JOIN Telegram

List Of Documents For DTP Maharashtra Exam – दस्तऐवज पडताळणी प्रक्रियेदरम्यान मूळ कागदपत्रे सादर करायची यादी

List Of Documents For DTP Maharashtra Exam 2023

List Of Documents For DTP Maharashtra Exam : Candidates’ applications will be accepted online and while applying, it will be necessary and mandatory to upload educational certificates / other certificates on the website. It is necessary and mandatory for the candidate to carefully fill complete correct and true information as per their eligibility in the online application. In case of any mistakes or omissions while filling the application form online or if the application is rejected at any stage of recruitment due to giving misleading information, it will be the responsibility of the concerned candidate. Any form of complaint of the candidate will not be considered in this regard. The information filled in the online application cannot be changed after submission of the application. So candidates should fill the online application information carefully. Fill the online application after checking all the conditions mentioned in the advertisement, educational qualification and reservation as per demand, age relaxation etc.

उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असूनअर्ज करताना, शैक्षणिक प्रमाणपत्रे / अन्य प्रमाणपत्रे संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक व बंधनकारक राहील. ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने त्यांच्या पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण अचूक व खरी माहिती भरणे आवश्यक व बंधनकारक आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहिल्यास किंवा दिशाभूल करणारी माहिती दिली गेल्यामुळे भरतीच्या कोणत्याही टप्प्या वर अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राही ल. याबाबत उमेदवाराची कसल्याही स्वरुपाची तक्रार विचारात घेतली जाणार नाही. ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती अर्ज सादर केल्यानंतर बदलता येणार नाही . त्यामुळे ऑनलाईन अर्जाची माहिती उमेदवारांनी ळजीपूर्वक भरावी. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या सर्व अटी, शैक्षणिक अर्हता व मागणीनुसार आरक्षण, वयोमर्यादा शिथिलीकरण वगैरेची पात्रता तपासूनच ऑनलाईन अर्ज भरावा.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

Important Document Required For DTP Peaon Exam 2023

निवड झालेल्या उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणी वेळी, पडताळणी समितीकडे खालील मूळ प्रमाणपत्रांसह त्याच्या साक्षांकित छायाप्रती दोन प्रतीत सादर करणे आवश्यक व बंधनकारक राहील :-
i) शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र शासनमान्य संस्थेने निर्गमित केलेले प्रमाणपत्र व गुणपत्रिका –
ii) अधिवास प्रमाण पत्र महाराष्ट्र राज्यात वास्तव्य असल्याबाबतचे प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेले प्रमाणपत्र महसूल विभागाच्या सक्षम
iii)जन्मतारखेबाबत जन्म नोंदीचा दाखला किंवा माध्यमिक शालांत परिक्षेचे प्रमाणपत्र / एस. एस. सी. गुणपत्रिका व प्रमाणपत्र
iv) जात प्रमाणपत्र – राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेले प्रमाणपत्र v) जात वैधता प्रमाणपत्र (असल्यास) जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र vi) नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र असे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल अशा प्रवर्गातील उमेदवारांनी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे सध्या वैध असलेले सक्षम प्राधिकारी यांचे
कडील दि.३१.०३.२०२४ पर्यंत वैद्य असणारे प्रमाणपत्र. vii) लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र नमुना अ मध्ये इंग्रजी / मराठी मध्ये सादर करणे. –
vili) खेळाडूबाबतचे प्रमाणपत्र – योग्य त्या क्रीडाप्राधिकरणाने / सक्षम प्राधिकारी यांचेकडील पडताळणी करुन निर्गमित केलेले क्रीडा प्रमाणपत्र.
ix) आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य असल्याबाबतचे पत्र संबंधित जिल्हास्तरीय समितीने निर्गमित केलेले पत्र.
x) दिव्यांगाचे प्रमाणपत्र – संबंधित जिल्हा शल्य चिकित्सकाने निर्गमित केलेले प्रमाणपत्र.
xi) आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र – संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेले दि३१.०३.२०२४पर्यंत वैद्य असणारे प्रमाणपत्र.
xii) माजी सैनिक/प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त/पदवीधर अंशकालीन कर्मचारी – संबंधीत सक्षम प्राधिकारी यांचेकडील प्रमाणपत्र.

याव्यतिरिक्त वेळोवेळी निर्गमित झालेल्या शासन आदेशानुसार अन्य प्रमाणपत्रांची आवश्यकता भासल्यास ती पुरविण्याची जबाबदारी संबंधित उमेदवारावर राहील, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

  • विहित वयोमर्यादेतील शासकीय, निमशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज त्यां चे कार्यालय प्रमुखांच्या मान्यतेने विहित मार्गाने विहित मुदतीत अधि कृत संकेतस्थळावरुन ऑनलाईन भरणे व अशा परवानगीची प्रत उमेदवारांकडे असणे आवश्यक व बंधनकारक आहे. याबाबतची कागदपत्रे छाननीच्या वेळी सादर करावीत.
  • उमेदवारांनी त्यांच्या उमेदवारीच्या निवडी संबंधात कोणत्याही प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याची उमेदवारी अपात्र ठरविली जाईल. तसेच नियुक्तीसाठी विहित करण्यात आलेल्या अर्हताविषयक अटी पूर्ण न करणाऱ्या अथवा कोणत्याही प्रकारे गैरवर्तणूक / गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारा स कोणत्याही टप्प्यावर निवडीसाठी अपात्र ठरविण्यात येईल आणि / किंवा सदर उमेदवार इतर योग्य अशा कारवाईस पात्र असेल.

DTP Maharashtra Planning Assistant Document List

List Of Documents For DTP Maharashtra Exam 2023: Recently 177 vacancies have been announced for Planning Assistant in the Department of Town Planning and Valuation Maharashtra. Candidates planning to apply must clear Written Online Exam, syllabus, and exam pattern for DTP Urban Maharashtra Exam 2023 is already Published. Students who will be selected for DTP PA Posts will have to submit Original Documents During DTP PA Document Verification Process 2023. So here in this article, you will get all information related to the List Of Documents For DTP Maharashtra Exam 2023. Candidates can download the Documents Required FOR DTP Maharashtra PA Exam 2023 through Below Link:

DTP Maharashtra PA Exam 2023

नुकत्याच महाराष्ट्राच्या नगररचना आणि मूल्यमापन विभागात नियोजन सहाय्यकाच्या 177 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. अर्ज करण्याची योजना आखत असलेल्या उमेदवारांनी DTP अर्बन महाराष्ट्र परीक्षा २०२३ साठी लिखित ऑनलाइन परीक्षा, अभ्यासक्रम आणि परीक्षेचा नमुना जाणून घेणे महत्वाचे आहे जे आधीच महाभरती एक्सामला प्रकाशित करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांना DTP PA पदांसाठी निवडले जाईल त्यांना DTP PA दस्तऐवज पडताळणी प्रक्रियेदरम्यान मूळ कागदपत्रे सादर करावी लागतील. त्यामुळे येथे या लेखात तुम्हाला DTP महाराष्ट्र परीक्षा २०२३ साठी कागदपत्रांच्या यादीशी संबंधित सर्व माहिती मिळेल. उमेदवार कागदपत्रे डाउनलोड करू शकतात.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

List Of Documents Required For DTP Maharashtra Exam 2023

२२. निवड झालेल्या उमेदवारांनी कागदपत्रे छाननीच्या वेळी, पडताळणी समितीकडे खालील मूळ प्रमाणपत्रांसह त्याच्या साक्षांकित छायाप्रती दोन प्रतीत सादर करणे आवश्यक व बंधनकारक राहील :-
i. शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र – शासनमान्य संस्थेने निर्गमित केलेले प्रमाणपत्र
ii. अनुभव प्रमाणपत्र (असल्यास) – शासन / खाजगी संस्थेने निर्गमित केलेले प्रमाणपत्र
iii.अधिवास प्रमाणपत्र – महाराष्ट्र राज्यात वास्तव्य असल्याबाबतचे महसूल विभागाच्या सक्षम प्राधिकाऱ्याने – निर्गमित केलेले प्रमाणपत्र
iv. जन्मतारखेबाबत जन्म नोंदीचा दाखला किंवा माध्यमिक शालांत परिक्षेचे प्रमाणपत्र / एस.एस.सी. गुणपत्रिका व प्रमाणपत्र –
V. जात प्रमाणपत्र राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेले प्रमाणपत्र –
vi.जात वैधता प्रमाणपत्र (असल्यास) – जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र
vii. नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र खुल्या प्रवर्गातील महिला तसेच असे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल अशा प्रवर्गातील उमेदवारांनी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे सध्या वैध असलेले सक्षम प्राधिका-याकडील सन २०२१ २०२२ चे प्रमाणपत्र
viii. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र – विवाहित उमेदवारांसाठी नमुना-अ मध्ये सादर करणे.
ix. खेळाडूबाबतचे प्रमाणपत्र – योग्य त्या क्रीडा प्राधिकरणाने निर्गमित केलेले क्रीडा प्रमाणपत्र
X. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य असल्याबाबतचे पत्र संबंधित जिल्हास्तरीय समितीने निर्गमित केलेले – पत्र.

xi. दिव्यांगाचे प्रमाणपत्र – Department of Town Planning PWD Ceritificate

xii. संबंधित जिल्हा शल्य चिकित्सकाने निर्गमित केलेले प्रमाणपत्र अनाथ प्रमाणपत्र

xiii. महिला व बाल विकास विभागाच्या सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेले प्रमाणपत्र आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र – संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेले प्रमाणपत्र याव्यतिरिक्त वेळोवेळी निर्गमित झालेल्या शासन आदेशानुसार अन्य प्रमाणपत्रांची आवश्यकता भासल्यास ती पुरविण्याची जबाबदारी संबंधित उमेदवारावर राहील, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
२३. विहित वयोमर्यादेतील शासकीय, निमशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज त्यांचे कार्यालय प्रमुखांच्या मान्यतेने विहित मार्गाने विहित मुदतीत अधिकृत संकेतस्थळावरुन ऑनलाईन भरणे व अशा परवानगीची प्रत उमेदवारांकडे असणे आवश्यक व बंधनकारक आहे. याबाबतची कागदपत्रे छाननीच्या वेळी सादर करावीत.
२४.उमेदवारांनी त्यांच्या उमेदवारीच्या निवडी संबंधात कोणत्याही प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याची उमेदवारी अपात्र ठरविली जाईल. तसेच नियुक्तीसाठी विहित करण्यात आलेल्या अर्हताविषयक अटी पूर्ण न करणाऱ्या अथवा कोणत्याही प्रकारे गैरवर्तणूक / गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारास कोणत्याही टप्प्यावर निवडीसाठी अपात्र ठरविण्यात येईल आणि / किंवा सदर उमेदवार इतर योग्य अशा कारवाईस पात्र असेल.


test99

Leave a Comment

Available for Amazon Prime
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
कॉन्टेस्ट
अँप डाउनलोड