Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

नवीन अपडेट – नागपूर ‘अग्निशामक’मध्ये ३५० फायरमॅनची भरती | Fire Department Bharti 2024

Fire Department Bharti 2024

Fire Department Bharti 2024 – Latest Update

Fire Department Bharti 2024: A golden job opportunity has started for the people of Nagpur. Mahabharti has been organized under Nagpur Municipal Corporation. Through this recruitment, a total of 350 vacancies are to be filled for the posts of Assistant Forwarding Center Officer, Deputy Forwarding Officer, Driver / Machinist, Fitter Cum Driver, Anishamak Discharger. Nagpur Municipal Corporation has recently released a notification regarding this recruitment. Applications are invited from interested and eligible candidates for these posts. The application has to be done online and the last date of application is 27th December. So let’s know the detailed information about the posts, number of posts, eligibility, salary and application process in this recruitment.

नागपूर महानगरपालिका अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे विविध संवर्गातील ३५० रिक्त पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून २७ डिसेंबर ही त्यासाठीची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याचे सर्व तपशील जाणून घेऊया.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पुणे अग्निशामक 200 पदांची फायरनमन भरती महिन्याभरात सुरु होणार!

Nagpur Fire Brigade Bharti 2023 – अग्निशमन विभागात ३५० 

‘नागपूर महानगरपालिका भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या :
सहायक अग्रिशमन केंद्र अधिकारी – ०७ जागा

उप अग्रिशमन अधिकारी – १३ जागा
चालक / यंत्रचालक – २८ जागा
फिटर कम ड्रायव्हर – ०५ जागा
अग्निशामक विमोचक – २९७ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ३५० जागा


Fire Department Bharti: There are five centers of the fire department in Solapur city. But, now with the expansion of Solapur city, there is a delay in carrying water bombs from those centers to the other end of the city. Therefore, the fire brigade was not at the scene until it reached there. In 2023, eight incidents of fire have occurred in Akkalkot Road MIDC alone in two and a half months. Due to this it is said that, Recruitment of 35 firemen in Solapur ‘Fireman’ will be carried out soon! SO candidates from Solapur city be ready with Your documents to apply for Solapur Fire Department Bharti 2023, Solapur Fireman  Bharti 2023, Solapur Agnishamak Vibhag Bhaarti 2023:

साडेबारा लाखांहून अधिक लोकसंख्या (अंदाजित तीन लाख घरे) असलेल्या स्मार्ट सिटीतील अग्निशामक विभागाचा कारभार आठ गाड्या आणि ३६ कामगारांवर सुरु आहे. त्यामुळे अनेकांना वेळेवर मदत मिळू शकत नसल्याची वस्तुस्थिती आहे. आमदार सुभाष देशमुखांनी त्यावर अधिवेशनात आवाज उठवताच आता त्याच्या सक्षमीकरणाचा विषय महापालिकेने हाती घेतला आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सोलापूर शहरात अग्निशामक विभागाची पाच केंद्रे आहेत. पण, आता सोलापूर शहराचा विस्तार वाढल्याने त्या केंद्रांवरून शहराच्या दुसऱ्या टोकाला पाण्याचे बंब घेऊन जाण्यासाठी विलंब लागतोय. त्यामुळे अग्निशामक विभाग तेथे पोचेपर्यंत घटनास्थळी होत्याचे नव्हते झालेले असते. २०२३ मध्ये अडीच महिन्यांत नुसत्या अक्कलकोट रोड एमआयडीसीत आठ घटना आगीच्या घडल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर आता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी मिळवून दोन गाड्या खरेदी केल्या जाणार आहेत. तसेच मार्चअखेर ३५ फायरमॅनची पदे भरली जाणार आहेत. अक्कलकोट एमआयडीसीतील पाण्याच्या टाकीजवळ अग्निशामक विभागाचे स्वतंत्र केंद्र सुरु केले जाणार आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीत कोठेही आग लागल्यास अवघ्या पाच ते आठ मिनिटात त्याठिकाणी पोचणे शक्य होणार आहे. सध्या १० ते १४ मिनिटे लागतात. पण, त्यानुसार कार्यवाही कधीपर्यंत पूर्ण होणार की आगीच्या घटनांमध्ये आणखी नुकसानच पाहावे लागणार, हे आगामी काळच ठरवेल.

दोन गाड्या वाढतील; एमआयडीसीत एक केंद्र वाढणार

सोलापूर शहरात अग्निशामक विभागाचे पाच सेंटर असून आठ गाड्या आहेत. अग्निशामक विभाग अधिक सक्षम व्हावा, यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून आणखी दोन गाड्या खरेदी केल्या जाणार आहेत. तर एमआयडीसीत आणखी एक केंद्र वाढविण्याचे नियोजन केले आहे.

सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसीत फेब्रुवारी महिन्यात आठ आगीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे जवळपास तीनशेहून अधिक कामगारांचा उदरनिर्वाह बंद पडला आहे. दुसरीकडे कारखानदार तथा उद्योजकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

आग लागल्यानंतर त्यांना तत्काळ मदत मिळणे अपेक्षित असतानाही सोलापूर महापालिकेची अग्निशामक दल तेवढे सक्षम नसल्याने मदत वेळेत मिळाली नाही. त्यासंदर्भात राज्य सरकारने सकारात्मक विचार करून त्या उद्योजकांना मदत मिळावी, अशी मागणी आमदार सुभाष देशमुख यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली. त्यानंतर पालकमंत्री विखे पाटलांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. ४) सोलापुरात बैठक देखील पार पडली. त्यावेळी अग्निशामक दल अधिक सक्षम करण्यासंदर्भात निर्णय झाला आहे.


Agni Vibhag Bharti 2023

Fire Department Bharti 2023: Good news for job seekers!! Mumbai Fire Brigade Recruitment will be conducted soon. As many as 910 vacancies for the post of Firefighter will be recruited and the advertisement for the same will be released soon. Further details are as follows:-

 

गेल्या काही वर्षांपासून रखडलेली मुंबई अग्निशमन दलातील भरती प्रक्रिया आता नवीन वर्षातच सुरू होणार आहे. दहिसर पश्चिमेकडील भावदेवी मैदानात ही भरती प्रक्रिया होणार असून त्याकरिता अग्निशमन दलाने मागवलेल्याला निविदांना कमी प्रतिसाद मिळाल्यामुळे भरती प्रक्रिया रखडली आहे.

????मुंबई अग्निशामक विभागात ९१० पदांची भरती सुरु – Mumbai Fire Department Bharti Advertisement

मुंबई अग्निशमन दलातील अग्निशामक या पदासाठीची भरती प्रक्रिया अखेर बऱ्याच प्रतीक्षेनंतर सुरू झाली आहे. या भरतीसाठीची बहुप्रतिक्षित जाहिरात लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. दहिसर पश्चिमेकडील भावदेवी मैदानात ही भरती प्रक्रिया होणार असून त्याचे चित्रीकरणही केले जाणार आहे.त्याकरिता अग्निशमन दलाने नुकत्याच निविदा मागवल्या होत्या. मात्र त्याला कमी प्रतिसाद मिळाला. त्यामुळे प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे.त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मधल्या काळात मराठा आरक्षणाचा तिढा, टाळेबंदी व करोनामुळे अग्निशमन दलातील रखडलेली भरती प्रक्रिया आता वेगळ्या कारणामुळे रखडली आहे. यापूर्वी २०१७ मध्ये भरती झाली होती तशीच भरती आता होणार आहे. बारावी उत्तीर्ण इच्छुक उमेदवारांची पारंपरिक पद्धतीने शारीरिक तपासणी, वैद्यकीय तपासणी यांचा या प्रक्रियेत समावेश आहे. भरतीसाठी दहिसरच्या मैदानात तयारीसाठी कंत्राटदार निश्चित झाल्यानंतर भरतीची जाहिरात दिली जाईल.

जाहिरात निघाल्यानंतर प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतर उमेदवार निवडीची प्रक्रिया वैद्यकीय चाचणी यासाठी दोन महिने लागतील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने उमेदवारांचे सहा महिन्यांचे प्रशिक्षण अशा प्रक्रिया पार पाडून सगळे सुरळीत झाले तरी उमेदवारांना प्रत्यक्ष रुजू व्हायला एक वर्ष जाईल असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मुंबई अग्निशमन दलात सुमारे तीन हजार अग्निशामक जवान, अधिकारी, वाहनचालक असे मनुष्यबळ आहे. त्यापैकी अडीच हजार अग्निशामक जवान आहेत. मात्र पदोन्नती किंवा निवृत्तीमुळे पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त झाली होती. रिक्त जागांसाठी ही भरती होणार असल्याची माहिती अग्निशमन दल प्रमुख संजय मांजरेकर यांनी दिली.

टाळेबंदीमुळे पोलीस भरतीमध्ये जशी वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवली तशीच सूट या भरतीतही देण्यात येणार असून त्याला नुकतीच प्रशासकीय मंजुरी मिळाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे आता खुल्या गटासाठी वयोमर्यादा २५ ऐवजी २७ वर्षे असेल तर आरक्षित प्रवर्गांसाठी हीच मर्यादा ३० ऐवजी ३२ वर्षे असेल. तसेच सातत्याने रिक्त होणाऱ्या पदासाठी प्रतीक्षा यादी करता येईल का याबाबतही विचार केला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.


 

Fire Department Bharti 2022

Mumbai Fire Brigade Recruitment 2023

  • मराठा आरक्षणाचा तिढा, टाळेबंदी व करोनामुळे मुंबई अग्निशमन दलातील रखडलेली भरती प्रक्रिया आता पूर्ण होण्याची शक्यता आहे.
  • २०१७ मध्ये यापूर्वी भरती झाली होती, तशीच भरती आता होणार आहे.
  • बारावी उत्तीर्ण इच्छुक उमेदवारांची पारंपरिक पद्धतीने शारीरिक तपासणी, वैद्यकीय तपासणींचा या प्रक्रियेत समावेश आहे.
  • मुंबई अग्निशमन दलात सुमारे तीन हजार अग्निशामक जवान, अधिकारी, वाहनचालक असे मनुष्यबळ आहे.
  • त्यापैकी अडीच हजार अग्निशामक जवान आहेत. मात्र पदोन्नती किंवा निवृत्तीमुळे पदे मोठय़ा प्रमाणावर रिक्त झाली आहेत.
  • या जागांसाठी ही भरती होणार असल्याची माहिती अग्निशमन दल प्रमुख संजय मांजरेकर यांनी दिली.
  • दहिसर पश्चिमेकडील भावदेवी मैदानात ही भरती प्रक्रिया होणार असून त्याचे चित्रीकरणही केले जाणार आहे.
  • त्याकरिता अग्निशमन दलाने नुकत्याच निविदा मागवल्या आहेत.

प्रत्यक्ष रुजू होण्यास एक वर्ष..

जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर डिसेंबरअखेपर्यंत प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतर उमेदवार निवडीची प्रक्रिया, वैद्यकीय चाचणी याकरिता दोन महिने लागतील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने उमेदवारांचे प्रशिक्षण अशा प्रक्रिया पार पाडून सगळे सुरळीत झाले तरी उमेदवारांना प्रत्यक्ष रुजू होण्यासाठी एक वर्ष जाईल, असे संजय मांजरेकर यांनी सांगितले.

Mumbai Fire Brigade Recruitment Age Criteria 

वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवली

  • ‘टाळेबंदीमुळे पोलीस भरतीमध्ये जशी वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवली तशीच सवलत या भरतीतही देण्यात येणार असून त्याला नुकतीच प्रशासकीय मंजुरी मिळाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
  • ‘त्यामुळे आता खुल्या गटासाठी वयोमर्यादा २५ ऐवजी २७ वर्षे असेल तर आरक्षणासाठी हीच मर्यादा ३० ऐवजी ३२ वर्षे असेल.
  • ‘तसेच सातत्याने रिक्त होणाऱ्या पदासाठी प्रतीक्षा यादी करता येईल का याबाबतही विचार केला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Fire Department Bharti 2022: The latest update for Mumbai Fire Department Recruitment 2022. As per the latest news, Mumbai Fire Department Firemen Recruitment will be conducted soon. Further details are as follows:-

Mumbai Fire Brigade Bharti 2023

मुंबई अग्निशमन दलातील प्रलंबित असलेली फायरमन भरती प्रक्रिया लवकरच मुंबई अग्निशमन दल आणि मुंबई महापालिकेतर्फे राबविण्यात येणार आहे. यासाठी २०१६ सालच्या प्रक्रियेनुसार कार्यवाही केली जाणार असल्याचे मुंबई अग्निशमन दलाचे म्हणणे आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

अग्निशमन दलात मुंबई अग्निशामक या संवर्गातील अर्हता २०१५ साली नव्याने तयार करण्यात आली. या अर्हतेनुसार २०१६ मध्ये अग्निशामक पदाकरिता ७७४ पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या भरती प्रक्रियेस मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून, आवश्यक तेवढे उमेदवार प्राप्त झाले होते. आता २०१६ च्या भरती प्रक्रियेनुसारच सद्य:स्थितीमध्ये भरती प्रक्रिया राबवायची असून, त्यास मुंबई महापालिका आयुक्तांची मंजुरी प्राप्त झाली आहे. भरती प्रक्रियेचे आयोजन सुरू असून, लवकरच भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, अशी माहिती अग्निशमन दलाकडून मुंबई स्वाभिमानी भारतीय पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष कुराडे यांना पत्राद्वारे देण्यात आली आहे.

Mumbai Fire Department Bharti 2023

Fire Department Bharti 2022


Previous Update –

नवीन अपडेट – अग्निशमन विभागातील 910 पदे लवकरच भरली जाणार | Fire Department Bharti 2022

Fire Department Bharti 2022: good news for job seekers!! there are a total of 910 posts that will be recruited soon in the Fire Department. Considering the stress on the employees due to vacancies, the Municipal Corporation has decided to fill these posts. Further details are as follows:-

आपत्कालीन परिस्थितीचा सामना करणाऱ्या मुंबई अग्निशमन दलात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असून, उपलब्ध जवानांच्या मदतीने अग्निशमन दलाचा गाडा हाकला जात आहे. रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर येणारा ताण लक्षात घेता ही पदे भरण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे मुंबई अग्निशमन विभागातील ९१० पदे लवकरच भरली जाणार आहेत. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • अग्निशमन दलात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची क्षमता ३,५०० असून, ९१० कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे.
  • याशिवाय चालकांची क्षमताही कमी असून, ५६ चालकांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आली आहे.
  • अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याने महापालिकेने अग्निशमन विभागातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला असून, त्याबाबत निविदाही काढण्यात आली आहे.

डिसेंबरपासून ही भरती सुरू होईल. त्यानंतर उमेदवारांची निवड करण्यासाठी दोन महिने लागतील व त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागेल. २०२३ च्या अखेरपर्यंत पूर्ण क्षमतेने अग्निशमन विभागाचे काम सुरळीतपणे चालेल, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.


Previous Update –

अग्निशामक दलात 900 पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा!! भरती प्रक्रियेतील उंचीची मर्यादा वाढली  

Fire Department Bharti 2022: The latest update for Fire Department Recruitment 2022. As per the latest news, the Height limit increased in Fire Department Recruitment Process. The 900 posts will be recruit soon. Further details are as follows:-

मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलामध्ये अग्निशामक जवान म्हणून किमान १७२ सेंटीमीटर उंची असणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे अग्निशमन दलामध्ये नोकरी मिळवण्यासाठी राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या अग्निशमन सेवा संचालनालयामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या युवकांची नोकरीबाबत अडचणी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे युवकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • राज्यभरातील महापालिकेमध्ये अग्निशमन दलामध्ये भरती होताना अग्निशामक जवानाची उंची १६५ सेंटीमीटर असावी, अशी अट आहे.
  • तर सरकारी प्रशिक्षण केंद्रामध्येही १६५ सेंटीमीटरची अट आहे.
  • राज्य सरकारच्या अखत्यारित अग्निशमन सेवा संचालनालयामध्ये अग्निशमक जवान व अधिकारी पदी भरती होण्यासाठी सहा महिन्याचे प्रशिक्षण देण्यात येते.
  • संचालनालयामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या जवानाला भरतीच्या वेळी मुंबई अग्निशमन दलासह अन्या शहरातील अग्निशमन दलामध्ये प्राधान्य देण्यात येते.

मुंबई वगळता राज्यातील अन्य महानगर व शहरातील अग्निशमन दलामध्ये जवानांची भरती करताना १६५ मीटर उंचीची मर्यादा आहे. मुंबई महापालिका अग्निशमन दलामध्ये १७२ सेंटीमीटर उंचीची सक्ती करण्यात आल्याने मुंबई अग्निशमन दलात भरती होताना अडचणी येणार आहेत.


नवीन अपडेट – अग्निशामक दलात 900 पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा!! नोव्हेंबरपासून मेगा भरती – Fire Department Bharti 2022

Fire Department Bharti 2022: Good news for job seekers!! There are a total of 900 Fire Extinguisher posts that will be recruited soon on Municipal Corporation. The recruitment process will start in November 2022. Due to this recruitment, the unemployed will get a job and the candidates will also get a chance to show bravery by working in the fire brigade. Further details are as follows:-

Mumbai Fire Brigade Bharti 2022

पालिकेच्या अग्निशमन दलात तब्बल 900 अग्निशामकांची भरती केली जाणार आहे. ही भरती ‘कायमस्वरूपी’ तत्त्वावर केली जणार असून अग्निशामकांना 30 हजारांपर्यंत पगार मिळणार आहे. नोव्हेंबरपासून ही भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. या भरतीमुळे बेरोजगारांना नोकरीची आणि अग्निशमन दलात नोकरी करून शौर्य गाजवण्याची संधीही उमेवारांना मिळणार आहे. 

 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • मुंबईत आगीसह कोणत्याही प्रकारच्या दुर्घटनेप्रसंगी अग्निशमन दलाचे जवान बचावकार्यासाठी हजर असतात.
  • स्वतःचा जीव धोक्यात घालून ते बचावकार्य करीत असतात.
  • मात्र संपूर्ण अग्निशमन दलातील 3500 पदांपैकी तब्बल 30 टक्के पदे रिक्त आहेत.
  • त्यामुळे उपलब्ध कर्मचारी वर्गावर मोठा ताण येतो.
  • त्यामुळे अग्निशामकांची रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • लेखी परीक्षा, मैदानी परीक्षेतील गुणांच्या आधारावर ही भरती होणार असून हेवी ड्रायव्हिंग लायसन्सचे गुणही मिळणार आहेत.
  • सध्या वाढलेल्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर या भरतीसाठी हजारो अर्ज येण्याची शक्यता आहे.
  • त्यामुळे लेखी परीक्षा, मैदानी चाचणी, शारीरिक क्षमता वैद्यकीय चाचणी केल्यानंतर मेरिटनुसार अग्निशामकांची भरती केली जाणार आहे.
  • भरतीसाठी 800 मीटर धावणे, डमी बॉडी घेऊन पळणे, रोपवर चढणे आदी चाचण्या होणार आहेत.

भरतीमध्ये 30 टक्के महिलांना आरक्षण असेल. यामध्ये महिला उमेदवार पात्र ठरले नाहीत तर पुरुष गटातून पात्र उमेदवारांची ही भरती केली जाईल. यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना सहा महिन्यांचे ट्रेनिंग दिले जाईल. अग्निशमन दलाच्या मरोळ, वडाळा, बोरिवली प्रशिक्षण केंद्रांवर हे ट्रेनिंग होईल.


नवीन अपडेट – अग्निशामक दलात 900हून अधिक पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा!! भरती पुढील महिन्यात – Fire Department Bharti 2022

Fire Department Bharti 2022: There are a total of 902 posts will be recruited next month at Mumbai Fire Department. The Mumbai Fire Brigade will have the largest recruitment ever and the proposal has been approved by the Municipal Commissioner. Mumbai Fire Department Bharti 2022 will be started next month. There are 30% of vacancies are reserved for women in Fire Department. Further details are as follows:-

Maharashtra Fire Department Bharti 2022 

मुंबई अग्निशमन दलामध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी पदभरती होणार असून त्याबाबतच्या प्रस्तावाला महापालिका आयुक्तांची मंजुरी मिळाली आहे. थेट मुलाखतीने ९०२ जणांची मेगाभरती होणार असून पुढील महिन्याभरात प्रत्यक्षात भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पुढील महिन्याभरात प्रत्यक्षात भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.
  • त्यामुळे मुंबई अग्निशमन दलाचे बळ आणखी वाढणार आहे.
  • मुंबई अग्निशमन दलामध्ये ९०२ फायरमनच्या जागा भरण्यात येणार आहेत.
  • सहा महिन्यांपूर्वी अग्निशमन दलाने पाठवलेल्या प्रस्तावाला महापालिका आयुक्तांनी मंजुरी दिली आहे.
  • त्यात ३० टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
  • मागील ५ वर्षांपासून अग्निशमन दलातील भरती प्रक्रिया रखडल्याने कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत होती.

मुंबई अग्निशमन दलात २०१७ मध्ये ७५० कर्मचाऱ्यांची शेवटची भरती झाली होती. त्यानंतर गेल्या पाच वर्षात एकाही कर्मचाऱ्याची नव्याने भरती झाली नाही. अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा बढतीने भरण्यात येत असल्या, तरी कर्मचाऱ्यांच्या शेकडो जागा रिक्त होत्या. त्यामुळे मुंबईतील वाढत्या आगीच्या किंवा इतर आपत्कालीन समस्यांचा सामना करण्यात अनेक अडचणी येत होत्या. कर्मचाऱ्यांचा तुटवडा लक्षात घेता महापालिका आयुक्तांकडे पदभरतीचा प्रस्ताव पाठवला होता. आयुक्तांनी या प्रस्तावास मान्यता दिल्याने मेगाभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. यंदा अग्निशमन दलामध्ये होणारी भरती ही थेट मुलाखतीने होणार आहे. यापूर्वी अग्निशमन दलात भरती प्रक्रियेसाठी टाटा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून केली जात होती. या वेळी मात्र भरती प्रक्रिया लवकर संपवायची असल्याने इतर बाबींना फाटा देऊन अग्निशमन दलाकडूनच शारीरिक चाचणी आणि थेट मुलाखत घेऊन पुढील महिन्यात भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

Fire Department Women Bharti 2022

२७० जागा महिलांसाठी राखीव (Fire Department Women Recruitment 2022)

  • अग्निशमन दलाच्या मेगाभरती मध्ये महिलांसाठी ३० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहे.
  • त्यानुसार एकूण ९०२ जागांपैकी २७० जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत.
  • त्यामुळे महिलांना ही मोठी संधी प्राप्त होणार आहे.
  • सध्या दलात केवळ १०८ महिला कर्मचारी आहेत.
  • त्यात आता २७० महिलांची भर पडणार असल्याने त्यांची संख्या पावणेचारशेच्या पुढे जाणार आहे.

Maharashtra Fire Department Recruitment 2022 

सध्या मुंबईत ३५ अग्निशमन दल केंद्रे आहेत. यापैकी ४ केंद्रे ही मागील पाच वर्षांत उभारण्यात आली आहेत. मुंबई अग्निशमन दलामध्ये नवी केंद्र सुरू करण्यात आली, तरी त्यासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची भरती न केल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांनावरच नव्या केंद्राची देण्यात आली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण आला होता. मुंबईत ३५ अग्निशमन केंद्रांमध्ये साधारणतः २८०० अधिकारी आणि कर्मचारी वर्ग आहे. मुंबई शहराचा आवाका पाहता साधारणतः २५ टक्के कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. दर महिन्याला ३० ते ४० अधिकारी-कर्मचारी निवृत्त होतात. त्यातील अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा बढती प्रक्रियेने भरल्या गेल्या; मात्र फायरमनसारख्या महत्त्वाच्या जागा रिक्त राहिल्याने प्रत्येक केंद्रावर साधारणता २० टक्के कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे.

मुंबई अग्निशमन दलामध्ये सर्वात मोठी भरती प्रक्रिया प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे; मात्र त्यात काही सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत. त्यानुसार आवश्यक ते बदल करण्यात आले असून पुढील महिन्याभरात भरतीचा मार्ग मोकळा होईल.
– हेमंत परब, मुख्य अग्निशमन अधिकारी


Fire Department Bharti 2022

Fire Department Bharti 2022: The way has been cleared to Pune Municipal Corporation Fire Department Recruitment 2022. Currently, there are 55% is 510 out of 903 seats are vacant in Pune Fire Department. Further details are as follows:-

पुणे महापालिकेच्या अग्निशामक दलाचा आकृतिबंध निश्‍चित झालेला असला तरी सेवा प्रवेश नियमावलीला राज्य शासनाकडून मान्यता मिळत नव्हती, अखेर सुमारे चार वर्षानंतर ही नियमावली मंजूर केल्याने या अत्यावश्यक विभागात पदभरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याबाबत नगरविकास विभागाने आदेश काढला आहे. सध्या या विभागातील तब्बल ५५ टक्के म्हणजे ९०३ पैकी ५१० जागा रिक्त आहेत.

Maharashtra Fire Department Bharti 2022 

  • शहरात लागणाऱ्या आगीमुळे पुणेकरांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे. लाखो रुपयांचे नुकसान होऊन व्यावसायिक देशोधडीला लागत आहेत.
  • शहराची हद्द, लोकसंख्या, इमारती वाढत असताना नागरिकांच्या सुरक्षेच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.
  • आगीच्या घटना घडल्यानंतर अग्निशामक दलावरील ताण कमी व्हावा, यासाठी पुरेसे व प्रशिक्षित मनुष्यबळ असणे गरजेचे आहे, पण पालिकेकडील पदे रिक्त असल्याने सध्याच्या मनुष्यबळावर ताण येत आहे.
  • अग्निशामक दलातील अधिकारी व कर्मचारी यांची भरतीसाठी ‘आदर्श सामाईक सेवा प्रवेश नियमावली’ अग्निशमन सेवा संचालनालयाने मार्च २०१८ मध्ये तयार केली, पण गेल्या तीन वर्षांपासून नगरविकास खात्याने त्यास मान्यता दिलेली नव्हती.
  • त्यामुळे पुणे महापालिकेच्या अग्निशामक दलातील भरती रखडली आहे.
  • सध्या अग्निशामक दलामध्ये विविध प्रकारची २८ पदे आहेत.
  • त्यापैकी कार्यदेशक (वाहन), सिनिअर रेडिओ टेक्निशियन, अधिक्षक, उपअधिक्षक आणि शिपाई ही सहा पदे पूर्ण क्षमतेने भरलेली असून, तेथे केवळ सात जणच कार्यरत आहेत.
  • उर्वरित २२ पदांसाठी ९०३ जागा उपलब्ध असल्या तरी तेथे सध्या ३९३ जण काम करत असून, ५१० जागा रिक्त आहेत.

रिक्त असलेली काही प्रमुख पदे 

  • Tandel – 47
  • Fireman – 198
  • Driver – 152
  • Ambulance driver – 37
  • Deputy Fire Officer – 17
  • Assistant Fire Officer – 18

पदोन्नतीलाही गती येणार

सेवा प्रवेश नियमावलीत मुख्य अग्निशामक अधिकारी १०० टक्के पदोन्नतीने पद भरता येणार आहे. तर उपमुख्य अग्निशामक अधिकारी हे पद ५० टक्के पदोन्नतीने, तर विभागीय अग्निशमन अधिकारी , सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी, उपअग्निशमन अधिकारी, यंत्रचालक या पदांपैकी ७५ टक्के पदे पदोन्नतीने भरली जाणार आहेत, तर काही पदे १०० टक्के पदोन्नतीने भरता येणार आहेत. त्यामुळे सध्या कार्यरत असलेले कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून पदोन्नतीसाठी प्रतिक्षेत होते, त्यांनाही न्याय मिळणार आहे.


Fire Department Bharti 2022 – Update

Fire Department Bharti 2022 : Recruitment of firefighters on actual operation in Mumbai Fire Brigade has started. Sources said that the written test examination process in the recruitment process was considered as costly without considering the fire administration’s proposal. Further details are as follows:-

मुंबई अग्निशमन दलातील प्रत्यक्ष कार्यवाहीवरील अग्निशामक पदाची भरती सुरु आहे. अग्निशमन प्रशासनाच्या प्रस्तावाची दखल न घेता भरती प्रक्रियेतील लेखी चाचणी परीक्षेची प्रक्रिया खर्चिक बाब असल्याची करणे सांगत वगळण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलातील अग्निशामकच्या रिक्त पदांच्या सरळसेवा भरती प्रक्रियेत लेखी चाचणी परीक्षेसह इतर आवश्यक अटी-शतींचा आवर्जून समावेश करण्यात यावा, अशी मागणी करतानाच भरतीप्रक्रिया कोणत्याही एजन्सीकडे देण्यात येऊ नये तर अग्निशमन दल प्रशासनाने ही प्रक्रिया पार पाडावी यावर मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनेने जोर दिला आहे.

Fire Department Recruitment 2022 – Eligibility Criteria 

अग्निशमन दल सरळसेवा भरती करिता आवश्यक पात्रता 

अग्निशामक पदाच्या सरळसेवा भरती प्रक्रियेतील लेखी चाचणी परीक्षा यासाठी होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे हा उमेदवार बारावी पास असावा मात्र यासाठी बारावीची ५० टक्क्यांची शैक्षणिक अट नसावी. उंची मर्यादा १७२ सेमीऐवजी पुरुष १६५ आणि स्त्री १५५ सेमी याप्रमाणे गणवेशधारी पोलीस, मनपा सुरक्षारक्षक खाते इत्यादीप्रमाणे असावी. अग्निशमन दलासाठी आवश्यक असलेल्या ड्रायव्हिंग लायसन्स, एसएफटीसी कोर्स, स्विमिंग इत्यादी सर्व प्रमाणपत्रांना सारखे बोनस गुण असावेत. सर्वात महत्वाचे म्हणजे भरती प्रक्रिया कोणत्याची एजन्सीकडे देण्यात येऊ नये. अग्निशामक दल सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

Fire Department Bharti 2022


Fire Department Recruitment 2022

Fire Department Bharti 2022: Considering the need to increase the capacity of the fire brigade, a major decision has been taken to recruit 100 personnel. The commissioner expressed confidence that the capacity of the department will increase in the coming period. Further details are as follows:-

खुशखबर – अग्निशमन दलात 100 पदभरतीचा मोठा निर्णय!!

अग्निशमन दलाची क्षमता वाढविण्याची गरज लक्षात घेऊन 100 पदभरतीचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. येणाऱ्या काळात विभागाची क्षमता वाढेल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.

शहराचा वाढता विस्तार व लोकसंख्या विचारात घेता वाठोडा परिसरातील आरक्षित जागेवर लवकरच अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार आहे. केंद्रामुळे या भागातील नागरिकांना अग्निशमन सेवा उपलब्ध होणार आहे. अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागातर्फे अग्निशमन सेवा सप्ताहाच्या अनुषंगाने गुरुवारी मनपा मुख्यालयातील हिरवळीवर आयोजित अग्निशमन सेवा दिवस कार्यक्रमात ही माहिती देण्यात आली.

 ध्यामातून १३ केंद्रांसाठी ५० कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार.

Table of Contents


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

20 Comments
  1. Vinayak jadhav says

    फार्म कसा भरायचा सर

  2. Geeta Avhad says

    Online apply hot nahi off line kas karaw

  3. Rohan o. Bhitkar says

    सर फॉर्म कसा भरावा लागेल।

  4. MahaBharti says

    अपडेट महाभरती वर येईलच

  5. संकेत चव्हाण says

    कधी चालू होणार आहेत सर ईमेल करा

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड