात आहे. त्यामुळे नोकरभरती पदाधिकारी, नगरसेवकांचा वरचष्मा असेल अशी चर्चा सुरू झाली आहे. महापालिकेतील अधिकारी -कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे पालिकेचा कारभार कंत्राटींच्या भरवशावर सुरू आहे. सुमारे अडीच हजार कंत्राटी कर्मचारी पालिकेत काम करतात. सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये रिक्त झालेल्या पदांवर नोकरभरती करण्याचा प्रस्ताव महापालिकेने शासनाला पाठवला होता. परंतु शासनाने अत्यावश्यक सेवेतील पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली. त्यात पहिल्या टप्प्यात ११४ पदे भरण्यात आली. दुसऱ्या टप्यातील २२४ पदांना देखील शासनाने मान्यता दिली. शासनाची मान्यता मिळाल्यावर महापालिकेने नोकरभरतीची तयारी सुरू केली. पदांची वर्गवारी करुन त्यांची निश्चित बिंदुनामावली करण्यासाठीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवणार आला. सुमारे दीड वर्षानंतर बिंदुनामावली निश्चित करून त्याचा तपशील विभागीय आयुक्त कार्यालयाकडून महापालिकेला पाठवण्यात आला.
बिंदूनामावली निश्चित झाल्यावर महापालिकेने नोकरभरतीसाठी आयबीपीएस या एजन्सीची नियुक्ती केली. या एजन्सीला नोकरभरतीची जाहिरात तयार करण्याची सूचना करण्यात आली. सुमारे महिनाभरापूर्वी पालिकेने त्या एजन्सीला जाहिरात तयार करण्याबद्दल सांगितले होते पण निवडणुकीची लागण्यापूर्वी एजन्सीकडून जाहिरात आचारसंहिता तयार करण्यात आली नाही. आचारसंहिता लागण्यापूर्वी जाहिरात प्रसिध्द करुन लगेचच नोकरभरती करण्याचे पालिका प्रशासनाचे नियोजन यामुळे कोलमडले. महापालिकेच्या निवडणुकीनंतरच नोकरभरती होईल हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नोकरभरतीत पदाधिकारी, नगरसेवकांचा हस्तक्षेप होईल अशी चर्चाही सुरू झाली आहे. २२४ पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची केवळ लेखी परीक्षा घेतली जाणार आहे आणि गुणवत्तेनुसार नियुक्ती दिली जाणार आहे, त्यामुळे नगरसेवक पदाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाला काही अर्थ राहील का असा प्रश्नदेखील विचारला जात आहे.
महापालिकेतील रिक्त विविध १२ प्रवर्गाच्या २२४ पदांच्या बिंदूनामावलीला विभागीय आयुक्तालयाकडून मंजुरी मिळाली असून, मनपा निवडणुकीपूर्वी ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महापालिकेत विविध प्रवर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची सुमारे ५ हजार पदे मंजूर आहेत. मात्र १५-२० कर्मचारी दरमहिन्याला सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे मनपात कायम कर्मचाऱ्यांपेक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असून, रिक्त पदे भरण्यासाठी मनपाने शासनाकडे परवानगी मागितली होती. यासह बिंदूनामावली तयार करून विभागीय आयुक्तांकडे मजुरीसाठी प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला विभागिय आयुक्तांकडून मंजुरी मिळाली आहे.
त्यामुळे महापालिकेकडून भरती प्रक्रियासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे. यात तब्बल २२४ पदे भरण्यात येणार असून, त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्याची तयारी मनपाकडून सुरू झाली आहे. त्यासाठी आयबीपीएस एजन्सीमार्फत भरतीसाठीचे अर्ज मागवण्यासह ऑनलाईन परीक्षा घेणे, पात्र उमेदवारांची यादी जाहीर करणे आदी प्रक्रिया पार पाडल्या जाणार आहेत. तसेच कागदपत्रांची छाननी करून नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत. यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अर्ज मागविण्यासाठी ३ आठवड्यांची मुदत दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.मनपाच्या या भरती प्रक्रियेसाठी आठ ते पंधरा दिवसांत जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, यात उप अग्निशमन अधिकारी पदासाठी ४, अग्निशामक (फायरमन) १०० पदे, अभियंता ३२, कनिष्ठ अभियंता २४, अनुरेखक ९, रोखपाल १२, उद्यान सहाय्यक ६, स्वच्छता निरीक्षक १२ यासह विविध प्रवर्गातील पदे भरली जाणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीपूर्वी प्रशासन रिक्त असलेल्या २८३ पैकी २२७ जागांची भरती प्रक्रिया राबविणार आहे. त्यासाठी प्रशासकीयस्तरावर हालचालींना वेग आला असून १२ पैकी ६ पदांच्या बिंदुनामावलीला विभागीय आयुक्तांनी नुकतीच मंजूरी दिल्यानंतर उर्वरित ६ पदांसाठी येत्या आठवड्यात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने आयबीपीएस या सरकारी एजन्सीकडे प्रस्ताव सादर करुन जाहिरात काढण्याची तयारी सुरू केली आहे. शासनाने महापालिकेसाठी मंजूर केलेल्या आकृतीबंध व सेवा भरती नियमांनुसार मंजूर पदांची संख्या ५२०२ एवढी झाली आहे. त्यापैकी सुमारे २६०० कर्मचारी सध्या कार्यरत असून २६०० हून अधिक पदे रिक्त आहेत.
त्यापैकी गेल्या वर्षी १२४ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यातील ११८ पात्र उमेदवारांच सेवेत रूजू झाले. आता या भरतीतील उर्वरीत जागा आणि नव्याने विविध १२ पदांच्या २८३ जागांसाठी महापालिका निवडणुकीपूर्वी भरती प्रक्रिया राबवण्याची तयारी प्रशासनाने केली. परंतु, यातील लिपीकांच्या वगळण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने २२७ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी प्रथम विविध ६ पदांच्या ५२ जागांचा तर नंतर उर्वरित ६ पदांच्या १७५ पदांचा प्रस्ताव बिंदुनामावली निश्चित करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे सादर केला होता. यातील पहिल्या प्रस्तावाला दोन आठवड्यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे. तर दुसऱ्या प्रस्तावालादेखील येत्या आठ दिवसात मंजुरी मिळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. लिपिकांच्या ५० पदांची अडचण समितीमध्ये ज्या २८ जणांना लिपिकपदी पदोन्नती दिली होती. त्यांना पुन्हा पदावमत करण्यात आले. या सर्वांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे याचिकेचा निकाल लागेपर्यंत या लिपिक पदाची ५० रिक्त जागा या भरती प्रक्रियेतून वगळण्यात येणार आहे.
बिंदुनामावली मंजूर पद व संख्या
▶ रोखपाल-१२, उद्यान सहायक-०९, अनुरेखक-०९, चालक यंत्रचालक-१७, ▶ सहायक सुरक्षा अधिकारी १, उपअग्नशिमन केंद्र -अधिकारी- ४
मंजुरीसाठी पाठवलेली पद व संख्या
▶ कनिष्ठ अभियंता स्थापत्य -३२, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक-२४, स्वच्छता निरीक्षक-१२, अग्निशामक-१००, पशूधन पर्यवेक्षक-७




















Comments are closed.