Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पुणे अग्निशामक 200 पदांची फायरनमन भरती महिन्याभरात सुरु होणार! | Pune Fire Brigade Bharti 2024

Pune FireMan Bharti 2024

Pune Fire Brigade Bharti 2024

Pune FireMan Bharti 2024 – Of the 562 vacant posts in the bmc’s fire brigade, 200 fireman posts will be filled in the next one month. The recruitment process, which was supposed to be completed till November, was delayed as some cases in the recruitment of women candidates went to court over the issue of reservation and fitness tests could not be conducted during the monsoon. However, the general administration department said that now that the entire process has been completed, the process of filling up the vacant posts will be completed in the next one month.

 

महापालिकेच्या अग्निशमन दलातील रिक्त असलेल्या ५६२ पदांपैकी २०० फायरमन पदे येत्या महिनाभरात भरली जाणार आहेत. महिला उमेदवारांच्या भरतीमध्ये काही प्रकरणे ही आरक्षणाच्या मुद्द्यावरून न्यायालयात गेल्याने व पावसाळ्यात फिटनेस टेस्ट होऊ न शकल्याने नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणारी ही भरती प्रक्रिया लांबली गेली होती. मात्र आता ही संपूर्ण कार्यवाही पूर्ण झाल्याने येत्या महिनाभरात रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने सांगितले. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

तुटपुंज्या मनुष्यबळाअभावी महापालिकेचे आधीच कमी असलेली अग्निशमन दलाची केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यरत राहू शकत नाहीत. ही बाब अग्निशमन दलासह महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्य शासनाला कळविली होती. त्यानुसार तीन वर्षांपूर्वी शासनाने आर.आर.नुसार ही पदे भरण्यास तत्वत: मान्यता दिली व गेल्या वर्षी तसे आदेश दिले. यामध्ये काही पदे पदोन्नतीने तर फायरमनची पदे नव्याने भरण्याचे आदेश दिले. फायरमनची पदे भरताना माजी सैनिक, महिला गट यांमधील रिक्त जागाही नमूद नियमावलीनुसार भरण्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार महापालिकेने ही प्रक्रिया सुरू केली. परंतु, काही महिला उमेदवार भरती प्रक्रियेत न्यायालयात गेल्याने ही भरती प्रक्रिया लांबली होती.

 

न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित महिलांची पुर्नप्रवेश प्रक्रिया पूर्ण करून, फिटनेस टेस्टही पूर्ण झाली आहे. तर माजी सैनिकांच्या भरतीची अडचणही दूर झाली असल्याने या दोन घटनांमुळे रखडलेल्या एकूण २०० फायरमन पदाची भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या महिनाभरात ही भरती पूर्ण होऊन अग्निशमन दलाला नवीन २०० फायरमन मिळतील असा विश्वास सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

 

सध्याचे अग्निशमन दलातील मनुष्यबळ –

मनुष्यबळाअभावी तुटपुंज्या क्षमतेवर सध्या महापालिकेची अग्निशमन दलाची केंद्र कार्यरत आहेत. या केंद्रावर प्रत्येक शिफ्टमध्ये ९ असे तीन शिफ्टमध्ये २७ जणांची आवश्यक आहे. यामध्ये एका शिफ्टमध्ये १ लिडिंग फायरमन, ७ फायरमन व १ चालक यांची आवश्यकता आहे. परंतु, काही अपवाद वगळता सध्या केवळ ३ ते ४ जण एका शिफ्टमध्ये केंद्रात कार्यरत असल्याचे वास्तव आहे.

 

अग्निशमन दलाकडे मंजूर पदे – ९१०
कार्यरत – ३४८

रिक्त – ५६२

अग्निशमन दलाच्या केंद्रांची सद्य:स्थिती काय?
महापालिकेची अग्निशमन दल केंद्र मनुष्यबळाअभावी सध्या तुटपुंज्या क्षमतेवर कार्यरत आहेत. या केंद्रावर प्रत्येक शिफ्टमध्ये ९ असे तीन शिफ्टमध्ये २७ जणांची आवश्यक आहे. यात एका शिफ्टमध्ये १ लीडिंग फायरमन, ७ फायरमन आणि १ चालक यांची आवश्यकता आहे. काही अपवाद वगळता सध्या केवळ ३ ते ४ जण एका शिफ्टमध्ये कार्यरत असल्याचे वास्तव आहे.


Pune Fire Brigade Bharti 2022: The Pune Fire Brigade Recruitment process has started. In the year 2014, the Service Entry Rules were approved. At that time more than 900 seats were increased. For more details about Pune Fire Brigade Recruitment 2022, Fire Brigade Pune Bharti 2022, Pune Fire Brigade Applications 2022, Pune Fire Brigade Vacancy 2022, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-

2014 साली सेवाप्रवेश नियम मान्य करण्यात आला होता. त्यावेळेस 900 हून अधिक जागा वाढवून मिळाल्या होत्या. पण त्यानंतर सेवा प्रवेश नियम मान्य न झाल्याने तो विषय प्रलंबित राहिला होता. पण, आता हे नियम 2 महिन्यांपूर्वी मान्य झाल्याने महापालिका ( Pune Municipality ) अधिकाऱ्यांनी भरती बाबत प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती यावेळी अग्निशमन दलाचे प्रमुख सुनील गिलबिले यांनी दिली.

 

पुणे जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

  • पुणे शहराची आताची लोकसंख्या ही तब्बल 60 लाखांच्या घरात जाऊन पोहोचली आहे.
  • लोकसंख्येच्या तुलनेत शहरात अग्निशमन दलात तब्बल 1 हजार 700 हून अधिक जवानांची गरज आहे.
  • तर, 70 हून अधिक अग्निशमन केंद्राची गरज आहे. असे असताना शहरातील पुणे अग्निशमन दलाची परिस्थिती पाहिली तर, शहरात फक्त 380 जवान हे कार्यरत आहे.
  • तर 14 अग्निशमन केंद्र सध्या कार्यरत आहे.
  • तर 7 नव्याने बांधण्यात आले आहेत.
  • ते पुढील महिन्यात सुरू होणार आहे.
  • एकूणच शहरात केवळ 21 केंद्र, 380 कर्मचारी हे अग्निशमन दलात काम करत आहे.
  • एकूणच शहरात अजूनही 49 केंद्रांची गरज आहे.
  • तर शहरात 1 हजार 320 पदे रिक्त असून गेल्या 10 वर्षापासून अग्निशमन केंद्रात एकही पद भरलेले नाही.
  • शहरात कुठेही काहीही घटना घडली की, अग्निशमन दलातील जवान स्वत:चा जीव धोक्यात घालून अडकलेल्यांची नागरिकांची सुटका करण्यासाठी प्रयत्न करीत असतात.
  • अग्निशमन दलातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे अधिकाऱ्यांसह अग्निशामकांवर प्रचंड ताण येत आहे.
  • त्यामुळे दलामधील रिक्त पदे भरावी अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे.
  • मात्र, गेली दहा वर्ष झाली फक्त आश्वासनांवर आश्वासन दिले जाते आहे.
  • पण प्रत्यक्षात आहे त्याच कर्मचाऱ्यांवर या जवानांना काम करावं लागतं आहे.

खरंचं रिक्त पदे भरली जाणार का? – जरी 2014 नुसार अग्निशमन दलात जी 900 पदे रिक्त होती, ती जरी भरली गेली तरी शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत पाहिजे तेवढी पदे भरली जाणार नाहीये. म्हणूनच आता तरी 2014 सालापासून 900 पदे जी रिक्त पदे आहे ती तरी भरली जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Vishwajeet Kashinath Kadam says

    Bharti la sir kontya test honar?

  2. MahaBharti says

    Pune Fire Brigade Bharti 2024 Apply Now

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड