अग्निशमन दल सरळसेवा भरती नवीन अपडेट!! जाणून घ्या | Fire Department Bharti 2022

Fire Department Bharti 2022

Fire Department Bharti 2022 – Update

Fire Department Bharti 2022 : Recruitment of firefighters on actual operation in Mumbai Fire Brigade has started. Sources said that the written test examination process in the recruitment process was considered as costly without considering the fire administration’s proposal. Further details are as follows:-

मुंबई अग्निशमन दलातील प्रत्यक्ष कार्यवाहीवरील अग्निशामक पदाची भरती सुरु आहे. अग्निशमन प्रशासनाच्या प्रस्तावाची दखल न घेता भरती प्रक्रियेतील लेखी चाचणी परीक्षेची प्रक्रिया खर्चिक बाब असल्याची करणे सांगत वगळण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलातील अग्निशामकच्या रिक्त पदांच्या सरळसेवा भरती प्रक्रियेत लेखी चाचणी परीक्षेसह इतर आवश्यक अटी-शतींचा आवर्जून समावेश करण्यात यावा, अशी मागणी करतानाच भरतीप्रक्रिया कोणत्याही एजन्सीकडे देण्यात येऊ नये तर अग्निशमन दल प्रशासनाने ही प्रक्रिया पार पाडावी यावर मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनेने जोर दिला आहे.

Fire Department Recruitment 2022 – Eligibility Criteria 

अग्निशमन दल सरळसेवा भरती करिता आवश्यक पात्रता 

अग्निशामक पदाच्या सरळसेवा भरती प्रक्रियेतील लेखी चाचणी परीक्षा यासाठी होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे हा उमेदवार बारावी पास असावा मात्र यासाठी बारावीची ५० टक्क्यांची शैक्षणिक अट नसावी. उंची मर्यादा १७२ सेमीऐवजी पुरुष १६५ आणि स्त्री १५५ सेमी याप्रमाणे गणवेशधारी पोलीस, मनपा सुरक्षारक्षक खाते इत्यादीप्रमाणे असावी. अग्निशमन दलासाठी आवश्यक असलेल्या ड्रायव्हिंग लायसन्स, एसएफटीसी कोर्स, स्विमिंग इत्यादी सर्व प्रमाणपत्रांना सारखे बोनस गुण असावेत. सर्वात महत्वाचे म्हणजे भरती प्रक्रिया कोणत्याची एजन्सीकडे देण्यात येऊ नये. अग्निशामक दल सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

Fire Department Bharti 2022


Fire Department Recruitment 2022

Fire Department Bharti 2022: Considering the need to increase the capacity of the fire brigade, a major decision has been taken to recruit 100 personnel. The commissioner expressed confidence that the capacity of the department will increase in the coming period. Further details are as follows:-

खुशखबर – अग्निशमन दलात 100 पदभरतीचा मोठा निर्णय!!

अग्निशमन दलाची क्षमता वाढविण्याची गरज लक्षात घेऊन 100 पदभरतीचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. येणाऱ्या काळात विभागाची क्षमता वाढेल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.

शहराचा वाढता विस्तार व लोकसंख्या विचारात घेता वाठोडा परिसरातील आरक्षित जागेवर लवकरच अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार आहे. केंद्रामुळे या भागातील नागरिकांना अग्निशमन सेवा उपलब्ध होणार आहे. अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागातर्फे अग्निशमन सेवा सप्ताहाच्या अनुषंगाने गुरुवारी मनपा मुख्यालयातील हिरवळीवर आयोजित अग्निशमन सेवा दिवस कार्यक्रमात ही माहिती देण्यात आली.

Fire Department Bharti 2022


Fire Department Vacant Posts 2022

Fire Department Bharti 2022 : The city of Pune, which has expanded its boundaries due to newly included villages, needs 73 fire stations. At present, only 14 fire stations are responsible for fire safety in the city, ‘said Prashant Ranapise, Chief Fire Officer, Pune Fire Brigade. At present only 383 employees are working in 14 centers operating in the city and 510 posts are vacant. Further details are as follows:-

पालिकेच्या अग्निशमन दलात लवकरच 900 फायरमनची कायमस्वरूपी भरती होणार आहे. या भरतीसाठी कुठल्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून लेखी परीक्षा, मैदानी चाचणी, मेडिकल टेस्टनंतर मेरिटवर या फायरमनची निवड होणार आहे.

या भरतीसाठी कार्यवाही सुरू असल्याची माहिती प्रमुख अग्निशमन दल हेमंत परब यांनी दिली.

पालिकेच्या अग्निशमन दलात 2600 अधिकारी-कर्मचारी आहेत. आगीसह कोणत्याही दुर्घटनेत मुंबईकरांचा जीव वाचवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करतात. त्यामुळे अग्निशमन दलातील जवानांची रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याची कार्यवाही अग्निशमन दलाच्या पातळीवर सुरू आहे. मे किंवा जून महिन्यात या भरतीबाबत प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होणार आहे. लेखी परीक्षा, मैदानी परीक्षेतील गुणांच्या आधारावर ही भरती होणार असून हेवी ड्रायव्हिंग लायसन्सचे गुणही मिळणार आहेत. ऑगस्ट 2016 नंतर ही भरती होत असल्यामुळे रोजगाराची संधी आणि अग्निशमन दलात नोकरी करून शौर्य गाजवण्याची संधीही उमेदवारांना मिळणार आहे.

सहा महिन्यांचे प्रशिक्षण

  • 900 पदांच्या या भरतीसाठी हजारो अर्ज येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे जाहिरातीनंतर ऑनलाइन करणाऱया उमेदवारांची टाटा कन्सलटन्सीकडून ऑनलाइन लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
  • यामध्ये पात्र ठरणाऱया उमेदवारांमधून मैदानी चाचणीसाठी उमेदवार निवड केले जातील. यानंतर मेडिकल चाचणीत पात्र ठरणाऱया उमेदवारांमधून मेरिटवर अंतिम निवड केली जाईल.
  • भरतीमध्ये 30 टक्के महिलांना आरक्षण असेल. यामध्ये महिला उमेदवार पात्र ठरले नाहीत तर पुरुष गटातून पात्र उमेदवारांची ही भरती केली जाईल.
  • यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना सहा महिन्यांचे ट्रेनिंग दिले जाईल. अग्निशमन दलाच्या मरोळ, वडाळा, बोरिवली प्रशिक्षण केंद्रांवर हे ट्रेनिंग होईल.

Fire Department Bharti 2022

पुणे : ‘नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमुळे हद्द वाढ झालेल्या पुणे शहराला ७३ अग्निशमन केंद्रांची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत केवळ १४ अग्निशमन केंद्रांवर शहराच्या अग्निसुरक्षेची जबाबदारी आहे,’ अशी माहिती पुणे अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी दिली.

Fire Department Recruitment 2022

सध्या शहरात कार्यान्वित असणाऱ्या १४ केंद्रांवर केवळ ३८३ कर्मचारी कार्यरत आहेत आणि ५१० पदे रिक्त आहेत. जवानांची संख्या अपुरी असल्याने त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण येतो. अपुरी केंद्रे आणि मनुष्यबळाची कमतरता, हा अग्निशमन दलासाठी चिंतेचा विषय ठरला आहे.

With the expansion of the city, growing population and industrialization, it is clear that the municipal administration needs to focus on increasing fire services in the near future. Last year 23 villages were included in NMC. So, before that 11 villages have been included. Therefore, Pune Municipal Corporation has become the largest municipal corporation in the state in terms of area. The area of ​​NMC is 516 square kilometers. At the same time, the population of Pune has increased by ten to twelve lakhs. The city needs a fire station within a ten-kilometer radius, and there is a greater need for fire stations in slums and industrial estates. Depending on the area and population of the city, a total of 73 fire stations need to be started, ‘said Prashant Ranapise, Chief Fire Officer, Pune Fire Brigade.

‘नवीन गावांच्या समावेशामुळे येत्या काळात अग्निशमन दलाच्या कामाचा व्याप वाढण्याची शक्यता आहे; मात्र, अग्निशमन दलाची सध्याची यंत्रणा अपुरी पडत असताना, नवीन भार उचलण्यासाठी दलाचे सक्षमीकरण करणे गरजेचे आहे,’ असे मत पुणे अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी व्यक्त केले.


Pune Mahanagarpalika Fire Department Vacant Posts

Fire Department Bharti 2021 : While the population of the city is close to 50 lakhs, 57% of the posts in the fire brigade are vacant, but for the last three and a half years, the proposal for recruitment rules for the fire brigade has been pending with the state government. Further details are as follows:-

शहराची लोकसंख्या ५० लाखाच्या जवळ गेलेली असताना अग्नीशामक दलातील ५७ टक्के पदे रिक्त आहेत, पण गेल्या साडे तीन वर्षापासून अग्निशामक दलाच्या पद भरतीच्या नियमावलीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे साडे प्रलंबित आहे. त्यामुळे महापालिकेवर आता कंत्राटी फायरमन घेण्याची नामुष्की आली आहे. स्थायी समितीने आज (बुधवारी) या प्रस्तावाला मान्यता दिली.

अग्निशामक दलातील अधिकारी व कर्मचारी यांची भरती करण्यासाठी आदर्श सामाईक सेवा प्रवेश नियमावली अग्नीशामक सेवा संचालनालयाने मार्च २०१८ मध्ये तयार केली. ही नियमावली नगरविकास मंत्रालयाकडे मंजुरीसाठी सादर केली होती. पण साडे तीन वर्षे उलटून गेली तरी या नियमावलीला मंजुरी मिळाली नाही. पुण्यातील अग्नीशामक दलात ९१० पदे आहेत, त्यापैकी ५२७ पदे रिक्त आहेत. गेल्या वर्षभरात शहरात सिरम इन्स्टिट्यूट, फॅशन स्ट्रीट येथे मोठ्या आगीच्या घटना घडून गेल्या आहेत. शहराचा विस्तार होत असून लोकसंख्या ५० लाखाच्या जवळ गेली आहे. महापालिकेने मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला तरी त्यास अद्याप मंजुरी दिलेली नाही.

Fire Department Bharti 2021

पुणे महापालिकेचे १३ अग्निशामक केंद्र आहेत, निधन, सेवा निवृत्त, वैद्यकीय रजा या कारणामुळे कर्मचाऱ्यांची संख्या कमी होत आहे. या ठिकाणचा कारभार केवळ ३८३ कर्मचारी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर चालत आहे. अनेकदा कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी केंद्रावर अवघे दोन ते तीन फायरमन कार्यरत असतात. त्यामुळे आग लागताच दुसऱ्या केंद्रावरून अग्निशामक दलाची गाडीही पाठवावी लागते.

राज्य सरकारच्या मान्यतेशिवाय पदभरती होऊ शकणार नसल्याने महापालिकेने कंत्राटी फायरमन भरण्यासाठी वाहन विभागाकडून निविदा मागविली होती. त्यानुसार त्यास मे. इरिटेक इंजिनिअर्स पुणे या कंपनीला ६३ लाख ८० हजार रुपयांचे काम देण्यात आले आहे. यामाध्यामातून १३ केंद्रांसाठी ५० कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार.


Pune Mahanagarpalika Fire Department Vacancy 2021

New Update: Fire Department Bharti 2021 : There are 910 posts in Pune Fire Brigade, out of which 527 posts are vacant. There are 55% vacancies in NMC fire brigade. It has been three and a half years since the Directorate of Fire Services sent a proposal to the Urban Development Department for approval to fill the vacancies. Further details are as follows:-

Fire Department Recruitment 2021

महापालिकेच्या अग्निशमन दलात तब्बल ५५ टक्के जागा रिक्त असून, ही पदे भरण्यासाठी अग्नीशमन सेवा संचालनालयाने भरती नियमावलीला मंजूरी मिळावी यासाठी नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठवून साडे तीन वर्ष झाली आहेत. मात्र, अद्यापही त्यास मंजूरी मिळालेली नाही. त्यामुळे पुणे महापालिकेतील पदभरती रखडली असून, ही नियमावली त्वरीत मंजूर करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

The issue of fire safety has come to the fore after the fire at Nagar District Hospital. Vivek Welankar, President of Sajag Nagarik Manch, has demanded the appointment of the Chief Minister, noting that the fire brigade of the Municipal Corporation, Nagarpalika and Nagar Panchayat should be equipped with manpower so that such incidents do not happen and even if they do occur, there is no loss of life.

अग्नीशामक दलातील अधिकारी व कर्मचारी यांची भरती करण्यासाठी आदर्श सामाईक सेवा प्रवेश नियमावली अग्नीशमन सेवा संचालनालयाने मार्च २०१८ मध्ये तयार केली. ही नियमावली नगरविकास मंत्रालयाकडे मंजुरीसाठी सादर केली होती. पण साडे तीन वर्षे उलटून गेली तरी या नियमावलीला मंजूरी मिळाली नाही. त्यामुळे पुणे महापालिकेच्या अग्नीशामक दलातील भरती रखडली आहे.

पुण्यातील अग्नीशमन दलात ९१० पदे आहेत, त्यापैकी ५२७ पदे रिक्त आहेत. गेल्या वर्षभरात शहरात सिरम इन्स्टिट्यूट , फॅशन स्ट्रीट येथे मोठ्या आगीच्या घटना घडून गेल्या आहेत. शहराचा विस्तार होत असताना लोकसंख्याही वाढत आहे. महापालिकेने मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला तरी त्यास अद्याप मंजूरी दिलेली नाही. निमावलीची मंजूरी प्रलंबित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे.सोर्स : लोकमत


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

18 Comments
  1. Sandesh mogal says

    10 वी पास मला पण कळवा दिनांक

  2. Sandesh mogal says

    10 वी पास ओनलाईन फॉर्म कधी भरायाचे आहे दिनांक आली नाही

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड