Maharashtra Civil Services Gazetted Combine Prelims Exam Pattern And Syllabus – 21 जुलै 2024 रोजी ही परीक्षा, काय आहे तयारी?

Maharashtra Civil Services Gazetted Combine Prelims Exam Pattern And Syllabus

महाराष्ट्र नागरी सेवा पूर्व अभ्यासक्रम PDF डाउनलोड करा

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Maharashtra Civil Services Gazetted Combine Prelims Exam Pattern And Syllabus – Maharashtra Public Service Commission (MPSC) has released Updated MPSC Maharashtra Civil Services Gazetted Combine Prelims Exam Pattern And Syllabus 2024 on its official website i.e. @mpsc.gov.in on 07 December 2022. As Per New MPSC Civil Services exam pattern, there is two Paper in Preliminary exam i.e Paper 1 and Paper 2. Maharashtra Civil Services Gazetted Combined Prelims Examination conducted for the recruitment process of all gazetted Group-A and Group-B cadres through competitive examination. In order to get Maximum Scores in any exam, it is very important to Know the exam pattern and syllabus of that exam. In this article, you will get detailed MPSC Nagari Seva Syllabus 2024 for Prelims Exam 2024. Download Maharashtra Civil Services Prelims Syllabus PDF From below Link. Study Maharashtra Nagari Seva Exam Pattern And Syllabus PDF thoroughly

‘एमपीएससी’ तर्फे राज्‍यसेवा परीक्षेच्‍या संरचनेत बदल करण्यात आला असून, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्‍त पूर्व परीक्षेच्‍या माध्यमातून विविध शासकीय सेवांकरिता भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. या भरती प्रक्रियेतील पहिल्‍या टप्यांत पूर्व परीक्षा होत आहे. आयोगातर्फे फेब्रुवारी महिन्‍यात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती

🎯Maharashtra Non Gazetted Services Group B Main New Syllabus – New PDF in Marathi

🧿MPSC New Syllabus And Exam Pattern PDF-Download For All Exam

🧿सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकपूर्व पूर्व, मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम PDF

Maharashtra Civil Services Gazetted Combined Prelims Exam Pattern And Syllabus

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच @mpsc.gov.in वर अपडेटेड MPSC महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित एकत्रित पूर्व परीक्षेचा नमुना आणि अभ्यासक्रम 2024 प्रसिद्ध केला आहे. नवीन MPSC नागरी सेवा प्राथमिक परीक्षा पद्धतीनुसार, दोन पेपर आहेत, पेपर 1 आणि पेपर 2. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित एकत्रित पूर्वपरीक्षा स्पर्धा परीक्षेद्वारे सर्व राजपत्रित गट-अ आणि गट-ब संवर्गांच्या भरती प्रक्रियेसाठी घेण्यात येणार आहे . कोणत्याही परीक्षेत जास्तीत जास्त स्कोअर मिळवण्यासाठी त्या परीक्षेचा पॅटर्न आणि अभ्यासक्रम जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. या लेखात, तुम्हाला प्रिलिम्स परीक्षा 2024 साठी सविस्तर MPSC नागरी सेवा अभ्यासक्रम 2024 मिळेल. खालील लिंकवरून महाराष्ट्र नागरी सेवा पूर्व अभ्यासक्रम PDF डाउनलोड करा. महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम PDF चा सखोल अभ्यास करा. जाहिरात डाउनलोड करा 

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

To Know Latest Changes And Updates in MPSC Exam Click Here

एमपीएससी मोफत मॉक टेस्ट

MPSC Nagari Seva Purv Pariksha 2024

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ करीता दिनांक ०८ मे, २०२४ च्या शुद्धिपत्रकानुसार एकूण ५२४ रिक्त पदांचा समावेश जाहिरातीमध्ये करण्यात आला असून अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यावयाच्या असल्यास त्याबाबतचा विकल्प सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. दरम्यान काही उमेदवारांनी त्यांच्याकडील कुणबी नोंदी च्या आधारे इतर मागासवर्गाचे जात प्रमाणपत्र मिळाल्याचे नमूद करून महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२४ करीता इतर मागास वर्गाचा विकल्प सादर करण्याची विनंती केली होती. त्यास अनुसरून शासनाने, शासन पत्र, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक संकीर्ण २०२४/प्र.क्र.१३७/आरक्षण-०५, दिनांक २८ मे, २०२४ अनुसार दिलेल्या सूचना विचारात घेऊन अराखीव किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी इतर मागास वर्गाचे (OBC) जात प्रमाणपत्र प्राप्त केले असल्यास, अशा उमेदवारांना इतर मागास वर्गाचा (OBC) दावा उपलब्ध करून देण्याचा तसेच सदर प्रवर्गातून नव्याने पात्र ठरलेल्या (अराखीव करीता वयाधिक) उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ दिनांक ०६ जुलै, २०२४ ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच दिनांक २१ जुलै, २०२४ रोजी घेण्यात येईल.

६७३ पदांसाठी भरती प्रक्रिया..

या परीक्षेच्‍या माध्यमातून एकूण ६७३ पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यामध्ये सामान्‍य प्रशासन विभागातील २९५, पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता जलसंपदा, मृद व जलसंधारण विभाग १३०, सार्वजनिक बांधकाम विभाग १५, अन्न व नागरी विभाग ३९, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग १९४ पदांचा समावेश आहे.

ऑक्‍टोबरमध्ये मुख्य परीक्षांचे आयोजन

पूर्व परीक्षेतून पात्रताधारक उमेदवारांची मुख्य परीक्षा ऑक्‍टोबर महिन्‍यात घेतली जाणार आहे. जाहिरातीत नमूद वेळापत्रकानुसार राज्‍यसेवा मुख्य परीक्षा ७ ते ९ ऑक्‍टोबरदरम्‍यान घेतली जाईल.

तर महाराष्ट्र स्‍थापत्‍य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा आणि महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा १४ ऑक्‍टोबरला. निरीक्षक, वैधमापन शास्‍त्र, मुख्य परीक्षा २१ ऑक्‍टोबर आणि अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २८ ऑक्‍टोबर घेण्याचे नियोजित आहे.

राजपत्रित नागरी सेवा परीक्षेचा अभ्यासक्रम

परीक्षा पद्धती :- MPSC Nagri Seva Pariksha Pattern

  • विविध संवर्गांकरीता भरतीप्रक्रिया खालील तीन टप्प्यांमध्ये राबविण्यात येईल :-
    (१) संयुक्त पूर्व परीक्षा
    (२) स्वतंत्र मुख्य परीक्षा
    (३) मुलाखत
  • प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या सर्व संवर्गातील पदभरतीकरीता एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येईल.
  • ज्या संवर्गाच्या पदभरतीसाठी शासनाकडून मागणीपत्र प्राप्त झाले आहे; त्या संवर्गाची पदे जाहिरातीमध्ये नमूद करण्यात येतील.
  • संयुक्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातीस अनुसरून, अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून त्यांच्या अर्हतेच्या आधारे ते जाहिरातीमध्ये नमूद एक किंवा त्यापेक्षा जास्त संवर्गासाठी बसू इच्छितात किंवा कसे याबाबत विकल्प (Option) घेण्यात येईल.

Maharashtra Civil Services Gazetted Combine Prelims Exam Pattern And Syllabus

MPSC Civil Services Prelims Exam Pattern 2024

Paper No. and Code Marks Duration Standard                      Medium Nature of Paper
Paper I

(Compulsory) (514)

200 Two hours Degree Marathi & English Objective Type
Paper II

(Qualifying) (515)

200 Two hours Topic No.(1)to (5) Degree level Topic No.(6) class X level Topic No. (7) class X/XII level

Maharashtra Civil Services Paper I Syllabus 2024

Paper I – (200 marks)
(1)         Current events of state, national and international importance.
(2) History of India and Indian National Movement with some weiyhtaue to Maharashtra
(3) Maharashtra, India and World Geography – Physical, Social, Economic Geography of Maharashtra. India and the World.
(4) India and Maharashtra – Polity and Governance – Constitution, Political System. Panchayati Raj, Urban Governance. Public Policy. Riyhts issues, etc.
(5) Economic and Social Development – Sustainable Development, Poverty. Inclusion. Demographics, Social Sector initiatives, etc.
(6) General issues on Environmental Ecology, Bio-diversity and Climate Change – that do not require

subject specialisation.

(7) General Science.

Maharashtra Civil Services Paper II Syllabus 2024

Paper II -(200 marks)
(1) Comprehension
(2) Interpersonal skills including communication skills.
(3) Logical reasoning and analytical ability.
(4) Decision – making and problem – solving.
(5) General menial ability.
(6) Basic numeracy (numbers and their relations, orders of magnitude, etc.) (Class X level). Data interpretation (Charts, graphs, tables, data sufficiency etc.- Class X level)
(7) Marathi and Lnylish Language Comprehension skills (Class X/XII level)

Note 1 : Questions relating to Marathi and Lnglish Language Comprehension skill of Class X/Xll level (last item in the Syllabus of Paper II) will be tested through passages from Marathi and Lnglish language without providing cross translation thereof in the question paper.

Note 2 : The questions will be of multiple choice, objective type.

Note 3 : It is mandatory for the candidate to appear in both the Papers of Maharashtra Civil Services Gazetted (Prelim) Examination for the purpose of evaluation. Therefore a candidate will not be considered for evaluation in case he / she docs not appear in both the papers of Maharashtra Civil Services Gazetted (Prelim) Examination.

MPSC Nagari Seva Syllabus in Marathi | Maharashtra Civil Services Gazetted Combine Prelims Syllabus in Marathi

एमपीएससी नागरी सेवा परीक्षेच्या रचनेत जून २०२२ मध्ये मूलभूत बदल करण्यात आले. मात्र, हा नवा पॅटर्न २०२५ पासून लागू केला जावा, अशी काही युवकांची मागणी आहे. महाराष्ट्र आणि भारताचे शासन चालविणाऱ्या कर्तबगार अधिकाऱ्यांची निवड करणारी ही नागरी सेवा परीक्षा आहे. निवडल्या गेलेल्या अधिकाऱ्यांची सरासरी सेवा केवळ एक-दोन वर्षे नाही तर साधारण ३० ते ३५ वर्षे असणार आहे.

एमपीएससी नागरी सेवा परीक्षेच्या रचनेत मूलभूत बदल करून ती जवळजवळ पूर्णपणे यूपीएससी नागरी सेवा परीक्षेप्रमाणे करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने साधारण जून २०२२ मध्ये जाहीर केला. हा निर्णय जाहीर करण्यापूर्वी तीन सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली होती. त्या समितीने समाजातले विविध जाणकार, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक अशा सर्वांशी संवाद करून अंतिम निर्णय घेतला. हा निर्णय होऊन आता सहा महिने झाले. मात्र, बदललेल्या पॅटर्ननुसार, मनापासून अभ्यासाला लागण्याऐवजी स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे काही युवक समित्या तयार करून संबंधित अधिकारी, मंत्रिमहोदयांच्या भेटीगाठी घेत आहेत. अर्थात, अशा भेटी घेऊन आपले म्हणणे मांडणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. या युवकांचे म्हणणे आहे की, केलेला बदल योग्य आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षापासून आम्ही जुन्या पॅटर्ननुसार अभ्यास करत होतो, त्यामुळे नवा पॅटर्न आणखी दोन वर्षांनी, म्हणजे २०२५ पासून लागू केला जावा.

खरं तर साधारण २०१४ पूर्वी एमपीएससी परीक्षा सर्वसाधारणपणे खूपीएससीप्रमाणेच होती. विशेषतः मुख्य परीक्षा लेखी निबंधवजा होती. मात्र, तेव्हा एमपीएससीच्या परीक्षा वेळच्यावेळी होत नसत. झालेल्या परीक्षांचे निकाल वेळच्यावेळी लागत नव्हते. सर्वात दुःखाची बाब म्हणजे निवडल्या गेलेल्या युवकांना वेळच्यावेळी नियुक्त्या मिळत नव्हत्या. या सर्व प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीची करण्याचा उपाय आयोगाने सुचवला. पूर्व परीक्षा मुळातच वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीची असते. मुख्य परीक्षादेखील वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीची करणे हा आयोगाने सुचवलेला उपाय आहे. त्याही वेळी आयोगाने अनेकांचे म्हणणे मागवले. 

उद्या ज्याला अधिकारी व्हायचे आहे, त्याची प्रशासन चालवताना पहिली पकड़ सर्व प्रकारची वस्तुनिष्ठ माहिती डेटा यावर हवी. त्यासाठीच वस्तुनिष्ठ स्वरूपाची पूर्व परीक्षा आहे. तो देत असलेले निर्णय, त्याचे वागणे उगीच भावनिक, उथळ किंवा हलक्या कानाचे असता कामा नये. त्याने शांत आणि कणखर चित्ताने समोर येणाच्या सर्व बाजूंची प्रथम नीट माहिती घेत, त्यावर पकड बसवत प्रशासन चालवायचे आहे. म्हणून पूर्व परीक्षा ही ज्ञान आणि महिती प्रभुत्वाची परीक्षा आहे. या परीक्षेचा पुढचा टप्पा आहे ज्ञानावरील प्रभुत्वाची परीक्षा पूर्व परीक्षेतील माहिती आणि मुख्य परीक्षेतील ज्ञान यांच्यातला मुख्य फरक म्हणजे असलेल्या माहितीचा वापर करून अन्वयार्थ लावता येणे, समोर येणाऱ्या मुदयाच्या दोन किंवा त्याहून अधिक बाजू असतात. मन आणि बुद्धी खुली ठेवून सर्व बाजू समजून घेणे, त्यावर स्वतंत्र बुद्धीने विचार करणे, त्याआधारे निःपक्षपातीपणाने एका निर्णयावर येणे आणि झालेली सर्व प्रक्रिया नेमक्या आणि योग्य शब्दांत मांडता येणे हे कौशल्य उद्या ज्याला अधिकारी होण्याची इच्छा आहे, त्याच्याजवळ असणे अत्यावश्यक आहे. त्यासाठीच मुख्य परीक्षा लेखी, निबंधवजा हवी. परीक्षा देणान्याच्या व्यक्तिमत्त्वातील या कौशल्याचा तिथे कस लागायला हवा. परीक्षेचा शेवटचा टप्पा मुलाखत. सध्या मुलाखतीवरून कोणताही वाद सुरू नसल्याने आपण तूर्त तिकडे लक्ष द्यायला नको.

मुख्य परीक्षा लेखी, निबंधवजा करणे आणि ती परीक्षा जवळजवळ संपूर्णपणे यूपीएससीच्या धर्तीवर करण्याचा निर्णय आयोगाने घाईघाईत एका रात्रीत घेतलेला नाही. त्याआधी पुरेशी दीर्घकाळ विचार विनिमयाची प्रक्रिया झाली. सर्व बाजूंचा साकल्याने, साधकबाधक विचार करून जून २०१२ मध्ये आपला निर्णय जाहीर केला. एमपीएससी नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांचे काम आता त्याप्रमाणे अभ्यासाला लागणे! बदललेल्या पॅटर्ननुसार होणारी परीक्षा सप्टेंबर २०२३ मध्ये असल्याने तरुणांना तयारीसाठी पंधरा महिन्यांचा कालावधी उरला आहे. या परीक्षेचा अभ्यास प्रचंड आहे. कितीही केला तरी तो कमी आहे, हे खरे आहेच. मात्र, उद्या ज्याला प्रशासनात दाखल होऊन एकाहून एक अवघड जबाबदाऱ्या आणि काळाची आव्हाने पेलायची आहेत त्याला पंधरा महिन्यांच्या मुदतीच्या काळात सांगितलेल्या नव्या पॅटर्ननुसार अभ्यास करून, समर्थपणे परीक्षा देता आली पाहिजे, देशात वस्तू आणि सेवांवरील विविध कर, त्यातून निर्माण झालेली करविषयक गुंतागुंत, तयार होणारा भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमता वाला उत्तर म्हणून साधारण २००२ पासूनच वस्तू व सेवा कर (जीएसटी) ही संकल्पना मांडण्यात आली. मात्र, अंतिमतः यावर देशाचे मतैक्य होऊन, सप्टेंबर २०१६ मध्ये घटनादुरुस्ती झाली. १ जुलै २०१७ पासून वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी सुरू होईल, अशी घोषणा करण्यात आली. करप्रणालीत आमूलाग्र बदल करणारा हा जगातला सर्वात मोठा, क्रांतिकारी निर्णय आहे. या निर्णयामुळे कर संकलन करणाऱ्या सरकारी विभागांच्या कामकाजाची पद्धत मूलभूत स्वरूपात बदलणार होती. त्यासाठी सप्टेंबर २०१६ ते १ जुलै २०१७ इतकाच कालावधी उपलब्ध होता. अशावेळी यूपीएससीमार्फत निवडले जाणारे आयआरएस अधिकारी आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवडले जाणारे एसटीआय अधिकारी जर म्हणू लागले की, आम्ही गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून एका विशिष्ट पद्धतीनुसार काम करत आहोत, त्यामुळे येणारी नवी करपद्धत आणखी दोन वर्षांनी लांबवा, तर प्रशासन कसे चालेल? आयोगाने जाहीर केलेल्या परीक्षा पद्धतीला सामोरे जाण्यास ज्यांचा विरोध आहे, ते उद्या जेव्हा प्रशासन चालवताना याहून प्रचंड मोठी आव्हाने अंगावर येतील तेव्हा ते कसे निर्णय घेणार?

📚Download Maharashtra Civil Services Gazetted Combine Prelims Exam Pattern And Syllabus 2024 PDF(Dec 2022)

Download Maharashtra Gazetted Civil Services Examination – Scheme (Feb-2023)

1 thought on “Maharashtra Civil Services Gazetted Combine Prelims Exam Pattern And Syllabus – 21 जुलै 2024 रोजी ही परीक्षा, काय आहे तयारी?”

Leave a Comment